Back
कृषि विभाग ने 11 सेवा केंद्रों के लाइसेंस निलंबित कर किसानो को दिया बड़ा झटका
KJKunal Jamdade
Jan 08, 2026 08:34:21
Shirdi, Maharashtra
नियम धाब्यावर बसवणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी जिल्हाभरात राबवलेल्या तपासणी मोहिमेत तब्बल ११ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून यामध्ये पाथर्डी तालुक्यातील ३ तर कोपरगाव तालुक्यातील ८ कृषी सेवा केंद्रांचा समावेश आहे. या कारवाईने अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे..
रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा योग्य दरात मिळाव्यात, यासाठी कृषी विभागाने तालुकास्तरीय गुण नियंत्रण निरीक्षक व भरारी पथकाच्या माध्यमातून तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. या तपासणीत कृषी निविष्ठा विक्रीमध्ये अनियमितता, लिंकिंग तसेच नियमबाह्य प्रकार आढळून आले. विशेषतः युरिया खताच्या वाढत्या मागणीदरम्यान विक्रीतील गैरप्रकार, ई-पॉसवरील साठा आणि गोदामातील प्रत्यक्ष साठ्यातील तफावत याबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाभरातील कृषी सेवा केंद्रांची व्यापक तपासणी करण्यात आली. कृषी विभागाच्या या कारवाईमुळे नियमबाह्य प्रकार करणाऱ्या सेवा केंद्रांचे धाबे दणाणले असून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
33
Report
0
Report
बाराबंकी टोलप्लाजा पर अधिवक्ता पर जानलेवा हमला को लेकर जखनिया बार एसोसिएशन के अधिवक्ताओं का प्रदर्शन
0
Report
सोफीपुर में बाबा साहब की प्रतिमा से छेड़छाड़ को लेकर गांव में आक्रोश, प्रशासन ने समझाबुझा कर कराया..
0
Report
0
Report
0
Report
0
Report