Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Mumbai City400003
राज ठाकरे के मुताबिक 96 लाख बोगस मतदाता: चुनाव आयोग की सख्त कार्रवाई की मांग
APAMOL PEDNEKAR
Oct 20, 2025 06:00:52
Mumbai, Maharashtra
संजय राऊत ऑन राज ठाकरे 96 लाख बोगस मतदार काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये विशेषतः खास करून निवडणूक आयोग निवडणूक यादी मधील घोटाळे निवडणूक यंत्रणेचा भ्रष्टाचार यावर भाष्य केलं आणि त्याच्यातला जो महत्त्वाचा मुद्दा आहे आजही महाराष्ट्रातल्या निवडणूक मतदार यादी मधील साधारण 96 लाख मतदार बोगस आहेत ज्याला आपण राऊंड फिगर म्हणतो ते एक कोटी एक कोटी मतदार बोगस असल्यामुळे निवडणुकीचा निकाल पूर्ण या बोगस मतदार यांच्या हातामध्ये आहे आता विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईमध्ये चार दिवसात साडेसहा लाख मतदान वाढवले हा काय प्रकार आहे कुठून येतात अमित शहा म्हणतात दोन दिवसांपूर्वी दिल्लीत आम्ही घुसकरांना शोधून काढू आणि घुसखोर जर मतदार यादीत असेल तर आम्ही त्यांना हाकलून देऊ मतदार यादीतून महाराष्ट्रामध्ये एक लाख बोगस मतदार आणि घोस्कर आहे असे आम्ही मानतो अमित शहा यांनी एक कोटी मतदार घुसखोर विजय तुमच्या भाजप मिंधे लोकांनी घुसवले आहेत सुरुवातीतून करा मतदार यादीतला घोटाळा जोपर्यंत आहे तोपर्यंत निवडणुका निष्पक्ष पारदर्शक होणार नाही आणि त्यासाठी देशाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र निवडणूक आयोगावर एक नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन केलं त्यात काल घोषणा झाली काल शिवसेना भवनात पत्रकार परिषदेला सर्वपक्षीय नेते होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व नेते हजर होते काँग्रेसचे नेते हजार होते राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील होते आणि आता हळूहळू त्या संदर्भात पाऊल पडत आहेत निवडणूक आयोग कार्यवाही करेल हे कोणत्या भरोशावर युतीफुटी बोलत आहे निवडणूक आयोगाने कार्यवाही करावी म्हणून दोन दिवस 14 15 तारखेला शिस्त मंडळ भेटलं काय कारवाई केली पुरावे दिले ना विधानसभा लोकसभा निवडणुकांचीदरम्यान मतदान आहे 46 लाख 50 लाख ते एकाच पक्षाला कसं काय पडू शकतं का दुसरं कोणी येथे निवडणुकीला उभे नव्हते का ज्या चोराला रंगे हात पकडला आहे तो चोरच पुरावा मागत आहे आणि चोर पुरावा कोणाकडून मागत आहे हे चोर आहेत यांनी चोरा केलेल्या आहेत आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे भारतीय जनता पक्षाला उत्तर द्यायचं कारण नाही आमचा प्रश्न संविधानिक पदावर बसलेल्या संस्थेला आहे ते उत्तर देतील भारतीय जनता पक्षाला किंवा मिंधे यांना मिरच्या का लागत आहे याच्यातच एक मराठीमध्ये फार मन आहे चोराच्या मनात चांदणे आम्ही सवाल विचारतो निवडणूक आयोगाला जसे केंद्रात राहुल गांधी सवाल विचार होते निवडणूक आयोगाला उत्तर कोणते आहे तर भाजपचे नेते काय गरज आहे तुम्हाला जर भारतीय जनता पक्ष उत्तर देत असेल मिंधे उत्तर देत असेल याचा अर्थ निवडणूक आयोगाने या सगळ्यांची मिली बघत आहे हे जॉईंट वेंचर आहे भ्रष्टाचार आणि घोटाळ्यामध्ये ऑन शिंदे मन मिलन प्रमोशन विधान एकनाथ शिंदे यांच्या वाचन वाढलेले दिसत आहे मराठी वाचता येत त्यांना माझा एक प्रश्न विचारा आता लगेच भाऊ बंदगी नाटकाचे लेखक कोण आहेत