Back
सावळ घाट में वाहन लूट: आठ गिरफ्तारी, डिंडोरी पुलिस ने राज खोला
SKSudarshan Khillare
Sept 11, 2025 01:04:00
Dindori, Madhya Pradesh
अँकर:- नाशिक पेठ महामार्गावर असणाऱ्या सावळ घाटात चालत्या वाहनातून मालाची लूट करणारी टोळी दिंडोरी पोलिसांनी जेरबंद केली असून एकूण आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी प्रवासी वाहनांची देखील लूट केल्याची माहिती समोर आली असून या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास दिंडोरी पोलीस करत आहे
13
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowSept 11, 2025 05:03:27Pandharpur, Maharashtra:
Anchor - सोलापूर जिल्ह्यामध्ये तमाशा बारीच्या कला केंद्रातील नर्तकीच्या प्रकरणातून बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंचाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचं प्रकरण ताजा असताना आता माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे तमाशा बारी केंद्रात नर्तकींची बैठक लावण्याच्या कारणावरून गोळीबार करण्यात आला आहे. या मध्ये एक जण जखमी झाला आहे. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
टेंभुर्णी नदीच्या वेणेगाव येथील जय मल्हार लोकनाट्य कला केंद्रात पंढरपूर येथील दोन मित्र यांचे सहकार्यांमध्ये नर्तकींची नाच गाण्याची बैठक लावण्यावरून भांडण झाले. हे भांडण सोडवत असताना त्यापैकी एकाने त्यांच्याकडे रिव्हॉल्वर मधून जीवे मारण्याच्या हेतूने गोळी झाडली.
यात देवा बाळू कोठावळे वय 27 राहणार वाखरी यांच्या मांडीत गोळी लागून तो गंभीर जखमी झाला आहे.
त्याला टेंभुर्णी मधील खासगी रुग्णालयाला दाखल केले आहे
याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
0
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 11, 2025 04:51:42Bhandara, Maharashtra:
मानेगाव येथे वीज कोसळून गुराखी ठार....जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी....धानाला पोषक
Anchor ;- भंडारा जिल्ह्यात मेघ गर्जनेसह ठिकठिकाणी पाऊस बरसला. यात भंडारा तालुक्यातील मानेगाव बाजार शेतशिवारात शेळी चारायला गेलेल्या ५२ वर्षीय गुराख्यावर वीज कोसळली.यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.बबन नत्थू भदाडे (मानेगाव बाजार) असे मृताचे नाव आहे.गावात शोककळा पसरली आहे.
0
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 11, 2025 04:51:12Buldhana, Maharashtra:
बुलढाणा ब्रेकींग.
चिखलीत दोन गटात राडा ..
रक्तदान शिबिरात रक्तदान केल्याच्या कारणावरून झाला राडा ..
पोलिसांना करावा लागला सौम्य लाठीचार्ज ..
तर पोलिसांनी वेळीच पोहचून परिस्थिती आणली नियंत्रणात ..
परिसरात तणावपूर्ण वातावरण ..
Anchor - वेगवेगळ्या रक्तदान शिबिरात रक्तदान केल्याच्या कारणावरून रात्री बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली शहरातील बाबू लॉज चौकात दोन गटांत चांगलाच वाद होऊन हाणामारी झाली.. यावेळी त्याठिकाणी तणाव निर्माण झाला होता .. मात्र, वेळीच ठाणेदार संग्राम पाटील यांनी हस्तक्षेप केल्याने वाद निवळला... मात्र पोलिसाना जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज ही करावा लागला आहे .. या संदर्भात अद्याप चिखली पोलिसात दोन्ही गटाकडून तक्रारा दाखल झाली नाही. . ईद चे दिवशी चिखली शहरामध्ये दोन ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होत .. या रक्तदान शिबिरामध्ये अनेकांनी रक्तदान ही केले.. मात्र एका गटाने दुसऱ्या गटातल्या युवकाला आमच्याकडे रक्तदान का केले नाही, असे म्हटले असता वाद झाला. . त्यामुळे दोन गट समोरासमोर भिडल्याचे पहायला मिळत असून बाबू लॉज चौकात चांगलाच राडा झाला आहे . . सध्या परिसरात तणाव असून पोलिस बंदोबस्त तैनात आहे .
