Back
कर्जत की बस समृद्धि मार्ग पर भीषण दुर्घटना, चालक की मौत
UJUmesh Jadhav
Nov 01, 2025 08:30:42
Thane, Maharashtra
समृद्धी महामार्गावर कर्जतच्या महिला भाविकांच्या बसचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू...
कर्जत शहरातील दहिवली पाटील आळी परिसरातील महिला भाविकांचा देवदर्शनाचा प्रवास दुर्दैवी ठरला. कर्जतहून शेगावकडे निघालेल्या भाविकांच्या बसचा समृद्धी महामार्गावर इगतपुरी जवळील बोगद्यामध्ये शनिवारी (१ नोव्हेंबर) सकाळी सातच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात बस चालक दत्ता ढाकवल (वय २४, रा. वदप) याचा जागीच मृत्यू झाला आहे.
महिनांनी भाड्याने घेतलेल्या MH 46 AH 0767 या बसमधून साधारण १० महिला आणि ५ पुरुष भाविक देवदर्शनासाठी निघाले होते. इगतपुरी परिसरात अचानक चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट संरक्षक कठड्यावर जाऊन आदळली. धडक एवढी जबर होती की बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि चालक जागीच ठार झाला. तर सुरेश गौरु लाड हे गंभीर जखमी झाले आहेत. माजी आमदार सुरेश लाड यांचे नातेवाईक असल्याचे समजते.
अपघाताचा आवाज आणि धुळीचा प्रचंड फवारा उडाल्याने घटनास्थळी एकच गोंधळ निर्माण झाला. प्रत्यक्षदर्शींनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी महिलांना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच कर्जत येथील राजेश लाड यांच्यासह कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. गंभीर जखमींना पुढील वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी धावपळ सुरू असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले.
देवदर्शनासाठी निघालेला धार्मिक प्रवास अशा दुर्दैवी घटनांनी काळवंडल्याने कर्जत परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
SKSantosh Kumar
FollowNov 01, 2025 12:03:420
Report
TSTripurari Sharan
FollowNov 01, 2025 12:03:280
Report
KNKuldeep Nageshwar Pawar
FollowNov 01, 2025 12:03:130
Report
PKPrakash Kumar Sinha
FollowNov 01, 2025 12:03:050
Report
SKSantosh Kumar
FollowNov 01, 2025 12:02:400
Report
VRVIJAY RANA
FollowNov 01, 2025 12:02:320
Report
ADAnkush Dhobal
FollowNov 01, 2025 12:02:080
Report
NCNITIN CHAWRE
FollowNov 01, 2025 12:02:020
Report
0
Report
JAJhulan Agrawal
FollowNov 01, 2025 12:01:490
Report
PSPramod Sinha
FollowNov 01, 2025 12:01:350
Report
AOAjay Ojha
FollowNov 01, 2025 12:00:500
Report
CSChandrashekhar Solanki
FollowNov 01, 2025 12:00:210
Report
0
Report
AMAnkit Mittal
FollowNov 01, 2025 11:54:27Muzaffarnagar, Uttar Pradesh:मुजफ्फरनगर से हादसे का एक खौफनाक वीडियो सामने आया है...यहां एक मासूम की स्कूल वैन के नीचे आने से मौत हो गई
मामले में पुलिस ने कार्रवाई करते हुए ड्राइवर को पकड़ लिया है और वैन को कब्जे में ले लिया है
0
Report