Back
तीन फीट ऊँचाई वाले अपक्ष उमेदوار मनन शाह ने Akola महापालिका चुनाव में इतिहास रचा
JJJAYESH JAGAD
Dec 31, 2025 04:45:35
Akola, Maharashtra
उंची लहान असली तरी कीर्ती महान असते, हे पुन्हा एकदा अकोल्यात सिद्ध झालं आहे. क्षेत्र कोणतंही असो, जिद्द, आत्मविश्वास आणि चांगले विचार असतील तर वय, परिस्थिती किंवा शारीरिक मर्यादा कधीच अडथळा ठरत नाहीत, याचं जिवंत उदाहरण म्हणजे अकोला महापालिकेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरलेले मनन शाह. राज्यात सर्वत्र महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना अकोल्यात सर्वात कमी उंचीचे उमेदवार म्हणून मनन शाह यांनी नामांकन अर्ज दाखल केला असून ते सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. विशेष म्हणजे ही त्यांची पहिलीच निवडणूक असून त्यांची उंची अवघी जेमतेम तीन फूट आहे. तरीही आत्मविश्वासाने आणि निर्धाराने त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या मनन शाह यांना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. अनेकांनी त्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. मनन शाह हे राज्यातील सर्वात कमी उंचीचे उमेदवार असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. “माझी उंची नव्हे, तर माझे विचार आणि काम महत्त्वाचे आहे. माझ्या प्रभागाचा विकास हाच माझा एकमेव अजेंडा आहे,” असे स्पष्ट आणि ठाम मत मनन शाह यांनी व्यक्त केले. शारीरिक मर्यादांवर मात करत लोकशाहीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवणारे मनन शाह हे अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. अकोल्याच्या राजकीय इतिहासात हा क्षण नक्कीच लक्षात राहणारा ठरणार असून जिद्द, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार असतील तर अशक्य काहीच नाही, हा संदेश मनन शाह देत आहेत.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
AYAmit Yadav
FollowDec 31, 2025 06:24:020
Report
AYAmit Yadav
FollowDec 31, 2025 06:23:370
Report
AOAjay Ojha
FollowDec 31, 2025 06:23:290
Report
PSPradeep Soni
FollowDec 31, 2025 06:22:540
Report
AYAmit Yadav
FollowDec 31, 2025 06:22:340
Report
ASAshutosh Sharma1
FollowDec 31, 2025 06:22:080
Report
RVRaunak Vyas
FollowDec 31, 2025 06:21:200
Report
ACAshish Chaturvedi
FollowDec 31, 2025 06:21:080
Report
ACAshish Chaturvedi
FollowDec 31, 2025 06:20:570
Report
ACAshish Chaturvedi
FollowDec 31, 2025 06:20:450
Report
NLNitin Luthra
FollowDec 31, 2025 06:20:300
Report
VBVIJAY BHARDWAJ
FollowDec 31, 2025 06:19:500
Report
AAANOOP AWASTHI
FollowDec 31, 2025 06:18:260
Report
0
Report