हे नाटक कोणत्या साली नाटक आला आपण पाहिलात का इतिहास काळामध्ये भाऊबंदकी नष्ट झाल्यावरती या राज्यात शिवशाही अवतरली कृष्णाजी प्रभाकर खांडविलकर हे त्या नाटकाचे लेखक आणि भाऊबंदकी या माध्यमातून चित्र महाराष्ट्राला दाखवलं भाऊबंदकी आहे तोपर्यंत राज्य आपलं एकत्र आलं पाहिजे मराठी लोकांनी देशातल्या लोकांनी तेव्हा भाऊ बंदगी संदेश आहे तो संदेश अस्वस्थ गरज आहे वाद संपले मतं बसले भाऊ एकत्र आले कुटुंब एकत्र आले का पक्षाचे कार्यकर्त्यांच्या भाऊबंदकी संपली आता या राज्यावर एकेचा सूर्य उगवला महाराष्ट्र शिवशाहीचे सूर्य उगवला आहे भाऊ बंदगी नाटकाचं नाटकाचे महत्त्व तेच आहे कृष्णाजी खांडविलकर आणि तेच सांगितलं आहे सारखं छातीत दुखत आहे आणि आज नारक चतुर्थी आहे नारकासुराचा जन्म कुठे झाला नरकासुराचा मूळ स्थान गुहाटी त्याच्यामुळे हे जे नरकासुर एकडेल आहेत जे गोवाटीला जाऊन पूजा करतात त्यांचं हे बॉडी पेन होणार आमचा विषय पोटात दुखण्याचा कारण नाही आमचा कोणाच्या पोटात छातीत दुखत नाही आम्ही ठणठणीत आणि तंदुरुस्त आहोत पण आज त्यांची जयंती आहे आज एकनाथ शिंदे यांची जयंती आहे त्यांना गोहाटी जावं लागेल कदाचित नरकासुर हा उगम पावला गोहाटी मधून आणि ते प्रेरणा घेत आहेत पण त्या नरकासुराचा अंत झाला आणि म्हणून आज आपण नरकासुर चीरडतो तसं नारकासुराला या गद्दार नरकासुराला चिरडलं जाईल जनता या राज्याचे पाय खाली चिरडेल नो किंग्स आंदोलन चालू आहे अमेरिकेत नो किंग्स ट्रम्प च्या विरुद्ध हिंदुस्थानामध्ये देखील हे होणार आहे ऑन इंडियन अलायन्स त्याच्यावरती सगळ्यांना चिंता वाटते आयआयटी जे सरकार गुहाटी मध्ये रेड्यांचे बळी दोन निर्माण झालं त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता ज्या देशाचे पंतप्रधान ज्या राज्याचे मुख्यमंत्री हे विज्ञानापेक्षा तंत्र मंत्र याच्यावरती अवलंबून राहतात त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता पंडित नेहरूंनी हा देश विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये खूप पुढे नेला तितकंच हे मागे आणून लोकांना अंधश्रद्धा मध्ये गुंतवून ठेवत आहेत काय अपेक्षा करणार त्यांच्याकडून तुम्ही 50 रेड्यांचे बळी देऊन सरकार जे सत्तेमध्ये आला आहे त्यांच्याकडे दुसरी काय अपेक्षा ऑन शिवसेना भवन जुन्या आठवणी हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भवन मराठी माणसाच्या ऐकायच्या प्रतीक म्हणून उभं केलं अशा वेळेला मराठी माणूस तिथे येणार असेल पक्षभेद मतभेद विसरून तर त्याचा स्वागत आहे काल मनसेचे सर्व नेते तिथे आले ते भारावले होते त्या वास्तेमध्ये त्यातले काही नेते प्रथमच इथे आले राजू पाटील वगैरेंचन्या त्यांच्यासाठी फार मोठ्या भावनिक सहन होता हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब भवन मध्ये यांना त्यांच्या त्या सगळ्या गोष्टींचे दर्शन घेणं अनेकांनी भावना शोधा व्यक्त केल्या हे चांगल आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Oct 20, 2025 08:33:42
