Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur444001
नागपुर में भाजप उम्मीदवारों की भारी मुलाकात, चयन प्रक्रिया तेज
AKAMAR KANE
Dec 16, 2025 07:45:35
Nagpur, Maharashtra
नागपूर नागपुरात भाजपच्या इच्छुकांच्या मुलाखती सुरू महापालिकेच्या 151 जागसाठी भाजपचे 1489 इच्छुक मुलाखतीला... महायुती मित्र पक्षासाठी गेल्यावेळेस जेवढी ताकत होती तेवढ्याच जागा सोडण्यास शहर भाजपा तयार... ज्याची जेवढी क्षमता तेवढ्याच जागा सोडू गेल्या वेळेस शिवसेनाच्या नागपुरात दोन जागा होत्या तर राष्ट्रवादी एक जागा जिंकली होती ( राष्ट्रवादीची एक जागा अपक्ष म्हणून होती... आणि शिवसेनेचे दोन्ही जिंकलेले उबाठामध्ये आहे ) प्रत्येक जागेसाठी भाजपकडून सरासरी 9 ते 10 उमेदवार... काही ठिकाणी एका जागेसाठी 30 इच्छुकसुद्धा आहे युवा चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले शहर कार्यालय मंगलम इमारतीतील भाजप कार्यालयात मुलाखती सुरू आहेत.... भाजपाने तीन सर्वे केले आहे.. शहराध्यक्ष दया शंकर तिवारी यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी काणे यांनी ----- बाईट दयाशंकर तिवारी, शहराध्यक्ष, भाजप
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Dec 16, 2025 13:51:18
Kalyan, Maharashtra:कल्याण-डोंबिवलीत भाजप-शिवसेना पुन्हा वाद पेटला; पक्षप्रवेशावरून भाजपचा शिंदे गटावर थेट आक्षेप. भाजपच्या दोन माजी नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश दिल्याचा भाजपचा आरोप. माजी नगरसेवक अरुण गीध आणि माजी नगरसेविका वंदना गीध हे भाजपचे सदस्य असून त्यांना उमेदवारी अर्ज देण्यात येणार असताना शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्यात आल्याचा भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांचा दावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण मधील उबाठा गटाच्या माजी नगरसेविका उर्मिला गोसावी, काँग्रेसचे माजी नगरसेवक अरुण गीध व माजी नगरसेविका वंदना गीध बहुजन समाज पक्षाच्या माजी नगरसेविका सोनी अहिरे यांचा प्रवेश झाला. परंतु या पक्षप्रवेशची अधिकृत माहिती शिवसेनेकडून दिली गेली. मात्र दोन माजी नगरसेवक हे आधीपासूनच भाजपचे सदस्य असल्याचा दावा भाजपने केला. नरेंद्र पवार यांनी स्पष्ट केलं की भाजप-शिवसेना यांच्यात एक अलिखित करार झाला आहे. करारानुसार भाजपने शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रवेश देऊ नये, असं ठरलं आहे. त्यामुळे प्रत्यक्षात प्रत्यक्ष भाजपचे अधिकृत सदस्य असल्याचा दावा पवार यांनी केला. भाजपकडून संबंधित नगरसेवकांना तिकीट जाहीर झाले होते. तरीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला, हे चुकीचं असल्याचं पवार म्हणाले. "नियम ठरवले जातात..." अशी टीका त्यांनी केली. भाजपमध्ये शिवसेनेतील अनेक नगरसेवक प्रवेश इच्छुक असूनही युती असल्याने कोणालाही प्रवेश दिलेला नाही. अम्बरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली, कल्याण परिसरातील शिवसेना नगरसेवक भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचा दावाही पवार यांनी केला. देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांनी युती होणार असल्याचं स्पष्ट केलं असताना अशी घटना युती विरोधात असल्याचं त्यांनी नमूद केलं. एकीकडे युतीच्या चर्चा, दुसरीकडे भाजपच्या पाठीमागे खंजीर खुपसण्याचं काम सुरू आहे, असा आरोप भाजपच्या माजी नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश देणं योग्य नसल्याचं पवार यांनी ठामपणे सांगितलं. या प्रकरणाची तक्रार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली गेली. मात्र या पक्षप्रवेशानंतर पुन्हा एकदा भाजप-शिवसेना मधला वाद चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळत आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 16, 2025 13:20:25
