Back
वर्धा के गीरड शिवार में कपाशी खेत में टाइगर का ठहरना, किसान काँप उठा
MAMILIND ANDE
Sept 11, 2025 04:32:32
Wardha, Maharashtra
वर्धा
SLUG- 1109_WARDHA_TIGER
वर्ध्यातील गीरड शिवारात चक्क कपाशीच्या शेतात वाघाचा मुक्काम
शेतकऱ्यात भीतीचे वातावरण
गीरड येथील शेतकरी अरुण मोटघरे यांच्या कपाशीच्या शेतात वाघाने ठिय्या मांडला
वाघ शेतात असल्याने परिसरात उडाली तारांबळ
वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल
वाघाला जंगलाच्या दिशेने हुसकावून लावले
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 11, 2025 08:18:03Beed, Maharashtra:
बीड:सात महिन्यांच्या चिमुरडीच्या घशात चॉकलेट अडकले; चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
Anc: बीडमधून ह्दय पिळवटून टाकणारी घटना समोर आलीय. एका सात महिन्यांच्या मुलीच्या घशात चॉकलेट अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. या चिमुर्डीचा मृतदेह कुशीत घेऊन नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय गाठले मात्र या घटनेत चिमुकलीचा दुर्दैवी असा मृत्यू झाला.. बीड तालुक्यातील काटवटवाडी गावात ही घटना घडली आहे. आरोही आनंद खोड असे मृत मुलीचे नाव असून ती अवघ्या सात महिन्यांची होती. घरातच खेळत असताना खाली पडलेले चॉकलेट तिने तोंडांत टाकून गिळण्याचा प्रयत्न केला. मात्र चॉकलेट तिच्या घशात अडकले आणि तिचा यात दुर्दैवी अंत झाला.. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..
0
Report
AKAMAR KANE
FollowSept 11, 2025 08:05:53kolhapur, Maharashtra:
2c ला बाईट जोडला आहे
--=-
नागपूर
बाईट_ बबनराव तायवाडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघ अध्यक्ष.
- मला कुठल्याही प्रकारचा निरोप आलेला नाही आहे.
- आजची बैठक पार पडणार आहे.त्यामध्ये कुठले विषय बैठकीत उपस्थित राहणार आहेत. ते मला माहित नाही त्यामुळे मी बैठकीत उपस्थित नसणार आहे.
- 60 टक्के ओबीसी समाजासाठी व त्यांच्या हितासाठी रक्षण करण्याकरिता अनेक नेत्या असायला पाहिजे. एखाद्या आंदोलनाची भूमिका जाहीर करत असताना कुठल्या बाबींमुळे गदा येते.. ती गोष्ट स्पष्ट करावी कुठल्या गोष्टीसाठी मोर्चा निघतो.. आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करू व अभ्यास करून जर काही गोष्टी सहमत असेल तर मोर्चात सहभागी होवू..
- आम्ही ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी भांडत असतो म्हणून सरकारने 58 जीआर ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी, युवकांच्या कल्याणासाठी काढलेले आहेत.
- मला आनंद आहे की मी जे मागण्या सरकार पुढे मांडल्या... सर्व मागणीवर उपसमिती मध्ये चर्चा झाली. त्या सर्व मागण्या योग्य असल्याने या सर्व मागणीचे समर्थन केले.
- या सर्व मागणीचे लवकरात लवकर असं मान्यता आम्हाला मिळेल.