Amravati, Maharashtra:पाच फाईल आहे रिपोर्टर : अनिरुद्ध दवाळे, अमरावती आमदार कापा हे वक्तव्य संतापापोटी; मी माझ्या वक्तव्यावर ठाम बच्चू कडू अँकर :- शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापून टाकावं असं वक्तव्य माजी मंत्री बच्चू कडू यांनी संग्रामपूर येथे सभेत केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे यावर पुन्हा बच्चू कडू यांनी पलटवार करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आमदाराला बोललो तर एवढे वाईट वाटले एवढेच शेतकऱ्याबाबतही कळवळा वाटू द्यावा. आम्ही आमच्या वक्तव्यावर ठाम आहोत, ही आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यावर सत्ताधाऱ्यांनी येऊ नये असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला दिला आहे तसेच बच्चू कडू यांनी नितेश राणे यांच्यावरही पलटवार केला असून देवा भाऊंनी शेतकऱ्यांची काळजी घ्यावी असे म्हणत नितेश राणे यांना डिचवला आहे. दरम्यान बच्चू कडू यांचा 28 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे एल्गार मोर्चा आहे हा एल्गार मोर्चा दडपण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप केला असून एका शेतकऱ्याने एल्गार मोर्चासाठी जागा दिली तर त्याच्या घरी 50 पोलीस जाऊन त्याच्यावर दबाव टाकत असल्याचा गौप्यस्पोर्ट केला आहे आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला तर आंदोलन जागच्या जागेवर पेटव असेही बच्चू कडू म्हणाले आहे याविषयी बच्चू कडू यांच्याशी अधिक बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 20, 2025 08:20:53
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मित्राचा गळा कापून खून करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी काढली धिंड छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शाळेजवळ दारूच्या नशेत शुल्लक कारणावरून मित्राने मित्राचा खून केल्याची घटना घडली होती. त्या आरोपीची पोलिसांनी धिंड काढली आहे. शाळेजवळील मोकळ्या मैदानावर मद्यपान करत असताना दोघांमध्ये शुल्क कारणावरून वाद झाला त्यामध्ये एका मित्राने दुसऱ्या मित्राचा गळा कापला होता. या आरोपीवर या अगोदरही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मित्राच्या नात्याला काळीमा फासून मित्राचाच निर्घृण खून करणाऱ्या या आरोपीची दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी त्याची धिंड काढली आहे.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Oct 20, 2025 08:08:30
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 20, 2025 08:02:56
Nagpur, Maharashtra:नागपूर काँग्रेस शहराध्यक्ष और आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात आज महापालिका प्रशासनविरुद्ध काँग्रेसने जोरदार एल्गार आंदोलन केले... शहरात असलेली अस्वच्छता,रस्त्यांची, दुरावास्था, खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेय..याकडे प्रशासनाचा वारंवार लक्ष वेधूनही ते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेसने हे तीव्र आंदोलन आंदोलन केले.. काँग्रेस कार्यकर्ते थेट महापालिका आयुक्त दालना बाहेर पोहोचले. आणि त्यांनी तिथे महापालिका प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली... काँग्रेस कार्यकर्त्यांना महापालिका आयुक्त दालनाजवळ जाण्यापासून पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला पण तो न जुमानता कार्यकर्तेनी थेट दालना बाहेर येऊन जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत शाब्दिक बाचाबाची आणि रेटारेटी ही झाली . नागरिकांच्या समस्या आणि अस्वच्छतेकडे महापालिका प्रशासनाने त्वरेने पाऊल उचलली नाही तर महापालिका आयुक्तांच्या निवासस्थाने बाहेर येऊन कचरा टाकण्याचा इशाराही काँग्रेस कडून यावेळी देण्यात आला...नागपूर शहरातील कचरा उचलून संकलन करणाऱ्या AG enviro आणि BVG इंडिया आणि खाजगी पाणीपुरवठा ऑपरेटर याच्यावर गलथान कारभाराचा आरोपही यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 20, 2025 08:01:44
