Back
अकोला के राम मंदिर ने गैस संकट के कारण अन्नदान रोककर समाजहित को प्राथमिकता दी
JJJAYESH JAGAD
Mar 20, 2026 06:34:31
Akola, Maharashtra
सध्या हाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा मोठा परिणाम पेट्रोल - डिझेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर झाला आहे. परिणामी देशातील अनेक हॉटेल्स , उद्योग बंद पडले आहे. तर याचा परिणाम शतकांपूर्वरून सुरू असलेल्या प्रथेवर सुद्धा पडला आहे.
अकोला शहरातील श्रीराम मंदिर येथे संत श्री गजानन महाराज यांनी तब्बल 120 वर्षांपूर्वी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती. त्यानंतर या मंदिरात गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत दरवर्षी अन्नदानाची अखंड परंपरा सुरू होती. मात्र यंदा या परंपरेत खंड पडला असला तरी मंदिर समितीने घेतलेला निर्णय भक्तांमध्ये सकारात्मक संदेश देणारा ठरला आहे.
मंदिरात दरवर्षी दहा दिवस मोठ्या प्रमाणात अन्नदान केले जाते. शहरासह जिल्ह्यातील अनेक भाविक या अन्नदानात सहभागी होतात. मात्र यंदा गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे अन्नदानाचे आयोजन करणे कठीण झाले. अनेक भक्तांनी स्वतःहून सिलेंडर उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती, मात्र हे सिलेंडर काळ्या बाजारातून आणावे लागतील आणि त्यामुळे इतर कोणाचा हक्क हिरवला जाईल, अशी भावना मंदिर समितीने व्यक्त केली.
याच पार्श्वभूमीवर मंदिर समितीने यंदा अन्नदान न करण्याचा निर्णय घेतला.
हा निर्णय घेताना समितीने स्पष्ट केलं की परंपरा महत्त्वाची असली तरी समाजहित त्याहून महत्त्वाचं आहे. कुणाचाही हक्क मारून अन्नदान करणे योग्य नाही, असा संदेश समितीने दिला आहे.
मंदिर समितीच्या या निर्णयाचं शहरात कौतुक होत आहे. अनेक भाविकांनी हा निर्णय समाजासाठी आदर्श असल्याचं म्हटलं आहे.120 वर्षांची परंपरा थांबली असली तरी मंदिराची सेवा, श्रद्धा आणि समाजाबद्दलची जबाबदारी कायम असल्याचं या निर्णयातून स्पष्ट झालं आहे.
गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत यंदा अन्नदान न झालं तरी पुढील वर्षी ही परंपरा अधिक उत्साहात सुरू केली जाईल, असा विश्वास मंदिर समितीने व्यक्त केला आहे.
समाजहिताला प्राधान्य देत घेतलेला हा निर्णय अकोल्यात एक सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश देणारा ठरत आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
KCKULDEEP CHAUHAN
FollowMar 20, 2026 07:40:290
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowMar 20, 2026 07:39:430
Report
KCKumar Chandan
FollowMar 20, 2026 07:39:29Ranchi, Jharkhand:रांची
बंगाल की खाड़ी में नमी और साइक्लोनिक सर्कुलेशन के कारण राज्य में मौसम में बदलाव दिखेगा। रांची सहित 13 जिले में ओलावृष्टि और बज्रपात की संभावना है।
0
Report
FWFAROOQ WANI
FollowMar 20, 2026 07:39:170
Report
SKSantosh Kumar
FollowMar 20, 2026 07:38:370
Report
RSRahul shukla
FollowMar 20, 2026 07:38:170
Report
SKSANTOSH KUMAR
FollowMar 20, 2026 07:38:030
Report
0
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 20, 2026 07:34:140
Report
ASArvind Singh
FollowMar 20, 2026 07:33:500
Report
PSPramod Sharma
FollowMar 20, 2026 07:33:350
Report
PJPrashant Jha2
FollowMar 20, 2026 07:33:150
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowMar 20, 2026 07:33:01Noida, Uttar Pradesh:जयंत चौधरी को धमकी मिली है
केंद्रीय मंत्री जयंत चौधरी को शुक्रवार को एक अनजान नंबर से जान से मारने की धमकी भरा फोन आया। उन्होंने इस बारे में पुलिस में शिकायत दर्ज कराई है。
0
Report
MGMOHIT Gomat
FollowMar 20, 2026 07:32:490
Report
DMDILEEP MISHRA
FollowMar 20, 2026 07:32:360
Report