Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001
नागपुर में देवेंद्र फडणवीस की खास मुलाकात: जनता के सवालों के साथ रैपिड फायर
AKAMAR KANE
Jan 07, 2026 06:30:16
kolhapur, Maharashtra
नागपूर तर्री पोहा with देवाभाऊ भारत गणेशपुरे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत नागपुरी तर्री पोहा आस्वाद घेत देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता स्वागत लॉन येथे तर्री पोहा with देवाभाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रॅपिड फायर राउंडमध्ये जनतेच्या प्रश्नाचे उत्तर देणार नागपुरातील प्रतिष्ठित नागरिकांनाही विशेष निमंत्रण
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Jan 08, 2026 04:49:57
kolhapur, Maharashtra:नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजप और शिवसेनेच्या युतीमध्ये शिवसेनेला आठ जागा मिळाल्याचे जाहीर झाले असले तरी प्रत्यक्षात मात्र सहाच जागेवर शिवसेनेचा धनुष्यबाण निवडणूक मैदानात आहे युतीमध्ये शिवसेनेची उमेदवारी मिळालेल्या दोन उमेदवारांनी भाजपचा एबी फॉर्म जोडल्याने त्यांना कमळ निवडणूक चिन्ह मिळाले आहे... भाजप शिवसेनेत युतीवरून अनेक बैठका झाल्या, रस्सीखेच झाली.. अखेर आठ जागांवर शिवसेनेला समाधान मानावं लागलं. त्यातही दोन उमेदवारांनी त्यांच्या अर्जासह भाजपचा एबी फॉर्म दिलाने प्रत्यक्षात सहाच जागी शिवसेनेचे उमेदवार धनुष्यावर लढत आहे.. प्रभाग 24 च्या दुर्गेश्वरी कोसरे आणि प्रभाग 7 च्या मीनल तरारे या शिवसेनाच्या कोट्यातून उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांनी शिवसेनेचा एबी फॉर्म न जोडता भाजपचा एबी फॉर्म जोडल्याने त्यांना भाजपचे कमळ चिन्ह मिळाले आहे त्यामुळे आता नागपूर महानगरपालिकेच्या 151 जागांपैकी 145 ठिकाणी कमळ चिन्हावर उमेदवार आहेत तर 6 ठिकाणी धनुष्यबाण चिन्ह सह उमेदवार आहे
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 08, 2026 02:46:15
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राजकीय वर्चस्वातून एमआयएममध्ये भडका, ५० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगरात प्रभाग क्रमांक १३ आणि १४ मध्ये एमआयएमची पदयात्रा सुरू असताना जिन्सी चौकात एमआयएमचे आजी माजी कार्यकर्ते आमनेसामने आले, त्यात काही  काँग्रेस कार्यकर्ते ही सहभागी झाले  या वेळी झालेल्या राड्यामध्ये एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.  या घटनेनंतर इम्तियाज यांनी हा हल्ला भाजप आणि शिवसेनेने घडवून आणल्याचा आरोप केला आहे, तर काँग्रेस उमेदवार कलीम कुरेशी यांनी हा एमआयएममधील अंतर्गत वादाचा परिणाम असल्याचे म्हटले आहे, इम्तियाज जलील यांची रॅली जिन्सी चौकात पोहोचली असता समोरून काँग्रेसच्या उमेदवारांची रॅली आली. दोन्ही वाजूंच्या कार्यकत्यांमध्ये सुरुवातीला घोषणाबाजी झाली, ज्याचे रूपांतर नंतर शिवीगाळ आणि अंडी भिरकावण्यामध्ये झाले.  जिन्सी पोलिस ठाण्यापासून अवघ्या १०० फुटांवर हा प्रकार घडला. जमावाने इम्तियाज यांच्या गाडीवर हल्ला चढवून धक्काबुक्की केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अखेर लाठीमार केला आणि जमावाला पांगवले. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात कलीम कुरेशी आणि इतर ५० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय...
