Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

नागपंचमीच्या सणावर रुक्मिणी मातेला अनोखे अलंकार!

SKSACHIN KASABE
Jul 29, 2025 14:31:03
Pandharpur, Maharashtra
29072025 Slug - PPR_PANCHMI_ALNKAR file 01 ----- Anchor - श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी या सण निमित्ताने रुक्मिणी मातेला आज सायंकाळच्या पूजे वेळी विविध अलंकार परिधान करण्यात आले आहेत. यामध्ये सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्याची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी. अलंकार परिधान केले
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
Jul 30, 2025 03:45:56
Beed, Maharashtra:
बीड : अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात, जिल्ह्यात पावसाचा तडाखा, गेवराई तालुक्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान Anc : बीड जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावत शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ केली आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः गेवराई तालुक्यातील सुरळेगाव परिसरातील कपाशीच्या 95 टक्क्यांहून अधिक पीक पाण्यात गेली आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. परिणामी, आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी आता आणखीन आर्थिक संकटात सापडला आहे.आता तरी सरकारने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
0
Report
AAABHISHEK ADEPPA
Jul 30, 2025 03:45:45
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्री जयकुमार गोरे यांच्याहस्ते 55 हजार 555 वह्यांचे करण्यात आले वाटप Anchor - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर मध्यचे आ.देवेंद्र कोठे यांच्यावतीने समाजातील गरजू विद्यार्थ्यांना 55 हजार 555 वह्यांचे वाटप करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणीही जाहिरात न करता सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार देवेंद्र कोठे यांनी 55 हजार 555 गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले आहे.
0
Report
HCHEMANT CHAPUDE
Jul 30, 2025 03:45:33
Junnar, Maharashtra:
Feed 2C Slug: Outur Mobile Theft Open File:02 Rep: Hemant Chapude(Junnar) Anc: जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे वर्षभरात चोरीला गेलेले 38 मोबाईल शोधण्यात ओतूर पोलिसांना यश आले असून 4 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 38 मोबाईल रिकव्हर करत पुन्हा त्या व्यक्ती कडे त्यांचे मोबाईल परत करण्यात आले त्यामुळे नागरिकांकडून ओतूर पोलिसांचे कौतुक करण्यात येत असून नागरिकांच्या चेहय्रावर एक उत्साह पाहिला मिळाला. Byte: लहू थाटे (सहाय्यक पोलिस निरीक्षक) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
0
Report
SGSagar Gaikwad
Jul 30, 2025 03:30:59
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_trabak_pass ( त्र्यंबकेश्वरचे व्हिज्युअल वापरा ) त्र्यंबकेश्वर दर्शन पास प्रकरणी माजी विश्वास त्यांना एक लाखाचा दंड अँकर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शनविरोधातील (दर्शन पास) याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच याचिकाकर्ता असलेल्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांना एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे...मंदिर प्रशासनाकडून व्हीआयपी दर्शनासाठी २०० रुपये प्रति व्यक्ती आकारले जातात. ललिता शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत व्हीआयपी दर्शन रोखावे, अशी मागणी केली होती. मात्र, ही याचिका मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी फेटाळली आहे. पेड दर्शनामुळे देवाच्या दरबारात दुजाभाव होतो असे कारण पुढे करून याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, भाविकांना मोफत दर्शनाची रांगदेखील उपलब्ध आहे, असे म्हणत न्यायालयाने ही याचिका फेटाळली. ललिता शिंदे यांनी २०२२ मध्ये आव्हान याचिका दाखल केली होती. दर्शन घेण्यासाठी ज्यांना पैसे भरायचे नाहीत ते रांगेद्वारे दर्शन घेतील. भाविकांना कोणत्याही प्रकारची जवरदस्ती करण्यात आलेली नाही, अशी टिप्पणी करत न्यायालयाने शिंदे यांची याचिका फेटाळत त्यांना दंड ठोठावला....
