Back
विरार मधील युनिटेक कॉम्प्लेक्स तीन दिवसांपासून पाण्याखाली, नागरिकांचे हाल!
PTPRATHAMESH TAWADE
Aug 18, 2025 05:16:37
Virar, Maharashtra
Date-18aug2025
Rep-prathamesh tawade
Loc-virar
Slug-VIRAR WATER
Feed send by 2c
Type-AV
Slug- विरार मधील युनिटेक कॉम्प्लेक्स तीन दिवसापासून पाण्याखाली, रहिवासांचे हाल
नागरिकांना कमरे इतक्या पाण्यातून , वाट काढायची वेळ
महापालिकेची यंत्रणा गायब?
ॲकर - वसई विरार मध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरातील सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
त्यामुळे विरार पश्चिमेकडील युनिटेक कॉम्प्लेक्स मध्ये मध्ये 35 ते 40 इमारती असून या इमारतीच्या तळमजल्यावर प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले आहे…
सध्या पाऊस कमी असला तरी या सोसायटीतले पाणी जाण्याचे नाव घेत नाहीये कारण या सोसायटीमधील रस्ते सखल असून बाहेरच्या रस्त्यांची उंची वाढवल्याने हे पाणी जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे…
महापालिकेकडून त्यांच्याकडून घरपट्टी वसूल केली जाते मात्र सुविधांच्या नावाने बोंबाबोंब असल्याचा आरोप नागरिक करत आहेत ..
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 18, 2025 08:34:34Parbhani, Maharashtra:
अँकर - हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसाने ओढे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला असून जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली पैनगंगा नदी धोक्याच्या पातळीने वाहत आहे. विदर्भात होत असलेल्या पावसाचे पाणी हिंगोलीच्या ईसापूर धरणात येत असून त्यामुळे ईसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नदी काठच्या पीकांचे नुकसान होणार आहे. या पैनगंगेने आता रोद्र रूप धारण केले असून पैनगंगा धोक्याच्या पातळीने वाहत आहे, प्रशासनाच्या वतीने नागरिकांना नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. हिंगोलीच्या कण्हेरगाव नाका येथील पैनगंगेच्या पुलावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी...
wkt गजानन देशमुख
0
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 18, 2025 08:34:27Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_DIMAGE_R3
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीचा तडाखा – 38 हजार एकरवरील पिकांचे नुकसान
धाराशिव :
मागील तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 38 हजार एकरांवरील खरीप पिके बाधित झाली आहेत. महसूल व कृषी विभागाने याबाबतचा प्राथमिक अहवाल सादर केला असून 108 गावांच्या शेतशिवाराला फटका बसल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, 38 हजार 315 हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर ओढे-नद्यांना आलेल्या पुराने 53 जनावरे वाहून गेली असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक कणा मोडून पडला आहे.
दरम्यान, अजूनही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. परंडा तालुक्यातील अनेक शेतांमध्ये पाणी साचले असून विशेषतः मिरचीच्या शेतात पाणीच पाणी दिसत आहे. पिकांचे झालेले नुकसान पाहून शेतकरी हताश झाले आहेत.
शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे.
BYTE : लवंगे महिला शेतकरी
BYTE : शेतकरी
BYTE : शेतकरी
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 18, 2025 08:33:40Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1808ZT_NANDED_COLLECTOR(1 FILE)
नांदेड : ब्रेकिंग : सध्या पाण्याने वेढलेल्यांना सोडवण्याचे काम सुरू
जिल्ह्यात 200 पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाल्याचा अंदाज
उर्वरीत बचाव कार्य तातडीने पूर्ण करणार
जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची माहिती
पाण्यात अडकलेल्या लोकांना सर्व मदत देण्याचे आदेश
महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा,जिल्हाधिकारी कर्डिले यांचं आवाहन
अँकर : नांदेड जिल्ह्यात सध्या पाण्याने वेढलेल्यांना नागरीकांना सोडवण्याचे काम सुरू असून उर्वरीत बचाव कार्य तातडीने पूर्ण करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिली आहे.
