Back
अमरावती महापालिका चुनाव: महायुति बनाम महाविकास आघाडी के बीच जबरदस्त टकराव
ADANIRUDHA DAWALE
Dec 20, 2025 15:16:05
Amravati, Maharashtra
AMT_HAVA_PKG चोवीस फाईल आहे
अमरावती महापालिकेत युती आणि आघाडीच भिजते घोघडे; अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा एकला चलोचा नारा, तिरंगी निवडणूक होण्याची शक्यता
अँकर : आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर महापालिका निवडणूक जाहीर झालेली आहे. अशातच प्रत्येक पक्ष जागा वाटपामध्ये जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र अमरावतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आणि काँग्रेस पक्षाने एकला चलो ची भूमिका घेतल्याने अमरावती तिरंगी निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवनीत राणा–रवी राणा, यशोमती ठाकूर–सुनील देशमुख, संजय खोडके–प्रवीण पोटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे जनता जनार्दन कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे...
Vo1: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगे महाराज, देशाचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख, आणि देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, मेळघाट आणि चिखलदरा यासारख्या अनेक गोष्टींसाठी अमरावती प्रसिद्ध आहे. अंबादेवीच्या नावाने अमरावती शहर वसले असून अंबा नगरीच्या संत्र्याची आंबट गोळ चव चाखण्यासाठी अनेक नागरिक देश-विदेशातून अमरावतीत दाखल होत असतात. मात्र सध्याच्या राजकीय स्थितीचा झालेला बीचका पाहता अमरावतीच्या राजकीय परिस्थितीची चव मोठ्या प्रमाणात बदलली आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत जनता कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकते आणि आपला कौल कुणाला देते याचाच आढावा घेणार हा स्पेशल रिपोर्ट पाहूया...
Vo2: अमरावती महापालिकेत एकूण 87 नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे राणा दांपत्य जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडण्यासाठी प्रयत्न करणार आणि कशाप्रकारे ही निवडणूक लढते याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे. तसेच यशोमती ठाकूर यांनी ही निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे त्यामुळे यशोमती ठाकूर आणि काँग्रेसचे नेते सुनील देशमुख यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजय खोडके यांनीही स्वबळाची तयारी केली असून महापालिकेत महायुतीतून ते बाहेर पडले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि युतीच भिजतं घोंगड असल्याचं दिसून येत आहे.
Vo3: महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा खोडके विरुद्ध र Rana हा वाद सुरू झाला असून या निवडणुकीत राहणार विरुद्ध खोडके हे एकमेकांविरोधात उभे ठाकले आहे. आम्ही गेल्या दोन वर्षापासून 87 जागेवर निवडणुकीची तयारी करत अहो मात्र भाजपसोबत रवी राणा असल्याने युतीचा प्रश्नच येत नसल्याचं खोडके यांनी म्हटलं आहे त्यामुळे खोडक्यांनी आणि निवडणुकीत रवी राणा यांना शिंगावर घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. दरम्यान आमदार रवी राणा यांनीही खोडके यांना जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. खोडके यांनी अनेक निवडणुकीत आम्हाला धोका दिला आणि आमच्या सोबत बंडखोरी केली sreula खोडके जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीत उभ्या होत्या तेव्हा अजित पवारांनी मला 50 फोन केले प्रफुल पटेल यांनीही मला फोन केले. महायुती म्हणून आम्ही खोडक्यांचे प्रामाणिकपणे काम केलं आणि ते 2000 मतांनी निवडून आले खोडके यांनी वारंवार आम्हाला धोका दिला तसेच राष्ट्रवादीचा आम्हाला काहीच फायदा होत नसल्याने कुठेच राष्ट्रवादीसोबत युती होणार नसल्यास रवी राणांनी सांगितला आहे.
ग्राफिक्स.....
अमरावती महानगरपालिका पक्षनिहाय बलाबल...
