Back
महाराष्ट्र के पूर्व वित्त एवं जल संधारण मंत्री प्रो. महादेवराव शिवणकर का निधन
PTPRAVIN TANDEKAR
Oct 20, 2025 06:46:58
Bhandara, Maharashtra
महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थ व पाटबंधारे विभागाचे मंत्री तथा चिमूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा.महादेवरावजी शिवणकर यांचे आज २० ऑक्टोबर २०२५, सोमवारला आमगाव येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. विशेष म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी संसदेत पहिल्यांदा माजी खासदार प्रा. शिवणकर यांनी केली होती. त्यांनी गोंदिया जिल्ह्यात पाटबंधारे मंत्री असताना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्यामुळेच कलपाथरी, बेवारटोला, ओवारा, पुजारीटोला, कालीसरार सारखे सिंचनाचे प्रकल्प जिल्ह्यात आज तयार होऊन शेतकरी विकासात हात लावलेला आहे. २६ जानेवारी १९९९ रोजी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शिवणकर यांनी गोंदिया जिल्ह्याची घोषणा केली आणि १ मे १९९९ रोजीच गोंदिया जिल्हा अस्तित्वात आणून कार्यभार सुरु करीत गोंदिया जिल्हा निर्मितीचे ते खरे शिल्पकार ठरले. मात्र त्यांनी गोंंदिया जिल्ह्याचे श्रेय हे सर्वांच्या सहकार्यामुळेच झाले असे नेहमी सांगायाचे. सोबतच गोंदिया मध्यभागी असल्याने विकासाकरीता गोंदियाचा विमानतळ खरा विकासमार्ग ठरु शकतो यासाठी सरकार व लोकप्रतिनिधींची भूमिका सकारात्मक राहिली तर आपण अनेक मोठ्या शहरांनाही मागे घालू शकतो असे त्यांचे विचार जिल्ह्याच्या विकासाप्रती होते. वाटचाल नाव महादेवराव सुकाजी शिवणकर जन्म ७ एप्रिल १९४० (रविवार) जन्मस्थळ आमगाव, जिल्हा गोंदिया शिक्षण- एम.ए.(अर्थशास्त्र), एम.ए.(इतिहास) व्यवसाय शेतकरी (मूळ), माजी व्याख्याता (अर्थशास्त्र व इतिहास) भवभूती महाविद्यालय आमगाव (नागपूर विद्यापीठ संलग्र) २६ जुळे १९७५ रोजी आणिबाणीकाळात तुरुगांत गेले राजकीय वाटचाल १९७८ ते २००८ पर्यंत निवडणुकीत अजिंक्य विधानसभा सदस्य १९७८ ते १९८९ (तीन वेळा आमगाव विधानसभा) १९९४ ते २००४ (दोन वेळा आमगाव विधानसभा) कॅबिनेट मंत्री पाटबंधारे, वित्त व नियोजन (१९९९-२००४) संसदीय सदस्य १९८९ ते १९९४ व २००४ ते २००८ २००४ मध्ये चिमूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्याबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी संसदेत केली होती. भंडारा जिल्ह्याचे विभाजन करुन गोंंदिया जिल्हा तयार केले. खासदार (चिमूर) २००८च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने प्रा. शिवणकर यांना तिकीट नाकारली होती. वैधानिक समित्यांचे सदस्य अंदाजपत्रीय समिती, रोहयो समिती, वनविकास समिती, लोकलेखा समितीचे अध्यक्ष, मागासवर्गीय समिती, आदिवासी विकास समिती. लोकसभा समित्या स्थायी समिती, कृषी समिती, रेल्वे समिती, संरक्षण समिती, संसदीय सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना (२००४-०८), रसायन व खते मंत्रालयसंपर्क समिती (२००४-०८), भारतीय कृषी परिषदेचे कार्यकारी सदस्य, भारत सरकारची संशोधन संस्था (२००४-०८) पुस्तके- १) गजाआड (मराठी आणीबाणी काळातील डायनी) २) भारताची आर्थिक स्थिती (मराठी) ३) विदर्भ झालाच पाहिजे (मराठी) ४) केनिया सफारी (मराठी) ५) भारतीय शेतकऱ्यांच्या समस्यांवर लेख परदेश गमन अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, फ्रान्स,जर्मनी, इटली, फिजी, ऑस्ट्रिया, न्यूझीलंड, सिंगापूर,स्विझरलैंड, श्रीलंका इतर राजकीय वाटचात- महाराष्ट्र युवा मोर्चा अध्यक्ष (१९७७) भाजप कार्यकारिणी सदस्य (१९८०-९०) अखिल भारतीय किसान मोर्चा अध्यक्ष (२०००-०४)(१९९१-१९९३) किसान शक्ती सामाहिकाचे प्रकाशन शेतकरी खासदारांच्या कलबची स्थापना, संस्था ग्रामोत्थान संस्था संस्थापक अध्यक्ष जनकल्याण संस्था संस्थापक ग्रामविकास विद्यालय व कनिष्ठ महा तिरखेडी अध्यक्ष श्री संत जयरामदास आश्रमशाळा, कामठा सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महा. बनगाव श्री महादेवराव शिवणकर अध्यापक विद्यालय, बनगाव संत जयरामदास विद्यालय व कनिष्ठ महा. ठाणा पंडित दिनदयाल उपाध्यक्ष आश्रमशाळा, धावेधवनी स्वामी विवेकानंद आश्रमशाळा, गोठणगाव महाकाली सिध्दपीठ, आमगाव जनता सहकारी बैंक, गोंदियाचे संस्थापक अध्यक्ष गोंदिया होमियोपॅथी कॉलेज, गोंदियाचे माजी अध्यक्ष
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowOct 20, 2025 11:18:190
Report
JMJAVED MULANI
FollowOct 20, 2025 11:16:590
Report
JMJAVED MULANI
FollowOct 20, 2025 11:04:173
Report
JMJAVED MULANI
FollowOct 20, 2025 11:03:290
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 20, 2025 11:01:490
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 20, 2025 11:00:130
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 20, 2025 10:47:460
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 20, 2025 10:46:490
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 20, 2025 10:36:260
Report
RSRAJEEV SHARMA
FollowOct 20, 2025 10:31:530
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 20, 2025 10:13:440
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 20, 2025 10:01:440
Report
MKManoj Kulkarni
FollowOct 20, 2025 10:01:040
Report
MNMAYUR NIKAM
FollowOct 20, 2025 10:00:490
Report
PNPratap Naik1
FollowOct 20, 2025 09:30:130
Report