Back
75 साल में मोदी का अद्भुत सफर: संघ से विश्व नेता तक
CFChandrakant Funde
Sept 16, 2025 17:02:44
Pune, Maharashtra
Narendra Modi profile pkg
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस अख्खा भारत देश आज साजरा करतोय...पण एक साधा संघ स्वयंसेवक ते देशाचे पंतप्रधान हा मोदींचा प्रवास शब्दश: थक्क करणाराय...पाहुयात झी 24 तासचा खास रिपोर्ट
Play pkg
Last line
Typo gfx with pm Modi photo...
नाव...नरेंद्र दामोदारदास मोदी
जन्म...17 सप्टेंबर 1050
मूळगाव...वडनगर, गुजरात
पद...भारताचे पंतप्रधान
Gfx out
तसं पाहिलं तर नरेंद्र मोदींचा गुदरातमधल्या वडनगरपासून सुरू झालेला प्रवास फक्त प्रेरणादायीच नाहीतर शब्दश: थक्क करणारा हे...कारण ते स्वतंत्र भारतात जन्मलेले पहिले पंतप्रधान आहेत...एवढंच नाहीतर गुजरातसारख्या राज्याचे सलग तीनवेळा मुख्यमंञीपद भुषवण्यासोबतच भारतासारख्या महाकाय लोकशाही वादी देशाचे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पद मिळवण्याचा विक्रम देखील त्यांच्याच नावावर आहे...नरेंद्र मोदींचा प्रारंभीचा काळ प्रचंड संघर्षाचा गेला...बालपणापासून देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची उर्मीच त्यांना राष्ट्रप्रथमची शिकवण असलेल्या संघपरिवारात घेऊन गेली...वयाच्या अवध्या 17 व्या वर्षी त्यांनी घर सोडले...वयाच्या 21 व्या वर्षी ते संघाचे पूर्णवेळ संघ स्वयंसेवक बनले...पुढे त्यांच्या कामाचा झपाटा बघूनच संघाने 1987 साली मोदींना गुजरातच्या राजकारणात उतरवलं...पण पक्षांतर्गंत कुरघोड्यांमुळे त्यांना पुन्हा दिल्लीत जावं लागलं तिथेही त्यांनी अगदी मन लावून पार्टीची सेवा केली....लालकृष्ण अडवाणींच्या रथयाञेचं नियोजनही मोदीजींकडेच होतं...त्याचेच फलित म्हणून पुढे 2001 साली पार्टीने त्यांना थेट गुजरातच्या मुख्यमंञीपदी नियुक्त केलं ...तो दिवस ते आजचा दिवस या तब्बल 25 वर्षांच्या कालखंडात या धेयवेड्या कणखर नेतृत्वाने आजवर एकदाही मागे वळून पाहिलेलं नाही...केंद्रात काँग्रेसचं सरकार असूनही मोदीजींनी गुजरातच्या विकासाचं यशस्वी मॉडेल देशासमोर ठेवलं आणि त्याच जोरावर 2013 साली थेट राष्ट्रीय राजकारणात उडी घेतली...तेव्हा खरंतर त्यांच्यासमोर अनेक सिनिअर नेते होते...पण पार्टी आणि संघनेृत्वाचा विश्वास सार्थ ठरवत देशभरात झंझावाती प्रचार केला आणि भारतात प्रथमच उजव्या विचारसरणीच्या भाजपचे स्वबळावर सरकार आणले...नरेंद्र मोदी संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक ठेऊन देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान झाले...तो दिवस होता 26 मे 2014...
Byte...पीएम पदाची शपथ घेतानाचा मोदी बाईट लावणे...
व्हीओ....पंतप्रधान पदाची शपथ घेताच मोदींनी स्वच्छ भारतच अभियान हाती घेतलं तेही राष्ट्रपिता गांधीजींचा चेहरा वापरून...तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या...कारण मोदीजी हे संघपरिवारातून आलेले...!!! तिथेच ते देशवासियांच्या गळ्यातले ताईत बनले... देशाचं नेतृत्व स्वीकारताच मोदीजींनी मनमोहन सिंह यांचेच उदारमतवाती आर्थिक धोरण पुढे नेत मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक भारतात आकृष्ट केली...आणि विकासाचा गाडा पुढे नेला...पण हे करतानाही मोदींजीनी आणखी एक नारा दिला आणि तो म्हणजे आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण भारत...डिजीटल इंडिया,...त्याच जोरावर आज आपला देश मोठ्या आत्मविश्वासाने आंतराष्ट्रीय पातळीवर एक विकसनशील देश म्हणून ताठ मानेनं उभा हे...पण याच काळात मोदींनी नोटबंदी सारखे धक्के देऊन काळ्या पैशाला पायबंद घालण्याचा जोरदार प्रयत्न केला...त्यावरून मोदींवर प्रचंड टीका ही झाली पण ते कधीच मागे हटले नाहीत...
