Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444701

भाजपच्या नेत्यांना मराठीचं प्रेम नाही, अरविंद सावंत यांची टीका!

ANIRUDHA DAWALE
Jun 28, 2025 10:01:53
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_MP_SAWANT एक फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 महाराष्ट्राला लाचार सरकार लाभलं, भाजपमधील नेत्यांना मराठीचं प्रेम नाही; सत्ताधाऱ्यांनी फसवणूक करू नये, खासदार अरविंद सावंत यांची टीका अँकर :– येत्या पाच तारखेला ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर मुंबईत मोर्चा काढत आहे. यावर ठाकरे यांचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राला लाचार सरकार लाभलं आहे. मातृभाषेत शिक्षण घेतलं पाहिजे असा आग्रह धरायला पाहिजे. भाजपमधील नेत्यांना मराठीचं प्रेम नाही. मराठीला अभिजित भाषेचा दर्जा द्या यासाठी गेली 10 वर्ष माझा लढा सुरू होता महाराष्ट्राला जातीपाती मध्ये लढवणारे सत्ताधारी आहे. मराठी भाषा अविरत सुरू राहील यासाठी जीआर काढला पाहिजे. असेही सावंत यांनी म्हटलं आहे. सत्ताधाऱ्यांनी फसवणूक करू नये तर हा लढा महाराष्ट्राच्या अस्मितेचा लढा आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहे यावर सर्व सत्ताधारी उलट सुलट चर्चा करतात. मराठी भाषेचा जीआर हा उद्धव ठाकरे असताना काढला गेला हे मराठीचं प्रेम आहे. आधी राज आणि उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या होत्या मात्र समन्वय घडवून एकच तारीख ठरवण्यात आली. असून आता 5 जुलै रोजी मराठीचा जागर महाराष्ट्राच्या राजधानीत होणार आहे. मुंबईसाठी 106 हुतात्म्यांनी आपले प्राण अर्पण केले. हे सत्ताधाऱ्यांनी विसरू नये. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानात भाषावार प्रांतरचना आहे. मराठी ही आमची राज्यभाषा आहे तिचा अवमान सहन केला जाणार नाही. आमचा हिंदीला विरोध नाही. फक्त सक्तीला विरोध आहे. वर्ग 5 नंतर हिंदी शिकवायला हरकत नाही असेही अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. बाईट :– अरविंद सावंत, खासदार
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Advertisement