0
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 11, 2025 04:50:10Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1109ZT_WSM_NHRM_STRIKE_BACK
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा १७ दिवस चाललेला बेमुदतसंप काल यशस्वीरीत्या संपुष्टात आला.आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी त्यांच्या मागण्या तत्त्वतःमान्य केल्याने कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे.१४ मार्च २०२४ रोजी शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता.मात्र अंमलबजावणी न झाल्याने तसेच मानधनवाढ,लॉयल्टी बोनस, ग्रॅच्युटी, ईपीएफ योजना व बदली धोरण या मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेने आंदोलन छेडले होते.जिल्ह्यातील ४५० कंत्राटी अधिकारी व कर्मचारी संपात सहभागी झाले होते.यामुळे आरोग्य विभागात मनुष्यबळाचा तुटवडा जाणवून ग्रामीण भागातील आरोग्य सेवा प्रभावित झाली होती.आजपासून सर्व कर्मचारी पुन्हा कर्तव्यावर रुजू होणार असून आरोग्य सेवा पूर्ववत होणार आहेत.
0
Report
KPKAILAS PURI
FollowSept 11, 2025 04:47:13Pimpri-Chinchwad, Maharashtra:
pimpri garden
kailas puri pune 11-9-25
feed by 2c
Anchor - पिंपरी चिंचवड मधील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या आणि आय टी कर्मचाऱ्यांच्या पसंतीच ठिकाण असलेल्या पिंपळे सौदागर परिसरात महाराष्ट्रातील सर्वात मोठी क्लाइंबिंग वॉल उभारण्यात आलीय....तब्बल १४ कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेल्या योगा गार्डन मध्ये ही क्लाइंबिंग वॉल उभारण्यात आलीय...! एवढच नाही तर या योगा गार्डन मध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत...! योगा गार्डन आणि क्लाइंबिंग वॉल चे लवकरच उद्घाटन केले जाणार आहे. नेमके कसे आहे योगा गार्डन कधी होणार उद्घाटन संदर्भात शत्रुघ्न काटे यांच्याशी चर्चा केलीय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...!
kailas 1 to 1+ vis
0
Report
AKAMAR KANE
FollowSept 11, 2025 04:36:08kolhapur, Maharashtra:
नागपूर -
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या अमृत महोत्सव निमित्त अभिष्टचिंतन
- डॉ. मोहन भागवत यांचा आज 75 वा वाढदिवस, डॉ भागवत यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते डॉ. भागवत यांना 'नंदी'ची मूर्ती भेट देऊन अभिनंदन करण्यात आले
- "देवभक्ती आणि देशभक्ती हे जरी वेगवेगळे दिसत असले तरी ते आपल्या भारत देशात ते दोन्ही वेगवेगळे नसून एकच आहेत"
- "जो वास्तविक देवभक्ती करेल तो देशभक्ती करतो,आणि जो प्रामाणिकपणे देशभक्ती करतो त्याच्याकडून ईश्वर देवभक्तीपण करवून घेतो"
- अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या नागपुरातील 'महारुद्रपूजन' सोहळ्यात आरएसएस प्रमुख डॉ. मोहन भागवत यांचं वक्तव्य
- "इतिहासाच्या आधीपासून आपला भारत देश आहे,भगवान शिवशंकर हे आदीगुरु आहेत"
- "सर्वांमधील जे मूळ तत्व आहेत आहे,त्याला जाणण्याचे 108 मार्ग शिकवणारे भगवान शिव होते"
साउंड बाईट - डॉ. मोहन भागवत,आरएसएस प्रमुख
3
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 11, 2025 04:35:03Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1109ZT_CHP_BLDG_COLLAPSE
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट येथे दुध विक्री करणाऱ्या महिलेवर इमारतीचा भाग कोसळला, महिला जखमी, उपचार सुरू
अँकर:-- चंद्रपूर शहरात जटपुरा गेट परिसरात आज सकाळी दुध विक्री करणाऱ्या मनिषा सुनील लोखंडे (वय 50) या महिलेवर अचानक इमारतीचा काही भाग कोसळला. यात त्यांच्या हाताला, पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तत्काळ चंद्रपूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. लोखंडे कुटुंब गेल्या 35 ते 40 वर्षांपासून दूध व्यवसायाशी जोडलेले आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या पतींचे आकस्मिक निधन झाल्यानंतर मनिषा लोखंडे यांनी एकट्यानेच व्यवसाय सुरू ठेवला. त्यांना दोन मुली असून त्या दोघींचे शिक्षण सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन जखमी महिलेला मदत केली. शहरातील धोकादायक इमारती मनपाने त्वरित पाडाव्या अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