0
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 11, 2025 08:04:51Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1109ZT_CHP_BRIDGE_FLOODED
( single file sent on 2C)
टायटल:-- पश्चिम विदर्भातील दमदार पावसाने वर्धा नदीला पुन्हा पूर, या 3 महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला जोडणारा भोयेगाव वर्धा नदी पूल सहाव्या खेपेस पाण्याखाली, सिमेंट- कोळसा उद्योगांना फटका
अँकर:-- गेले चार दिवस पश्चिम विदर्भासह चंद्रपूर जिल्ह्यातही मुसळधार पावसाच्या सरी बघायला मिळत आहेत. विशेषतः पश्चिम विदर्भात दमदार पावसाने वर्धा नदीला पुन्हा पूर आला आहे. या नदीवरील काही धरणांचे पाणी सोडल्या गेल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र असलेल्या गडचांदूर- कोरपना या भागाला जोडणारा भोयेगाव वर्धा नदी पूल पुन्हा एकदा पाण्याखाली आला आहे. आज सकाळपासून या पुलावरील वाहतूक ठप्प झाली असून यामुळे सिमेंट ,कोळसा उद्योगांना मोठा फटका पडला आहे. यंदाच्या पावसाळ्यातील तीन महिन्यात पूल पुरामुळे बंद होण्याची सहावी वेळ आहे. मागील खेपेस हा पूल कमकुवत झाल्याचे लक्षात आले होते. पुलावरील सळाखी दिसू लागल्या होत्या मात्र प्रशासनाने जुजबी दुरुस्ती करून पूल वाहतुकीस खुला केला होता. आता आठ दिवसात पुन्हा एकदा हा पूल पाण्याखाली आल्याने दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी अवजड वाहनांच्या रांगा लागल्या असून या भागातील नागरिकांसाठी देखील हा कमी उंचीचा पूल त्रासदायक व धोकादायक ठरत आहे. पुराचे पाणी आणखी वाढल्यास आसपासच्या शेकडो शेतशिवारात पाणी शिरून असले- नसले सोयाबीन उध्वस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 11, 2025 08:04:27Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 1109_BHA_MP_ACCIDENT
FILE - 1 VIDEO 3 IMAGE
भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार प्रशांत पडोळे यांचा अपघात...
अपघातातून थोडक्यात बचावले.... नागपूर बायपासवर उमरेड फाट्याजवळ पहाटेची घटना
Anchor - भंडारा गोंदिया जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाहनाला आज पहाटे भीषण अपघात झाला. नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ सकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या या अपघातात थोडक्यात जीवितहानी टळली. खासदार पडोळे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या फॉर्च्युनर (एमएच 36 एपी 9911) गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सद्या त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे.
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 11, 2025 07:50:37Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn collector 121
Feed by tvu
हैदराबाद गॅझेट यांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रक्रिया कशी असावी याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे मात्र हा संभ्रम संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दूर केलाय कशा पद्धतीने अर्ज करावा आणि त्यानंतरची प्रक्रिया कसं असेल आणि कसं मिळणार कुणबी प्रमाणपत्र हे सगळं त्यांनी झी 24 तास ला सांगितले आहे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या सोबत बातचीत केले आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी
1
Report
PNPratap Naik1
FollowSept 11, 2025 07:49:41Kolhapur, Maharashtra:
Kop Garud Mandap 121
Feed:- Live U
Anc:- करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नवरात्र उत्सवाच्या पूर्वी देवीच्या सदरेवरचे काम पूर्ण होईल यादृष्टीने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती प्रयत्न करत आहे. गरुड मंडपाचे काम कसं सुरू आहे ? ते कधीपर्यंत पूर्ण होईल ? यासंदर्भात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
Play121
शिवराज नायकवडी, सचिव देवस्थान समिती
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 11, 2025 07:49:35Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - पावसाच्या पाण्यामुळे सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी ( DRONE SHOT )
- पावसाच्या पाण्यामुळे सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी
- सोलापूर जिल्ह्यात काल रात्रीपासून सकाळपर्यंत 118. 3 मिमी पावसाची नोंद
- शहरातील शेळगी, जुना विडी घरकुल, अक्कलकोट रोड परिसर अशा अनेक भागात पाणीच पाणी
- पावसाच्या हाहारामुळे अनेक शेती पिके पाण्याखाली
- कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पोलिसांचा बंदोबस्त
- सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील सर्व परिस्थितीचे चित्रीकरण केले आहे ड्रोन पायलट नागेश राशिनकर यांनी
सौजन्य - ड्रोन पायलट - नागेश राशीनकर
4
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 11, 2025 07:49:24Jalna, Maharashtra:
FEED NAME | 1109ZT_JALNA_TEACHER_TFR(15 FILES)
जालना | जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची बदली,गावकऱ्यांचं बदली रोखण्यासाठी शाळेसमोर आंदोलन
अँकर : जालना जिल्ह्यात तब्बल 3 हजार जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्यायत.काल बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश देण्यात येऊन बदली झालेल्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आलेत.या बदली करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये मानेगाव जिल्हा परिषद शाळेतील संतोष नागवडे या शिक्षकाचा देखील समावेश आहे.नागवडे यांनी मानेगाव जिल्हा परिषद शाळेचा कायापालट केल्यानं शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढलीय.शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत असल्यानं गावकऱ्यांनी त्यांच्या बदलीला विरोध केलाय.नागवडे यांची झालेली बदली रोखण्याच्या मागणीसाठी गावातील नागरीकांनी जिल्हा परिषद शाळेसमोर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केलीय.नागवडे यांची बदली न रोखल्यास सोमवारपासून तीव्र आंदोलनाचा ईशारा गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांनी दिलाय.
