431001मतदार सूची में डुप्लीकेट नाम: विपक्ष-सरकार के आरोप बुलढाणा तक पहुंचे
VKVISHAL KAROLE
Oct 18, 2025 13:53:59
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Anchor : महाराष्ट्रात मतदार यादीत बोगस नाव असल्याचा, दुबार नाव असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली ,विरोधकांकडून आरोप होत असताना आता सत्ताधारी सुद्धा या मतदार यादीतील दुबार नावा विरोधात आवाज उठवत असल्याचे चित्र आहे, बुलढाणा छत्रपती संभाजीनगर ,मुंबई सगळीकडेच निवडणूक आयोगाने याबाबत कारवाई करण्याची मागणी होतेय
मतदार यादीतील घोळ बाबत विरोधकांसह सत्ताधाऱ्यां आक्रमक
मतदार यादीतील घोळ संपवण्याची सत्ताधाऱ्यांची मागणी
छत्रपती संभाजीनगर सह बुलढाण्यातही सत्ताधारीच आक्रमक
मतदार यादीत घोळ आहे, अनेकांची दुबार नाव आहे चुकीची नाव आहे असा आरोप विरोधकांनी केलाय याबाबत त्यांनी राज्याच्या निवडणूक आयोगाची भेट घेतली त्यामुळं राज्य सरकार विरोधातील टीकेची धार सुरू असताना आता सत्ताधारी सुद्धा मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप करत आहे , बुलढुण्यात शिंदें गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मतदार यादीत एक लाख दुबार नाव असल्याचा आरोप केला आहे यातील काही नाव बोगस आहे मृत लोकांचीही आहे ही नाव हटवण्याची मागणी केली आहे तर बुलढाणा भाजप जिल्हाध्यक्षांनी या आरोपाची री ओढत जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली असल्याची माहिती दिली आहे आणि लवकरच ही नाव काढावी अशी त्यांची मागणी आहे..
मतदार यादीत 36000 बोगस नाव असल्याचा आरोप अजित पवार गटाच्या आमदार सतीश चव्हाण यांनीही पत्रकार परिषदेत केला होता आणि छत्रपती संभाजी नगरमधील गंगापूर तालुक्यात 36000 बोगस नाव असल्याचा आरोप त्यांनी केला होता, ही नाव तातडीने काढण्याची मागणी त्यांनी केली आहे व सिल्लोड तालुक्यातही बोगस मतदार असल्याची तक्रार भाजपचा तालुकाध्यक्ष कमलेश कटारिया यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे आणि ही नावे वगळण्याची त्यांची मागणी आहे.
बेलापूर भाजपाचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सुद्धा मतदार यादीच्या घोळांविरोधात टीका केली आहे अनेक वर्षांपासून तक्रार करूनही ही नाव वगळण्यात येत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे आणि आता मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली आहे..
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारला यावरून टोला लावलाय, हा प्रकार सगळीकडेच आहे सत्ताधाऱ्यांच्याही लक्षात येत आहे मात्र निवडणूक आयोग या टाळाटाळ करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे..
एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री मतदार याद्यांमध्ये घोळ नसल्याचा दावा करत आहेत मात्र सत्ताधाऱ्यां आमदार कडूनच मतदार यादीत घोळ असल्याचे पुरावे पुढे येत आहे त्यामुळे राज्य सरकार आता विरोधकांमुळे तर कोंडीत अडकली आहे सोबतच सत्तेतील सहका-या मुळे ही त्यांच्या अडचणी वाढल्या आहे असं चित्र दिसतंय
ब्युरो रिपोर्ट झी 24 तास
0हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|