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:सकाळी थोडे शॉट्स आणि त्या शेतकऱ्यांचा byte assignment ला पाठवला होता, शिरसाठ पीसी रेकॉर्ड झालीय, आणि अंबादास byte 2 सी ला जोडला आहे... उपोषण सोडवण्यासाठी शिरसाठ यांनी उपोषण कर्त्याला बोलावले घरी. आंदोलकांचे 9 दिवसाचे उपोषण शिरसाठ यांनी बंगल्यावर सोडवले. उपोषण स्थळी जायला शिरसाठ याना नव्हता वेळ? छत्रपती संभाजी नगरच्या शिरसाठ यांच्या बंगल्यात उपोषण सोडणारा संदीप सेठी, या सामाजिक कार्यकर्त्याने शेतकऱ्यांना पंजाब च्या धर्तीवर नुकसानीची मदत मिळावी म्हणून कन्नड तहसील कार्यालय समोर 9 दिवस उपोषण केले. अधिकाऱ्यांनी त्याचे उपोषण सोडवण्याचा प्रयत्नही केला मात्र तो उपोषण पालकमंत्र्यांच्या आश्वासन नंतरच सोडु या भूमिकेवर ठाम होता... अंततः उपोषण सोडवण्यासाठी अधिकारी थेट उपोषण कर्त्याला घेऊन अंबुलन्स द्वारे शिरसाठ यांच्या बंगल्यावर पोहोचले आणि तिथं उपोषण सोडवले, पालकमंत्र्यांनी घरी बोलावून उपोषण सोडवले म्हणून या उपोषणकर्त्याने पालकमंत्र्यांचे आभारही मानले. मात्र यानंतर शिरसाठ यांच्यावर टीका सुरू झालीय, पालकमंत्र्यांना उपोषण सोडवायला जाण्यासाठी वेळ नाही का, उपोषण कर्त्याला घरी बोलावून उपोषण सोडवणे ते ही शेतकरी प्रश्नावर ही असंवेदनशील पणा नाही का असे सवाल उपस्थित व्हायला लागले. यात असंवेदनशीलता काय असा सवाल पालकमंत्री शिरसाठ यांनी उपस्थित केलाय, मी त्याची इच्छा पूर्ण केली त्याचे प्रश्न सरकार दरबारी मांडले या चूक काय असा प्रतिप्रश्न शिरसाठ करताय. शेतकऱ्यांची अवस्था मराठवाड्यात बिकट आहे; तिच्या प्रश्नांसाठी कोणी उपोषण करत असेल तर निश्चितपणे ही गंभीर बाब म्हणावी लागेल. मात्र त्याचे उपोषण सोडवायला जाण्याऐवजी त्यालाच घरी बोलवून त्याचे उपोषण सोडवणे हे एखाद्या मंत्र्याला शोभतो का असे सगळे सवाल यानंतर उपस्थित व्हायचे आहेत...
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 20, 2025 07:46:06
Satara, Maharashtra:सातारा– दिवाळीच्या पहाटे सज्जनगडावर पारंपारिक मशाल महोत्सवाचा भव्य सोहळा उत्साहात पार पडला. सज्जनगड दुर्गनाद प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शेकडो मशालींच्या प्रकाशाने गड उजळून निघाला. पहाटे भातखळे येथून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तिंची पालखीतून मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात निघाली. ‘जय शिवाजी’च्या घोषात मावळे मशाली घेऊन पारंपारिक मार्गाने अंगलाई मंदिरात पोहोचले. समाधी मंदिर परिसरात पालखी पोहोचताच भक्तिरस, शौर्य आणि इतिहासाचा संगम घडला. शाहिर रंगराव पाटील यांनी शिवकालीन पोवाडा सादर केला, तसेच सर्व भक्तांनी “ध्येय मंत्र” म्हणत एकात्मतेचा संदेश दिला. शेकडो मशालींच्या तेजाने उजळलेल्या सज्जनगडाचे दर्शन घेताना प्रत्येकाच्या मनात अभिमान आणि भावनांचा आवेग दाटून आला.
