Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
महादेवी हत्तीची न्यायालयीन लढाई: शेतकऱ्यांचा आवाज!
PNPratap Naik1
Aug 06, 2025 15:21:22
Kolhapur, Maharashtra
Kop Raju Shetty 121 Feed :- Live U Anc :- जनतेच्या रेट्यामुळे काय होऊ शकतं हे महादेवी हत्तीनीच्या निमित्ताने समोर आले आहे. त्यामुळे सरकारने देखील याचा विचार करून आपला कारभार करावा असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटलय. महादेवी हत्ती आज देखील धडधाकटच आहे असा आमचा दावा आहे. तरीदेखील कायद्याच्या चौकटीत राहून महादेवी हत्ती परत येण्यासाठी न्यायालयीन लढाई लढण्याचे ठरले आहे असं देखील शेट्टी म्हणालेत. वनतारा CEO सोबत झालेल्या बैठकीनंतर राजू शेट्टी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. Play 121
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Dec 10, 2025 02:34:29
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 10, 2025 02:34:13
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Dec 10, 2025 02:31:23
Nashik, Maharashtra:बालक विक्री प्रकरणी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दोन्ही आई-वडील घोटी पोलीस स्टेशन मध्ये स्वतःहून हजर झाले आहेत. या प्रकरणात सरकारने एक समिती गठन केली असून पोलिसांनी या कुटुंबाच्या घरी जाऊन मध्यरात्री तपास केला. टाके देवगाव येथील बरड्याची वाडी या गावात राहणाऱ्या लोकांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर या घरातील असलेली लहान लहान मुलं यांच्याशी चर्चा केली. या कुटुंबातील ४५ वर्षीय महिलेने तब्बल १४ मुला मुलींना जन्म दिला, मात्र या महिलेने घरची परिस्थिती हलाखीची असल्याने या १४ मुलामुलींपैकी ६ मुल आणि मुली विकल्याची धक्कादायक माहिती समोरं आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 10, 2025 02:31:13
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्यात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवटा.... गृहिणीच्या डोक्यावर ताण वाढला...ग्राहकांची गॅस सिलेंडरसाठी धावाधाव... भंडारा जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा घराघरांत जाणवू लागला आहे. ग्राहकांना वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सिलेंडर मिळत नसल्याने काहींनी तर चुलीवर स्वयंपाक सुरू केला आहे. एकीकडे धुरामुळे डोळ्यांना आजार होत असल्यामुळे शासनाने प्रत्येक घरी उज्वला गॅस योजना दिली. पण आता सिलेंडर मिळत नसल्याने महिलांची हेळसांड होत आहे.. सिलिंडरचा नंबर लावूनही मिळत नसल्याने ग्राहक संबंधित गॅस एजन्सीच्या कार्यालयाबाहेर सकाळपासूनच गर्दी करीत आहेत. स्वयंपाकासाठी गॅस न मिळाल्यामुळे घरच्यांच्या रोजच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. गॅस पुरवठा करणाऱ्या कंपने मध्ये काही तरी तांत्रिक बिघाड झाल्याने गॅस सिलेंडर येत नाही आहे. त्यामुळे ग्राहकांना सिलेंडर वितरीत होत नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. मात्र एकीकडे घरगुती गॅस सर्व सामान्य लोकांना मिळत नाही पण दुसरीकडे हेच सिलेंडर व्यावसायिक लोकांकडे हॉटेल मध्ये दिसून येत आहे. त्यामुळे गॅस वितरण एजन्सी यांच्या कार्य प्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 10, 2025 02:02:57
Jalna, Maharashtra:जालना : नुकसान होऊनही पीकविमा मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त(जनरल, पीकपाणी) अँकर : जालन्यातील भोकारदन तालुक्यात यंदा खरीप हंगामात 1 लाख 9 हजार हेक्टरवर पेरणी झाली होती.