Back
अकोला नगरपालिका: भाजपा-शरद पवार गट ने सत्ता बदली, नया राजनीतिक समीकरण
JJJAYESH JAGAD
Jan 24, 2026 07:45:33
Akola, Maharashtra
अकोला महापालिकेच्या राजकारणात अखेर भाजप गेम चेंजर ठरला आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आलेल्या भाजपने विरोधकांचे सत्तास्थापनेचे सर्व दावे फोल ठरवत संपूर्ण चित्रच बदलून टाकलं आहे. विरोधक मोठमोठे आकडे सांगत सत्ता स्थापनेचा दावा करत होते, मात्र भाजपने नेमकी कशी खेळी करत बाजी मारली, पाहूया रिपोर्टमधून.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात महापालिका मध्ये सत्ता स्थापनेसाठी राजकीय तडजोडींचं राजकारण सुरू आहे. अकोल्यातही भाजप आणि काँग्रेसकडून बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी आकडेमोड सुरू होती. काँग्रेसने भाजपविरोधी सर्व पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये काँग्रेस, उबाठा, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि अपक्षांचा समावेश होता. मात्र ही एकजूट प्रत्यक्षात आली नाही आणि अखेर काँग्रेसचं सत्तेचं स्वप्न भंगलं, कारण काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने विकासाच्या मुद्द्यावर भाजपसोबत हातमिळवणी करत काँग्रेसची साथ सोडली आहे.
‘शहर सुधार आघाडी’च्या नावाखाली 44 नगरसेवकांची यादी विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडे सादर करण्यात आली आहे. या यादीत भाजपचे 38 नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, एक अपक्ष नगरसेवक आणि विशेष म्हणजे राज्यात भाजपच्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 3 नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांचा समावेश आहे. काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढलेल्या शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी भाजप समर्थित आघाडीत सहभाग घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. झी 24 तासनं आठवडाभर आधीच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात सत्ता स्थापनेसाठी चर्चा सुरू असल्याची बातमी दिली होती आणि अखेर ती खरी ठरली आहे. दरम्यान, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने सत्तास्थापनेचे मोठे दावे केले होते, मात्र अखेर हे सर्व दावे हवेतच विरले असून अकोला महापालिकेत भाजपची सत्ता स्पष्ट झाली आहे. समविचारी पक्षांना सोबत घेऊन आघाडी स्थापन करण्यात आली असून महापौर हा आघाडीचाच असेल, असं वक्तव्य भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी केलं आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या नव्या राजकीय समीकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अकोल्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या युतीवर त्यांनी टीका केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ना विचारधारा उरली, ना तत्व, सत्तासंपत्ती, ठेकेदारी आणि दलाली हेच राजकारणाचं नवं समीकरण बनल्याचं सांगत त्यांनी ही परिस्थिती देश आणि जनतेसाठी दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
(समीकरण) भाजप – 38 राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – 03 राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – 01 शिवसेना (एकनाथ शिंदे) – 01 अपक्ष – 01 Final: राज्यात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अकोला महापालिकेत सत्तेसाठी एकत्र आल्याने हे नवं राजकीय समीकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मित्रपक्ष विरोधकांच्या मदतीला धावून आल्याने येत्या काळात स्थानिक राजकारणाचं चित्र बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RKRishikesh Kumar
FollowJan 24, 2026 09:23:360
Report
PKPrashant Kumar
FollowJan 24, 2026 09:23:150
Report
MMMAYANK MAYANK
FollowJan 24, 2026 09:22:470
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowJan 24, 2026 09:22:360
Report
0
Report
PJPrashant Jha2
FollowJan 24, 2026 09:22:230
Report
ASAkhilesh Sharma
FollowJan 24, 2026 09:22:020
Report
JPJai Pal
FollowJan 24, 2026 09:21:420
Report
ASAshutosh Sharma1
FollowJan 24, 2026 09:21:280
Report
HBHeeralal Bhati
FollowJan 24, 2026 09:21:150
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowJan 24, 2026 09:20:560
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowJan 24, 2026 09:20:41Jodhpur, Rajasthan:फलोदी के केलनसर गांव में चोरों ने मकान का ताला तोड़कर घर में रखे लाखों रु के सोने-चांदी के आभूषण पर हाथ साफ किया। चाखु पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू की।
0
Report
ASAshutosh Sharma1
FollowJan 24, 2026 09:20:340
Report
ASArvind Singh
FollowJan 24, 2026 09:20:210
Report
RKRampravesh Kumar
FollowJan 24, 2026 09:20:090
Report