Back
अनधिकृत ड Dumpर ने युवक की मौत, सड़क सुरक्षा पर उग्र नागरिक उबाल
UJUmesh Jadhav
Feb 24, 2026 12:09:03
Thane, Maharashtra
अनधिकृत डंपरचा कहर...
कल्याण मार्गावर तरुणाचा चिरडून मृत्यू...
संतप्त नागरिकांचा जाहीर आक्रोश....
घटना सीसीटीव्हीत कैद...
कल्याण-नगर महामार्गवर कल्याणच्या दिशेने बेफाम वेगाने धावणाऱ्या अनधिकृत डंपरने पंचवीस वर्षीय वैभव साहेबराव भामरे या तरुणाला अक्षरशः चिरडत मृत्यूच्या दारात ढकलले आणि एका कुटुंबाचा संसार क्षणात उद्ध्वस्त झाला. कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्देत असलेल्या वरप गावानजीकच्या परिसरात घडलेली ही हृदयद्रावक घटना केवळ अपघात म्हणून विसरून चालणार नाही, अशी तीव्र भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे. मालेगावचा रहिवासी असलेला वैभव आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी वरप येथे आला होता. कुटुंबीयांच्या सोबत विधी आटोपून सुरक्षितपणे घरी परतण्याची त्याची तयारी सुरू असतानाच नियतीने निर्दयी वळण घेतले. भरधाव आणि नियमबाह्य डंपरने त्याला जोरदार धडक दिली; इतकी भीषण की त्याचा जागीच मृत्यू झाला. सदरची घटना सीसीटीव्हीत कैद.
या घटने नंतर परिसरात संतापाचा जणू स्फोटच झाला. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने डोळेझाक केल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडले. संबंधित मार्गावर वेगमर्यादा नियंत्रणासाठी स्पीड ब्रेकर उभारावेत, झेब्रा क्रॉसिंगची स्पष्ट रेखांकन करावी, अवैध डंपर वाहतुकीवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी अनेकदा करण्यात आली होती. मात्र अधिकाऱ्यांनी केवळ आश्वासने देत वेळ काढल्याचा संतप्त सूर उमटत आहे. परिणामी, रस्ते सुरक्षेच्या बाबतीत झालेल्या निष्काळजीपणाची किंमत एका तरुणाच्या जीवाने चुकवावी लागली, अशी खंत व्यक्त केली जात आहे.
अपघातानंतर संतप्त जमावाने मृतदेह उचलण्यास नकार देत रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. पोलिसांना धारेवर धरत अनधिकृत डंपर त्वरित बंद करण्याची आणि संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दोषींवर कारवाईचे आश्वासन देण्यात आले असले तरी स्थानिकांचा रोष अद्याप शांत झालेला नाही.
वैभव हा कुटुंबाचा कर्ता आणि आई-वडिलांचा आधार होता. त्याच्या आकस्मिक निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. “हा अपघात नाही, ही थेट निष्काळजीपणातून झालेली हत्या आहे,” असा थेट आरोप नागरिकांकडून होत आहे. वाढत्या बांधकाम व्यवसायामुळे रस्त्यावर अनधिकृत डंपरची वर्दळ वाढली असून वाहतूक नियमांचे उघड उल्लंघन सर्रास सुरू असल्याची बाब यानिमित्ताने पुन्हा समोर आली आहे. प्रश्न केवळ एका तरुणाच्या मृत्यूपुरता मर्यादित नाही; तो संपूर्ण व्यवस्थेच्या उत्तरदायित्वाचा आहे.
रस्ते सुरक्षेचे नियम केवळ कागदावर राहणार असतील, तर अशा घटना पुन्हा घडण्याची भीती नाकारता येत नाही. एका कुटुंबाचा उजेड हरपल्यानंतर प्रशासन जागे होणार का, की आणखी एखादा जीव गमावल्यावरच हालचाल होणार, हा जळजळीत सवाल आता वरपेतेसह संपूर्ण परिसरातून घुमू लागला आहे. नागरिकांच्या संतप्त आक्रोशाला योग्य दिशा देत ठोस आणि तत्काळ उपाययोजना राबवणे हीच या दुर्दैवी घटनेला खरी श्रद्धांजली ठरेल.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
BPBHUPESH PRATAP
FollowFeb 24, 2026 13:37:520
Report
ADArvind Dubey
FollowFeb 24, 2026 13:37:070
Report
AMAbhishek Mathur
FollowFeb 24, 2026 13:36:530
Report
VKVINOD KANDPAL
FollowFeb 24, 2026 13:36:370
Report
OSONKAR SINGH
FollowFeb 24, 2026 13:36:170
Report
CRCHANDAN RAI
FollowFeb 24, 2026 13:35:240
Report
IKIsateyak Khan
FollowFeb 24, 2026 13:34:250
Report
DCDhruv Chaudhary
FollowFeb 24, 2026 13:34:100
Report
NDNEELAM DAS PADWAR
FollowFeb 24, 2026 13:34:020
Report
RNRajesh Nilshad
FollowFeb 24, 2026 13:33:460
Report
DKDARSHAN KAIT
FollowFeb 24, 2026 13:33:350
Report
MKMohammed Khan
FollowFeb 24, 2026 13:32:200
Report
RKRAJESH KUMAR
FollowFeb 24, 2026 13:32:100
Report
VKVijay1 Kumar
FollowFeb 24, 2026 13:31:07Noida, Uttar Pradesh:होली मौके पर नोएडा में खाद्य सुरक्षा ने सात नमूने लैब भेजे
0
Report
VKVijay1 Kumar
FollowFeb 24, 2026 13:30:520
Report