जिल्ह्यात 200 पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाल्याचा अंदाज जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून याबाबत माहिती माहिती घेण्याचं काम सुरू असल्याचं ते म्हणालेत.पाण्यात अडकलेल्या लोकांना सर्व मदत देण्याचे आदेश देण्यात आले असून महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन देखील जिल्हाधिकारी कर्डिले यांनी नागरिकांना केलं आहे.
बाईट : राहुल कर्डीले, जिल्हाधिकारी, नांदेड
0
Report
ABATISH BHOIR
FollowAug 18, 2025 08:33:20Kalyan, Maharashtra:
कल्याण डोंबिवली सह आजूबाजूच्या परिसरात पावसाची संततधार
Anchor :- कल्याण डोंबिवली चा आजूबाजूच्या परिसरात काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सकाळपासूनच हजेरी लावली. कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. पावसाला जोर नसला तरी अधून मधून पावसाच्या जोरदार कोसळत आहेत. एकीकडे पाऊस दुसरीकडे खड्डे चुकवुन वाहनचालवताना वाहन चालकांची मात्र चांगलीच तारांबळ उडताना दिसून येतेय . पावसाचा जोर कायम राहील्यास कल्याण डोंबिवली मधील सखल भागात देखील पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
0
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 18, 2025 08:23:57Nashik, Maharashtra:
Feed send by mozo
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_tribal_121
*नाशिक ब्रेकिंग*
- *25 ऑगस्टला नाशिकमध्ये राज्यभरातील आदिवासी संघटना एकवटणार*
- *आदिवासी बांधवांचा निघणार विराट मोर्चा*
- गेल्या 40 दिवसांपासून नाशिकमध्ये सुरू आहे आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
- सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आदिवासी संघटना संतप्त
- *काम करत असलेल्या पदावर कायम नियुक्तीसाठी कंत्राटी कर्मचारी गेल्या 40 दिवसापासून करत आहेत आंदोलन*
- नाशिकच्या तपोवन परिसरातून मोर्चाला होणार सुरुवात
- काल देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली होती भेट...
याच मोर्चा संदर्भात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांशी बातचीत केली आहे आमचे नाशिकचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
3
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 18, 2025 08:23:35Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1808ZT_NANDED_BODY_CARRY( 1
FILE)
नांदेड :ब्रेकिंग
अंत्यविधीसाठी जीव धोक्यात घालून नदीच्या पाण्यातून न्यावा लागतोय मृतदेह
नांदेडच्या मुखेड तालुक्यातील तारदडवाडी गावातील घटना
नांदेडच्या मुखेड तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस
अनेक गावांना पाण्याने घातला वेढा, पाण्यात अडकलेलंय लोकांना काढले बाहेर
अँकर : नांदेड जिल्ह्यात अंत्यविधीसाठी जीव धोक्यात घालून नदीच्या पाण्यातून मृतदेह न्यावा लागतोय.नांदेडच्या मुखेड तालुक्यातील तारदडवाडी गावातील ही घटना आहे.मुखेड तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय.यामुळे अनेक गावांना पाण्याने वेढा घातलाय, पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं जात असलं तरीही पूर परिस्थिती अजूनही कायम आहे.अंत्यविधी क्रिया उरकण्यासाठी मृतदेह नदीच्या पुराच्या पाण्यातून नेऊन अंत्यविधी क्रिया पार पाडावी लागत असल्याचं वास्तव समोर आलंय
3
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 18, 2025 08:18:28Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर शहर डॉलीमुक्त करण्यासाठी सरसावले विद्यार्थी, सह्यांच्या मोहिमेला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ( WKT )
- सोलापूर शहर डॉल्बीमुक्त करण्यासाठी सरसावले विद्यार्थी, सह्यांच्या मोहिमेला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- सोलापूर डॉल्बीमुक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांची जोरदार घोषणाबाजी
- सोलापुरातील लाखो नागरिकांच्या सह्या घेऊन मुख्यमंत्र्यांकडे डॉल्बी मुक्तीची होणार मागणी
- सोलापूरकरांना विविध जयंती उत्सवाच्या निमित्ताने करावा लागतोय कार्ड कर्णरकश्य डॉल्बीचा सामना
