Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

महिलेने घरातच प्रसूती केली, बाळ गोणीत टाकले!

NMNITESH MAHAJAN
Aug 30, 2025 01:46:32
Jalna, Maharashtra
FEED NAME : 3008ZT_CSN_DELIEVERY(4 FILES) छत्रपती संभाजीनगर : राहत्या घरात स्वतःच स्वतःची प्रसूती करून बाळाला गोणीत गुंडाळून फेकणाऱ्या महिलेची चौकशी सुरू अँकर : छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत्या घरात स्वतःच प्रसूती करून बाळाला गोणीत गुंडाळून पुंडलिकनगर चौकात टाकण्याची घटना उघडकीस आली होती. या 24 वर्षांच्या महिलेने एकटीनेच तिची प्रसूती केल्याचा दावा केला आहे. मात्र, तिच्यासोबत कुणीतरी असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. त्यामुळे परिसरातील सीसीटीव्ही आणि आरोपी महिलेच्या संपर्कात कोण होते, तिने कुणाला कॉल - मेसेज केले याची पोलिसांनी माहिती मागवली आहे.दरम्यान महिलेने फेकलेल्या बाळावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
13
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Aug 30, 2025 05:46:30
Washim, Maharashtra:
वाशिम: File:3008ZT_WSM_CROPS_DAMAGE रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम अँकर : “सांगा साहेब…आम्ही आता जगायचं कसं? बियाण्यांचे कर्ज, खताची उधारी कशी फेडू? घर चालवायचं कसं?”असा हंबरडा फोडत मानोरा तालुक्यातील पारवा येथील शेतकरी धनराज म्हातरमारे ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची हातभर झालेल्या शेतकऱ्याची व्यथा मांडली आहे.मानोरा तालुक्यात २८ व २९ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे धनराज म्हातरमारे यांच्या दोन एकर शेतातील सोयाबीन व तूरपिक पूर्णतः नष्ट झाले.काही दिवसांपूर्वी ही पिके चांगल्या अवस्थेत होती, मात्र नाल्याचे पाणी शेतात शिरून काही तासांतच मेहनतीवर पाणी फिरले. म्हातरमारेंसह परिसरातील नाल्यालगत असलेल्या अनेक शेतकऱ्यांचेही पीक वाहून गेले आहे.शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की नाल्याचे रुंदीकरण अपुरे झाले असून शेतकऱ्यासमोर मोठं आर्थिक संकट शेतकऱ्यासमोर उभे राहिले आहे.त्यामुळे शासनाने दखल घेऊन तात्काळ शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 30, 2025 05:45:31
Nashik, Maharashtra:
nsk_protest feed by mojo anchor जोपर्यंत भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना पोलीस अटक करणार नाही तोपर्यंत राहुल धोत्रे याचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका धोत्रे कुटुंबियांनी घेतल्याने नाशिक जिल्हा रुग्णालयात गेल्या पंधरा तासापासून आंदोलन सुरू आहे पोळा सणाला उद्धव निमसे समर्थकांनी धोत्रे कुटुंबीयांवर हल्ला करत राहुल धोत्रे याला गंभीर जखमी केले होते त्याचा उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला त्यामुळे पोलिसांनी एकूण या गुन्ह्यातील सात जणांना अटक केली असून चार जण फराळ झाले आहेत त्यामुळे प्रमुख सूत्रधार उद्धव निमसे यांना शोधण्यासाठी पोलिसांनी पाच पथके रवाना केली आहेत.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Aug 30, 2025 05:35:32
Washim, Maharashtra:
वाशीम: File:3008ZT_WSM_KARANJA_DRAINAGE_ROAD रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम अँकर:वाशिमच्या कारंजा शहरातील नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नालेसफाई व रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने गेली तीन दशके माळीपुरा, दाफनीपुरा, बकरा कमेला,दिल्ली वेस, निजामपुरा, महात्मा फुले चौक आदी भागातील लोकांचे हाल सुरूच आहेत. थोड्याशा पावसातच नाले तुडुंब भरून घाण रस्त्यावर वाहते,त्यामुळे नागरिकांना आरोग्याचा धोका वाढतो या भागात सहा-सात शाळा असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यात अडचण होते.दरम्यान,महात्मा फुले चौक ते दारव्हा नाका मार्ग अत्यंत खराबअसून अनेकदा निवेदन दिले तरीही दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. तात्काळ नालेसफाई व रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकाकडून केली जात आहे.