3
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 20, 2025 07:31:30
Jalna, Maharashtra:जालना : 30 एकर ऊसाला विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग,निमखेडा येथील घटना जालना : जालन्यात ऊसाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून अंदाजे 30 एकर ऊस जळून खाक झाला आहे.जाफ्राबाद तालुक्यातील निमखेडा या ठिकाणी ही घटना घडली.उत्तम चव्हाण आणि पांडुरंग चव्हाण यांच्यासह ईतर काही शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला.विजेचे शॉर्ट सर्किट होऊन ऊस जळाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.आज सकाळी ही घटना घडलीय.निमखेडा येथील गट नंबर 81,82,आणि 83 मधील ऊसाला अचानक आग लागल्यानंतर शेतकऱ्यांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग अधिकच भडकलेली असल्यानं अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं.त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान उशिरापर्यंत ही आग विझवण्याचा प्रयत्न करत होते.दरम्यान या घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 20, 2025 07:17:26
Satara, Maharashtra:सातारा बच्चू कडू हे आमचे विधिमंडळाचे सहकारी आहेत. मात्र कापून काढा तोडून काढा अशा भाषा लोकशाहीमध्ये वापरणं योग्य नाही तुम्हाला संताप व्यक्त करायचा आहे तर तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करा भावना व्यक्त करा विधिमंडळात प्रश्न उपस्थित करा मात्र आमदारांना कापा हे भाष्य करणे खूप चुकीचं आहे. आमदारांच्या जिवाला धोका करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करताय असं त्याचा अर्थ होतोय. शंभूराज देसाई भाऊबंदकीवर राऊत यांच्या टीकेवर शंभुराजे देसाई यांची प्रतिक्रिया राऊत दुसरं काही बोलू शकत नाहीत राहू त्यांना मी कालही सांगितलं होतं तुम्ही भाऊ एकत्र आहात का नाही हे काही आम्हाला देणंघेणं नाही दोन्ही भाऊ एकत्र आले तरी आम्हाला आनंदच आहे. एकमेकांविरोधात टोकाची भूमिका तुम्ही कुठल्या मुद्द्यावर घेतली होती हा सगळे मुद्दे विसरले असतील तर आम्हाला काही फरक पडणार नाही. शिंदे साहेबांना इशारा देण्याप्रकाशे 2022 ला 50 आमदार एकत्र आले याची धडकी तुम्हाला बसलेली आहे त्यातून अजून तुम्ही सावरलेला नाही त्यातू अगोदर तुम्ही बाहेर या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तुम्हाला दुसरा हपका बसणार आहे याची काळजी करा. विरोधी पक्षाचे काम हे आंदोलन करणं आहे रोहित पवार हे विधीमंडळाचे सदस्य आहेत एका चांगल्या पक्षाचे जबाबदार नेते आहेत लोकशाहीमध्ये आंदोलन करणं हे प्रत्येकाचा अधिकार आहे विधिमंडळामध्ये ही समस्या मांडावी शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे हे सरकार शेतकऱ्यांना कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. गुवाहाटी ला जाऊन आलेले लोक नरकासुर या संजय राऊत यांच्या टीकेवर शंभूराज देसाई यांच्या खालील byte आम्ही गुव्वाटीला जाऊन आलो नवीन सरकार बनवलं तुम्ही अकाउंट तांडव केलं वर्षा बंगला सोडताना मोठा ड्रामा सुद्धा तुम्ही केला त्याचा काय परिणाम झाला तुम्ही आता आम्हाला नरकासुर म्हणताय मात्र तेव्हा मला रेडे गटातलं पाणी तसेच महिलांना बरेच अश्लील शब्द रावतानी वापरले होते. राऊत आणि एवढेच बोलत राहावं राहू जेवढे आम्हाला असं बोलतील तेवढेच आमचे मतं वाढतील आमच्याकडची संख्या वाढेल आणि सामान्य लोकांची यामुळे त्यांच्यावर जास्तीत जास्त नाराज उडवलेले आहे.
