Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

जवाहरनगर में शराब के नशे में दोस्त की हत्या; आरोपी की धिंड काढ़ी गई

VKVISHAL KAROLE
Oct 20, 2025 08:20:53
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
मित्राचा गळा कापून खून करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी काढली धिंड छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शाळेजवळ दारूच्या नशेत शुल्लक कारणावरून मित्राने मित्राचा खून केल्याची घटना घडली होती. त्या आरोपीची पोलिसांनी धिंड काढली आहे. शाळेजवळील मोकळ्या मैदानावर मद्यपान करत असताना दोघांमध्ये शुल्क कारणावरून वाद झाला त्यामध्ये एका मित्राने दुसऱ्या मित्राचा गळा कापला होता. या आरोपीवर या अगोदरही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मित्राच्या नात्याला काळीमा फासून मित्राचाच निर्घृण खून करणाऱ्या या आरोपीची दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी त्याची धिंड काढली आहे.
4
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Oct 20, 2025 11:18:19
Jalna, Maharashtra:जालना : विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे 60 एकर ऊस जळून खाक,निमखेडा येथील घटना,नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको अँकर | जालन्यात ऊसाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून 60 एकर ऊस जळून खाक झाला आहे.जाफ्राबाद तालुक्यातील निमखेडा बुद्रुक या ठिकाणी ही घटना घडली.उत्तम चव्हाण आणि पांडुरंग चव्हाण यांच्यासह ईतर काही शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला.विजेचे शॉर्ट सर्किट होऊन ऊस जळाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.आज सकाळी निमखेडा येथील गट नंबर 81,82,आणि 83 मध्ये आग लागून ही घटना घडली.दरम्यान जाफ्राबाद नगर पंचायत कार्यालयाने अग्निशमन दलाची गाडी पाठवून ही आग विझवल्यानं ईतर शेतकऱ्यांचा ऊस आगीपासून वाचवण्यात आला.दरम्यान जळालेल्या ऊसाचे पंचनामे करून भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं.महावितरण अधिकाऱ्यांनी सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 20, 2025 11:16:59
Baramati, Maharashtra:بارामती شردار پوار ساوند بائك پوइंटير اون بارामती ہائڈ्रोलک پریوٹیٹ لمیٹڈ افتتاح سوہلا Baramati ہائڈرو لک پریوٹ لمیٹڈ یا کمپنیचा उद्घाटन सोहळा ज्येष्ठ नेते شرद پوار यांच्या हस्ते संपन्न झालाय.. شرد پوار एक प्रकारचे स्थिर उत्पन्न मिळत नव्हतं म्हणून आपल्या बाळदाद्यांनी हा निर्णय घेतला की आता गुराळ सोडून आणि साखर काढू. दोन-तीन ठिकाणी कारखाने काढण्याचा निर्णय घेतला. पहिले कारखाना भवानीनगर ला उभा राहिला मला आठवतंय मी त्यावेळी शिकत होतो भवानी नगर कारखान्याच्या संचालकांची बैठक असली ती सगळे संचालक पटले वाले होते. त्याकाळात शिक्षण नव्हतं पण दृष्टी होती, तयारी होती प्रामाणिक पण होता. बांधिलकी होती. त्यानंतर दुसरा कारखाना माळेगाव उभा राहिला. अनेक लोकांनी तिथे पुढाकार घेतला. आणि कारखानदारी उभी केली. ही कारखानदारी गुळावरून साखरेवर गेली 1967 साली तुमच्या वाढ वडिलांनी माझी आमदार म्हणून निवड केली. आज त्याला 56 वर्षे होऊन गेली. मी या सर्व कारखानदारांमध्ये वेगळ्या दिशेने लक्ष घातलं. नुसती साखर नको साखर करू पण वीज करता येईल का. आज माळेगावला सोमेश्वरला आपण साखर करतो वीज करतो. कारखान्याच्या मळी पासून इथेनॉल निर्मिती