Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
शीतल फराकटे का शिवसेना में प्रवेश, टिकट नहीं मिलने पर नाराज राष्ट्रवादी
PNPratap Naik1
Jan 21, 2026 12:50:55
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तिकीट मिळाले नाही म्हणून नाराज झालेल्या अजित पवार राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा शितल फराकटे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलाय. जिल्ह्यातील बोरवडे जिल्हा परिषद मतदार संघातून फराकटे इच्छुक होत्या. पण जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी तिकीट नाकारलं असल्याचे कारण देत शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. शीतल फराकटे याचा पक्ष प्रवेश राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरला आहे. कारण राष्ट्रवादीच्या फायरब्रँड नेत्या म्हणून त्या व्यासपीठ गाजवत होत्या.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Mar 11, 2026 02:46:40
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर: उबाठाच्या उपतालुका प्रमुखांवर चाकू हल्ला; दोघे गंभीर जखमी ANCHOR: वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर येथील उबाठाचे उपतालुका प्रमुख कृष्णा राठोड यांच्यावर मध्यरात्री चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात त्यांच्या सहकार्य मन्नू राठोड हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी रात्री सुमारे 12 वाजेच्या सुमारास कामगार चौक परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा राठोड यांचे कामगार चौकात ‘जय भवानी’ नावाचे हॉटेल आहे. रात्री हॉटेल बंद करून कृष्णा राठोड आणि त्यांच्या सहकारी मन्नू राठोड हे चारचाकी वाहनाने घरी जात होते. कामगार चौकात पोहोचताच समोरून आलेल्या दुचाकीवरून तिघा अज्ञातांनी त्यांचा रस्ता अडवला. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाली. या झटापटीदरम्यान अज्ञात आरोपींनी कृष्णा राठोड यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या मन्नू राठोड यांच्यावरही आरोपींनी चाकूने वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत करत दोघांनाही छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या दोघांवर उपचार सुरू आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 11, 2026 02:33:17
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर | खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती पदांसाठीची निवडणूक मंगळवारी पंचायत समिती सभागृहात पार पडली. या निवडणुकीत राजकीय समीकरणांना अनपेक्षित कलाटणी मिळाली. राज्यपातळीवर कट्टर विरोधक मानले जाणारे भाजप आणि उद्धव ठाकरे शिवसेना गट एकत्र आल्याने पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. सभापतिपदी भाजपच्या सुनीता संजय खंडागळे तर उपसभापतिपदी उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या मंदाबाई बद्रीनाथ वाकळे यांची निवड झाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले भाजप ठाकरे गट एकत्र आल्याने, राजकारणात कुणीच कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो हे पुन्हाएकदा सिद्ध झालं आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 11, 2026 02:31:58
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेची 18 मार्चला सर्वसाधारण सभा आहे. या सभेमध्ये पानिपट्टीसाठी दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. रहिवासी पाणीपट्टी करता 10 टक्के, व्यावसायिका करता 15 टक्के आणि औद्योगिक साठी 20 टक्के दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. इतकच नव्हे तर आरोग्य घनकचरा व्यवस्थापनासाठी पहिल्यांदाच सेवाशुल्क आकारण्यांसह याच विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध ना हरकत दाखल्यांसाठी 10 ते 15 टक्के शुल्क वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. दरम्यान नूतन महापौर आणि भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी मात्र कोल्हापूरकरांच्यावर कोणत्याही प्रकारचा अधिकचा कर लावला जाणार नाही असं आश्वासन दिले आहे. त्यामुळे 18 मार्चला होणाऱ्या सभेत नेमकं काय होतं याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 11, 2026 02:15:29
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 11, 2026 02:01:24
