Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Mathura281401

महायुति ने नाशिक के नगर निकाय चुनाव एक साथ लड़ने का किया ऐलान

SKSudarshan Khillare
Nov 09, 2025 02:16:37
Nandgaon Rural, Uttar Pradesh
अँकर:-नगर परिषद, नगर पंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर मनमाड, चांदवड, येवला, नांदगावंसह नाशिक जिल्ह्यात वेगाने राजकीय घडामोडी घडू लागल्या.. निवडणुकीत महायुती एकत्रिपणे लढणार की स्वबळावर या बाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु असतांना आज मनमाडला नांदगावंचे शिवसेना आमदार सुहास कांदे, चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर, शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरी यांची संयुक्त बैठक झाली त्यात महायुती अभेद्य असून मनमाड, चांदवड, येवला, नांदगावंसह नाशिक जिल्ह्यात आम्ही नगर परिषद, नगर पंचायत आणि जिल्हा परिषद निवडणूक एकत्रितपणे लढणार असल्याचे आमदार कांदे, आमदार आहेर यांनी सांगिले. यावेळी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती.
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Nov 09, 2025 04:17:23
Bhandara, Maharashtra:नशा मुक्त भारतचा संदेश देण्यासाठी गोंदियात रन फॉर हेल्थ चे आयोजन नशा मुक्त भारत चा संदेश देण्यासाठी गोंदियात विश्व् हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीच्या वतीने रन फॉर हेल्थ मेरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून शेकडो धावकांनी या मेरेथॉन स्पर्धेत भाग घेत नशा मुक्त भारत घडविण्याचा संकल्प घेतला... गोंदिया शहराच्या नेहरु चौकातून या मेरेथॉन स्पर्धेला सुरवात झाली असून नेहरु चौक ते कारंजा ते नेहरु चौक असा पचा किलोमीटरचा अंतर धावकांनी पूर्ण केला यात महिला आणि पुरुष गटात तर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविणाऱ्या धावकांना रोख रक्कम आणि मोमेन्टो देऊन गौरविण्यात आले असून गोंदिया शहरातील शेकडो धावकांनी या स्पर्धेत भाग घेत नशा मुक्त भारत घडविण्याचा संकल्प घेतला.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 09, 2025 04:17:07
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये नव जयहिंद मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरूष व महिला खो-खो स्पर्धेत पुरूषांच्या गटात विदर्भ क्रीडा मंडळ काटोल तर महिलांच्या गटात स्पर्धेच्या यजमान नवजयहिंद मंडळाच्या संघाने बाजी मारुन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा रंगारंग दिमाखदार बक्षीस वितरण समारंभ पार पडला. या खो -खो स्पर्धेत विदर्भातील २९ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचा पुरूष गटातील अंतीम सामना सिटी नागपूर पोलीस संघ व विदर्भ क्रीडा मंडळ, काटोल संघ यांच्या दरम्यान पार पडला. महिला गटातील अंतिम सामन्यात यजमान नव जयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळने अनंत क्रीडा मंडळ अकोला या संघाचा पराभव केला.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 09, 2025 04:16:52
Satara, Maharashtra:सातारा - मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एक गुगली टाकत पालकमंत्री शंभूराज देसाई यांची कोंडी केली आहे.पाटणमध्ये जसा निर्णय होईल तसाही निर्णय मेढ्यात होईल अशी प्रतिक्रिया भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी काही दिवसांपूर्वी शिवेंद्रसिंहराजे यांच्या मतदारसंघातील मेढ्यात एका सभेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसैनिकांचा कुठेही अपमान सहन केला जाणार नाही आणि शिवसेनेला कुठेही कमी लेखले जाईल असे निदर्शनास आले तर जशास तसे उत्तर देऊ असा इशारा दिला होता त्याला मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी हे उत्तर दिलं आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना कल्पना आहे की पाटण मध्ये भाजप मध्ये आलेले सत्यजित पाटणकर आणि मंत्री शंभूराज देसाई हे कधीही एकत्र येऊ शकत नाहीत त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे यांनी ही गुगली टाकली आहे .