करायचं यासाठी प्रयत्न केला आणि उत्पन्न वाढवलं. त्यामुळे हा धंदा आणखीन वाढला. त्याच काळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने मला राज्याचा सरकारमध्ये काम करायची संधी दिली. त्यानंतर पहिला निर्णय काय घेतला तो म्हणजे बारामती मध्ये एमआयडीसी काढायची दुधाचे प्रक्रिया करणारी डायनामिक्स सारखी इंडस्ट्री आणायची. मला आनंद आहे आता मला काही लोकांनी फार सहकार्य केले. मी शेतकऱ्यांना विचारले इथे उद्योग आणायच्या आहेत जागा दिल का सगळ्यांनी दोन हात वर केले आणि द्या म्हणाले. जागा मिळाली आणि हळूहळू या ठिकाणी कारखानदारी वाढली. इतर उप पदार्थ निर्मिती होऊ लागले. बारामती हे उद्योगाचे केंद्र राहिलं. मला दहावीच्या नंतर पुण्याला शिक्षणाला जावं लागलं. मी आमदार झाल्यानंतर एक निर्णय घेतला की बारामती शिक्षण संस्था काढू. विद्य प्रतिष्ठान ही संस्था काढली तिथे आज 30 हजार मुले मुली शिकतात. माळेगावला मुलांच्या आणि मुलींची शिक्षणाचे स्वतंत्र सोय केली. त्या ठिकाणी 4 हजार मुले मुली शिकतात. सोमेश्वर कॉलेज या ठिकाणीही काही शिक्षण संस्था उभ केले तिथे काही हजार मुले शिकतात. याचा परिणाम देशात कुठेही गेलो कुठेतरी इथली मुले मला दिसतात सांगतात की आम्ही विद्य प्रतिष्ठान तिथले विद्यार्थी आहोत. काहींनी भारताच्या बाहेर परदेशात सुद्धा तुमची मुलं मुली बघायला मिळतात. शिक्षणाचा दालन आपण या ठिकाणी उभं केलं म्हणून हे घडलं. शिक्षण झाली पण नोकरीचा प्रश्न आहे. मला इथे येण्याच्या आधी काय काम करत आहेत त्याची माहिती होती मी आज एक नवीन प्रकल्प हाती घेतला तो म्हणजे हायड्रोलिक मशीन खरेदी केली. महत्त्वाची गोष्टी मशीन घेऊन कुठेही काम मिळेल तिथे आपल्या मुलांची जाण्याची तयारी आहे. त्याचा परिणाम आज मुंबईसारख्या ठिकाणी मोठं काम आपल्या मुलांना मिळाला आहे माझ्या मते ते काम कमीत कमी पंधरा वर्षे चालेल आणि वाढेल. 3 ते 4 वर्षात या मशीनची किंमत वसूल होईल. हा एक वेगळा दृष्टिकोन इतक्या करून लोकांनी कष्ट करून ठेवला आहे. आज मुंबईमध्ये मी बघतो अनेक ठिकाणी कुठे कचरा डेपो असेल धारावीसारखा मोठा भाग असेल स्वच्छतेची गरज असेल तिथली सगळी काम आज हळूहळू आपल्या मुलांना मिळू लागली आहे. या देशात उद्योगात मोठे झालेले अनेक लोक असे आहेत ज्यांचे माझे व्यक्तिगत संबंध आहेत. अशा एका गुजरात मधील मोठ्या उद्योजकाला मी सांगितले, ही कामे मुंबईत घ्या आणि ही कामी मुंबईत घेतल्यानंतर आमच्या मुलांमध्ये ज्यामुळे त्यांनी मुंबईतील काम घेतली
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 20, 2025 11:04:17
Baramati, Maharashtra:राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी भविष्यात चांगला निर्णय घेतील : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत दौंड तालुक्यातील खडकी एका इथेनॉल प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ पार पडला यावेळी दत्तात्रय भरणे बोलत होते. शेतकरी बांधवांना एवढंच सांगायचं आहे येणाऱ्या काही दिवसात अतिवृष्टीचं संकट आहे ते कमी होईल शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची मदत दिल्यानंतर भविष्यकाळात निश्चित प्रकारे माझ्या शेतकरी बांधवांसाठी ज्या काही चांगल्या गोष्टी करता येतील त्या योग्यवेळी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी भविष्यात चांगला निर्णय घेतील असं मोठा विधान राज्याची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला आहे.