Bhandara, Maharashtra:876 शिक्षकांचे पदभरती करा... जिल्हा परिषद चे सभापती सह सदस्य बसले साखळी उपोषणाला जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत 876 शिक्षकांची पदभरती प्रलंबित असून या शिक्षकांची शाळेमध्ये पदभरती करावी या मागणी करिता आज जिल्हा परिषदेसमोर जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापतीसह सदस्य साखळी उपोषणाला बसले असून जिथपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत उपोषण सुरू राहणार अशी ठाम भूमिका घेते आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिक्षण व क्रीडा मंत्री पंकज भोयर यांना वारंवार निवेदने देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची निर्णय घेतला नाही एकीकडे सरकार जिल्ह्यातील शाळा डिजिटल करण्याचा निर्णय घेतला असून शाळेत शिक्षकच राहिले नाही तर विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 11, 2026 02:01:04
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्यात ‘वैनगंगा मिनी सरस विक्री व प्रदर्शन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद...स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांना मिळाले विक्रीचे व्यासपीठ...ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना...चार दिवस प्रदर्शनीचे आयोजन Anchor ;- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, भंडारा यांच्या वतीने जिल्हास्तरीय वैणगंगा मिनी सरस विक्री व प्रदर्शन भंडाऱ्यातील दसरा मैदान शास्त्री चौक येथे करण्यात आले असून या प्रदर्शनात भंडारा जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू,घरगुती खाद्यपदार्थ,पारंपरिक ग्रामीण उत्पादने तसेच विविध कलाकुसरीच्या वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आले आहे.ग्रामीण महिलांना त्यांच्या उत्पादनांची थेट विक्री करण्यासाठी या प्रदर्शनामुळे एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले.या प्रदर्शनामुळे ग्रामीण महिलांच्या कौशल्याला प्रोत्साहन मिळाले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामीण उत्पादनांना पसंती दिली.या उपक्रमामुळे स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होऊन ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे हे मात्र विशेष..!
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 11, 2026 01:30:25
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग| पळसवाडी जवळ एसटी बसला अचानक आग; ४८ प्रवासी सुखरूप बचावले धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी जवळ उभी असलेल्या एसटी महामंडळाच्या बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. बसमध्ये एकूण ४८ प्रवासी होते. सुदैवाने चालक आणि वाहक यांच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवाशांचा सुखरूप बचाव करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील शहादा येथून छत्रपती संभाजीनगरकडे येणारी एसटी बस चहा-नाश्त्यासाठी पळसवाडी जवळील हॉटेल आम्रपाली येथे थांबली होती. यावेळी बसच्या मागील बाजूचा टायर अचानक फुटला आणि त्यातून उडालेल्या ठिणग्यांमुळे बसला आग लागली. प्रसंगावधान राखत चालक वसंत पाटील आणि वाहक शिरसाट यांनी तात्काळ सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. बसमध्ये ४७ प्रवासी आणि एक लहान मूल असे एकूण ४८ प्रवाशी होते. बसमधून उतरताना एक-दोन प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मदत केली. या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली होती. मात्र सर्व प्रवासी सुरक्षित असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 11, 2026 01:17:37
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Mar 11, 2026 01:17:16
Thane, Maharashtra:भिवंडी भिवंडीत टोरेन्ट पावर कडून इफ्तार पार्टीतून धार्मिक सलोख्याचे दर्शन इफ्तार पार्टीत मुस्लिम-हिंदू बांधवांचा सहभाग सध्यस्थितीत पवित्र रमजान महिना सुरू असून या महिन्यात उपवास (रोजा ) मुस्लिम बांधवांकडून धरला जातो. या रमजान महिन्यात भिवंडीत एक अनोखी धार्मिक परंपरा दिसून आली आहे. भिवंडी शहरात टोरेन्ट पावर कंपनी कडून अशोक नगर येथील पाटीदार हॉल येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी व पोलीस प्रशासन सह मुस्लिम - हिंदू बांधव एकत्र येत इफ्तार पार्टीचे आयोजन करून त्यामधून धार्मिक सलोख्याचे दर्शन घडविले आहे. या इफ्तारीचे सर्वच सामाजिक स्थरातून कौतुक होत आहे. यावेळी इफ्तार पार्टीत अनेक मुस्लिम - हिंदू बांधव सहभागी झाले होते.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 11, 2026 01:16:56
0
comment0
Report
Advertisement
Back to top