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 09, 2025 04:04:18
Bhandara, Maharashtra:विदर्भातील ग्रामीण संस्कृतीला जपणारी नवसंजीवनी म्हणजे मंडई.! भंडाऱ्यातील मंडईत आनंद, परंपरा आणि लोककलेचा उत्सवाला सुरुवात. Anchor - विदर्भातील ग्रामीण संस्कृती, लोककला आणि आनंदाचा संगम व झाडीपट्टीची संस्कृती जपणार ठरलेला उत्सव म्हणजे मंडई. दिवाळी सण च्या दुसऱ्या दिवसापासून मंडई उत्सवाला सुरुवात होत असते.भंडारा जिल्हातील वार्षिक मंडई उत्सव यंदाही उत्साहात पार पडत आहे. गावातील तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी पारंपरिक उत्सवात मनसोक्त सहभाग घेत, जुन्या आठवणींना उजाळा दिला. मंडईच्या ठिकाणी विविध वस्तू, शेतीसाहित्य, कपडे, खेळणी, झुले अशा रंगीबेरंगी दुकानांनी परिसर गजबजून असतात. तर बालकांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकासाठी काहीना काही आकर्षण असते. संध्याकाळच्या सत्रात सादर करण्यात आलेल्या दंडार, तमाशा आणि खडीगंमत यांसारख्या पारंपरिक लोककलांनी प्रेक्षकांना केवळ मनोरंजनच नाही तर समाजप्रबोधनाचा संदेश दिला जात असून लोककलेचा हा रंगतदार सोहळा पाहत उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत कलाकारांना भरभरून दाद दिली जाते. रात्रीच्या सुमारास सादर झालेल्या तीन अंकी नाटकाने मंडईला सांस्कृतिक परिपूर्णता व नाट्यसंस्थेच्या कलावंतांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षक मंत्रमुग्ध होत असतात. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली भंडारा जिल्हातील ही मंडई आजही गावाच्या ओळखीचा, परंपरेचा आणि एकतेचा सजीव प्रतीक ठरत आहे.
3
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 09, 2025 04:01:41
Pandharpur, Maharashtra:मुख्यमंत्र्यांनी दिलेली जबाबदारी पूर्ण झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं वक्तव्य करणारे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून भाजपमधील इन्कमिंग चा ओघ काही थांबायला तयार नाही. शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांचा भाजपात प्रवेश निश्चित झाला आहे. बुधवारी मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत प्राध्यापक सावंत, त्यांचे दोन्ही पुत्र पृथ्वीराज आणि ऋतुराज हे कुर्डूवाडी करमाळा सोलापूर मधील काही माजी नगरसेवकांसह प्रवेश करणार आहेत. त्यामुळे या नगरपालिकांच्या निवडणुकात सावंत यांच्या प्रवेशाने भाजपचं बळ वाढणार आहे. जयकुमार गोरे आणखीन बरेच धक्के देण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे
4
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 09, 2025 04:01:30
3
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 09, 2025 04:00:52
Chendhare, Alibag, Maharashtra:अलिबागमध्‍ये शिवसेनेला हव्‍यात किमान चार जागा. शेकापबरोबर बैठक सुरू असल्‍याची माहिती. अँकर - अलिबाग नगर पालिका निवडणूक महाविकास आघाडीच्‍या माध्‍यमातून लढवण्‍यासाठी आम्‍ही इच्‍छुक आहोत. जागावाटपासंदर्भात शेकाप बरोबर चर्चा सुरू आहे. आमचा योग्‍य सन्‍मान राखला गेला नाही तर स्‍वबळावर लढण्‍याची आमची तयारी आहे असा इशारा शिवसेना संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी दिलाय. आगामी नगर पालिका निवडणूकीच्‍या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने अलिबाग इथं पत्रकार परीषद घेवून आपली भूमिका मांडली. अलिबागमध्‍ये महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्‍या शेकापचे नेते माजी आमदार जयंत पाटील यांच्‍याशी चर्चा करण्‍यात आली आहे. शहरात ज्‍या भागात आमचे प्राबल्‍य आहे किंवा ज्‍या ठिकाणी उमेदवार निवडून येवू शकतात अशाच तीन ते चार जागांसाठी आमचा आग्रह आहे. शेकापकडून काही जागा मिळतील अशी अपेक्षा भोईर यांनी व्यक्त केली. दरम्यान अलिबागमध्ये आजच महाविकास आघाडीचे उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेकाप नेते शिवसेनेला कसा प्रतिसाद देतात हे पहावं लागणार आहे.