0
Report
PNPratap Naik1
Jul 30, 2025 03:30:48
Kolhapur, Maharashtra:
Kop Rain Update Feed :- Anc :- कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. घाटमाथ्यावर देखील पावसाने उसंत घेतल्यामुळे धरणातील विसर्ग देखील कमी झाला आहे. याचा परिणाम म्हणून कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी दोन फुटाणे कमी झाले आहे.. असं असलं तरी जिल्ह्यातील 47 बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यावरील वाहतूक पर्याय मार्गाने सुरू आहे.
0
Report
AAABHISHEK ADEPPA
Jul 30, 2025 03:17:23
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार, प्रसूतीसाठी महापालिका हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात वळवतानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस - सोलापूर आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार, प्रसूतीसाठी महापालिका हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात वळवतानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस - खाजगी रुग्णालयाशी संबंधित जवळपास 200 आशा सेविकांचा व्हाट्सअप ग्रुप ठरला चर्चेचा विषय आशा सेविकांना आमिष दाखवून शासकीय रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती माता खासगी रुग्णालयाकडे नेल्या सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या चौकशीत धक्कादायक प्रकार उघडकीस रुग्णच्या उपचारात झालेल्या बिलाच्या एकूण रकमेपैकी 25 टक्के रक्कम ही कमिशन, भेटवस्तू, महागड्या हॉटेलमध्ये जेवण अशा विविध गोष्टीचे आमिष श्रेयस नर्सिंग होम असे या खासगी हॉस्पिटलचे नावं आहे आशा सेविकांना संपर्क करण्यासाठी खासगी रुग्णालयाने चक्क वॉट्सअपचा ग्रुप केला होता. याचं ग्रुपच्या माध्यमातून आशा सेविकांना विविध प्रकारचे आमिष दाखवले जात असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी ग्रुपमध्ये असलेल्या आशा सेविका आणि श्रेयस नर्सिंग होमच्या डॉक्टरांना देखील महापालिकेने नोटीस पाठवून कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा मागितलंय. बाईट : डॉ. राखी माने, आरोग्यअधिकारी
4
Report
AKAMAR KANE
Jul 30, 2025 03:16:47
kolhapur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ जोडला आहे ---- - गोंड राजे राजे बख्त बुलंद शाह यांची जयंती नागपुरात साजरी करण्यात येतेय.. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची प्रमुख उपस्थिती आहे स. गोंड राजेराजे बख्त बुलंद शाहयांच्या विधानभवन चौकातील पुतळ्याला मंत्री अशोक उईके यांनी माल्यार्पण केलं यावेळी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करण्यात आलं... आज दिवसभर या निमित्ताने विविध दिमाखदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
6
Report
HCHEMANT CHAPUDE
Jul 30, 2025 03:16:12
Ambegaon, Maharashtra:
Feed 2C Slug: Malin 11 Year File:02 Rep: Hemant Chapude (Ambegaon) Anc:आंबेगाव तालुक्यातील माळीण दुर्घटनेला आज 11 वर्ष पूर्ण होत आहेत, 30 जुलै 2014 रोजी भूस्खलन होऊन डोंगराखाली संपूर्ण माळीण गाव गाडलं गेलं, या दुर्दैवी घटनेत 151 नागरीकांचा मृत्यू झाला तर 900 पेक्षा जास्त मुक्या प्राण्यांना यात आपल्या जीव गमवावा लागला आजही या आठवणीने माळीण वासीयांना अश्रृ अनावर होत आहेत,याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी... Wkt: हेमंत चापुडे (प्रतिनिधी) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया आंबेगाव पुणे...
