Buldhanaधोशे या डिफेंडर के पीछे: आमदार के ठेकेदार लिंक पर बवाल!
MNMAYUR NIKAM
Oct 18, 2025 10:47:30
Buldhana, Maharashtra
प्लॉट विकून 'दानशूर' झालेले आमदार, आता दीड कोटींच्या 'डिफेंडर'साठी 'ठेकेदार' कनेक्शन? बुलढाण्याचे गायकवाड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! बुलढाणा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि वाद हे जणू समीकरणच बनले आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीवर आणि विधानावर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते आणि ते कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी राहतात. आता, नुकत्याच दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांनी खरेदी केलीली दीड कोटींची आलिशान 'डिफेंडर' (Defender) गाडी त्यांना पुन्हा एकदा वादाच्या गर्तेत घेऊन आली आहे. विशेष म्हणजे, या खरेदीमुळे एक खोचक प्रश्न उभा राहिला आहे. कारण, महिनाभरापूर्वीच मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी याच आमदारांनी आपल्या मालकीचे दोन प्लॉट विकून २५ लाख रुपये दिल्याच्या मोठ्या आणि संवेदनशील बातम्या झळकल्या होत्या. शेतकऱ्यांसाठी स्वतःची मालमत्ता विकावी लागली, अशा 'त्याग' भावनेतून मदत करणाऱ्या आमदारांना आता दीड कोटींची 'डिफेंडर' घेण्यासाठी नेमका कोणता 'शॉर्टकट' किंवा 'उपाय' करावा लागला, हाच खरा खळीचा मुद्दा आहे. गायकवाड यांच्या या नव्या 'डिफेंडर' गाडीने वादाची पहिली धुरा ओढली, ती भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या आरोपाने. शिंदे यांनी थेट नाव न घेता असा गंभीर आरोप केला आहे की, ही महागडी गाडी एका ठेकेदाराच्या नावावर असून, ती कमिशनच्या स्वरूपात आमदार गायकवाड यांना देण्यात आली आहे. यामुळे 'डिफेंडर'च्या खरेदीचे 'अर्थकारण' आणि 'स्रोत' यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. Final Vo - आमदारसाहेब, तुम्ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात अडकलेले असता. पण, यावेळेस 'शेतकऱ्यांचा त्याग' आणि 'ठेकेदाराचे कमिशन' या दोन टोकांच्या गोष्टी एकत्र आल्यामुळे, तुम्ही या डिफेंडरच्या वादातून आता कसे सुटणार, हाच प्रश्न बुलढाण्याच्या जनतेला सतावतो आहे. जनतेला आता फक्त एवढेच जाणून घ्यायचे आहे की, 'प्लॉट' विकून दाखवलेली 'दानशूरता' खरी होती, की 'डिफेंडर' मधून दिसणारा 'राजकीय थाट' खरा आहे? मयूर निकम झी 24 तास बुलढाणा
0हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|