3
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 20, 2025 11:03:29
Baramati, Maharashtra:दौंड में कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत खडकी, पुणे जिल्ह्यातील खाजगी कंपनीच्या इथेनॉल प्रकल्पाचा भूमिपूजन शुभारंभ पार पडला. शेतकरी बांधवांना हा प्रकल्प उपयोगी ठरेल, कारण तांदळा़ आणि मका यासाठी वापरला जाणार आहे. भविष्यात इथेनॉल प्रकल्प चालू राहील व शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल याची खात्री त्यांनी दिली. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असून अडचणीच्या काळात मदत केली जाईल असे म्हटले. याप्रकल्पामुळे इंदापूर येथे तशीच इतर तीन प्रकल्प होत असल्यामुळे मक्याची मागणी वाढेल. शेतकऱ्यांना जागरूक करणे, उत्पादन वाढवण्यासाठी योग्य उपाययोजना, वाहतुकीच्या कामकाजात शरीरकथा घेऊन काय करायचे याविषयावर चर्चा झाली. कृषी विभागाच्या द्वारा यांत्रिकीकरणाच्या स्कीममध्ये काही अडचणी आल्या होत्या परंतु आता ओपन केली गेली असून शेतकऱ्यांना तीन ट्रॅक्टरसारखी मदत देण्याची व्यवस्था केली जाईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने कृषीमंत्री म्हणून माझ्या शेतकरी बांधवांचे हित सर्वोच्च आहे. दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. भविष्यात शेतकऱ्यांना आणखी चांगल्या प्रकारे मदत करण्यासाठी निर्णय घेतले जातील. प्रत्येक प्रसंगात धैर्याने पुढे जायचं, शासकीय मदत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध राहील.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 20, 2025 11:01:49
Pune, Maharashtra:अहिल्यानगर येथील पाच डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. कोरोना काळात रुग्णावर उपचार करताना हलगर्जीपणा केला असल्याच खंडपीठाने हा आदेश दिला आहे. याप्रकरणी नगर शहरातील तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल झाला असून या डॉक्टरांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मृत्यू झालेल्या रुग्णाच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून पाच डॉक्टरांनी विरोधात गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत मात्र गुन्हे दाखल होऊ नये; डॉक्टर अजप अटक झाले नसल्यामुळे अशा डॉक्टरांवर त्वरित कारवाई करून त्यांच्या रुग्णालयावर बॉम्बे नर्सिंग होम कायदा अन्वये कठोर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी केली आहे
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 20, 2025 10:47:46
Akola, Maharashtra:राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. तोंडी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला असून, शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भवितव्याचं स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांचे स्वप्न देखील या आपत्तीमुळे दुभंगताना दिसत आहे. मात्र सामाजिक बांधिलकी जपत झी 24 तास या वृत्तवाहिनीने ‘फक्त लढ म्हणा’ ही मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमातून पैशाअभावी शिक्षण थांबलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी मदतीचा हात पुढे केला जात आहे. या मोहिमेची बातमी अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील ‘किड्स प्लॅनेट’ शाळेच्या संस्थापक मनीष आढाव यांनी पाहिली आणि त्यांचा संवेदनशील मनाला ती भिडली. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या मनीष आढाव यांनी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊचे पैसे जमा केले, तर शिक्षकांनीही त्यात सहभाग नोंदविला. अशा प्रकारे एकूण ५० हजार रुपये रक्कम शाळेच्या वतीने झी 24 तासच्या ‘फक्त लढ म्हणा’ मोहिमेस देण्यात झाली.‘किड्स प्लॅनेट’ शाळेच्या या संवेदनशील आणि कृतीमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठी मदत झाली असून, विद्यार्थ्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी हा उपक्रम खारीचा वाटा ठरत आहे.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Oct 20, 2025 10:46:49
Parbhani, Maharashtra:अँकर- परभणीत काँग्रेसकडून सरकारने जाहीर केलेल्या घोषणेचा निषेध करीत ऐन दिवाळीला पिठलं भाकर खाऊन आंदोलन करीत सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केलाय. राज्य सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू असा शब्द दिल्यानंतरही शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे, पण दिवाळी सुरू होऊनही शेतकऱ्यांना कोणतीही ठोस मदत मिळाली नाही,त्यामुळे काँग्रेस आणि विविध पक्ष, संघटना यांनी एकत्रित येत परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये पिठलं भाकरी खात काळी दिवाळी साजरी केली. यावेळी महाविकास आघाडी मधील, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासह, विविध संघटनाचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्र सरकारने राज्याला पंधराशे कोटी रुपये जाहीर केले, परंतु ते कोणत्या नियमाने निकषावर केले, हे देखील कळत नाही. असा आरोप यावेळी काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी दुर्रांनी यांनी केलाय...