एकूण जागा 87
भाजप : 45
शिवसेना : 05
राष्ट्रवादी : 00
काँग्रेस : 15
शिवसेना UBT :02
BSP : 05
MIM : 10
युवा स्वाभिमान पक्ष, रवी राणा : 03
RPI : 01
अपक्ष : 01
Vo4 : अमरावती महापालिकेत जास्तीत जास्त काळ काँग्रेसने सत्ता भोगली आहे मात्र 2017 मध्ये एक हाती सत्ता मिळवत भाजपने सत्ता मिळवली त्यानंतर काही काळ प्रशासकराज अमरावती शहर आणि अनुभवलेला आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता पहिल्यांदा निवडणूक होत असल्याने अमरावती कर कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकतो याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
बाईट :– शैलेश धुंदी, महाराष्ट्र टाइम्स, स्वेटर घालून आहेत
Vo5 : 2017 मध्ये भाजपने महापालिकेत एक हाती सत्ता मिळवत महापौर आणि स्थायी समिती असे पद मिळवली होती. मात्र 2017 ते 2025 पर्यंत पुलाखालून बरच पाणी गेला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजप एक संघ असून भाजपसोबत शिंदेंची शिवसेना आणि आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला स्वबळाची तयारी केली आहे असं असलं तरी उमेदवारी मागण्याची गर्दी भाजपकडे जास्त आहे. तसेच काँग्रेस कडेही उमेदवारी अर्ज मागणाऱ्यांची गर्दी आहे त्यामुळे येणाऱ्या काळात काय उलथापालती होतात यानंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल सध्या यावर बोलणं घाईच होईल असं पत्रकार शैलेश धुंदी सांगतात... 2017 ते 2025 या कालखंडात भरीव असं काय झालं हे सांगता येत नाही. हॉकर्स झोन पार्किंग झोन हे प्रश्न अजूनही कायम आहेत. सीसीटीव्हीचा मुद्दा अजूनही पूर्ण झाला नाही railways की साकडी उड्डाणपूल हा देखील बंद आहे. चित्रा चौकातील उड्डाण पुलाचा काम अजून पूर्ण झाला नाही... शहरात अनेक शेतकरी राहत असून सोयाबीन आणि कापूस पिकवणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात शहरात राहतात मात्र कृषीवर आधारित एकही प्रकल्प नांदगाव पेठच्या पंचतारांकित एमआयडीसीत नाही त्यामुळे येणाऱ्या काळात कोण काय घोषणा करतो यावर या निवडणुकीचा भविष्य अवलंबून असणार असल्याचहीं महाराष्ट्र टाईम चे पत्रकार शैलेश धुंदी सांगत आहेत..
Vo6: 2017 मध्ये काँग्रेसची सत्ता भाजपने हिसकावून घेतली आहे. मात्र प्रशासकीय राजवटीत जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत ते सोडवण्यासाठी भाजपला धडपड करावी लागत आहे.. इच्छुकांची संख्या भाजपमध्ये जास्त असली तरी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन प्रबळ विरोधक भाजप समोर दिसत आहे... दुसरीकडे महायुतीत घोळ असून समन्वय नाही त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी ही स्वतंत्रपणे लढत आहे... त्यामुळे भाजपला शिंदेंची शिवसेना आणि रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाला सोबत घेऊन ही निवडणूक लढावी लागेल मात्र शिंदेंच्या शिवसेनेतील नेते जगदीश गुप्ता हे नाराज असल्याचे बोलला जात आहे... पक्षात गुप्ता यांचा मत ऐकून घेत जात नसल्याने त्यांची नाराजी आहे... तर तिकडे महाविकास आघाडीलाही सूर गवसलेला नसून त्यांच्या एकत्रित बैठका झाल्या नाही... त्यामुळे काँग्रेस स्वतंत्रपणे लढण्याच्या मानसिकतेत आहे.... दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने गेल्या वेळी सात जागा जिंकल्या होत्या मात्र या सात जागा मिळवण्याचा आव्हान उद्धव ठाकरे गटासमोर असणार आहे. 2017 पासून अमरावती त काहीही विकास झाल्या नसल्याच्या तक्रारी आहेत शहरात वाहतुकीचा आणि सिटी बसचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच शहर वाढल्यानंतर निर्माण झालेल्या वस्तीत पाणीपुरवठा होत नाही... त्यामुळे या सर्व प्रश्नांची पूर्तता व्हावी ही लोकांची अपेक्षा आहे तसेच अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून ही प्रमुख तक्रार असल्याचे मत लोकसत्ताचे पत्रकार मोहन अटाळकर सांगत आहेत.
