Back
कमर्शियल गैस बंद: छत्रपती संभाजीनगर के होटल-उद्योग संकट में
NMNITESH MAHAJAN
Mar 12, 2026 13:04:03
Jalna, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर : कमर्शियल गैस पुरवठा बंद,हॉटेल व्यवसाय संकटात,रिअँलिटी चेक(पॅकेज)
युद्धामुळे आखाती देशातून होणारा गैस और क्रूड ऑइल पुरवठा बंद झाला. त्यामुळे केंद्र सरकारने कमर्शियल गैस पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन दिवसांत सुमारे २८०० उद्योग आणि सुमारे ९२० हॉटेल्स बंद पडणार असल्याची माहिती सीएमआयएने मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसांमध्ये हॉटेल आणि उद्योग व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.याच पार्श्वभूमीवर झी-२४ तास छत्रपती संभाजीनगर शहरातील हॉटेल व्यवसायाचा रिलँनलिटी चेक करत वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.
व्हिओ:१:युध्दामुळे कंपन्या आणि हॉटेल व्यवसायाला होणारा कमर्शियल गॅसपुरवठा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.याचा परिणाम छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसून येतोय.छत्रपती संभाजीनगर मधील ज्योती नगर भागात ग्राहकांची सतत वर्दळ असणाऱ्या बालाजी रेस्टॉरंटला गॅसचा साठा संपल्यानं थेट कुलूप ठोकावं लागलंय.हॉटेलचं शटर बंद करून मालक घरी गेलेत.
व्हाक थ्रू+121 विथ हॉटेल मालक संदीप कांबळे
व्हिओ:२:अशीच अवस्था याच ज्योतीनगर भागातील दुसऱ्या साऊथ इंडियन नाश्ता सेंटरची झालीय.या नाश्ता सेंटरमध्ये कधीही ग्राहकांची वर्दळच पाहायला मिळते.पण हॉटेलमध्ये असलेला गॅसचा साठा संपला आणि मालकावर रिकाम्या हाताने नाष्ता सेंटरमध्ये उभं राहण्याची वेळ आलीय.एकही गॅसची टाकी उपलब्ध बसल्यानं या मालकाला दररोज थेट ४० हजारांच्या नुकसानीला सामोरं जावं लागतंय.
वाक थ्रू +121 विथ हॉटेल मालक संदीप कांबळे
व्हिओ:३:छत्रपती संभाजीनगर भागातील एमजीएम कॅम्पस परीसरात असलेल्या कैलाशा हॉटेलमध्ये आम्ही गॅसचा साठा किती उरलाय हे चेक करण्यासाठी हॉटेलमध्ये पोहचलो. सध्या हॉटेल सुरू आहे मात्र दोन दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा शिल्लक असल्यानं सरकारनं शक्य तेवढी मदत करावी अशी मागणी हॉटेल मालकांनी केलीय.जास्तीचा गॅस लागू नये म्हणून हॉटेलच्या मेनूत बदल करण्यात आलाय.जे पदार्थ शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो ते पदार्थ मेनूतून वगळण्यात आल्याची माहिती हॉटेल मालकांनी दिलीय.गॅसचा साठा संपल्यास हॉटेल सुरू ठेवण्यासाठी बाकी उपाययोजना काय करता येईल याची पडताळणी करत असल्याचं या हॉटेलच्या मालकांनी सांगितलं.
वाक थ्रू +121 विथ किशोर शेट्टी,मालक हॉटेल कैलाशा
(किचनमध्ये केलेला वाक थ्रू--या वाक थ्रू मधील सुरळीत सुरू आहे हे माझ्याकडून आलेलं वाक्य काढून टाकण्यात यावे ही विनंती)
व्हिओ:४: दरम्यान शहरातील हॉटेल आणि कंपन्या कमर्शिअल गैस पुरवठा बंद झाल्यानं अडचणीत आल्यानं आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत उद्योजक, हॉटेल मालक यांची बैठक होणार असून या बैठकीत काही तोडगा निघेल अशी अपेक्षा हॉटेल व्यावसायिक आणि उद्योजक बाळगून आहेत.
चौपाल विथ सीएमआयए
उत्सव मछार,अध्यक्ष
मिहीर सौंदलगीकर,पदाधिकारी,सीएमआयए
अर्थर्वेश नंदावत,उपाध्यक्ष,सीएमआयए
व्हिओ: कमर्शिल गैस अभावी शहरातील उद्योग संकटात सापडलेत.सीएमआयएने दावा केलेले 2900 उद्योग आणि 920 हॉटेल बंद झाल्यास लाखो कामगारांच्या रोजी रोटीचा प्रश्न उभा राहण्याची शक्यता आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowMar 12, 2026 14:38:530
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 12, 2026 14:20:230
Report
AKAMAR KANE
FollowMar 12, 2026 14:18:000
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 12, 2026 14:17:460
Report
UPUmesh Parab
FollowMar 12, 2026 14:17:050
Report
UPUmesh Parab
FollowMar 12, 2026 14:16:520
Report
UPUmesh Parab
FollowMar 12, 2026 14:16:410
Report
UPUmesh Parab
FollowMar 12, 2026 14:16:300
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 12, 2026 13:15:190
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 12, 2026 13:09:120
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 12, 2026 13:07:170
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 12, 2026 13:05:470
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 12, 2026 13:02:440
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 12, 2026 12:53:33Ambernath, Maharashtra:बदलापुरातील महानगर गैसविरोधात धड़क मोर्चा
वाढीव बिलांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब
बिलं दुरूस्त करा, अन्यथा काळं फासू – अविनाश देशमुख
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Report