4
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 20, 2025 07:03:41
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपूर महापालिकेवर काँग्रेसचा एल्गार आंदोलन.. महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी यांच्या थेट केबिन बाहेरच केले तीव्र आंदोलन -- शहरातील अस्वच्छता, रस्त्यांची दुरवस्था त्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले असून त्याकडे प्रशासनचे वेधण्यासाठी काँग्रेसचा महापालिकेवर मोर्चा शहरातील कचरा AG enviro आणि BVG इंडिया आणि खाजगी पाणीपुरवठा ऑपरेटर याच्यावर गलथान कारभाराचा आरोप करत काँग्रेसचा महापालिका प्रशासना विरोधात काँग्रेस शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन महापालिका प्रशासकीय इमारती बाहेर पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त असताना काँग्रेस कार्यकर्ते थेट आयुक्त अभिजीत चौधरी यांच्या केबिन बाहेर पोहोचले... कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की ही झाली बाईट विकास ठाकरे,शहराध्यक्ष,काँग्रेस
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Oct 20, 2025 06:47:08
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव जिले के परंडा नगर परिषद क्षेत्र में धोखाधड़ मतदाता पंजीकरण का गंभीर मामला उजागर हुआ है. एक ही घर के पते पर पूरे 37 मतदाताओं का पंजीकरण सामने आया है. खास यह है कि ये सभी मतदाता अलग-अलग जाति और धर्म के हैं — हिंदू, मुस्लिम, दलित, Malli, ब्राह्मण इस विविध समाज के शामिल हैं. इनमें से पांच मतदाताओं के उत्तर प्रदेश के होने की भी गंभीर आरोप लगाए गए हैं. स्थानीय नागरिकों ने यह पंजीकरण योजनाबद्ध ढंग से किया जाए का संदेह व्यक्त किया है. यह घर शिवसेना शिंदे गट के पूर्व नगरसेवक का बताया जा रहा है. इसलिए इस मामले में राजनीतिक रंग चढ़ने की संभावना है. इस संबंध में नगरपालिका प्रशासन को लेखित शिकायत दी गई है और इस बोगस मतदाता पंजीकरण की चौकसी की जाए, ऐसी मांग स्थानीय लोगों की है.
6
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 20, 2025 06:46:58
Bhandara, Maharashtra:महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थ व पाटबंधारे विभागाचे मंत्री तथा चिमूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा.महादेवरावजी शिवणकर यांचे आज २० ऑक्टोबर २०२५, सोमवारला आमगाव येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. विशेष म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी संसदेत पहिल्यांदा माजी खासदार प्रा. शिवणकर यांनी केली होती. त्यांनी गोंदिया जिल्ह्यात पाटबंधारे मंत्री असताना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्यामुळेच कलपाथरी, बेवारटोला, ओवारा, पुजारीटोला, कालीसरार सारखे सिंचनाचे प्रकल्प जिल्ह्यात आज तयार होऊन शेतकरी विकासात हात लावलेला आहे. २६ जानेवारी १९९९ रोजी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शिवणकर यांनी गोंदिया जिल्ह्याची घोषणा केली आणि १ मे १९९९ रोजीच गोंदिया जिल्हा अस्तित्वात आणून कार्यभार सुरु करीत गोंदिया जिल्हा निर्मितीचे ते खरे शिल्पकार ठरले. मात्र त्यांनी गोंंदिया जिल्ह्याचे श्रेय हे सर्वांच्या सहकार्यामुळेच झाले असे नेहमी सांगायाचे. सोबतच गोंदिया मध्यभागी असल्याने विकासाकरीता गोंदियाचा विमानतळ खरा विकासमार्ग ठरु शकतो यासाठी सरकार व लोकप्रतिनिधींची भूमिका सकारात्मक राहिली तर आपण अनेक मोठ्या शहरांनाही मागे घालू शकतो असे त्यांचे विचार जिल्ह्याच्या विकासाप्रती होते. वाटचाल नाव महादेवराव सुकाजी शिवणकर जन्म ७ एप्रिल १९४० (रविवार) जन्मस्थळ आमगाव, जिल्हा गोंदिया शिक्षण- एम.ए.(अर्थशास्त्र), एम.ए.