Back
नवी मुंबई के बोगस कॉल सेंटर पर साइबर पुलिस ने बड़ा छापा; 17 गिरफ्तार
SNSWATI NAIK
Nov 21, 2025 07:51:42
Navi Mumbai, Maharashtra
नवी मुंबईत बोगस कॉल सेंटरवर सायबर पोलिसांचा मोठा छापा; १७ जण अटकेत. १२ कोटींची फसवणूक केल्याचं उघड. नवी मुंबई सायबर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेने संयुक्त कारवाईत तुर्भेतील मिलेनियम पार्क, बिल्डिंग क्रमांक 03, तिसरा मजला येथे सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून एक मोठा सायबर फसवणूक रॅकेट उधळून लावले. शेअर्स मार्केट ट्रेडिंगमध्ये नफा मिळण्याचे आमिष व अमेरिकन नागरिकांच्या संगणकांमध्ये व्हायरस हल्ला करून मदतीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीतील अक्षय शिर्के, गगन थापर सह १७ जणांना अटक करण्यात आली. तर शिव शर्मा हा मुख्य सूत्रधार फरार आहे. छाप्यादरम्यान The Wealth Growth, The Capital Services, Sigma, Trade Knowledge Services आणि Stock Vision या नावांनी चालणाऱ्या बनावट कंपन्यांमध्ये ९७ युवक व युवती संगणकावरून व्हॉट्सअॅप ग्रुप्स व कॉलच्या माध्यमातून शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आश्वासन देत असल्याचे आढळले. संगणक तपासणीअंती फसवणुकीसाठी वापरलेले चॅट मेसेजेस, विविध बँक खात्यांची माहिती, व्यवहारांचे तपशील तसेच नागरिकांनी फसवणूक झाल्याची तक्रारीचे पुरावे जप्त करण्यात आले. तपासादरम्यान उघड झालेल्या ७१ बँक खात्यांपैकी ६१ खात्यांतून तब्बल १२.२९ कोटींचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. NCCRP वर या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण देशभरातून ३१ तक्रारी नोंद झालेल्या आहेत. याशिवाय World Solution या कंपनीमार्फत अमेरिकन नागरिकांच्या संगणकांमध्ये Malware/Ransomware Attack करून स्क्रीनवर Microsoft Error Code दाखवत बनावट Microsoft Customer Support च्या नावाने फसवणूक करण्यात येत असल्याचेही उघड झाले. संपूर्ण कारवाईत २१ सीपीयू, ५ लॅपटॉप, ५ SSD, ३८ मोबाईल फोन आणि GSM सर्व्हर असा मुद्देमाल जप्त केला. सायबर पोलीस ठाणे, गु.र.नं. ५५/२०२५ कलम ३१८(४), ३१९(२), ६१(२) भा.दं.वि. व माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६(C), ६६(D) अन्वये गुन्हा नोंदण्यात आला असून २० आरोपींना २३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील फसवणुकीचा व्याप मोठा असून आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
159
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
सरदार पटेल की 150वीं जयंती पर बरहज विधायक दीपक मिश्रा ने हजारों कार्यकर्ताओं के साथ की भव्य पदयात्रा
SSandeep
FollowNov 21, 2025 08:42:160
Report
ASAJEET SINGH
FollowNov 21, 2025 08:42:13Jaunpur, Uttar Pradesh:SIR विवाद वायरल वीडियो को बीजेपी विधायक रमेश चंद्र मिश्रा ने बताया फर्जी, विपक्ष पर गुमराह करने का आरोप
0
Report
MGMOHIT Gomat
FollowNov 21, 2025 08:41:580
Report
AMAnkit Mittal
FollowNov 21, 2025 08:41:41Muzaffarnagar, Uttar Pradesh:मुज़फ्फरनगर ब्रेकिंग
एसएसपी आफिस पर महिला ने छिड़का पेट्रोल,
पैट्रोल छिड़क महिला ने किया आत्मदाह का प्रयास
पति व ससुरालियों पर प्रताड़ित करने का लगाया आरोप
महिला को आंखों में जलन होने पर अस्पताल पहुंचाया.
थाना भोपा क्षेत्र के भोकारेहड़ी की निवासी है पीड़िता
0
Report
ASAVNISH SINGH
FollowNov 21, 2025 08:41:270
Report
MGMOHIT Gomat
FollowNov 21, 2025 08:41:140
Report
0
Report
KLKANHAIYA LAL SHARMA
FollowNov 21, 2025 08:40:460
Report
VKVIJAY KUMAR
FollowNov 21, 2025 08:39:450
Report
LSLaxmi Sharma
FollowNov 21, 2025 08:39:160
Report
RNRajesh Nilshad
FollowNov 21, 2025 08:38:160
Report
DIDamodar Inaniya
FollowNov 21, 2025 08:37:580
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowNov 21, 2025 08:37:400
Report
MPMAHESH PARIHAR1
FollowNov 21, 2025 08:37:220
Report
AOAjay Ojha
FollowNov 21, 2025 08:37:050
Report