Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001
अजित पवार गट के उम्मीदवारों की मुलाकातें, बीजेपी-शिवसेना फिफ्टी-फिफ्टी से जूझती राजनीति
VKVISHAL KAROLE
Dec 20, 2025 08:08:20
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
ANC: छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांकडून इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या फिफ्टी-फिफ्टी फॉर्मुल्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची फरपट होताना दिसतेय. करण युतीची बैठक असं सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसला बैठकीला एकत्रित बोलावले जात नाही. त्यामुळे जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला स्थान नाही असा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मेसेज शिवसेना आणि भाजपने दिल्याचे दिसतंय. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांनी आपल्या सगळ्याच मतदारसंघांमध्ये इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली आहे. जवळपास तीनशे इच्छुक उमेदवार आज मुलाखतीसाठी आलेले आहेत. जर शिवसेना-भाजप आम्हाला सोबत घेतले नाहीतर आमची पूर्ण तयारी आहे. स्वतंत्र लढू असं राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी सांगितले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JMJAVED MULANI
Dec 20, 2025 10:05:38
Baramati, Maharashtra:बारामती नगरपालिकेसाठी आज मतदान पार पडतं आहे… यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे.. एका मतदाराच मतदानच आधी कोणतरी करून गेला असल्याचं समोर आला आहे. बारामतीतील अहिल्यानगर देवी क्लब या मतदार केंद्रात हा प्रकार घडला आहे.. अमित दिलीप कुलथे यांचे मतदान आधीच झालं होतं.. अमित कुलथे मतदान केंद्रात दाखल झाले आणि त्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला.. यानंतर त्याच्याकडून निवडणूक केंद्रातील कर्मचाऱ्यांनी टेंडर वोट फॉर्म भरून घेतला आणि त्यानंतर अमित कुलथे यांनी मतदान केले आहे.. मात्र याआधी अमित कुलथे यांच्या नावाने मतदान कोणी केले याबद्दल संशय आहे. याबद्दल या केंद्रातील निवडणूक अधिकाऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास विचारणा केली असता प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला आहे
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Dec 20, 2025 09:36:05
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- उद्योग मंत्री उदय सामंत निवडणूक निकाल येईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे विरोधकांचा निकाल देखील लागलेला असेल विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष व्हायचा प्रयत्न गांधी घराण्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न मराठी माणसांच्या वाटोळ करण्याचं काम उद्धव ठाकरे सेनेने 25 वर्षांत केलं ठाणे महानगरपालिका, 29 महानगरपालिकेमध्ये युती होणार ठाणे महानगरपालिकेची यादी तयार झाल्यानंतर चर्चा फॉर्म भरायची तारीख झाल्यावर किती माणसं कुठे लढताहेत कळेल ठाकरे बंधूंशी युती, 29 जागा महायुती रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीची बोलणी अंतिम टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी महायुती म्हणून सामोरे जाणार उद्धव ठाकरे यांनी कॅलेंडर बनवलं आहे एक विकेट गेली दोन विकेट गेली 25 वर्षे त्यांची याच्यातच जाणार सिंधुदुर्ग निकाल रत्नागिरी प्रमाणेच लागेल जे रत्नागिरीमध्ये घडलं ते सिंधुदुर्गमध्ये घडेल
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Dec 20, 2025 08:45:45
