Back
सरकार के GR बदलाव से किसानों का संकट बढ़ा, दिवाली पर आशंकाएं बढ़ीं
AKAMAR KANE
Oct 17, 2025 05:47:29
Nagpur, Maharashtra
Ngp Wadetiwar byte
live u ने फीड पाठवले
------------
विजय वडेटीवार बाईट
नागपूर
विजय वडेट्टीवार
On शिवाजीराव कर्डीले निधन -
- शिवाजीराव कर्डिले यांच्याबरोबर आम्ही अनेक वर्ष सभागृहात काम केलं, जनतेच्या प्रश्नांना घेऊन आंदोलन करणारे नेते म्हणून ओळख होती, आज त्यांचा निधन झाला आहे. मी माझ्यातर्फे आणि पक्षातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो
On शेतकरी मदत जीआर
- आज या शासनाची बनवाबनवी आपल्यापुढे मांडतो आहे.
- नऊ तारखेला जीआर काढण्यात आला अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी, त्यात 31 हजार 628 कोटींचा सहभाग करण्यात आला
- या दुरुस्तीत 268 तालुक्यांपैकी 253 तालुके हे पूर्णतः नुकसानग्रस्त म्हणून त्यामध्ये समावेश करण्यात आला होता.
- परंतु त्यामध्ये काहीच गोष्टींचा समावेश होता, नऊ तारखेच्या जीआर मध्ये ज्या सवलती होत्या जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीच्या निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती, दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी अशा गोष्टी होत्या..
- परंतु दहा तारखेला करण्यात आलेल्या जीआर मध्ये राज्यातील आर्थिक परिस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांना हे जमणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असेल. त्यामुळे या जीआर नुसार ही मदत देणे शक्य नाही असं वाटल्यामुळे 10 ऑक्टोबरला पुन्हा एक जीआर काढला आहे..
- त्यामध्ये जुन्या जीआर मधील सवलतीचा कुठेही उल्लेख नाही. म्हणजेच लोकांच्या पुढे एक वेगळं मांडायचं आणि शेतकऱ्यांची फसवणूक करायची असे यांचे धंदे आहे..
- या संदर्भात अद्यापही केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव गेला नसल्याची माझ्याकडे माहिती आहे..
- खरडून गेलेल्या शेतीसाठी तीन वर्षाचा प्रोग्राम आहे. जर शेतकरी तीन वर्ष दुरुस्ती करत राहील तर तो खाईल काय आणि जगेल कोणत्या पद्धतीने
- या पॅकेजच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीतून केवळ साडेसहा हजार कोटी जातात
- दिवाळीपूर्वी मदत देऊ असं सांगण्यात आले होते.. मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवल्याचे दिसून येत नाही.. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी म्हणून साजरी करावी लागेल अशा प्रकारची परिस्थिती या सरकारने शेतकऱ्यांवर आणली आहे.. जो कापूस निघतोय त्याच्या खरेदीसाठी कापूस केंद्रांना सरकारने अजून परवानगी दिली नाही.. ओलावा कमी करावा आणि दुसरी आठवी त्याची लांबी यावरून महाराष्ट्रातील कापूस खरेदी करताना हात आखडता घेईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असं झालं तर व्यापाऱ्याकडे चार साडेचार हजार एवढ्या कमी दरात कापूस विकावा लागेल आणि शेतकरी उध्वस्त होईल..
- सोयाबीन साठी केलं मात्र त्याचे दर तीन साडेतीन हजाराच्या वर जात नाहीये.. थोडी तरी जनाची नाही तर मनाची लाज वाटत असेल तर शेतकऱ्यांच्या छळ करू नये अशी सरकारकडे विनंती आहे
- *शेतकऱ्यांनी या सरकारचा निषेध म्हणून दिवाळीच्या दिवशी एक तास महाराष्ट्रात सर्व शेतकरी काळी दिवाळी म्हणून दिवे बंद करून या सरकारचा निषेध करावा आणि या सरकारला शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेण्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो आहे*
-
On पणन विभाग GR
- मंत्र्यांना पैसे खाण्यासाठी, भ्रष्टाचार करण्यासाठी बाजार समित्या हिरवं कुरण दिसत आहे, त्यासाठी निवडून आलेला मंडळ बरखास्त करून नवी व्यवस्था केली जात आहे.
- पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी वेगळा निर्णय, मुंबईसाठी वेगळा निर्णय.
- जनता आणि शेतकऱ्यांच्या हक्कांच्या जागेवर अतिक्रमणाचा हा शासनाचा प्रयत्न आहे..
On बीड मोर्चा
- ओबीसी बांधव मोर्चा काढत आहे, आनंदाची बाब आहे. मात्र मला त्या मोर्चाचा कुठलाही निमंत्रण नव्हता..
- २ सप्टेंबर चा जीआर रद्द करण्याचा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे..
- जरांगेरी जे काही केलं ते आता जनतेसमोर आहे.. जरांगेचं नाव घेऊन झाकून ठेवू नये
- सरकार कशाला जरांगे पुढे कमर झुकवून राहिली आहे.
- 54 टक्के ओबीसींना उध्वस्त करताना सरकारला काहीही चिंता वाटली नाही का??
- तिथे छगन भुजबळ पंकजाताई सारखे दोन मंत्री आहे आणि अनेक ओबीसी आमदार आहे. वजनदार नेते धनंजय मुंडे आहे पडळकर सारखे शक्तिशाली आमदार आहे..
- आता जरांगे पुराण बंद करून सरकार पुराण मजबूत करावे लागेल.. तेव्हाच 2 सप्टेंबर चा जीआर रद्द होऊ शकेल...
On पडळकर
- हे खुटीउपाड धंदे आहे.. ज्यांच्याशी काही जमत नाही, ते असे करतात यांची स्थिती माकडासारखी झाली आहे.. तुम्हाला विकासावर बोलण्यासाठी निवडून दिले आहे की हिंदू मुस्लिम वर बोलण्यासाठी...
12
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowOct 19, 2025 13:43:500
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 19, 2025 13:15:460
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 19, 2025 13:07:424
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 19, 2025 12:36:540
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 19, 2025 12:31:000
Report
KJKunal Jamdade
FollowOct 19, 2025 11:30:242
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 19, 2025 10:46:260
Report
KJKunal Jamdade
FollowOct 19, 2025 10:30:220
Report
KCKULDEEP CHAUHAN
FollowOct 19, 2025 10:25:072
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 19, 2025 10:19:144
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 19, 2025 10:15:260
Report
MKManoj Kulkarni
FollowOct 19, 2025 10:04:192
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 19, 2025 10:00:370
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 19, 2025 09:46:110
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 19, 2025 09:32:493
Report