2
comment0
Report
AAASHISH AMBADE
Aug 30, 2025 05:35:17
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 3008ZT_CHP_AWARDEE_MANDAL_1_2_3 ( 3 file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूरच्या सिव्हिल लाईन भागातील सार्वजनिक गणेश मंडळाची उत्कृष्ट पुरस्कारांची परंपरा, यंदा लालबागच्या राजाची स्थापित केली मूर्ती, तर साडेतीन शक्तीपिठाच्या मनोहारी देखाव्याला बघण्यासाठी नागरिकांची गर्दी अँकर:-- चंद्रपूरच्या सिव्हिल लाईन भागातील सार्वजनिक गणेश मंडळाची उत्कृष्ट पुरस्कारांची परंपरा राहिली आहे. शहरातील नागपूर मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता कार्यालायशेजारी गेली 46 वर्षे मंडळाच्या वतीने उत्तमोत्तम गणेश मूर्ती स्थापनेसह हजारोंच्या संख्येत येणाऱ्या गणेशभक्तांसाठी वर्षभर सामाजिक उपक्रम राबविले जातात. यंदा लालबागच्या राजाची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. तर राज्यातील साडेतीन शक्तीपिठाच्या देवी दर्शनाचा मनोहारी देखावा बघण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी केली आहे. ----- लालबागचा राजा आणि साडेतीन शक्तीपीठ देखाव्याची दृश्ये------ बाईट १) प्रीतम जयपूरकर, मंडळ पदाधिकारी आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
1
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 30, 2025 05:34:58
Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दिग्रस, उमरखेड आणि महागाव तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. डेहनी येथे रमेश चव्हाण या शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे, तर पोफाळी येथे विश्वास राठोड हे नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेले आहे. पावसाचा 22 मंडळांना मोठा फटका बसला असून, 30 गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहतूक प्रभावित झाली असून जनजी जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेती पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यात 57 घरांची पडझड झाली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अन्नधान्याचे नुकसान झाले आहे.
1
comment0
Report
AKAMAR KANE
Aug 30, 2025 05:34:34
kolhapur, Maharashtra:
Ngp OBC Choupal live u ने फीड पाठवले ------ नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आजपासून साखळी उपोषण संविधान चौकात सुरू होत आहे... यावेळी उपोषणाला बसणाऱ्या ओबीसी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
1
comment0
Report
GMGANESH MOHALE
Aug 30, 2025 05:34:24
Washim, Maharashtra:
वाशीम: File:3008ZT_WSM_ORANGE_CROPS रिपोर्टर गणेश मोहळे, वाशीम अँकर:वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा परिसर हा मोठ्या प्रमाणावर झालेल्या संत्रा लागवडीमुळे ‘ऑरेंज व्हिलेज’ म्हणून ओळखला जातो.येथील संत्रा केवळ देशातच नव्हे तर विदेशातही विकला जातो.मात्र यंदा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.अनियमित पावसामुळे हजारो एकरांतील संत्राबागा बाधित झाल्या आहेत.जूनमध्ये कमी आणि जुलै महिन्यात जास्त पावसामुळे संत्रा झाडांची फुलगळणी होऊन झाडांना फळेच धरली नाहीत.परिणामी यावर्षी संत्रा उत्पादनात मोठी घट होणार असून लागवडीचा खर्चसुद्धा वसूल होईल की नाही, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी प्रचंड चिंतेत सापडले आहेत.
1
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 30, 2025 04:36:01
Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणीच्या पूर्णा शहरासाठीच्या पाणीपुरवठा योजनेत नव्याने उभारण्यात येत असलेल्या जलकुंभासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून १० वर्षीय विश्वदीप संतोष कांबळे या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. तो खेळण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. परंतु बेपत्ता झाल्याने त्याच्या नातेवाइकांनी पोलिसांना कळवले असता पोलिसांनीही त्याचा शोध असता सदर मुलाचा मृतदेह पाणीपुरवठा योजनेसाठीच्या जलकुंभासाठी खोदलेल्या खड्ड्यात आढळला. हे काम करणाऱ्या कंत्राटदाराने कामाच्या ठिकाणी कोणतीच सुरक्षा उपाययोजना केली नसल्याने या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. बाईट- नातेवाईक
5
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 30, 2025 04:35:19
Akola, Maharashtra:
Anchor : शिवसेना (उबाठा) पक्षाला अकोल्यात मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक प्रकाश डवले यांनी पक्षाची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे..मागील निवडणुकीत तेली समाजाला प्रतिनिधित्व न दिल्याने डवले नाराज होते अखेर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतरित्या शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला.प्रकाश डवले हे राज्य तेली समाज समन्वयक समितीचे राज्याध्यक्ष असून त्यांच्या या निर्णयामुळे अकोल्यातील शिवसेना (उबाठा) पक्षाला मोठा फटका बसणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
3
comment0
Report
SKSudarshan Khillare
Aug 30, 2025 04:18:53
Lasalgaon, Maharashtra:
अँकर :- मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जारंगे पाटील उपोषणाला बसले आहेत. राज्यभरातून लाखो मराठा बांधव त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत दाखल होत आहेत. या प्रचंड जनसमुदायाच्या जेवणाची व्यवस्था येवला-लासलगाव मतदारसंघावर सोपवण्यात आली आहे. या व्यवस्थेत मुस्लिम समाजाचाही मोठा पुढाकार दिसून येतो आहे. मुस्लिम महिलांनी आंदोलनकर्त्यांसाठी शेकडो भाकऱ्या तयार करून खारीचा वाटा उचलला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा-मुस्लिम ऐक्याचं यनिमित्ताने लासलगाव येथे दर्शन दिसले या सहभागाचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे.
