Back
अकोला नगर निगम चुनाव: गरीब परिवार से आए मंगेश झिने को बीजेपी ने उम्मीदवार बनाया
JJJAYESH JAGAD
Jan 03, 2026 04:46:19
Akola, Maharashtra
पक्षाचं तिकीट मिळवणं म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांसाठी तारेवरची कसरत मानली जाते. मोठ्या पक्षाचं तिकीट मिळालं की पक्षाच्या विचारधारेशी जुळलेल्या मतदारांची मते सहज मिळतात, असं एक राजकीय समीकरण मानलं जातं. त्यामुळे प्रत्येक इच्छुकाचा कल असतो तो पक्षाचं तिकीट मिळवण्याकडे. मात्र अकोला महानगरपालिका निवडणुकीत भाजपने केवळ पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणाऱ्या, गरीब कुटुंबातील एका कार्यकर्त्याला उमेदवारी देत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. काय आहे या उमेदवाराची प्रेरणादायी कहाणी, पाहूया. अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 अ मधून भाजप उमेदवार म्हणून निवड झालेल्या मंगेश झिने यांची कहाणी मात्र सर्वांपेक्षा वेगळी आहे. या प्रभागातून चार वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या उमेदवाराचं तिकीट कापून मंगेश झिने यांना संधी देण्यात आली आहे. हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या मंगेशकडे उमेदवारी मिळाल्यानंतरही नामांकन अर्ज भरण्यासाठी पैसे सुद्धा नव्हते हे विशेष. मंगेश यांची आई घराघरात जेवणं करतात, तर मंगेश स्वतः गेल्या दहा वर्षांपासून घराघरात महावितरणची वीजबिले वाटपाचं काम करतोय. त्यामुळे प्रभागातील जवळपास प्रत्येक घराशी मंगेशचा थेट संपर्क आहे. या प्रभागातून चारही उमेदवार भाजपचे आहेत. मंगेशला उमेदवारी मिळूनही नामांकनासाठी पैसे नसल्याची बाब मित्रांच्या लक्षात आली. त्यानंतर प्रभागातील नागरिकांनी आणि मित्रांनी एकत्र येत नामांकन अर्जासाठी लागणारी रक्कम जमा केली आणि मंगेशने आपला अर्ज दाखल केला. प्रभागातील प्रत्येक घराशी संपर्क असलेल्या मंगेश झिने यांनी केवळ वीजबिले वाटप न करता अनेक नागरिकांच्या दैनंदिन अडचणीं हलवल्या आहेत. मात्र निवडणूक रिंगणात ते प्रथमच उतरले आहेत. प्रभागातील चारही जागा भाजपच्या वाटेवर असल्याने अनुभवी उमेदवार आणि कार्यकर्ते मंगेशला सक्रिय सहकार्य करत आहेत. त्याचबरोबर समाजातूनही त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला पक्षाने उमेदवारी दिल्याचा आनंद मंगेश झिन यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. पक्षनिष्ठा, प्रामाणिक काम आणि जनतेशी असलेला थेट संपर्क याच्या जोरावर सामान्य परिस्थितीतून पुढे आलेल्या मंगेश झिने यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. पैशांपेक्षा विश्वास मोठा असतो, हे या निवडणुकीत पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. अकोल्याच्या राजकारणात सामान्य कार्यकर्त्यालाही संधी मिळू शकते, याचं जिवंत उदाहरण म्हणजे मंगेश झिने यांची ही कहाणी.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
AOAjay Ojha
FollowJan 03, 2026 07:08:320
Report
MPMAHESH PARIHAR1
FollowJan 03, 2026 07:08:080
Report
AOAjay Ojha
FollowJan 03, 2026 07:07:570
Report
GLGautam Lenin
FollowJan 03, 2026 07:07:280
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowJan 03, 2026 07:06:080
Report
ASABHISHEK SHARMA1
FollowJan 03, 2026 07:05:340
Report
RKRANJEET Kumar OJHA
FollowJan 03, 2026 07:05:220
Report
MPMAHESH PARIHAR1
FollowJan 03, 2026 07:04:540
Report
MSManish Shanker
FollowJan 03, 2026 07:04:410
Report
DBDevender Bhardwaj
FollowJan 03, 2026 07:03:470
Report
PKPrashant Kumar
FollowJan 03, 2026 07:03:190
Report
AAANOOP AWASTHI
FollowJan 03, 2026 07:01:500
Report
SMSarfaraj Musa
FollowJan 03, 2026 07:01:340
Report