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:वाल्मीक कराड एक याच्या जामीन अर्जावर औरंगाबाद हायकोर्टात सुनावणी सुरू आहे, त्यात सरकारी पक्ष आणि देशमुख कुटुंबीयांच्या वकिलाने वाल्मीक कराड यांना जामीन मिळू नये अशा पद्धतीचे अपील केलं ही संघटित गुन्हेगारी आहे केलेलं कृत्य हीन आहे असे मुद्दे यावेळी कोर्टात मांडण्यात आले... पुढील सुनावणी उद्या आहे त्यावेळी जामीन मिळेल की नाही याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे... कोर्टात मांडलेले मुद्दे वाल्मीक कराड हा संघटित गुन्हेगारी चालवणारा व्यक्ती आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता जामीन देऊ नये. संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम सरकारी वकिलांनी कोर्टासमोर मांडला. कृष्णा आंधळे यांनी मारहाण करतानाचा व्हाट्सअप व्हिडिओ कॉल सुदर्शन घुलेला केला होता. त्याच्या अपडेट सुदर्शन घुले हा वाल्मीक कराडला देत होता असे वकिलांनी सांगितले. व्हाट्सअप कॉल केल्यानंतर तो डिलीट करण्यात आला. फॉरेन्सिक तपासणीनंतर तो पुन्हा रिकव्हर करून हस्तगत केला. सोबतच जे व्हाट्सअप कॉल केले होते. त्याच्या आवाज आणि वाल्मीक कराडचा आवाज एक असल्याचं फॉरेन्‍सिक तपासणीत एकच असल्याचे सांगितले. वाल्मीक कराड हा त्या परिसरामध्ये एक गुन्हेगारी टोळी चालवत असल्याचीही कोर्टासमोर सरकारी वकील आणि निदर्शनास आणून दिले. आवादा कंपनीच्या मॅनेजरला धमकी दिल्याचा मेलचाही उल्लेख करण्यात आला. कंपनीच्या तिथल्या मॅनेजरने स्थानिक राजकारण्याकडून आपल्याला धमकी येत असल्याचा मेल त्यांनी वरिष्ठांना केला होता. त्याचेही कागदपत्रे सादर करण्यात आले. वाल्मीक कराड आणि त्यांच्या टोळीकडून मला धोका असल्याचा फोन वरूनसरपंच संतोष देशमुख यांनी मुलगी वैभवी हिला केलेल्या शेवटच्या सवांदाचा उल्लेख कोर्टासमोर केला. दरम्यान आमचा न्यायालयावर विश्वास आहे निष्पाप माणसाला संपवले आम्हाला न्याय हवाय, आरोपी सुटणार आहे हत्तीवर मिरवणूक काढणार आहे अशी अफवा जी लोक करताय त्यावर सीएम साहेबांनी कारवाई करावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली..
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 16, 2025 12:36:53
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 16, 2025 12:19:11
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार किशनचंद तनवाणी नाराज असल्याचा चर्चा आहेत त्यांच्या भावासाठी आणि मुलांसाठी त्यांना गुलमंडी प्रभागातून तिकीट हवे होते मात्र त्या ठिकाणी आमदार प्रदीप जैस्वाल यांचा मुलगा ऋषी जैस्वाल यानेही तिकिटांची मागणी केलीय त्याचे पारडे जड आहे त्यामुळं तनवाणी नाराज असल्याची चर्चा आहे याबाबत त्यांनी आज पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि नाराजी दर्शवली... महत्वपूर्ण म्हणजे आज तनवाणी यांनी जागा वाटप बैठकीला ही दांडी मारली, ठाकरे गट सोडून आम्ही शिवसेनेत आल्यावर अनेक कार्यकर्ते आमच्यासोबत पक्षात आले. पण आम्हाला आता कुणीही पक्षात विचारत नाही. काही कार्यक्रम असल्यास आम्हाला निरोप मिळत नाही. आमचं काही चुकत असेल तर आम्हाला कार्यमुक्त करा असं थेट शिरसाट यांच्याकडे सांगितले असल्याचे तनवाणी म्हणाले आहे. त्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर तनवाणी यांच्या नाराजीचा फटका शिवसेनेला बसू शकतो...