बाईट :– मोहन अटाळकर, लोकसत्ता, निळ्या रंगाचा शर्ट घातला आहे
Vo7 : दरम्यान काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असून काँग्रेस सर्व जागांवर आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे अशात सत्ताधारी पक्षाकडून काँग्रेसच्या उमेदवारांना दमदाटी करत असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी नाव न घेता संजय खोडके आणि आमदार रवी राणा यांच्यावर टीका केली आहे...
बाईट :– यशोमती ठाकूर माजी मंत्री
Vo 8 : भाजपची संपूर्ण तयारी झाली आहे.. गेल्या सहा महिन्यापासून मी या निवडणुकीकरिता तयारी करत आहे... उमेदवारांसाठी आम्ही जे अर्ज मागवले होते त्यापैकी 641 जणांनी आम्हाला उमेदवारी मागितली आहे मात्र पार्लमेंटरी बोर्ड मध्ये सर्व उमेदवार फायनल होणार आहे.... श SHिंदे यांच्या शिवसेना आणि आमदार רवी राणांचे युवा स्वाभिमान पक्षासोबत आमची युती होणार असून अजूनही आमचा जागा वाटपाचा फॉर्मुला ठरला नाही... मात्र लवकरच आम्ही टेबलवर बसून हा फॉर्म्युला ठरवणार आहे... दरम्यान राष्ट्रवादीला सर्व जागा स्वबळावर लढायच्या आहे त्यामुळे आमची युती होऊ शकली नाही असं मत भाजपचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी व्यक्त केला आहे...
बाईट :– नितीन धांडे, भाजप शहराध्यक्ष, पांढरा शर्ट घातल आहे
Vo9 : 2017 पासून अमरावती महापालिकेवर भाजपची सत्ता होती मात्र भाजपची सत्ता असतानाही अमरावतीला पाहिजे त्या प्रमाणात निधी मिळाला नाही अमरावतीत वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहे... बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे... कचऱ्याचा मोठा प्रश्न अजूनही कायम आहे... मोठ्या प्रमाणात भाजप सरकारकडून घोषणांचा पाऊस पाडण्यात येत आहे... मात्र प्रत्यक्षात अनेक गोष्टी उतरताना दिसत नाही...
END PTC
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
PCPranay Chakraborty
FollowDec 20, 2025 17:00:391
Report
RSRAhul Sisodia
FollowDec 20, 2025 17:00:29Noida, Uttar Pradesh:Heavy snowfall in Isfahan, Iran.
0
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowDec 20, 2025 17:00:130
Report
MKManoj Kumar Chaturvedi
FollowDec 20, 2025 16:50:170
Report
PSPramod Sharma
FollowDec 20, 2025 16:49:220
Report
PSPramod Sharma
FollowDec 20, 2025 16:49:120
Report
ASAkhilesh Sharma
FollowDec 20, 2025 16:49:020
Report
ATALOK TRIPATHI
FollowDec 20, 2025 16:48:320
Report
JSJitendra Soni
FollowDec 20, 2025 16:46:590
Report
RSRahul shukla
FollowDec 20, 2025 16:46:050
Report
ATALOK TRIPATHI
FollowDec 20, 2025 16:45:470
Report
0
Report
ATAlok Tripathi
FollowDec 20, 2025 16:32:260
Report
KBKuldeep Babele
FollowDec 20, 2025 16:31:400
Report
PKPradeep Kumar
FollowDec 20, 2025 16:31:180
Report