बाईट : गावकरी आणि विद्यार्थी
2
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 11, 2025 07:49:11Washim, Maharashtra:
वाशिम :
File:1109ZT_WSM_ROBBERY
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिमच्या कारंजा मेमन कॉलनी येथील शिक्षक जाकीर शेख यांच्या घरी काल सकाळी भर दिवसा ११ वाजता दरम्यान दोन दरोडेखोरांनी घरफोडीचा प्रयत्न केला.चोरटे कुलूप तोडताना शेजारील महिलेच्या लक्षात येताचं महिलेणं आरडाओरडा केला असता दरोडेखोर पळून गेले.पळताना त्यांनी धारदार शस्त्राने हल्ल्याचा प्रयत्न केला,मात्र महिला सुखरूप बचावली. घटनास्थळावर एक नायलॉन बॅग व खंजीरसारखे धारधार शस्त्र आढळले.सीसीटीव्हीत दरोडेखोरांची कार कैद झाली असून,तिची नंबर प्लेट बनावट असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले असून कारंजा पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहे.घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून शहरात पोलिसांची गस्तीसाठी मागणी नागरिकांनी केली आहे.
1
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 11, 2025 07:48:56Akola, Maharashtra:
Anchor : राज्यातील मराठा समाजाला कुणबीचे दाखले देण्याबाबत विरोध नसून, विविध नेत्यांनी आपापल्या सूचना मांडल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी सांगितलं की, महाराष्ट्र सरकार सर्व समाजाला एकत्र घेऊन चालण्याचं काम करत असून, मराठा समाजासह इतर समाजालाही न्याय मिळावा यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती कार्यरत आहे.राजकारणातील आघाड्यांबाबत बोलताना आबिटकर म्हणाले कोण कोणासोबत येत आहे यापेक्षा आमचं संघटन मजबूत करून काम करणं हेच आमचं उद्दिष्ट आहे.दरम्यान, संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या “रक्त आणि क्रिकेट कसं चालतं?” या प्रश्नावर आबिटकर यांनी माहिती घेऊन उत्तर देऊ असं सांगितलं. मात्र, अतिरेकी घटनांबाबत बोलताना त्यांनी ठामपणे सांगितलं की, अतिरेक्यांन संदर्भात भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली होती, तीच भूमिका शिवसेनेची देखील असल्याच ते म्हणाले.
Byte : प्रकाश आबिटकर , आरोग्य मंत्री..
4
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 11, 2025 07:48:35Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Gondia
Slug - 1109_GON_TEACHER_LIQUOR
FILE - 2 VIDEO
शिक्षकाचा अशाही प्रताप.... दारू पिऊन वर्गात झोपला.... गावकऱ्यांनी बनविला व्हिडिओ...
Anchor :- धक्कादायक... गोंदिया जिल्ह्यात शिक्षक दारू पिऊन शाळेत आला असताना आता हा व्हिडीओ चांगलाच वायरल होत आहे..... शाळा म्हटलं की विद्येचा माहेरघर आहे..
पण याच शाळेत पुढील पिढी घडविणाराच शिक्षक दारू पित असेल तर याला काय म्हणावं...
Vo :- देवरी तालुक्यातील मोहगाव येथे जिल्हा परिषद शाळा आहे. याच शाळेतील शिक्षक चक्क दारू पिऊन शाळेत आला व खुर्चीवर बसून झोपत होता. गावकऱ्यांनी अचानक शाळा भेट दिल्याने सदर प्रकार समोर आला आहे. आर. एस. बहेकार असे या मद्यपी शिक्षकाचे नाव आहे. मोहगाव येथील जिल्हा परिषद शाळेत दोन शिक्षक असून २२ विद्यार्थी शिकत आहेत. गेल्या वर्षभर ग्रामस्थांनी त्यांना सुधारण्याची संधी दिली. मात्र सरावलेल्या शिक्षकाने ती वाया घालवली आणि चिमुरड्या विद्यार्थ्यांना बेधुंद गुरुजी पहावा लागला. शिक्षक खुर्चीत बसून टेबलावर पाय ठेवून झोपी गेला होता. भरपूर दारू प्यायल्याने शिक्षक शुद्धीत नाही हे नागरिकांच्या लक्षात आले आणि त्या व्यक्तीने संबंधित घटनेचा व्हिडिओ केला. याची तक्रार गावकऱ्यांनी वरिष्ठांकडे केली आहे. त्यावरून संबंधित शिक्षकाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
0
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 11, 2025 07:48:24Vasai-Virar, Maharashtra:
Date-11sep2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slug-VASAI ACCIDENT
Feed send by 2c
Type-AV
Slug- वसईत डंपरने दुचाकीला चिरडले
थोडक्यात बचावला दुचाकीचालक
वसई नवजीवन नाक्यावरील घटना
अँकर - वसईच्या नवजीवन नाक्यावर दुचाकी चालकाचा डंपर खाली येऊन अपघात झाला आहे...सुदैवाने या अपघातात दुचाकी चालकाचा जीव बचावला आहे , मात्र त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे...