4
comment0
Report
GMGANESH MOHALE
Aug 30, 2025 04:18:45
Washim, Maharashtra:
वाशीम: File:3008ZT_WSM_GANESHOTSAV_DECORATION रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम अँकर: वाशीम येथील श्री महालक्ष्मी गणेशोत्सव मंडळा तर्फे यंदा गणेशोत्सवात युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील १२ गड-किल्ल्यांचा भव्य देखावासाकारण्यात आला आहे. या देखाव्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचा इतिहास सचित्र दाखवण्यात आला असून वास्तुरचना, तटबंदी,तोफा व रणशिंगाचा प्रत्यक्ष आविष्कार पाहायला मिळत आहे.विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने या देखाव्याला भेट देत असून महाराष्ट्राच्या इतिहास व संस्कृतीचे दर्शन घडल्याबद्दल समाधान व्यक्त करत आहेत.सर्वांनी या स्वराज्याच्या प्रतिकृतीचा लाभ घ्यावा,असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. बाईट:आशिष ठाकूर,महालक्ष्मी गणेशोत्सव मंडळ, वाशीम बाईट:अंजली पाटील, विद्यार्थीनी
4
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Aug 30, 2025 04:18:00
Bhandara, Maharashtra:
भंडारा जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू..... धान उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा.... Anchor :- भंडारा जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पावसाची संततधार सुरू असून सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते. धान उत्पादनासाठी पाऊस आवश्यक असतानाच आलेल्या या विश्रांतीमुळे पिके कोमेजण्याची भीती होती. मात्र आज सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. धानाची वाढ आता चांगली होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.
4
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 30, 2025 04:02:53
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात गणेशोत्सवानिमित्त महिला भजनी मंडळाच्या वतीने मोफत भारुडाचे आयोजन - सोलापुरात गणेशोत्सवानिमित्त विविध मंडळांमध्ये धार्मिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन - सोलापुरातील त्रिमूर्ती भजनी मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासूनची मोफत भारुड सादरीकरणाची सेवा आज देखील कायम - शहरातील विविध मंडळांमध्ये त्रिमूर्ती भजनी मंडळाच्या वतीने भारुडाच्या माध्यमातून दिला जातो सामाजिक संदेश - गणेशोत्सवाच्या काळामध्ये भजनी मंडळाच्या 25 महिलांच्या ग्रुपचे प्रभावी भारुडाचे सादरीकरण - शुक्रवारी शहरातील सोन्या मारुती गणेश मंडळामध्ये करण्यात आले भारुडाचे सादरीकरण बाईट - महिला कलाकार ( त्रिमूर्ती भजनी मंडळ ) बाईट - महिला ( सोन्या मारुती गणेश मंडळ )
5
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 30, 2025 04:02:12
Nashik, Maharashtra:
nsk_nimsefarar feed by mojo and images attached with 2ç anchor भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह समर्थकांच्या हल्ल्यात गंभीर जखमी युवक राहुल धोत्रे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यू झाल्यानंतर निमसे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे निमसे यांचा अटकपूर्व जामीन फेटात असते फराळ झाले आहेत त्यांच्या शोधासाठी सहा पत्कर रवाना करण्यात आली आहे. प्राण घातक हल्ल्याच्या बाबत निमसेसह अकरा समर्थकांविरोधात 22 ऑगस्टला प्राण घातक हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला होता मात्र त्यांना तीन दिवसांचा तात्पुरता जामीन न्यायालयाने दिला होता मात्र राहुल यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी चांगलाच गोंधळ घातला. भीमसेन यांना अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही असाही पवित्रा घेतला याप्रकरणी सात जण अटकेत असून चार जण फरार आहेत byte नातेवाईक नातेवाईक डीसीपी मोनिका राऊत
9
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 30, 2025 04:02:07
Nashik, Maharashtra:
nsk_nimsefarar feed by mojo and images attached with 2ç anchor भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह समर्थकांच्या हल्ल्यात गंभीर जखमी युवक राहुल धोत्रे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यू झाल्यानंतर निमसे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे निमसे यांचा अटकपूर्व जामीन फेटात असते फराळ झाले आहेत त्यांच्या शोधासाठी सहा पत्कर रवाना करण्यात आली आहे. प्राण घातक हल्ल्याच्या बाबत निमसेसह अकरा समर्थकांविरोधात 22 ऑगस्टला प्राण घातक हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला होता मात्र त्यांना तीन दिवसांचा तात्पुरता जामीन न्यायालयाने दिला होता मात्र राहुल यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी चांगलाच गोंधळ घातला. भीमसेन यांना अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही असाही पवित्रा घेतला याप्रकरणी सात जण अटकेत असून चार जण फरार आहेत
5
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top