- सोलापूर डॉल्बीमुक्त करण्यासाठी पोलिसांनी देखील व्यक्त केल्या भावना
याच विषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( WKT )
बाईट -
विद्यार्थिनी
2
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 18, 2025 08:05:58Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_SHINDE_SHETKARI
सातारा - राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणी साठी तत्काळ अधिवेशन घेण्याची मागणी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला आहे.राज्यात विदर्भ, मराठवाडा त्याच बरोबर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे.मात्र अद्याप पंचनामे देखील झालेले नाहीत ज्या ठिकाणचे पंचनामे झाले आहेत त्यांना अद्याप मदत झालेली नाही त्यामुळे राज्य सरकार ने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून एकरी 50 हजारांची मदत करावी अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
byte -शशिकांत शिंदे
byte - या सरकारची घोषणाच कर्जमाफी ची होती मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत वेळ आली तर कर्जमाफी करू महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरसकट कर्ज माफी करता येत नाही असं वक्तव्य केलं आहे .यावर शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जोरदार टीका केली असून जर सरकारने लवकरच सरसकट कर्ज माफी ची घोषणा केली नाही तर आम्ही शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठं आंदोलन उभारू असा इशारा दिला आहे.
byte -शशिकांत शिंदे
6
Report
WJWalmik Joshi
FollowAug 18, 2025 08:04:45Jalgaon, Maharashtra:
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB
FEED ON 2C
SLUG- 18 08JALG_JAMNER_BETAVAD_ABU_AZMI
Assigned by -
Date- 18-08-25
File _VDO 4Photo
Byte -1
जळगाव,जामनेर
जळगावच्या जामनेर तालुक्यातील बेटावद येथील तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ आज जामनेर मध्ये पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला
समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी यांच्या उपस्थितीमध्ये जामनेर पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा काढण्यात आला
तरुणाच्या हत्या प्रकरणात अटकेतील आरोपींवर कठोर कारवाई करावी इतरही फरार आरोपींना अटक करावी या सह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला
भर पावसामध्ये निघालेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते
या दरम्यान अबू आझमी यांनी बेटावद येथे जाऊन मयत तरुणाच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन देखील केलं
पोलीस स्टेशन येथे मोर्चा पोहोचल्यानंतर अबू आजमी यांच्यासह कुटुंबीयांनी पोलिसांची भेट घेत त्यांना मागण्याची निवेदन दिले.
स्थानिक पोलिसांमार्फत नव्हे तर बाहेरच्या पोलीस अधिकारांमार्फत या घटनेचा तपास करावा, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी अबू आजमी यांनी बोलताना केली आहे
एवढ्या अमानुषपणे मारहाण होत असेल तर या देशात नेमकं काय चाललंय असा प्रश्न देखील यावेळी अबू आजमी यांनी बोलताना उपस्थित केला.
मुंबईत वरिष्ठ पातळीवर देखील या घटनेच्या संदर्भात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी तसेच घटनेचा पादर्शक निपक्षपणे तपास व्हावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे अबू आजमी म्हणाले..
बाईट _अबू आझमी,( नेते, समाजवादी पार्टी)
7
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 18, 2025 08:02:03Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये जीवित हानी देखील केली आहे. मराठवाड्यात पावसामुळे आतापर्यंत सहा लोकांचा बळी गेला आहे. 107 छोट्या मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर 350 पेक्षा अधिक घरांची आणि गोठ्यांची पडझड झाली आहे. सोबतच 698 गावांना पावसाचा फटका बसला आहे. मराठवाड्यातील 1 लाख 19 हजार 964 शेतकरी पावसामुळे बाधित झाले आहे. तसेच 1 लाख 11 हजार 420.55 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाला आहे.