दुपारी १२ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला, झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवून दुचाकी चालकाला डंपर च्या खालून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले , यात दुचाकीचा चक्काचूर झाला आहे..
स्थानिक नागरिकांनी डंपर चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे...
0
Report
AKAMAR KANE
FollowSept 11, 2025 07:47:54kolhapur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ जोडले आहे
------
नागपूर
आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थींनी कडून शाळेच्या अधीक्षकांच्या घरचे घरकाम करून घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला...
नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील सावळी येथील विद्याभारती आदिवासी आश्रम शाळेतील हा धक्कदायक प्रकार आहे.
सामाजिक संघटनेकडून याबाबत तक्रार करण्यात आली आहे
0
Report
JMJAVED MULANI
FollowSept 11, 2025 05:49:04Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1109ZT_BARAMATIHAKE
FILE
बारामतीत ओबीसी मोर्चा काढल्या प्रकरणी लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जाणारवर गुन्हे दाखल....
पोलिसांनी परवानगी नाकारून देखील बारामतीत काढला होता मोर्चा...
बारामती पोलिसांनी लक्ष्मण हाके यांच्यासर अन्य 14 जणांवर केला गुन्हा नोंद...
गणपती विसर्जन आणि ईद च्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नाकारली होती परवानगी
5 तारखेला बारामतीत झाला होता मोर्चा..
विनापरवाना मोर्चा प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन.
Anchor:-
बारामती शहरात सकल ओबीसी समाजाने विनापरवाना मोर्चा काढल्या प्रकरणी लक्ष्मण हाके यांच्यासह १४जणाविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून आणि पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही हा मोर्चा काढण्यात आल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे..
चंद्रकांत वाघमोडे, अमोल सातकर ,पांडुरंग मेरगळ, नवनाथ पडळकर, किशोर मासाळ, गोविंद देवकाते ,बापूराव सोलनकर यांच्यासह इतरांचा यामध्ये समावेश आहे
. 5 सप्टेंबर रोजी बारामतीतील शारदा प्रांगण ते प्रशासकीय भवना पर्यंत मोर्चाचे आयोजन केले होते मात्र या तारखेला ईद-ए-मिलाद सण तसेच गणेश विसर्जन मिरवणुका असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती...
4
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 11, 2025 05:48:56Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1109ZT_CHP_OBC_MEETING
( single file sent on 2C)
टायटल:-- मराठा समाजाच्या ओबीसी घटकातील संभाव्य थेट समावेशा विरोधात आता ओबीसी समाज आक्रमक, ऑक्टोबर महिन्यात नागपुरात निघणार मोर्चा, मोर्चा संदर्भातील जनजागृतीसाठी चंद्रपुरात ओबीसी सेवा संघाने आयोजित केली बैठक
अँकर:-- मराठा समाजाच्या ओबीसी घटकातील संभाव्य थेट समावेशा विरोधात आता ओबीसी समाज आक्रमक झालाय. ऑक्टोबर महिन्यात नागपुरात यासंदर्भात मोर्चा निघणार आहे. मोर्चा संदर्भातील जनजागृतीसाठी चंद्रपुरात ओबीसी सेवा संघाने बैठक आयोजित केली. बैठकीत ओबीसी समाज घटकातील समाज बांधव सहभागी झाले. मराठा समाजाच्या झुंडशाहीचा निकराने विरोध करण्याचा निर्धार या बैठकीत ओबीसी बांधवानी दर्शविला.
बाईट १) प्रा. अनिल डाहाके, संयोजक
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
6
Report