Back
व्हॉट्सएप ऑटोडाउनलोड से बैंक अकाउंट खाली: जळगाव में साइबर धोखा चेतावनी
YKYOGESH KHARE
Oct 13, 2025 12:30:52
Nashik, Maharashtra
Anch -घरामध्ये ब्रॉडबँड लावलेला असेल आणि सातत्याने त्याचा उपयोग घरातील सर्वजण मोबाईल साठी करत असतील तर सावधान... या ब्रॉडबँडच्या माध्यमातून तुमचं बँक अकाउंट पूर्णपणे साफ होऊ शकतो.. जळगाव मधील एका घटनेने व्हाट्सअप चा वापर करणाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा समोर आलाय
Vo 1 हे आहे जळगावातील एक तक्रारदार नीलेश सराफ.... यांच्या मोबाईलवर व्हाट्सअप ॲपवर कस्टमर सपोर्टच्या नावाने एक एपीके फाईल आली. ऑटो डाउनलोड सेटिंग चालू असल्यामुळे ही फाईल आपोआप डाउनलोड झाली. या फाईलमुळे सायबर गुन्हेगारांना सराफ यांच्या मोबाईलचा 'ॲक्सेस' मिळाला. एकदा ॲक्सेस मिळताच, त्यांनी सराफ यांच्या खात्यातून एकामागून एक, तब्बल पावणेपाच लाख रुपये काढून घेतले. त्यामुळे खात्यात केवळ किरकोळ रक्कम शिल्लक राहिली. या प्रकरणी जळगावच्या या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Byte 1 अशोक नखाते अप्पर पोलिस अधीक्षक जळगाव
GFX मोबाईल वापरतानातुम्हीही तुमच्या व्हॉट्सॲपची 'ऑटो डाउनलोड' सेटिंग बंद करा.
अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या कोणत्याही फाईलवर क्लिक करू नका किंवा ती डाउनलोड करू नका.
कायदेशीर कारवाईच्या उदा महापालिका ,RTO चलान,NHI toll कडून वा तत्सम विभागाकडून कुठल्याही नोटीस असलेल्या फाईल उघडू नये
उत्सुकता ताणून धरणाऱ्या वा प्रलोभने देणारी आमिषे वा टास्क देणारी पोस्ट टाळाव्यात त्याच्या आहारी जाऊ नये
Vo 2 प्रत्येक जण सध्या संवादासाठी व्हाट्सअप चा वापर करतो.. संवाद घरचा असो मित्रांचा असो की ऑफिसचा.. यासाठी सातत्याने व्हाट्सअप चा वापर केला जातो.. यामध्ये बऱ्याच वेळेस ग्रुप मध्ये बिनकामाचा संवाद व्हिडिओ फोटो मोठ्या प्रमाणात येतात.. अनेक ग्रुप्स आपल्याला ऍड करत असतात मात्र हे सर्व टाळण्यासाठी आपण कुठलीही गोष्ट डाऊनलोड करताना whatsapp च्या चॅट सेटिंग मध्ये केवळ वाय-फाय वर डाऊनलोड असे सेट करतो... उद्देश असतो मोबाईलचा डेटा वाचावा...त्यासाठी ऑफिसचा किंवा घरी ब्रॉडबँड असेल तर वायफाय ॲक्सेस घेऊन वापर होतो... इथेच मोठी चूक होतेय सायबर तज्ज्ञांनी याबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे
Byte 2 तन्मय दीक्षित सायबर तज्ज्ञ
Vo 3 महाराष्ट्रभर आणि देशात आजकाल सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. याचे एक मोठे कारण ठरते आहे आपले दुर्लक्ष ..आता गरज आहे प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PKPramod Kumar Gour
FollowOct 13, 2025 14:30:240
Report
RSRAJEEV SHARMA
FollowOct 13, 2025 14:30:150
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 13, 2025 14:07:302
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 13, 2025 13:35:360
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 13, 2025 13:18:110
Report
AKAMAR KANE
FollowOct 13, 2025 13:15:210
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 13, 2025 12:52:410
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 13, 2025 12:31:090
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 13, 2025 12:20:420
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 13, 2025 12:19:511
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 12:01:120
Report
SNSWATI NAIK
FollowOct 13, 2025 11:35:020
Report
KJKunal Jamdade
FollowOct 13, 2025 11:33:180
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 13, 2025 11:23:070
Report