Back
शहापुर- मुरबाड मार्ग पर खुले लोहे के बार, यात्रियों के लिए बड़ा खतरा
UJUmesh Jadhav
Feb 17, 2026 23:17:30
Thane, Maharashtra
समृद्धीनजीकच्या शहापूर-मुरबाड मार्गावर उघडे पडले लोखंडी बार... अपघातांचा धोका वाढला; जीवितहानी होण्याची दाट शक्यता... महाराष्ट्य राज्य रस्ते व विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या शहापूर-मुरबाड - खोपोली या मुख्य मार्गावरील कोळकेवाडी व दोनघरच्या दरम्यान म्हणजेच समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याची बाब समोर आली असून, ठिकठिकाणी रस्ता खचल्याने लोखंडी सळ्या (बार) उघड्या अवस्थेत बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्य वाहन चालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. मागील आठ वर्षांपासून सुरु असलेल्या व अजातगायत पूर्ण न झालेल्या शहापूर - मुरबाड - खोपोली महामार्गावरील कोळकेवाडी - दोनघर दरम्यान असलेल्या महामार्गाचा काँक्रीट रस्ता तुटून आतमधील लोखंडी जाळी बाहेर आली आहे. या उघड्या सळ्यांमुळे दुचाकीस्वारांचे टायर फुटण्याची, वाहन घसरून अपघात होण्याचे प्रकार वाढत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी हा धोका अधिक वाढत असून, एखादा गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होते. शाळकरी मुले, कामगार तसेच ग्रामीण भागातील नागरिक याच मार्गाचा वापर करतात. मात्र एमएसआरडीसी विभागाकडून दुरुस्तीबाबत अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसत नाही. रस्त्यावरील भेगा व उघडे लोखंडी बार तातडीने काढून रस्ता दुरुस्त करावा अन्यथा एखाद्या जीवितहानी नंतरच प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित एमएसआरडीसी विभागाने तातडीने पाहणी करून धोकादायक ठिकाणी तात्काळ सुरक्षितता उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
YSYatnesh Sen
FollowMar 15, 2026 08:32:510
Report
VRVikash Raut
FollowMar 15, 2026 08:32:370
Report
IAImran Ajij
FollowMar 15, 2026 08:32:270
Report
JPJai Prakash
FollowMar 15, 2026 08:32:080
Report
KJKamran Jalili
FollowMar 15, 2026 08:31:370
Report
RKRampravesh Kumar
FollowMar 15, 2026 08:31:270
Report
DKDARSHAN KAIT
FollowMar 15, 2026 08:31:150
Report
DSDanvir Sahu
FollowMar 15, 2026 08:31:040
Report
KSKashish Singh
FollowMar 15, 2026 08:30:470
Report
BBBindu Bhushan
FollowMar 15, 2026 08:30:390
Report
GPGovind Prasad Pandey
FollowMar 15, 2026 08:30:260
Report
GPGovind Prasad Pandey
FollowMar 15, 2026 08:30:170
Report
0
Report
GPGovind Prasad Pandey
FollowMar 15, 2026 08:30:09Noida, Uttar Pradesh:104 skydivers, 20 nations, one incredible moment in the sky that broke a world record
0
Report
GPGovind Prasad Pandey
FollowMar 15, 2026 08:18:00Noida, Uttar Pradesh:खुश रहने के लिए महंगी गाड़ियां नहीं बस पुराने यार और एक साइकिल ही काफी है.
110
Report