Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001
संभाजी नगर में भाजपा-शिवसेना के बीच सत्ता-भाई-भाई का खेल
VKVISHAL KAROLE
Dec 15, 2025 08:15:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Anchor : राज्यात शिवसेना भाजप आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र निवडणूक लढवण्याची ठरवलं असलं तरी सुद्धा स्थानिक पातळीवर कुरघोडीचा राजकारण सुरूच आहे त्यात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजपाच मोठा भाऊ असल्याचं भाजप नेत्यांचे म्हणणं आहे , त्यामुळे आपसूकच लवकरच होणाऱ्या जागा वाटपात भाजपला जास्त जागा हव्या आहेत असा संदेशच भाजपाने मित्र पक्षांना दिला आहे मात्र यावरून राजकारण चांगलंच सुरू झाला आहे... संभाजी नगरात भाजपचा जास्त जागांवर दावा मोठ्या भावाच्या भूमिकेत भाजप असल्याचं स्पष्टीकरण तर इतिहासाची जाणीव ठेवावी शिवसेनेचा टोला महापालिका निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे महायुतीचं एकत्र लढण्याचे ठरलं असलं तरी स्थानिक पातळीवर मात्र कोणाच्या किती जागा यावरनं चांगलीच रस्सीखेच सुरू आहे , त्यात भाजपाने छत्रपती संभाजी नगरात एक सर्वे केला त्या सर्वेत लोकांनी भाजपला पसंती दिली आहे त्यामुळे आता आम्ही धाकट्या भावाच्या भूमिकेतून थोरल्या भावाच्या भूमिकेत गेल्याचा भाजप शहर अध्यक्ष यांचं म्हणणं आहे यानुसारच पुढील गणित ठरतील असेही त्यांनी म्हटलं म्हणजेच भाजपने जास्त जागा त्यांनाच हव्यात असे संकेत यातून दिले आहेतVisual: विशाल शिरसाठ, वर्षानुसार संभाजी नगर...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Dec 15, 2025 09:48:33
Akola, Maharashtra:नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा–2 साठी शासनाने समितीच्या रचनेत सुधारणा करत सह-अध्यक्ष पद निर्माण केले असून या पदावर भाजपचे अकोला पूर्वेचे आमदार रणधीर सावरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती शासनाने हा निर्णय घेतला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषी विभागाच्या मान्यतेनंतर 13 डिसेम्बर 2025 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील या सुकाणू समितीत रणधीर सावरकर सह-अध्यक्ष म्हणून काम पाहणार असून त्यांच्यावर प्रकल्प अंमलबजावणी, धोरणात्मक मार्गदर्शन, वार्षिक कृती आराखड्यास मान्यता, विभागांमध्ये समन्वय आणि जागतिक बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बदलांना मान्यता देणे ही जबाबदारी असेल.हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर शाश्वत, हवामान-अनुकूल व किफायतशीर शेतीस चालना देणाऱ्या या प्रकल्पात आमदार रणधीर सावरकरांच्या नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Dec 15, 2025 08:50:13
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग जिल्हा बँक दरोडेखोरांपासून वाचवा अशी मोहीम सध्या शिवसेना शिंदे गटाच्या माजी आमदार राजन तेली यांनी हाती घेऊन मंत्री नितेश राणे यांच्या निकटवर्ती असलेले सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यावर गंभीर आरोप केलेत. जिल्हा बँकेने महाजन यांना 59 कोटींचं कर्ज शेतमांगर 3.39 जागेवर दिलेलं आहे. त्या जागेचं व्हॅल्युएशन 88 लाख आहे. याची नोंद सातबारा उतारांवर दिसतंय. दहा कोटीच्या जागेवर एवढ्या मोठ्या रकमेची उचल बँकेकडून घेतली जाते तोच घोटाळा आहे. याला कारणीभूत बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि CEO प्रमोद गावडे हेही यामध्ये आरोपी आहेत यांच्यावर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे. ऑन --दीपक केसरकर केसरकर काय म्हणतात याला अर्थ नाही केसरकर हवेत आहेत केसरकरांना मी भेटून सांगितलं आहे. कोणाच्या प्रेमात ते वाकडी घेत नाहीत. आणि मी कोणाला घाबरत नाही एक घोटाळे नसले तर मी कशाला बँकेची बदनामी करू. मनीष दळवी यांना काय अनुभव आहे ते पहिल्यांदा चेअरमन झालेत. केसरकर यांच्या मतदार संघात भोगवे ग्रामपंचायत येते त्या ग्रामसेवकला बोलून घ्या घरी..एक गहान खत वेंगुर्ले तर दुसरं गहान खत कुडाळमध्ये झालं. तुम्ही प्रामाणिक काम करता येतं करा ना कशाला दडून करताय. बाईट ---राजन तेली
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 15, 2025 08:49:46
