Back
ओवैसी की एमआईएम ने संभाजी नगर में जोरदार रैली के साथ शक्ति प्रदर्शन किया
VKVISHAL KAROLE
Jan 08, 2026 12:17:25
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
एमआयएम मध्ये बुधवारी झालेल्या राड्यानंतर गुरुवारी पदयात्रेच्या माध्यमातून एमआयएमने जोरदार शक्ती प्रदर्शन केले, जिथं राडा झाला तिथूनच सुरुवात करून एमआयएम ने बंडखोराना आणि काल गोंधळ करणाऱ्या काँग्रेसला ही ताकत दाखवल्याची चर्चा आहे प्रचंड पोलीस फौजफाट्यात ओवेसी यांनी तब्बल 2 तास प्रचारात ताकत दाखवली... बंडखोरांच्या गडात ओवेसीचे शक्तिप्रदर्शन तब्बल 2 तास पदयात्रा करीत मोर्चेबांधणी हल्ला करणाऱ्या ना मतदार जागा दाखवतील -ओवेसी एमआयएम धील राड्यानंतर एमआयएम ने आज सकाळी संभाजी नगरात रस्त्यावर उतरत शक्ती प्रदर्शन केले, महत्वाचं म्हणजे कालच्या राडा ठिकाणावरून ओवेसी यांनी आज पदयात्रेची सुरुवात केली, पोलिसांच्या प्रचंड गराड्यात या पडयात्रेची सुरुवात झाली, ओवेसी याना पोलिसांनी पूर्ण गराडा घातला होता तर रॅलीत काहो होऊ नये म्हणून 200 वर पोलिसांची सुरक्षा रॅली ला होती या पोलीस गराड्यात एमआयएम ने शक्ती प्रदर्शन करीत विरोधकांना टार्गेट केले, कालच्या हल्ल्याबाबत पोलिसांनी कारवाई करावी अन्यथा उद्या पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करू असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिलाय... इम्तियाज जलील, प्रदेश अध्यक्ष असद ओवेसी ओवेसी यांनी आज लोकांसोबत चर्चा करीत मतदानाचे आवाहन केले, आणि ज्यांनी हल्ला केला, त्यांना मतदार मतदानात जागा दाखवतील असा टोला ही लगावला... तर भाजपनेही इम्तियाज वर सडकून टीका केलीय... इम्तियाज जलील यांनी रॅली मध्ये झालेल्या राडा प्रकरणात भाजप वर आरोप केले होते भाजप गुंडांना पोसत असल्याचा त्यांच्या आरोप होत त्यावर भाजपने सडकून टीका केलीय, अतुल Save यांनी इम्तियाज जलील याना नोटीस पाठवून अब्रुनुकसानीचा दावा करणार असे सांगितले आहे तर इम्तियाज बाबर चा वंशज आहे आम्ही त्याला आम्ही पळवून मारले नाही पण भाजपने असे केले तर जलील याना पळायला जागा उरणार नाही असा टोला भाजप आमदार संजय केनेकर यांनी लगावला आहे.. एमआयएम ने आज रॅली मधून शक्ती प्रदर्शन केले मात्र चर्चा होती ती पोलीस बंदोबस्ताची, त्यात आता इम्तियाज जलील यांनाही 10 पोलिसांचे संरक्षण मिळाले आहे तर काल झालेल्या हल्ल्यात पोलिसानी 50 लोकांवर दंगलीचे गुन्हे दाखल करत 6 लोकांना अटकही केलीय, मात्र कालच राडा आणि आजची ताकत दाखवण्याचे प्रयत्न , संभाजी नगरात हा वाद इतक्यात संपणार नाही याचीच नांदी दिसत होती...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJan 10, 2026 10:35:560
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJan 09, 2026 17:17:360
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 16:00:320
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 14:17:250
Report
SNSWATI NAIK
FollowJan 09, 2026 11:08:250
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 10:59:080
Report
SGSagar Gaikwad
FollowJan 09, 2026 09:33:550
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 09:20:000
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 09:13:210
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 07:52:140
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 07:49:400
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 07:33:140
Report
AKAMAR KANE
FollowJan 09, 2026 06:50:130
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 06:49:160
Report