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी-चिंचवड़ पर एक ही हाथ सत्ता गाजवणाऱ्या अजित पवारांचा बालेकिल्ला 2017 ला खालसा झाला. उसे वापस पाने के लिए उन्होंने स्पष्ट किया. इसके दृष्टिकोण से उन्होंने जोरदार मोर्चे बांधणी करत पक्ष प्रवेश ही दिले. लेकिन भाजपा نے بھی जोरदार पलटवार किया ki Ajit Pawarांचे अनेक शिलेदार फोडले.... पाहुयात भाजपच्या मिशन लोटस वर खास रिपोर्ट.... बाईट - Ajit Pawar, उपमुख्यमंत्री (16 December मोजо वरून pune ajit pawar byte) ...... पुण्याच्या बारामती होस्टेल वर पिंपरी.चिंचवड मधल्या भाजप आणि इतर पक्षांच्या काही स्थानिक नेत्यांना प्रवेश दिल्यानंतर अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी ताकत पणाला लावू असा दावा केला...भाजप आणि सेनेच्या स्थानिक नेत्यांचे प्रवेश घडवत अजित पवारांनी पहिला डाव टाकला खरा पण भाजप ने त्याला जोरदार प्रत्युत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेसची हवाच काढून घेतली आहे... अजित पवार यांचा शब्द प्रमाण मानणारे माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे; माजी महापौर मंगला कदम यांचा मुलगा कुशाग्र कदम, समीर मासुळकर यांच्या सह सर्वच पक्षातील दिग्गज नेत्यांना प्रवेश देत अजित पवार यांच्या सह महावीकास आघाडीला ही धक्का दिलाय...! बाईट - ( मुंबईतून ) ....अर्थात भाजप कडून जोरदार इन्कमिंग सुरू असताना भाजप मध्ये ही सर्व आलबेल आहे अशी स्थिती नाही...! भाजप मध्ये अनेक प्रभागात असंतोष उफाळून आला. अनेक ठिकाणी आंदोलन झाली आणि आयात उमेदवार नको अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी व्यक्त केली... केशव घोळवे, माजी.महापौर आर एस कुमार, भाजप (टक्कल) स्थानिक कार्यकर्ता ....भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून विरोध होत असला तरी वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतर बहुतांश नेत्यांच्या बंडाच्या तलवारी म्यान होणार हे स्पष्ट आहे... आता जरी या नेत्यांचा आयात उमेदवाराला विरोध असला तरी शेवटी पक्षादेश म्हणून त्यांचाच प्रचार करावा लागणार आहे....एकूणच गेलेला गड परत मिळवण्यासाठी धडपडत असलेल्या अजित पवारानी लढाईची सुरुवात केली खरी..पण भाजपने इन्कमिंग चे अस्त्र काढत अजित पवारांच्या पहिल्या हल्ल्याला परतवून लावले नाही तर उरलेल्या सैनिकांच्या आत्मविश्वासाला ही धक्का दिलाय...
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 20, 2025 08:39:24
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सोलापूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचे संकेत सोलापुरातील 12 पैकी 11 नगराध्यक्ष भाजपचे असतील पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा दावा जनतेने यांना लाथाडले तरी हे इतरांवर बोलतात; काँग्रेस नेते वडेट्टीवारांवर टीका दिलीप मानेंच्या प्रवेशामुळे आमदार सुभाष देशमुख नाराज मात्र नेतृत्व निर्णय स्वीकारावा लागतो सोलापूर महापालिकेसाठी मित्र पक्षांकडून सन्मानजनक प्रस्ताव आला तर युती होईल अन्यथा भाजप स्वबळावर लढेल ऑन सुभाष देशमुख नाराजी : भाजप वाढत असताना अनेक लोकांनी कष्ट घेतलेय त्यामुळे त्यांना वाटणे स्वाभाविक आहे नेतृत्वाने काही निर्णय घेतलेले असतात त्यामुळे तो निर्णय स्वीकारत असतो तसा तो सुभाष देशमुख यांनीही स्वीकारला आहे दिलीप माने यांच्या प्रवेशाबाबत मुख्यमंत्र्यांनी सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा केली होती. सुभाष देशमुख हे नाराज आहेत हे वास्तव आहे. विजयकुमार देशमुख हे नाराज नव्हते आमच्या दोघांचे चांगले कोऑर्डिनेशन आहे. त्यांच्या आईची तब्येत बुरी नव्हती म्हणून मी त्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. खूप संघर्षातून पक्ष उभारला आहे. संघर्षाच्या काळात एक एक कार्यकर्ता घडवायला खूप त्रास होतो. ज्याच्याशी आम्ही संघर्ष केला त्यांनाच पुढे घेऊन जावा लागेल याबाबत त्यांनी माझ्याकडे भावना व्यक्त केली. त्यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी नेतृत्वाने घेतलेला निर्णय स्वीकारायचा असतो. ऑन सोलापूर महायुती : भाजपाला महायुती म्हणून सर्वांना सोबत घेऊन जाण्याची इच्छा आहे. मर्यादित स्वरूपाच्या अपेक्षा असतील आणि त्यांना संधी देऊ शकत असू तर महायुती होईल. सन्मानजनक प्रस्ताव आला तर युती होईल अन्यथा भाजप स्वबळावर लढेल. ऑन कार्यकर्ते बंडखोरी : पक्ष जेव्हा मोठा होतो त्यावेळेस कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढतात त्याला डोकेदुखी म्हणता येणार नाही. 