Shirdi, Maharashtra:कोपरगाव / अहिल्यानगर कोपरगावात समता पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यावर भररस्त्यात हल्ला.. समता पतसंस्थेचे कर्मचारी बाबासाहेब ठोंबरे यांना अज्ञातांकडून मारहाण. बेट नाक्याजवळ हल्लेखोरांनी अडवून केली बेदम मारहाण... “सोशल मीडियाचे पेज कोण चालवतोस ?” अशी विचारणा करून हल्ला.. हल्ल्यात बाबासाहेब ठोंबरे गंभीर जखमी.. जखमी कर्मचाऱ्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार... घटनेनंतर कोपरगाव पोलीस ठाण्याजवळ मोठी गर्दी.. समता पतसंस्थेचे कर्मचारी, संचालक मंडळ पोलीस ठाण्यात दाखल.. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही आक्रमक आरोपींवर कठोर कारवाईची मागणी... संचालक संदीप कोयटे यांची पोलिसांकडे तातडीची कारवाईची मागणी. कोपरगाव शहरात घटनेमुळे खळबळ... गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू.. पुढील तपास कोपरगाव पोलीस करत आहेत...
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 15, 2025 08:49:29
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 15, 2025 08:35:05
Shirdi, Maharashtra:बिबट्या मुक्त संगमनेर तालुक्यासाठी जन आक्रोश मोर्चा। आमदार सत्यजित तांबे आक्रमक। प्रांतअधिकारी निवेदन घेण्यासाठी कार्यालयाखाली येत नसल्याने तांबे आक्रमक। आमदार सत्यजीत तांबे पोलिस अधिकाऱ्यांवर संतापले। निवेदन घ्यायला दहा मिनिटात खाली या। अन्यथा या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस जबाबदार राहतील। प्रांत अधिकारी खाली न आल्यास जिल्हाधिकारी इथे येतील अशी परिस्थिती निर्माण करेल। आमदार सत्यजीत तांबे यांचा इशारा। तांबे यांच्या इशाऱ्यानंतर प्रांत अधिकाऱ्यांनी कार्यालयाखाली येत स्वीकारले निवेदन। प्रांतअधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन संपले.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 15, 2025 08:06:00
Nagpur, Maharashtra:Vidarbha महानगर पालिका पक्षीय बलाबल नागपूर महानगर पालिका 2017 पक्षनिहाय बलाबल... एकूण 151 भाजपा- 108 शिवसेना-0 राष्ट्रवादी-0 अपक्ष--1( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला ) ------- काँग्रेस-29 UBT शिवसेना-2 राष्ट्रवादीSp -1 ---- बसपा-10 ----------------------------- अमरावती महानगरपालिका पक्षनिहाय बलाबल... एकूण जागा 87 भाजप : 45 शिवसेना : 05 राष्ट्रवादी : 00 युवा स्वाभिमान पक्ष, रवि राणा : 03(हे आता भाजपा सोबत आहे) काँग्रेस : 15 राष्ट्रवादी SP : 00 शिवसेना UBT :02 मनसे : 00 ---------------------- BSP : 05 MIM : 10 RPI : 01 अपक्ष : 01 ----------------------------- चंद्रपूर महानगर पालिका पक्षनिहाय बलाबल... एकूण 66 भाजपा- 36 शिवसेना-0 राष्ट्रवादी-0 अपक्ष - 3 काँग्रेस -12 UBT शिवसेना - 2 राष्ट्रवादी SP - 2 मनसे - 2 -------- बसपा- 8 प्रaher - 1 ------------------------------ अकोला महानगरपालिका पक्षनिहाय बलाबल..... एकूण जागा : 80 भाजप : 48 राष्ट्रवादी : 5 शिवसेना ( शिंदे ) : 6 काँग्रेस : 13 राष्ट्रवादी ( श. प ) : 0 शिवसेना ( उबाठा) : 2 अपक्ष भारिप - बहूजन महासंघ (सध्याची वंचित बहुजन आघाडी)-- 3 अपक्ष--2 एमआयएम : 1
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 15, 2025 08:05:04
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 15, 2025 08:04:52
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 15, 2025 07:36:03
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस सोबत हात मिळवनी केल्याने शिवसेना उबाठा चे विधानसभा प्रमुख संतोष ढवळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. संतोष ढवळे ह्यांची निष्ठावान शिवसैनिक म्हणून ओळख आहे. ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख देखील होते. विधानसभा निवडणुकीत दोन वेळा फार कमी मतांनी त्यांचा पराभव झाला. दरम्यान नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी फुटली, तरी संतोष ढवळे यांनी काँग्रेस उमेदवारांचा प्रचार सुरू केला, शिवसेनेच्या खासदारा विरुद्ध देखील आरोप केले. त्यामुळे पक्षविरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत, त्यांची उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. शिवसेना नेते तथा सचिव विनायक राऊत यांच्या आदेशावरून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ही कारवाई करण्यात आली.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 15, 2025 07:16:12