बाईट....
व्हीओ....पुढे दहशतवाद्यांनी पुलवामा हल्ला घडवून देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करताच या कनखर नेतृत्वाने बालाकोटचा एअर स्ट्राईक करून पहिल्यांदाच शञू राष्ट्र पाकिस्तानला मुव्हतोड जबाब दिला...भारतात हे पहिल्यांदाच घडत होतं, आणि राष्ट्रीय स्वाभिमानाच्या लाटेवर स्वार होत मोदी 2019 साली तब्बल 303 जागा जिंकून सलग दुसऱ्यांना देशाचे पंतप्रधान बनले...
बाईट...2nd शपथविधी....
व्हीओ...सलग दुसऱ्यांदा संपूर्ण बहुमत मिळताच मोदीजींनी 370 कलम हटवण्याचा मोठा निर्णय घेतला...आणि जम्मू- काश्मीरपासून लडाखला स्वतंत्र केलं....कलम 370 हटवल्याने मोदींजीची प्रतिमा भारतीयांमधे आणखीनच उंचावली....राम मंदिर- बाबरी मशिदीसारखा जटिल प्रश्नही मोदीजींनी कोर्टाच्या निर्णयाचा आधार घेऊनच सोडवला एवढं करूनच मोदी थांबले नाहीतर त्यांनी तमाम हिंदु धर्मियांसाठी जिव्हाळ्याचा विषय बनलेलं राम मंदिर ही बांधून दाखवलं...देशवासियांसाठी ही खूप मोठी उपलब्धी होती...मुस्लिम महिलांना बुरख्यातून बाहेर पडण्याचा निर्णय तर मोदीजींना प्रचंड लोकप्रियता मिळवून गेला. याच दरम्यान, मोदींजी आंतरराष्ट्रीय पातळीवरील जी 20 समिट सारखी महत्वाची परिषद भारतात भरवून स्वत:ला विश्वनेता म्हणून प्रोजेक्ट केलं....त्याचाच फायदा घेत मोदीजींनी भारतीय संस्कृतिचे भूषण असलेल्या योगाला थेट जागतिक पातळीवर नेऊन ठेवलं त्याचेच फलित म्हणून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगात साजरा होतोय
Play Modi yoga shots...
व्हीओ...
मोदीजी एवढंच करून थांबले नाहीतर त्यांनी परिक्षा पे चर्चा हा उपक्रम लाईव्ह करून तमाम विद्यार्थी वर्गाला आपलंसं केलं....थोडक्यात काय तर असा कोणताच वर्ग नाही जिकडे मोदीजी लोकप्रिय नाहीत...आणि लोकप्रियतेच्या जोरावर मोदीजी 2024 साली सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनले....अर्थात संविधान खतरे में या विरोधकांनी निर्माण केलेल्या परस्पेशनमुळे यावेळी भाजपच्या जागा निश्चितच 303 वरून 240 पर्यंत खाली आल्या...पण तरीही एनडिए आघाडीने पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वावरच विश्वास ठेवला....
Byte...3rd pm oath ceremony
व्हीओ....वयाच्या 75 आलेल्या या वैश्विक नेतृत्वाने भारतासमोर आता 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं उदिष्ठ ठेऊन 2047 साली भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं स्वप्न दाखवलं....एवढंच नाहीतर तेच मोदी जीएसटी कर प्रणालीत प्रचंड सुधारणा करून येत्या 22 सप्टेंबर पासून देशात स्वताईचं युग आणायला निघालेत....थोडक्यात काय तर जसजसं वय वाढतंय तसंतसं मोदीजींचा उत्साह आणखी वाढतंच चाललाय...किंबहुना आजही ते 18-18 तास काम करताहेत...दरम्यान, ऑपरेशन सिंदूर राबवून मोदीजींनी पहलगामच्या भ्याड हल्ल्याचा फक्त बदलाच घेतला नाहीतर घुस के मारेंगेचा...ये नया भारत हे वाला...अँटिट्यूड पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलाय....तर अशा या विश्व नेतृत्वाला झी मीडिया परिवारातर्फे वयाच्या अमृतमहोत्सवी शुभेच्छा .. !!!!
ब्युरो रिपोर्ट झी मीडिया
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowDec 07, 2025 17:47:55208
Report
ABATISH BHOIR
FollowDec 07, 2025 17:00:55260
Report
KPKAILAS PURI
FollowDec 07, 2025 16:31:58187
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:16:25242
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:16:13194
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:16:03168
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:15:51213
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:15:40133
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:15:30135
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:15:18253
Report
KJKunal Jamdade
FollowDec 07, 2025 14:31:37183
Report
SNSWATI NAIK
FollowDec 07, 2025 13:45:26138
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 07, 2025 13:01:03231
Report
ABATISH BHOIR
FollowDec 07, 2025 12:30:5594
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 07, 2025 12:19:38170
Report