1
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 09, 2025 04:00:33
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या शिवाजीनगर भुयारी मार्गात रेल्वे प्रशासनाने ज्या ठिकाणी काम केले होते, त्या ठिकाणचा सिमेंट रस्ता उखडून तेथे नवीन करण्याचे काम शनिवारी सकाळी सुरू करण्यात आले. दोन दिवसांसाठी भुयारी मार्ग बंद केल्याचे हजारो नागरिकांना माहीत नव्हते. दररोजच्या सवयीप्रमाणे भुयारी मार्गाच्या तोंडावर वाहन घेऊन आल्यावर बॅरिकेट्स लावून रस्ता बंद असल्याचे दिसून आले. वाहतूककोंडीतून परत संग्रामनगर उड्डाणपुलावरून जाणे अशक्य होते. त्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला. वाहनधारकांनी बॅरिकेट्स तोडून रस्ता सुरू केला. मात्र, थोड्या वेळाने पुन्हा बंद करण्यात आल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले.
4
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 09, 2025 04:00:20
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अमेरिकेतील नागरिकांना फसवणाऱ्या कॉल सेंटरवर केलेल्या कारवाईचा तपास थंडावल्याचे चित्र आहे. आतापर्यंतच्या तपासात केवळ ६ परदेशी नागरिकांची नावे मिळाली आहेत. मात्र त्यांची नेमकी भूमिका काय किंवा फसवणुकीचा नेमका आकडा किती आहे, याची उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत. या गुन्ह्यातील शेवटचे दोन आरोपी फारुख शहा आणि राजवीर वर्मा यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान, आरोपी फारुख शहा याने न्यायालयात त्याच्या डोक्यावरील कृत्रिम केस व्यवस्थित करून पुन्हा लावण्यासाठी तज्ज्नांकडे जाण्याची कोर्टाची परवानगी हवी होती. मात्र, कोर्टाने आरोपीच्या या मागणीचा विचार जेल प्रशासनाने करण्याचे कोर्टने सांगितले.
1
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 09, 2025 03:35:08
Chendhare, Alibag, Maharashtra:तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल मंत्री भरत गोगावले यांचा मित्र पक्षांना सूचक इशारा महायुतीबाबत रायगडात शिवसेना आशावादी युती होवो अथवा न होवो आमची तयारी झालीय रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादामुळे महायुतीचं मेतकूट जमायची चिन्हं दिसत नाहीत तरीही नगरपालिका निवडणुकीसाठी एकत्र येण्याबाबत शिवसेना अजूनही आशावादी आहे महायुती म्हणून एकत्र आलो तर जिल्ह्यात विरोधकांना फारसे स्थान उरणार नाही पण वेगवेगळे लढण्याची भाषा कुणी करत असेल तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असा सूचक वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केलंय आमची भाजप बरोबर चर्चा सुरू आहे पण अजूनही त्यांच्याकडून निरोप आलेला नाही निरोप आलााच तर विचार करू युती झाली किंवा नाही झाली तरी आम्ही आमची तयारी केल्याचं गोगावले म्हणाले
9
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 09, 2025 03:33:04
7
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 09, 2025 03:32:42
10
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Nov 09, 2025 03:01:29
12
comment0
Report
Advertisement
Back to top