Shirdi, Maharashtra:संगमनेर शहरात जनआक्रोश मोर्चा... वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्याविरोधात नागरीक आक्रमक... बिबटेमुक्त तालूका करा मागणी... बिबट्यांच्या हल्ल्यात अनेकांना गमवावा लागला जिव... बिबट्यांच्या दहशतीमुळे नागरीकांचे जगणे झाले मुश्किल... शाळकरी मुलं, शेतकरी यांच्यावर बिबट्यांचे वाढते हल्ले... संगमनेर शहरात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन... शेकडोंच्या संख्येने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह महिला मोर्चात सहभागी... आ.सत्यजीत तांबे आणि जयश्री थोरात यांनी धरलं वनविभागाच्या मंत्र्यांसह अधिकाऱ्यांना धारेवर... या मोर्चातून आढावा घेत आमदार सत्तेत तांबे आणि बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या सोबत बातचीत केलीये आमची प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 15, 2025 06:52:17
Lasalgaon, Maharashtra:नाशिकच्या निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील ब्राह्मणगाव विंचूर येथे बंडू मुरलीधर गायकवाड यांच्या टोमॅटोच्या शेतात रात्रीच्या सुमारास बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचे मोटर्सायकल वरून जात असलेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी जोर जोरात आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकल्याची घटना घडली यावेळी शेतकऱ्याने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात बिबट्याचा व्हिडिओ कैद करत शेतकऱ्यांच्या माहितीसाठी सोशल मीडियावर टाकल्याने शेतात पाणी भरण्यासाठी दिवसा लाईट राहत नसल्याने रात्री शेती पिकांना पाणी द्यावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे रात्रीच्या ऐवजी दिवसा लाईट द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून तसेच वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी होत आहे
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 15, 2025 06:52:02
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर मनपातील लेट लतीफांना नव्या आयएएस आयुक्तांचा दणका , वेळेत न येणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना गेटवरच ठेवले ताटकळत, दिला शेवटचा इशारा चंद्रपूर महानगरपालिकेत नव्याने आयएएस अधिका नरेश आकनुरी आयुक्तपदी नियुक्त झाल्यानंतर आज सकाळी एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. सकाळी दहा वाजताच्या अधिकृत कार्यालयीन वेळेत आयुक्त अकनुरी नरेश महानगरपालिकेत दाखल झाले. मात्र बहुतांश अधिकारी - कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संतप्त झालेल्या आयुक्तांनी थेट महानगरपालिकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचे आदेश दिले. काही वेळाने अधिकारी व कर्मचारी कार्यालयात पोहोचले असता त्यांना प्रवेशद्वार बंद असल्याचे आढळून आले. या कृतीने महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. आयुक्त नरेश अकनुरी नरेश यांनी दिलेल्या या धक्क्यामुळे महानगरपालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. काही वेळाने लेट लतीफांचा क्लास घेतल्यावर सर्वांच्या नोंदी घेत त्याना रुजू करून घेण्यात आले.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 15, 2025 06:38:43
Amravati, Maharashtra:धक्कादायक अमरावती जिल्ह्यात गेल्या 11 महिन्यात 22 हजार 661 नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी घेतला चावा; मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्याच्या कालावहीत तब्बल 22 हजार 661 नागरिकांना मोकाट कुत्र्याने चावा घेतला आहे. कुत्र्याने चावल्या नंतर शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावे लागत असल्याने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाची ही आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये एका नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद सुद्धा झाली आहे. जिल्ह्यात दररोज सरासरी 68 नागरिकांना कुत्र्याच्या चाव्याला बळी पळावे लागत आहे. अमरावती शहरासह ग्रामीण भागात मोकाट कुत्र्याचा त्रास वाढत चालला आहे. शहरात अनेक चौकात, वस्तीसह आणि मुख्य रस्त्यावर दुचाकीस्वारांचा पाठलाग करून कुत्रे चावत असल्याचा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top