0
comment0
Report
KRKAPIL RAUT
Jan 07, 2026 13:56:39
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 07, 2026 12:14:28
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर में आज एमआयएम पक्षात चांगलाच राडा झाला इम्तियाज जलील यांच्या बायजी पुरा भागात रॅली सुरू असताना एमआयएमचे नाराज उमेदवार आमने सामने आले हाणामारी झाली पोलिसांनी लाठीचार्ज केला पाहुयात काय आहे प्रकार एमआयएम पक्षात आजी माजी कार्यकर्त्यांत राडा इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला गाडी मागे कार्यकर्ते धावले एमआयएम च्या उमेदवारांना मारहाणा दोन गट भिडले इम्तियाज जलील यांच्या रॅली मध्ये आज हा असा राडा अनुभवायला मिळाला इम्तियाज जलील त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज बायजी पुरा भागात रैली करत होते त्या वेळी त्याना काळे झेंडे दाखवण्यात आले त्यानंतर इम्तियाज यांनी रैली चा मार्ग बदलला त्यानंतर जिन्सी भागात रॅली आली तिथं एमआयएम चे नाराज कार्यकर्ते उभे होते रॅली पाहताच ते घोषणाबाजी करायला लागले आणि आजी माजी कार्यकर्ते भिडले परिस्थिती हाताबाहेर जाताच पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि कार्यकर्त्यांना पांगवले त्याच वेळी इम्तियाज त्यांच्या गाडीत तिथून निघत असताना त्यांच्या गाडीवर काही लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यातून इम्तियाज कसे ते निसटले दरम्यान हा सगळा राडा कलीम कुरेशी च्या गटाने केल्याचा आरोप एमआयएम कार्यकर्त्यांनी केला तर हा जुन्या एमआयएम कार्यकर्त्यांचा उद्रेक असल्याचा नाराज गटाचे कलीम कुरेशी यांचे म्हणणे आहे ... इम्तियाज जलील,एमआयएम उमेदवार इम्तियाज जलील एक नंबरचा खोटारडा माणूस असल्याचा टोला या सगळ्यावरून पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी लावलय महापालिका निवडणुक प्रचारासाठी अखेरचे काही दिवस उरले, त्या मध्ये एमआयएम च्या नाराजांमध्ये आणि विद्यमान उमेदवारांमध्ये आता चांगली जुंपली आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्नही निर्माण होऊ शकतो पोलिसांसाठी मोठा आव्हान असणार आहे ओवेसी या सगळ्यांची समजूत घालतील असा दावा एमआयएम पक्ष करत असला तरी या राड्यानंतर पक्षाला अस्तित्व टिकवण्याचं एक मोठा आव्हान निर्माण झालंय विशाल करोले छत्रपती संभाजी नगर
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Jan 07, 2026 11:28:37
Latur, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील पॉइंटर लातूरने खूप मोठे नेतृत्व दिले.... स्व शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी नगराध्यक्ष पदापासून केंद्रीय मंत्री पदापर्यंत प्रवास ..... माजी मुख्यमंत्री स्व. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे एक नाव... माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लातूरला एक वेगळी ओळख दिली... महाराष्ट्राच्या जडण घडणीत ज्यांचा वाटा आहे...त्यातील एक विलासराव देशमुख... दोन दिवसांपूर्वी भाजप अध्यक्षांनी बोलताना एक विधान केले.... काँग्रेस सोबत आमची लढाई आसली तरी आम्हाला विलासराव देशमुख यांच्याबद्दल आदर आहे... स्व गोपीनाथ मुंडे यांची लातूर ही कर्मभूमी नेतृत्व तयार करणारी ही भूमी आहे... विधानसभा निवडणुकीत थोडक्यात अर्चनाताईंचा पराभव झाला...ती कसर महापालिका निवडणुकीत भरून काढा... लातूरला एकवेळी रेल्वेने पाणी आणावे लागले... ती वेळ पुन्हा येऊ नये यासाठी आम्हाला काम करायचे आहे.... महापालिका निवडणुकांनंतर पाणीपुरवठ्याच्या दुसऱ्या टप्प्याला आम्ही मान्यता देणार.... घनकचऱ्यावर प्रक्रिया करून आम्ही खत निर्मिती करतोय... लातूरला एक मॉडेल शहर म्हणून कार्य केले पाहिजे..ही विनंती... लातूरच्या जिल्हा रुग्णालयाच्या विषय सोडविला...लातुरात अत्याधुनिक रुग्णालय निर्मिती करण्यात येईल... यात सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणार... प्रत्येक व्यक्तीला पाच लाखांपर्यंत २४০० आजारांवर मोफत उपचार करण्याचा सुविधा उपलब्ध केली... लातूरमध्ये वाहतुकीच्या कोंडीची समस्या आहे... छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभिकरण सौंदर्यीकरण करण्याचे काम आम्ही करू.... लातूरसाठी नवीन रिंगरोड करण्याचा प्रस्ताव गडकरी साहेबांकडे आहे तोही करू लातूरला आधुनिक करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे... पुढच्या चार ते पाच महिन्यात लिंगायत समाजाच्या रुद्रभूमीचा विषय मार्गी लावू... मागच्या काळात लातूरला रेल्वे कोच फॅक्टरी दिली... वंदे भारत ट्रेनची निर्मिती तिथे होत आहे.... या फॅक्टरी मुले किमान दहा हजार तरुणांना रोजगार मिळेल... समृद्धी महामार्गामुळे राज्यात नवीन औद्योगिक क्षेत्र निर्माण झाले.... मॅग्नेट तयार झाले... या महामार्गामुळे महामार्ग शेजारील जिल्ह्याचा विकास होत आहे... लातूरच्या औद्योगिक प्रगतीचा मार्ग लातूर ते मुंबई हा महामार्ग तयार केला आहे... लातूरचा विकास हा आमचे एकमेव ध्येय... महापालिकेच्या माध्यमातून ही काम करायचे आहे... Imp....महापालिका आवारात शिवराज पाटील चाकूरकर यांचा पुतळा उभारण्याची मागणी पूर्ण करू.... प्रस्ताव पाठवा राज्य सरकार पुतळा उभारणीचा खर्च करणार.... आश्वासन पूर्ण करणारे आम्ही नेते आहोत.... विधानसभेत बहुमत मिळाल्यानंतर विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली.... जोपर्यंत देवभाऊ आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही... महाराष्ट्रात आतापर्यंत ५० लाख लखपती दीदी केल्यात....आता एक कोटी करण्याचे लक्ष्य पुढच्या वेळी लातूरला आल्यावर नेतेांना विचारणार किती लखपती दीदी झाल्या.... आम्हाला कुणावर टीका करायची नाही....कारण आम्ही काम केले...सांगायले कामे आहेत....योजना आहेत आणि व्हिजन आहे....
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 07, 2026 07:58:22
0
comment0
Report
Advertisement
Back to top