Back
अकोला में ओवैसी सभा के बाद हिंसक झड़प, पुलिस लाठीचार्ज से राजनीतिक चिंगारी
JJJAYESH JAGAD
Jan 05, 2026 10:38:19
Akola, Maharashtra
अकोल्यातील एमआयएमच्या ३२ उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या जाहीर सभेनंतर मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली. काल रात्री सभा संपल्यानंतर ओवेसी यांच्याजवळ जाण्यासाठी काही समर्थकांनी सुरक्षा कटडा तोडण्याचा प्रयत्न केला.यावेळी ओवेसी यांनी “त्यांना जवळ येऊ द्या, आमचं दिलाचं नातं आहे” असं म्हणत समर्थकांना जवळ येण्याची मुभा दिल्याचं पाहायला मिळालं. मात्र, एकाच वेळी मोठ्या संख्येने समर्थक पुढे सरसावल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.या कारवाईनंतर सभास्थळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होत. लाठीचार्जमध्ये काही नागरिकांना मारहाण झाल्याचा आरोप होत असून, या घटनेचे पडसाद आता राजकीय पातळीवर उमटू लागले आहेत.अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी या लाठीचार्जची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. आपल्या मतदारांवर झालेल्या कथित पोलिसी अत्याचारास जबाबदार असलेल्या दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.तसेच सभेच्या नियोजनात त्रुटी असल्यास आयोजकांवरही कारवाई करावी, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने अकोल्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हं दिसत आहेत.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
VAVINEET AGARWAL
FollowJan 07, 2026 02:47:320
Report
TTTRIPURESH TRIPATHI
FollowJan 07, 2026 02:47:020
Report
SKSantosh Kumar
FollowJan 07, 2026 02:46:260
Report
ABATISH BHOIR
FollowJan 07, 2026 02:46:150
Report
AKAMAR KANE
FollowJan 07, 2026 02:45:480
Report
FWFAROOQ WANI
FollowJan 07, 2026 02:45:340
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowJan 07, 2026 02:45:230
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowJan 07, 2026 02:37:010
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowJan 07, 2026 02:36:300
Report
RNRajesh Nilshad
FollowJan 07, 2026 02:35:440
Report
SKSantosh Kumar
FollowJan 07, 2026 02:35:340
Report
SKSantosh Kumar
FollowJan 07, 2026 02:35:150
Report
MDMahendra Dubey
FollowJan 07, 2026 02:34:560
Report
DPDharmendra Pathak
FollowJan 07, 2026 02:33:330
Report