Back

शेलोडी ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहारां विरोधात सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला स्थगिती
Shelodi, Darwha, Maharashtra:
गटविकास अधिकारी व पाणी पुरवठा उपविभागच्या अभियंत्यांनी दिले लेखी आश्वासन
शेलोडी ग्रामपंचायतीतील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या गैरव्यवहारासह पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी कारवाईकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते ईश्वर राठोड हे १६ सप्टेंबरपासून तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले. आज बिडीओ शिंदे व अभियंता पटेल यांच्या लेखी आश्वासनाने अन्नत्याग आंदोलन स्थगित केले.या आंदोलनाला ग्रामस्थांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला होता.
3
Report