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 16, 2025 12:18:48
Pandharpur, Maharashtra:उद्धव आणि राज या ठाकरे बांधवांना एकत्र यायला 12 वर्ष उशीर झाला. आता पर्यंत प्रतिमा निर्माण करायला ते कमी पडले. सगळे पाणी वाहून गेल्यावर जनता आता प्रतिसाद देणार नाही. शिवसेनेचे माजी आमदार शहाजी पाटील यांनी ठाकरे एकत्र येण्याचा परिणाम होणार नसल्याचे सांगितले ठाकरे बंधूांनी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यावर निवडणुक काळात मराठी बांधवांना साद घातली. मराठी बांधव वर झालेला अन्याय , गिरणी कामगार वर झालेला अन्याय यावर कधी हात घातला नाही. मनसेने मराठी मुद्दा वर हाणामाऱ्या केल्या. अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी ठोस निर्णय मराठी बांधवासाठी घेतले नाहीत प्रभाग प्रमाणे मराठी बांधवांचा मुद्दा आणि दुसऱ्या प्रभागात वेगळे मुद्दे घ्यायचे असे काम ठाकरे बंधूंचे सुरू आहे. महा विकास आघाडीचा हाच डावपेच सुरू आहे. दोन्ही ठाकरे बंधू यांनी मराठी भागात तो मुद्दा लावून धरायचा. काँग्रेसने मुस्लिम आणि मागासवर्गीय मतांना घेऊन निवडणुका खेळायच्या. पण हे चालणार नाही. ठाकरे बंधुंना एकत्र येण्यास 12 वर्ष उशीर झाला. सगळे पाणी वाहून गेल्यावर एकत्र येण्याला जनतेने प्रतिसाद दिला नाही. उशीर झाल्याचा फटाका बसणार आहे. प्रतिमा निर्माण करायला दोन्ही बंधू कमी पडले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले तेव्हा पासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.yांचा काळात मुंबई भव्य दिव्य गतिमान विकास झाला आहे. सुसज्ज सुरक्षित शहर होत आहे. ते काम मुंबई मधील जनतेला आवडले आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 16, 2025 11:59:49
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 16, 2025 11:57:44
Baramati, Maharashtra:इंदापूर तालुक्यात पत्रकार असल्याचे भासवून हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा प्रकार उघड…दोन्ही तोतया पत्रकारांना अटक… ANCHOR — इंदापूर तालुक्यात पत्रकार असल्याचे भासवून हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी उकळणाऱ्या दोन तोतया पत्रकारांवर इंदापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गागरगाव येथील 96 कट्टा हॉटेलचे चालक नितीन गोरख तळेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी स्वतःला पुण्यातील मोठे पत्रकार असल्याचे सांगून सातत्याने धमक्या देत होते. व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर पैसा द्या.. अन्यथा बदनामीकारक बातम्या प्रसिद्ध करू अशी धमकी देत आरोपींनी फोन-पे आणि रोख स्वरूपात पैसे उकळले. पुढे दरमहा मोठ्या रकमेची मागणी सुरू झाल्याने तक्रारदार मानसिक तणावात सापडले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत इंदापूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले असून, यापूर्वीही त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे...
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 16, 2025 11:46:01
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Dec 16, 2025 11:07:03
Nashik, Maharashtra:नाशिक - अखिल भारतीय संत समितीची नाशिकमध्ये राष्ट्रीय चिंतन बैठक - बैठकीला देशभरातील साधू महंत उपस्थित - अखिल भारतीय संत समितीचे महत्त्वाचे साधु महंत यांच्यात झाली बैठक - कुंभमेळा और धर्म प्रचार कार्याच्या अनुषंगाने नाशिक मध्ये बैठक - संत समितीचे अध्यक्ष कैवल्याचार्य आचार्य महाराज,स्वामी जितेंद्र आनंद सरस्वती, मनमोहन दास जी महाराज यांच्यासह देशभरातून आलेलं साधू महंत आणि महामंत्री उपस्थित जितेंद्रानंद सरस्वती महाराज बाईट पॉइंट्स - नाशिकमध्ये अखिल भारतीय संत समितीची मोठी मागणी - तपोवन क्षेत्र तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्याची मागणी - त्र्यंबकेश्वर आणि तपोवन परिसरात मांस आणि मद्य विक्री पूर्णतः बंद करण्याची मागणी - साधू संतांवर टीका केल्यास थेट पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा इशारा - झाडांच्या आडून विरोध करणाऱ्या लोकांच्या चौकशीची ही मागणी - विरोध करणाऱ्यांना विदेशी फंडिंग होत असल्याचा अखिल भारतीय संत समितीचा आरोप
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 16, 2025 10:55:10
Pune, Maharashtra:राज्यातील महानगरपालिकांची बिगुल वाजला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू होत असल्याने इच्छुक उमेदवारांसह नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या तीन-तीन पक्षांमुळे रंगत वाढते आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेत 2003 साली स्थापनेपासून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप यांचे महापौर राहिले आहेत. 2018-23 सत्तेवर असलेल्या महापौरांमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रभाव दिसत होते; 2018 च्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील घटकांचे परस्पर बळ कमी-जास्त झाले. अहिल्यानगर महानगरपालिका (2018-23) एकूण नगरसेवक संख्या 68 होती. भाजपा 14, शिवसेना 24, राष्ट्रवादी 18, काँग्रेस 5, बसपा 4, सपा 1, इतर 2 नगरसेवक राहिले. निवडणुकीनंतर पक्षीय बलाबलात बदल झाले असून सध्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर पक्षांचे गणित दृष्टीने महाविकास आघाडीतील आणि आघाडीच्या स्थितीवर परिणाम होणार आहे. निवडणूक कार्यक्रम लागण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा समाचार घेतला जात आहे. आगामी दिवसांत प्रत्यक्ष वर्चस्व कोण ठरवतो, तेच स्पष्ट होईल.
0
comment0
Report
Advertisement
Back to top