gfx
मराठवाडा पाऊस परिस्थिती
छत्रपती संभाजीनगर
जनावरांचा मृत्यू : 07
पडझड झालेली घर-गोठे : 71
बाधित गावं : 09
बाधित शेतकरी : 2160
शेती नुकसान : 3 हेक्टर
हिंगोली
मयत व्यक्ती :01
जनावरांचा मृत्यू : 16
पडझड झालेली घर-गोठे : 26
बाधित गावं : 185
बाधित शेतकरी : 9023
शेती नुकसान : 10789 हेक्टर
नांदेड
मयत व्यक्ती : 05
जनावरांचा मृत्यू : 181
पडझड झालेली घर-गोठे : 181
बाधित गावं : 363
बाधित शेतकरी : 91559
शेती नुकसान : 84188 हेक्टर
बीड
मयत व्यक्ती : 01
जनावरांचा मृत्यू : 01
पडझड झालेली घर-गोठे : 06
बाधित गावं : 24
बाधित शेतकरी : 1465
शेती नुकसान : 930 हेक्टर
लातूर
ल
पडझड झालेली घर-गोठे : 11
बाधित गावं : 09
बाधित शेतकरी : 161
शेती नुकसान : 184.5 हेक्टर
धाराशिव
जनावरांचा मृत्यू : 53
पडझड झालेली घर-गोठे : 64
बाधित गावं : 108
बाधित शेतकरी : 15590
शेती नुकसान : 15326 हेक्टर
एकूण मराठवाडा
जखमी :01
मयत व्यक्ती : 05
जनावरांचा मृत्यू : 107
पडझड झालेली घर-गोठे : 350
बाधित गावं : 798
बाधित शेतकरी : 119964
शेती नुकसान : 111420.55 हेक्टर
7
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 18, 2025 07:45:24Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील पांगरी फाटा ते टाकळवाडी रस्त्याच्या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी रविवार चिखलात अर्धनग्न आंदोलन केल्यानंतर आज या रस्त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक्सप्रेस वे असे मुख्यमंत्र्यांचे नाव देऊन त्या रस्त्याचे उदघाटन सोहळा पार पाडलाय. गेल्या अनेक वर्षापासून गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव पासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या टाकळवाडी गावाकडे जाणारा रस्ता उभरावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने केली जात होती पण याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांनी कालपासून अनोख्या पद्धतीने आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय...
12
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 18, 2025 07:21:52Satana, Maharashtra:
बागलाण/सटाणा ब्रेक
सटाणा शहरातील साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या बंद पडलेल्या कामामुळे व रस्त्याच्या दूरावस्थेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलेला आहे जोपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरवात होत नाही तोपर्यंत रस्ता रोको आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
12
Report
WJWalmik Joshi
FollowAug 18, 2025 07:19:25Jalgaon, Maharashtra:
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AV
FEED ON 2C
SLUG- 1808ZT_JALG_AMALNER_RAIN
Assigned by -
Date- 18-08-25
File _VDO 2 Photo
Byte -
जळगाव
अमळनेर तालुक्यात मुसळधार पाऊस
Ancr - जळगाव जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून अमळनेर तालुक्यात 105 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे तसेच अमळनेर तालुक्यातल्या चिखली नदीला पूर आल्याने पुराचे पाणी शेतात शिरून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
10
Report
PNPratap Naik1
FollowAug 18, 2025 07:19:03Kolhapur, Maharashtra:
Kop circuit bench
Feed :- Live U
Anc :- मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे शानदार उद्घाटन झाले त्यानंतर आजपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालीय. त्यामुळे सकाळपासून ऐतिहासिक सर्किट बेचच्या इमारतीमध्ये वकील, पक्षकार याची मोठी गर्दी झाली आहे. याचाच आढावा घेऊन वकील आणि नागरिकांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
Play
13
Report
PNPratap Naik1
FollowAug 18, 2025 07:16:36Kolhapur, Maharashtra:
Kop Rain WT
Feed:- 2C
Anc :- कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्याच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊन पंचगंगा नदीचे पाणी पाचव्यांदा पात्राबाहेर पडले आहे. पंचगंगा नदीवरून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
Play WT
13
Report