बाईट १) स्थानिक नागरिक
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 11, 2025 04:33:35Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यात झालेल्या तुफान पावसामुळे शहरातील शेळके भागात पूरजन्य परिस्थिती
- सोलापूर जिल्ह्यात झालेल्या तुफान पावसामुळे शहरातील शेळगी भागात पूरजन्य परिस्थिती
- शेळगी भागातील मित्र नगरातील शेकडो नागरिकांच्या घरात शिरले पाणी
- शहरातील अनेक नागरिकांना अक्षरशः रात्र जागून काढण्याची वेळ
- मित्र नगर भागातील अनेक नागरिकांच्या संसार उपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान
याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( WKT )
0
Report
AKAMAR KANE
FollowSept 11, 2025 04:33:24kolhapur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ आणि जोडले आहे
------------
नागपुरात दही बाजारात धडाकेबाज कारवाई : 4,431 किलो दही जप्त
नागपूर शहरातील दही बाजारात अन्न व औषध प्रसाधन विभागाने अस्वच्छ आणि आरोग्य अपायकारक असलेले दही जप्त करण्याची कारवाई केली. जबलपूर येथून आलेले तब्बल 277 पीपी म्हणजेच 4 हजार 431 किलो दही जप्त करण्यात आले. या दह्याची बाजारपेठ किंमत तब्बल 1 लाख 77 हजार रुपये इतकी आहे.
गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. चौकशीत समोर आले की हे दही जबलपूर येथील केसरवाणी डेअरीतून राजकुमार फुलचंद गुप्ता यांनी नागपुरात पाठवले होते.वाहतुकीदरम्यान आवश्यक परवाना व पॅकिंग नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्याने विभागाने दही जप्त केले. धक्कादायक म्हणजे दही ठेवण्यात आलेल्या टीनाच्या डब्यांना गंजले आहे
. या कारवाईमुळे नागपूरच्या दही बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.
बाईट – ललित संयाम, अन्न प्रशासन विभाग अधिकारी
0
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 11, 2025 04:32:43Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरीतील तिहेरी खून प्रकरण
रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे येथील भक्ती मयेकर हिचा खून केल्यानंतर दुर्वास पाटील याने तिचा मृतदेह आंबा घाट येथे फेकून दिला होता. त्यापूर्वी दुर्वास व त्याच्या दोघा साथीदारांनी भक्तीच्या अंगावरचे दागिने काढून घेतले. कोणताही पुरावा मागे राहू नये, यासाठी दुर्वासने खंडाळा येथील एका उकिरड्यावर हे दागिने फेकून दिल्याची माहिती आता पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी दुर्वासकडे चौकशी केली असता त्याने दागिने फेकल्याची कबुली पोलिसाना दिली. त्यानुसार पोलिसानी भक्तीचे दागिने दुर्वासने फेकलेल्या ठिकाणाहून हस्तगत केले आहेत..
0
Report
MAMILIND ANDE
FollowSept 11, 2025 04:32:32Wardha, Maharashtra:
वर्धा
SLUG- 1109_WARDHA_TIGER
वर्ध्यातील गीरड शिवारात चक्क कपाशीच्या शेतात वाघाचा मुक्काम
शेतकऱ्यात भीतीचे वातावरण
गीरड येथील शेतकरी अरुण मोटघरे यांच्या कपाशीच्या शेतात वाघाने ठिय्या मांडला
वाघ शेतात असल्याने परिसरात उडाली तारांबळ
वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल
वाघाला जंगलाच्या दिशेने हुसकावून लावले
0
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 11, 2025 04:21:24Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_DIMAGE
धाराशिवमध्ये अतिवृष्टीचा तडाखा – २ लाख हेक्टर शेती पिकांचे नुकसान
धाराशिव जिल्ह्यात २३ मंडळात अतिवृष्टी – शेतकऱ्यांचे मोठे नुकसान उघड
अँकर-
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे. जिल्ह्यातील तब्बल २ लाख हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या पंचनाम्यात उघड झाले आहे.
धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ४२ पैकी तब्बल २३ मंडळात अतिवृष्टी झाली असून, आतापर्यंत दोन लाख हेक्टर क्षेत्रातील शेती पिके पावसाच्या पाण्याखाली गेली आहेत.
पावसामुळे पंचनामे करण्याचे काम रखडले असून, हवामानाचा अंदाज पाहता अजून नुकसान वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
मे महिन्यातील मान्सूनपूर्व पाऊसानंतर आता झालेल्या या अतिवृष्टीमुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान समोर आल्यानंतर शेतकऱ्यांनी शासनाकडे आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
कृषी विभागाकडून पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा ताजा अहवाल शासनाला पाठवला जाणार असून त्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळेल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे
1
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 11, 2025 04:16:56Beed, Maharashtra:
बीड : टिप्परच्या धडकेत सरपंच व नातीचा मृत्यू; पत्नी गंभीर जखमी
Anc : परळीच्या पांगरी रस्त्यावर भीषण अपघात झालाय. भरधाव वेगात असलेल्या टिप्परच्या धडकेत जळगव्हाणचे सरपंच वसंत चव्हाण आणि त्यांची नात श्रुती चव्हाण यांचा जागीच मृत्यू झालाय. तर पत्नी कस्तुराबाई गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे गाव आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या घटनेमुळे गाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येतेय.
0
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 11, 2025 04:15:56Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1109ZT_WSM_TRAFFIC_JAM
रिपोर्टर: गणेश मोहळे वाशिम
अँकर: अकोला–नांदेड महामार्गाला जोडणाऱ्या वाशिम बायपासवर वारंवार ट्रॅफिक जाम होत आहे.वाहनांच्या लांबलचक रांगा लागत असल्याने प्रवासी आणि वाहनचालक हैराण झाले.बायपासवर सध्या रस्त्याचं काम सुरू आहे,मात्र कंत्राटदाराकडून पर्यायी व्यवस्था न केल्याने वाहतुकीचा गोंधळ उडालाय.एका बाजूला काम सुरू असताना दुसऱ्या बाजूला वाहनांना पुरेशी जागा मिळत नाही, त्यामुळे धोकादायक पद्धतीने वाहनं मार्ग काढताना दिसत आहेत.या निष्काळजीमुळे गाड्या रस्त्याच्या कडेला फसणे,वाहतूक ठप्प होणे आणि प्रवाशांची गैरसोय असे प्रकार रोजचेच झाले आहेत.त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.
0
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 11, 2025 03:50:55Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1109ZT_WSM_CUSTARD_APPLE_ORCHARDS_DAMAGE
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर : वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकाला फाटा देत संत्रा,आंबा, पेरु,डाळिंब आणि सिताफळ या फळबागांची लागवड केली मात्र या वर्षी फुल आणि फळ धारणेच्या वेळेस सतत अति मुसळधार पाऊस पडल्याने या सिताफळ झाडांची 60 ते 70 टक्के सीता फळं खाली गळून पडल्यामुळे सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
व्हीओ : वाशिम जिल्ह्यात फळबागांमध्ये संत्र्या नंतर सिताफळा चे उत्पादन घेतले जाते मात्र या वर्षी सततच्या मुसळधार पावसाने सीताफळाच्या झाडां वरील 60 ते 70 टक्के सिताफळ खाली जमिनीवर गळून पडली आहेत तर जी 30 ते 40 टक्के फळं झाडावर आहेत ती फळं ही सततच्या पावसा मुळे खराब होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सीताफळ बागांच्या देखभाल दुरुस्ती वर जो आजपर्यंत खर्च केला तो ही निघणार नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे त्यासाठी शासनाने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना अर्थिक मदत करावी अशी मागणी सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.
बाईट:अतुल पवार,सीताफळ उत्पादक, शेतकरी,पवारवाडी
बाईट:रवी चव्हाण,सीताफळ उत्पादक शेतकरी,पवारवाडी
3
Report