(इतिहास) व्यवसाय शेतकरी (मूळ), माजी व्याख्याता (अर्थशास्त्र व इतिहास) भवभूती महाविद्यालय आमगाव (नागपूर विद्यापीठ संलग्र) २६ जुळे १९७५ रोजी आणिबाणीकाळात तुरुगांत गेले राजकीय वाटचाल १९७८ ते २००८ पर्यंत निवडणुकीत अजिंक्य विधानसभा सदस्य १९७८ ते १९८९ (तीन वेळा आमगाव विधानसभा) १९९४ ते २००४ (दोन वेळा आमगाव विधानसभा) कॅबिनेट मंत्री पाटबंधारे, वित्त व नियोजन (१९९९-२००४) संसदीय सदस्य १९८९ ते १९९४ व २००४ ते २००८ २००४ मध्ये चिमूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्याबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी संसदेत केली होती. भंडारा जिल्ह्याचे विभाजन करुन गोंंदिया जिल्हा तयार केले. खासदार (चिमूर) २००८च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने प्रा. शिवणकर यांना तिकीट नाकारली होती. वैधानिक समित्यांचे सदस्य अंदाजपत्रीय समिती, रोहयो समिती, वनविकास समिती, लोकलेखा समितीचे अध्यक्ष, मागासवर्गीय समिती, आदिवासी विकास समिती. लोकसभा समित्या स्थायी समिती, कृषी समिती, रेल्वे समिती, संरक्षण समिती, संसदीय सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना (२००४-०८), रसायन व खते मंत्रालयसंपर्क समिती (२००४-०८), भारतीय कृषी परिषदेचे कार्यकारी सदस्य, भारत सरकारची संशोधन संस्था (२००४-०८) पुस्तके- १) गजाआड (मराठी आणीबाणी काळातील डायनी) २) भारताची आर्थिक स्थिती (मराठी) ३) विदर्भ झालाच पाहिजे (मराठी) ४) केनिया सफारी (मराठी) ५) भारतीय शेतकऱ्यांच्या समस्यांवर लेख परदेश गमन अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, फ्रान्स,जर्मनी, इटली, फिजी, ऑस्ट्रिया, न्यूझीलंड, सिंगापूर,स्विझरलैंड, श्रीलंका इतर राजकीय वाटचात- महाराष्ट्र युवा मोर्चा अध्यक्ष (१९७७) भाजप कार्यकारिणी सदस्य (१९८०-९०) अखिल भारतीय किसान मोर्चा अध्यक्ष (२०००-०४)(१९९१-१९९३) किसान शक्ती सामाहिकाचे प्रकाशन शेतकरी खासदारांच्या कलबची स्थापना, संस्था ग्रामोत्थान संस्था संस्थापक अध्यक्ष जनकल्याण संस्था संस्थापक ग्रामविकास विद्यालय व कनिष्ठ महा तिरखेडी अध्यक्ष श्री संत जयरामदास आश्रमशाळा, कामठा सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महा. बनगाव श्री महादेवराव शिवणकर अध्यापक विद्यालय, बनगाव संत जयरामदास विद्यालय व कनिष्ठ महा. ठाणा पंडित दिनदयाल उपाध्यक्ष आश्रमशाळा, धावेधवनी स्वामी विवेकानंद आश्रमशाळा, गोठणगाव महाकाली सिध्दपीठ, आमगाव जनता सहकारी बैंक, गोंदियाचे संस्थापक अध्यक्ष गोंदिया होमियोपॅथी कॉलेज, गोंदियाचे माजी अध्यक्ष
3
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 20, 2025 06:46:00
Jalna, Maharashtra:जालना | कुत्र्याच्या हल्ल्यात 3 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू यशवंत नगर मधील घटना परी गोस्वामी या चिमुकलीचा मृत्यू पोलिसांकडून घटनेचा पंचनामा अँकर | कुत्र्याच्या हल्ल्यात तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.या चिमुकलीच्या चेहऱ्यावर कुत्र्याने चावा घेतल्याचे प्रथम दर्शनी समोर आलं आहे.परी दीपक गोस्वामी असं मृत्युमुखी पडलेल्या मुलीचं नाव आहे.शहरातील यशवंत नगरमध्ये ही घटना घडलीय.या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत तपास सुरु केला आहे. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास परीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. स्थानिकांनी तात्काळ या घटनेची माहिती तालुका जालना पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं.पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. दरम्यान या घटनेची पुढील तपास तालुका जालना पोलीस करत आहेत. बाईट -संतोष साबळे, पोलीस निरीक्षक तालुका पोलीस ठाणे , जालना.
0
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top