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 20, 2025 10:36:26
Washim, Maharashtra:यंदाचा खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे पारंपरिक पिकांसोबतच फुलशेतीलाही मोठा फटका बसला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना नेहमीप्रमाणे मोठी मागणी असली तरी, या वर्षीproduktion जवळपास निम्म्यावर आलं आहे. दुसरीकडे झेंडूच्या उत्पादनात झालेल्या घटेमुळे सुरुवातीला दर वाढतील, अशी अपेक्षा होती. मात्र बाजारात अपेक्षेपेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. सध्या झेंडू फुलाला फक्त ३० ते ४० रुपये प्रति किलो दर मिळत असून, वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा दर शेतकऱ्यांसाठी तोट्याचा ठरत आहे. सततच्या पावसामुळे झेंडूच्या झाडांवर रोगराई वाढली आणि त्यामुळे फुलधार कमी झाली. परिणामी उत्पादनात मोठी घट झाली. आता बाजारात मागणी असूनही दर समाधानकारक नसल्याने झेंडू फुल उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Oct 20, 2025 10:13:44
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 20, 2025 10:01:44
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्ह्यातिल अनेक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असून, शासनाकडून मिळणारी मदत तोकडी आणि विलंबाने मिळत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार व जिल्हाध्यक्ष अमित झणक यांच्या नेतृत्वात, आज दिवाळी सणाच्या दिवशी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘चटणी-भाकर’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे शासनाच्या उदासीन भूमिकेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. शासनाने तात्काळ आणि पुरेशी मदत शेतकऱ्यांना द्यावी,अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Oct 20, 2025 10:01:04
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Oct 20, 2025 10:00:49
Buldhana, Maharashtra:On राज ठाकरे... सत्तेतला आमदार बोलतोय म्हणजे त्याने असं बोलू नाही असं नाही. मतदार यादी मध्ये बोगस नावही पंधरा-वीस वर्षाआधीची आहेत त्यावेळी युतीचं सरकार नव्हतं... ही बोगस नावे त्याकाळी काँग्रेसच्या काही नेत्यांनी निवडून येण्यासाठी टाकलेली आहेत. बुलढाण्यातील निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांची नावे दोन ठिकाणी आहेत मात्र ते स्वतःही त्यांची नावे डिलीट करू शकत नाहीत. (2.04) On निवडणूक आयोग निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. त्यांना निवडणूक लढवायची आहे का..? बोगस नाव ठेवण्यात निवडणूक आयोगाला काय स्वारस्या आहे. निवडणूक आयोग ज्यावेळी बैठक घेतो त्यावेळेस एकही अधिकारी बैठकीला उपस्थित नसतो सर्व कंत्राटी कम्प्युटर ऑपरेटर असतात ज्यांना काही काळत नाही.. हे पैसे घेऊन नावे टाकतात का..? (1.31) On बच्चू कडू 288 आमदारांना जरी कापलं तरी शेतकऱ्यांचा संकट दूर होणार आहे का...? शेतकऱ्यांची ही दशा करायला आमदारच जबाबदार आहेत का..? राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. आमदारांना कापून तुम्ही काय लोकशाहीचा गळा घोटणार आहात..? त्याला काय कापण्यासाठी निवडून दिलं का जनतेने..? हा सर्व प्रसिद्धीसाठी खेळ असतो. अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी करू नये.(1.06) On शनिवार वाडा नमाज पठण तिथे नमाज का पडल्या गेला याची चौकशी शासनाने केली पाहिजे.(0.43) On प्रवीण दरेकर.. प्रवीण दरेकर यांनी म्हटलं की संजय गायकवाड यांना समज द्यावी, अरे पण हे समजून घ्या ना की, विरोधी पक्ष हे करतोय याचा अर्थ सत्ताधारी पक्ष आरोपीच्या पिंजऱ्यात आहे असं नाही.ही घाण आधीचीच आहे. ती आपण साफ केली पाहिजे.(0.26) On 1 तारीख मोर्चा... विरोधी पक्षाने काय केलं पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे... पण विरोधी पक्षाला असं काही करण्याची संधी निवडणूक आयोगाने देऊ नये असं माझं मत आहे. बाईट्स - आ संजय गायकवाड.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 20, 2025 09:30:13
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरातील अनेक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चिखल मातीचे आकर्षक किल्ले बांधले आहेत. यातील किल्ले भव्य दिव्य बांधले आहेत. कोल्हापूर शहरातील साठमारी फ्रेंड सर्कलने यावर्षी सर्वात मोठी किल्ल्यांची प्रतिकृती बनवली आहे. यावर्षी साठमारी फ्रेंड सर्कल कडून प्रतापगडाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.. मंडळाच्या 15 ते 18 सदस्यांनी तब्बल महिनाभर परिश्रम घेऊन हा किल्ला बनवला आहे. अफजल खानाच्या वधाच्या वेळी प्रतापगडाच्या पायथ्याला झालेला रणसंग्राम या किल्ल्याच्या परिसरात अगदी हुबेहूब दर्शवण्यात आला आहे... साकारलेला हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वांत मोठा किल्ला असल्याचा दावा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
0
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top