मात्र, परतीच्या पावसाने आणि अवकाळी ढगफुटीमुळे परिस्थिती बदलली. सततच्या पावसामुळे जमिनीत पाणी साचले. वाफेवरची वाढ थांबली. तूर, सोयाबीन, मका, मूग, उडीद आणि कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले. प्राथमिक अहवालानुसार 62 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले. शासनाने पंचनामे करून तातडीची मदत दिली. त्यामुळे रब्बी पेरणीसाठी थोडा आधार मिळाला. मात्र, खरी दिलासा देणारी पिकविम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. अनेक शेतकऱ्यांनी वेळेवर विमा हप्ता भरला. तरीही विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाईसाठी हालचाल नाही. त्यामुळे नाराजी वाढली आहे. पूर्वी ''एक रुपयात पिकविमा' योजना होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत होता. ही योजना बंद झाल्याने आता विमा हप्ता मोठा झाला आहे. आर्थिक अडचणीच्या काळात हा हप्ता भार बनतो. त्यात भर म्हणजे नुकसान असूनही भरपाई वेळेवर मिळत नाही. त्यामुळे पिकविमा योजनेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी सध्या विमा कंपनीकडे पाठपुरावा करत आहेत. पंचनामे झाले आहेत. नुकसान स्पष्ट दिसत आहे. तरीही विमा रक्कम मिळत असल्याने पीकविमा कंपन्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
169
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 10, 2025 02:01:51
105
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 10, 2025 01:45:47
185
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Dec 10, 2025 01:16:04
Ambernath, Maharashtra:रस्ता 100 फुटांचा, गटार 20 फुटांवर बारवी डॅम रस्त्याच्या कामात प्रचंड घोळ नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा स्थानिकांचा आरोप बदलापूर ते बारवी रोड आज जवळपास 15 ते 20 छोट्या-मोठ्या गावांना जोडतो. त्यामुळे या रस्त्यावरून नियमितपणे वाहनांची ये-जा सुरू असते. एमआयडीसीने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केल्यानंतर या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम हाती घेण्यात आले आहे. मात्र कागदावर 100 फुटाचा रस्ता असूनही 20 फुटांच्या रस्त्याला मंजुरी का देण्यात आली असं स्थानिक नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला काँक्रीट गटार असल्यामुळे हा रस्ता अरुंद होईल असे नागरिकांचे म्हणणे आहे. घाईघाईत रस्त्याचे काम उरकल्यानंतर भविष्यात रस्ता रुंदीकरणासाठी دوन्ही बाजूची गटारं तोडावी लागतील, त्यामुळे जनतेचा पैसा पाण्यात जाईल असे ठामपणे म्हटले जाते. चंद्रशेखर भुयार, बदलापूर
188
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 09, 2025 17:00:18
Kalyan, Maharashtra:धावत्या एक्स्प्रेस मध्ये व्यापाऱ्याची साडे पाच कोटींचे सोन्याचे दागिने असलेली बॅग लंपास.. सिद्धेश्वर एक्स्प्रेस मध्ये घडली घटना कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल लोहमार्ग पोलिसांचा तपास सुरू. tपासासाठी कल्याण रेल्वे पोलिसांची तीन पथके तैनात सोलापूर ते कल्याण सिद्धेश्वर एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका व्यापाऱ्याची साडे पाच कोटींचे सोने असलेली बॅग चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे .या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .कल्याण रेल्वे पोलिसांची तीन पथके या गुन्ह्याच्या तपसासाठी नियुक्त करण्यात अल्या असून या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली.
182
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 09, 2025 16:15:48
Pune, Maharashtra:अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या कथित ऑफिसच्या जागेचा वाद चांगलाच गाजला होता...जैन समाजाच्या स्वर्गीय मंगुबाई व्होरा यांनी जैन समाजाला दिलेल्या जागेवर संग्राम जगताप यांनी आपले कार्यालय सुरूकेल्याचा आरोप करण्यात आला होता... याबाबत जैन समाजाचे आचार्य गुप्तिनंदीजी महाराज यांच्याकडेही तक्रार करण्यात आली होती..दरम्यान अहिल्यानगर येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना आचार्य गुप्तिनंदीजी महाराज यांनी या जागेबाबत मुळ भाडेकरू गणेश गोंडाळ आणि आमदार जगताप यांच्याशी आपलं बोलण झाल असून पुढील तीन महिन्यात ही जागा जैन समाजाच्या ट्रस्टकडे दिली जाईल असं वचन मला दिल्याच आचार्य गुप्तिनंदीजी महाराज यांनी म्हंटले आहे.
211
comment0
Report
Advertisement
Back to top