102 लोकांना संधी देता येईल मात्र उर्वरित लोकांना समजूत घालून निवडणुकीला सामोरे जाणार. ऑन आमदार सचिन कल्याणशेट्टी राजीनामा : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची सोलापूर महापालिकेचा निवडणूक प्रमुख होण्याची इच्छा नव्हती. जिल्ला परिषद निवडणुका जवळ आल्याने त्यांच्या मतदारसंघात त जिल्हा परिषद निवडणूक असल्याने सोलापुरात लक्ष देणे शक्य नव्हते. म्हणून सचिन कल्याणशेट्टी यांनी निवडणूक प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे तो आम्ही मान्य केला आहे. मात्र त्यांच्या जागी कोणीही दुसरा निवडले जाणार नाही. ऑन नगरपालिका नगराध्यक्ष : सोलापूर जिल्ह्यातील 12 पैकी 10 ते 11 नगरपालिकेत भाजपचा नगराध्यक्ष जिंकेल संपूर्ण जिल्हा भाजपासोबत आहे. भाजप सोबत गेल्यावर शहराचा भागाचा विकास होऊ शकतो हे लोकांना माहिती. ऑन विजय वाडेट्टीवर : लाचारी हे वडेट्टीवार यांच्याकडे आहे. जनतेने आपल्याला लाथाडले आहे. असे असताना आपण जनतेमध्ये जाऊन आत्मपरीक्षण करण्याऐवजी आपण कोणालातरी दोष देत बसतो. ऑन पृथ्वीराज चव्हाण दावा : त्यांना दिलेली तारीख उलटून गेलेली आहे, वयोपरत्वे काही गोष्टी लोक बोलत असतात त्यावर अधिकच बोलू इच्छित नाही.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 20, 2025 08:31:09
Washim, Maharashtra:वाशिम अँकर :वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी नगरसेवक पदाचे भाजपचे उमेदवार सतीश वानखेडे आणि शिवसेना उभाठा गटाचे प्रवीण इढोळे यांच्यात रात्रीला झालेल्या वादा नंतर आज पुन्हा भाजप आणि शिवसेनेचे कर्यकर्ते समोरासमोर येऊन वादविवाद झाला.या प्रकरणातील आरोपी सतीश उर्फ गल्ला वानखेडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं मात्र भाजपचे आमदार शाम खोडे यांनी आरोपी सतीश वानखेडे याला गाडीच्या बाहेर ओढल्यानं आमदार श्याम खोडे पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.त्यानंतर आमदार श्याम खोडे यांना मतदान केंद्राबाहेर काढण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले होते.लाखाला परिसरातील एसएमसी शाळेसमोर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.जवळपास अर्धा तास नंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि प्रकरण निवळण्याचा प्रयत्न केला. मात्र,भाजप आमदार शाम खोडे यांनी पोलिसांसोबत वाद घालत शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या दोन्ही कार्यकर्त्यांनी चांगलाच राडा केला त्यामुळे वातावरण चांगलं तणावपूर्ण होतं.अखेर पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेल्यानंतर वातावरण शांत झाले मात्र अजूनही या मतदान केंद्रावर तणावपूर्ण शांतता आहे
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 20, 2025 08:22:53
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 20, 2025 08:18:13
kolhapur, Maharashtra:नागपूर नागपुरात आज महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती सुरु झाल्यात... राष्ट्रवादीकडून 332 इच्छुकांनी अर्ज दाखल केला आहे... सर्व 151 जागांसाठी मुलाखती होत आहे... दरम्यान काल महायुतीची भाजपा और शिवसेना यांच्या जागावाटपण संदर्भात पहिली बैठक झाली होती... या बैठकीत राष्ट्रवादी नसल्याने चर्चांना उधाण आले होते मात्र पुढील महायुतीच्या जागावाटप बैठकीत आम्ही दिसू असा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे... शहराध्यक्ष अनिल अहिरकर राष्ट्रवादीकडून महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकी करता जातील असेही सांगण्यात येत आहे... पक्षालासन्मान जनक 15 टक्के जागा अर्थात 22 जागा राष्ट्रवादीकडून मागण्यात येत आहे... राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी ----- बाईट -- श्रीकांत शिवणकर,कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 20, 2025 08:07:13
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 20, 2025 08:06:58
0
comment0
Report
Advertisement
Back to top