Back
Amravati में बावनकुले के सामने बोंडे-नवनीत राणा के भाषण चकमक से भाजपा में घमासान
ADANIRUDHA DAWALE
Jan 08, 2026 10:37:33
Amravati, Maharashtra
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे समोर बोंडे और रानामध्ये शाब्दिक चकमक; भाजपाMDहंतरर्गत वाद चव्हाट्यावर अँकर: अमरावती महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ दसरा मैदान येथे भाजपच्या वतीने विशाल-जाहीर सभेचे आयोजन करण्यात आला होता या सभेमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे यावेळी भाजप नेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोरच खासदार अनिल बोंडे आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या चांगलीच शाब्दिक चकमक झाली आहे त्यामुळे भाजपमध्ये सगळं अलबेल नसल्याचं बोललं जात आहे. काही प्रभागात नवनीत राणा या भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या तर काही प्रभागात चक्क भाजपच्या उमेदवारा विरोधात पती-पत्नीने प्रचाराचा धुराळा उडवल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यावरून खासदार अनिल बोंडे यांनी कानपिचक्या दिल्यानंतर आता नवनीत राणा भडकल्या आहेत. भर प्रचार सभेत या दुखण्याचे प्रदर्शन मतदारांनाच नाही तर कार्यकर्त्यांना पाहायला मिळाले. त्यामुळे नवनीत राणा विरुद्ध सर्व इतरमध्ये भाजपमधील एक गट सक्रिय असल्याचे दिसून आले. अमरावतीत या धुमश्चक्रीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अमरावतीत भाजपच्या प्रचार सभेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोरच भाजप खासदार अनिल बोंडे आणि नवनीत राणा यांच्यात जुंपली. खासदार बोंडे म्हणाले की पंजा मोठा घातक आहे पंजा दाखवू नका गळा आवळते. त्यांच्याविरोधात मूठ बांधा अमरावती महानगपालिकेमध्ये हिंदू महापौर बनवायचा आहे. नवनीत भाभी जसं म्हणतात तसं कमळ दाखवा. भारतीय पार्टी अजिंक्य है अमरावती मधील काँग्रेस, राष्ट्रवादी, आणि एमआयम यांनी लाजाशर्मा सोडल्या आहेत. ओवैसी म्हणतात की महापौर मुस्लिम होईल काँग्रेसने जाहीर केलं शपथ घेतली आहे तुम्हच्यासाठी फक्त भाजप आहे त्याचवेळी खासदार बोंडे यांनी आपला मोर्चा नवनीत राणा यांच्याकडे वळवला. कोण काय बोलत यांच्याकडे विचार करू नका. मत मागाल तर फक्त भाजपच्या कमळसाठी मागा. माझ्या स्वभावात कुणावर टीका करण्याची सवय नाही. एकदा भगवा घातला तर जुनं विसरून जा. माझा सखा भाऊ जरी YSP युवा स्वाभिमान, राष्ट्रवादी,किंवा काँग्रेस, शिवसेना वर जरी उभा असता तरी मी भगव्याला प्रामाणिक राहील, असा चिमटा बोंडेंनी र Rana yांना काढला. योगीजींनी सांगितले की बटंगे तो कटंगे याची आठवणही बोंडे यांनी करून दिली. खासदार बोंडे यांनी शालीतून जोडे हाणल्यानंतर मग नवनीत राणा यांनी त्यांना भरसभेतच सुनावलं. बोंडे भाऊ मीही मोर्शी फिरून आली आहे. मोर्शीमध्ये माझी सभा झाली आहे. कोणालाही बोलण्याची गरज नाही. जो भगव्या सोबत भाजप सोबत बेईमानी करेल त्यांच्या सोबत नवनीत राणा कधीच उभी राहणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. काही लोकांनी म्हटलं होतं लोकसभेत एक अमरावतीची खासदार निवडणुका आली नाही तर काय फरक पडतो. एक अमरावती हारलो तर काही फरक पडत नाही, असं लोक म्हणायचे, असा जुन्या जखमेवरची खपली राणा यांनी स्वतःच काढली आणि खासदार बोंडे यांना जबरी टोला लगावला. लोकसभेत काही लोकांनी कमळाविरोधात काम केल्याचं सांगत त्यांनी बोंडेंवर निशाणा साधला. भगव्यासोबत बेइमानी करणाऱ्याला सोडणार नाही, बेईमानांना भीती राहणारच आहे असे त्यांनी सुनावले. हा प्रकार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोरच झाला.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
KKKRISNDEV KUMAR
FollowJan 09, 2026 07:33:00Noida, Uttar Pradesh:परिवार जनों से बात की है .. 10 से अधिक पुलिस की टीमें लगी हुई है ...हमारी प्रमुखता है आरोपी को जल्दी से जल्द गिरफ्तार करना
0
Report
BSBHARAT SHARMA
FollowJan 09, 2026 07:32:430
Report
JPJai Prakash
FollowJan 09, 2026 07:32:340
Report
SSSanjay Sharma
FollowJan 09, 2026 07:31:540
Report
AKAshok Kumar1
FollowJan 09, 2026 07:31:070
Report
DCDhruv Chaudhary
FollowJan 09, 2026 07:30:54Noida, Uttar Pradesh:DELHI: BJP LEADERS HOLD PROTEST AGAINST AAP / VISUALS
0
Report
KSKamaldeep Singh
FollowJan 09, 2026 07:30:470
Report
BSBHARAT SHARMA
FollowJan 09, 2026 07:30:300
Report
0
Report
0
Report
AKAMAR KANE
FollowJan 09, 2026 07:26:170
Report
VBVIJAY BHARDWAJ
FollowJan 09, 2026 07:25:590
Report
ADAnkush Dhobal
FollowJan 09, 2026 07:25:260
Report
VRVIJAY RANA
FollowJan 09, 2026 07:25:130
Report
ASABHISHEK SHARMA1
FollowJan 09, 2026 07:25:050
Report