Back
लातूर की श्रेया शंकर शिंदे: बाढ़ में खेत डूबे, IAS बनने का सपना बना रहा
VBVAIBHAV BALKUNDE
Oct 09, 2025 09:46:41
Latur, Maharashtra
AC :- औसा तालुक्यातील किल्लारी येथील श्रेया शंकर शिंदे… हिला IAS व्हायचं आहे, मोठा अधिकारी बनायचं आहे… आणि आपल्या आई-वडिलांचं आयुष्य बदलायचं आहे. पण या अतिवृष्टीनं आणि पुरानं तिची शेती अक्षरशः मातीसकट वाहून नेली... आणि तिचं आयुष्य जणू त्या पाण्यातच वाहून गेलं. तेरणा नदीनं पात्र सोडलं, आणि त्या पाण्यात तिचं सगळं स्वप्नही वाहून गेलं. आता श्रेयासमोर प्रश्न उभा टाकला आहे पुढे शिकायचं कसं ? आणि ‘मला अजून शिकायचंय, मोठं व्हायचंय’ हे वडिलांना सांगायचं कसं ?...\n\nहि आहे औसा तालुक्यातील किल्लारी येथील श्रेया शंकर शिंदे… भूकंपानं विद्ध झालेल्या या मातीत जन्मली, पण स्वप्न मात्र आभाळाएवढं. IAS बनायाचं, देशासाठी काहीतरी करायचं… आणि आपल्या आई-वडिलांचं आयुष्य बदलायचं — हेच तिचं ध्येय. कायम हातात पुस्तकं, डोळ्यांत स्वप्नं, आणि मनात प्रचंड जिद्द… की एक दिवस तिच्या घराचं नाव उजळेल. पण या वर्षीचा पाऊस आणि निर्माण झालेली पूरस्थिती तिच्या आयुष्यात कहर घेऊन आली. तेरणा नदीनं पात्र सोडलं, आणि पुराचं पाणी थेट तिच्या शेतात शिरलं.\n\nती दोन एकर शेती — जी तिच्या शिक्षणाचा आधार होती — ती मातीसकट वाहून गेली.\n\nआता शेतात उरलं आहे फक्त ओलं चिखल, आणि काही मोडकी स्वप्नं… श्रेयाला एकच गोष्ट सतत सतावत आहे ति म्हणजे मला अजून शिकायचंय, मोठा अधिकारी व्हायचंय… पण हे घरी कसं सांगायचं ? करण शेतातलं सगळं वाहून गेले हाता तोंडाशी आलेला घास गेलाय त्यामुळे आर्थिक गणित तिचं कोलमडलं आहे.\n\nबाईट :- श्रेया शिंदे\n\nआणि स्वप्न अधुरं राहू नये म्हणून…\n\nआता समाजानं, दानशूर व्यक्तींनी आणि प्रशासनानंही तिच्या पाठीशी उभं राहायला हवं.\nकारण ही फक्त एका शेतकऱ्याच्या लेकीची गोष्ट नाही…ही त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या स्वप्नाची गोष्ट आहे, ज्यांना वाटतं. माझं लेकरू मोठं व्हावं...या मातीत फक्त पिकं उगवत नाहीत… तर जिथं प्रत्येक चिखलात एक IAS दडलेला आहे.....
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RKRaj Kishore Soni
FollowOct 09, 2025 15:02:150
Report
0
Report
JKJitendra Kanwar
FollowOct 09, 2025 15:01:400
Report
GYGAUKARAN YADU
FollowOct 09, 2025 15:01:280
Report
ADArjun Devda
FollowOct 09, 2025 15:00:480
Report
MMMohd Mubashshir
FollowOct 09, 2025 15:00:280
Report
SSSanjay Sharma
FollowOct 09, 2025 15:00:170
Report
PCPranay Chakraborty
FollowOct 09, 2025 14:51:432
Report
RSRajendra sharma
FollowOct 09, 2025 14:51:330
Report
DSDevendra Singh
FollowOct 09, 2025 14:51:200
Report
RKRakesh Kumar
FollowOct 09, 2025 14:51:050
Report
RSRajendra sharma
FollowOct 09, 2025 14:50:440
Report
ADArjun Devda
FollowOct 09, 2025 14:50:320
Report
VKVIJAY KUMAR
FollowOct 09, 2025 14:50:220
Report