Back
भंडारा में बिना परवाना बोगस धान बीज बिक्री पर कृषि विभाग कार्रवाई, 2.5 लाख जप्त
PTPRAVIN TANDEKAR
Jan 07, 2026 02:16:16
Bhandara, Maharashtra
बोगस धान बियाणांची हेराफेरी करणाऱ्यावर कृषी विभागाची कार्यवाही.... 2 लाख 50 हजाराचे बोगस धान बियाणे जप्त विना परवाना विक्री प्रकरणी गुन्हा दाखल
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात बोगस धान बियाण्यांची विना परवाना विक्री करणाऱ्या इसमावर कृषी विभाग व भरारी पथकाने संयुक्त कारवाई करून मोठा दणका देण्यात आला असून तब्बल २ लाख ५० हजार रुपये किमतीचा बोगस बियाण्यांचा साठा पिंपळगाव येथे जप्त करण्यात आला आहे. पिंपळगाव कोहळी येथील मदन रामटेके हा इसम स्वतःच्या घरी धान पिकाचे बियाणे पॅकिंग करताना आढळून आला. तपासणीत सदर इसमाकडे बियाणे उत्पादन व विक्रीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. तपासादरम्यान विविध कंपन्यांच्या नावाने तयार केलेले बोगस माहितीपत्रक,पॅकिंग साहित्य तसेच पॅक व सैल स्वरूपातील धान बियाणे आढळून आले. या बियाण्यांची अंदाजे बाजारभावानुसार एकूण किंमत 2 लाख 50 हजार इतकी असल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे. विशेष म्हणजे बियाण्यांचे जुने (२०१८ सालचे) प्रयोगशाळा कागदपत्रे दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचेही निदर्शनास आले. जप्त केलेला सर्व मुद्देमाल खाजगी वाहनांद्वारे पोलीस स्टेशन लाखांदूर येथे जमा करण्यात आला असून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
1
Report
36
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
93
Report
91
Report
0
Report
0
Report
VKVasim Khan
FollowJan 19, 2026 07:06:270
Report
0
Report