Back
मुंबई के आर.ए.के मार्ग पर डिजिटल अरेस्ट गैंग का पर्दाफाश, 6 गिरफ्तार
MKManoj Kulkarni
Oct 18, 2025 01:45:31
Mumbai, Maharashtra
मुंबईतील आर. ए. के. मार्ग पोलिसांनी "डिजिटल अरेस्ट" प्रकारातील आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करत सहा आरोपींना अटक केली आहे. या टोळीने स्वतःला एटीएस आणि एनआयए अधिकारी म्हणून भासवून नागरिकांना फसवून लाखो रुपयांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी आर.ए.के. मार्ग पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर अधिकाऱ्यांच्या मदतीने तपास करताना पोलिसांनी १५ बँक खाती गोठवून ₹१०.५० लाख रुपये वाचवले. तपासादरम्यान आरोपींचा माग काढताना त्यांचे ठिकाण गुजरात आणि राजस्थानमध्ये असल्याचे समोर आले. पोलिसांनी तीन विशेष पथके तयार करून शोधमोहीम राबवली. अटक आरोपींमध्ये सुरेशकुमार मगनलाल पटेल (५१), मुसरान इक्बालभाई कुंभार (३०), चिराग महेशभाई चौधरी (२९), अंकितकुमार महेशभाई शाह (४०), वासुदेव उर्फ विवान वालजीभाई बारोट (२७) व युवराज उर्फ मार्को लक्ष्मणसिंग सिकरवार (४३) यांचा समावेश आहे. यापैकी मुख्य आरोपी युवराज उर्फ मार्को हा मागील दोन ते तीन वर्षांपासून विविध सायबर फसवणुकीत सक्रिय होता, तर उर्वरित आरोपी बँक करंट अकाउंट आणि सीमकार्ड पुरविण्याचे काम करीत होते. तपासात समोर आले की या टोळीचे जाळे देशभर पसरले असून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा, पश्चिम बंगाल, केरळ, झारखंड आणि हरियाणा या १३ राज्यांमधील सायबर युनिटमध्ये एकूण ३१ तक्रारी दाखल आहेत. याचप्रमाणे, पनवेल येथील ६८ वर्षीय नागरिकालाही अशाच पद्धतीने फसविण्याचा प्रयत्न झाला होता. त्यांना "अतिरेक्यांच्या यादीत नाव आहे" असे सांगून डिजिटल अरेस्टमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र त्यांच्या नातेवाईकांच्या जागरूकतेमुळे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने ₹४० लाखांची रक्कम वाचवण्यात पोलिसांना यश आले. मुंबई पोलिसांच्या या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारीविरोधात मोठा धक्का बसला असून इतर राज्यांमधील पोलिसांनाही या प्रकरणात पुढील तपासासाठी माहिती देण्यात आली आहे.
14
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
1
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowOct 19, 2025 15:03:040
Report
VSVishnu Sharma
FollowOct 19, 2025 15:02:430
Report
SLSanjay Lohani
FollowOct 19, 2025 15:02:330
Report
AGAbhishek Gour
FollowOct 19, 2025 15:02:240
Report
CJCHAMPESH JOSHI
FollowOct 19, 2025 15:02:070
Report
HSHITESH SHARMA
FollowOct 19, 2025 15:01:230
Report
KSKartar Singh Rajput
FollowOct 19, 2025 15:01:060
Report
ADASHISH DWIVEDI
FollowOct 19, 2025 15:00:310
Report
OSONKAR SINGH
FollowOct 19, 2025 15:00:180
Report
Orai, Uttar Pradesh:
उरई नगर पालिका अध्यक्ष श्रीमती गिरजा चौधरी और पुत्र विजय चौधरी की ओर से उरई नगर पालिका के सभी गणमान्य नागरिको को दीपावली व भाई दूज की हार्दिक शुभकामनाएं ।
0
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowOct 19, 2025 14:48:173
Report
VSVishnu Sharma
FollowOct 19, 2025 14:48:032
Report
VSVishnu Sharma
FollowOct 19, 2025 14:47:303
Report