7
Report
PTPRATHAMESH TAWADE
Jul 30, 2025 03:15:37
Vasai-Virar, Maharashtra:
Date-30july2025 Rep-prathamesh tawade Loc-vasai Slug-VASAI UPDATE Feed send by 2c Type-Av अँकर - माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानावर ED ची कारवाई 22 तासानंतर ईडीचे अधिकारी निघून गेले *अनिल कुमार पवार यांना ताब्यात न घेताच ईडीचे अधिकारी निघून गेले* *इडीच्या छाप्यात पवार यांच्याकडे कोणतं घबाड सापडतं याकडे सर्वांचे लक्ष..!* ANC: वसई विरार शहर महानगरपालिकेच्या माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांनी सोमवारी आपल्या पदाचा पदभार सोडल्यानंतर मंगळवारी पहाटे त्यांच्या शासकीय निवासस्थानावर आणि त्यांच्याशी संबंधित नाशिक पुणे अशा एकूण बारा ठिकाणी ed ने छापेमारी केली....तब्बल 22 तास चौकशी सुरू होती...त्यांच्या पत्नी आणि मुलीला बोलावून चौकशी करण्यात आली.. मात्र वसई पश्चिमेच्या ज्या शासकीय निवासस्थानी माजी आयुक्त अनिल कुमार पवार होते त्या ठिकाणी पवार यांनी सुरुवातीला ईडीच्या अधिकाऱ्यांना एक तास दरवाजा न उघडून रोखून धरलं होतं. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश केला. मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेली ईडीची कारवाई बुधवारी पहाटे दीड वाजल्यानंतर इडी अधिकारी या ठिकाणावरून निघून गेले. यावेळी अधिकाऱ्यांनी काही महत्त्वाचे साहित्य आणि कागदपत्रे आपल्या सोबत नेल्याचे दिसून आले. परंतु अनिल कुमार पवार यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेले नाही.
5
Report
SGSagar Gaikwad
Jul 30, 2025 03:15:09
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_kumbh_tayari ( कुंभमेळ्याचे स्टॉक विज्युअल आणि शहराचे स्टॉक व्हिज्युअल वापरा) सिंहस्थासाठी ६५ रस्त्यांचा विकास; १३ नवीन पूल अँकर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरांतर्गत व शहराच्या वेशीवरील बाह्रा रिंगरोडसह नवीन ६५ रस्त्यांचा विकासासह १३ नवीन पुलांची उभारणी महापालिका, एनएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात येणार आहे. याबाबत पोलिस आयुक्तालयात काल दुपारी संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत रस्ते विकासकामे, पूल बांधणीसह वाहतूक व्यवस्था याविषयी चर्चा करण्यात आली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या औचित्यावर वेगवेगळ्या नियोजन बैठकांना वेग आला आहे. प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून संयुक्तरीत्या बैठका घेत आढावा व नियोजन करण्यावर भर दिला जातोय...
2
Report
MMMahendrakumar Mudholkar
Jul 30, 2025 03:02:47
Beed, Maharashtra:
बीड: अंबाजोगाई-अहमदपूर एसटी बसमध्ये छत्रीने पावसापासून चालकाचे संरक्षण: एसटीची दयनीय अवस्था उघड Anc- बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आगाराच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) एसटी बसमधील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अंबाजोगाई-अहमदपूर मार्गावर धावणाऱ्या एका बसमध्ये एक प्रवासी चक्क चालकाला पावसापासून वाचवण्यासाठी छत्री पकडून उभा असल्याचे दिसत आहे. यामुळे अंबाजोगाई आगाराच्या एसटी बसेसची दयनीय अवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, बसच्या छतातून पाणी गळत आहे आणि त्यामुळे चालकाला गाडी चालवताना अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत एका सहृदय प्रवाशाने पुढाकार घेऊन चालकाला छत्री धरून मदत केली. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर आणि एसटी महामंडळाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी लवकरात लवकर या बसेसची दुरुस्ती करण्याची आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवास सेवा पुरवण्याची मागणी केली आहे.
5
Report
VKVISHAL KAROLE
Jul 30, 2025 03:02:31
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn election prep av Feed attached राज्यात  निवडणूक आयोगाला निवडणुकीची  तयारी करण्यासाठी जादा कालावधी लागणार आहे. त्यासाठी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयात आयोग मुदतवाढ मिळण्याच्या अनुषंगाने अंतरिम अर्ज दाखल करणार असल्याचे मंगळवारी निवडणूक आयोगाने सांगितले. संभाजी नगरात बुधवारी  निवडणूक आयोगाने आढावा बैठक घेतली ,  त्यात सर्व निवडणूक  टप्प्याटप्प्याने घेण्याबाबत चर्चा करण्यात आली... राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. आधी जि. प. निवडणुकांनंतर मनपांच्या नियोजनाची शक्यता आयोगाने वर्तविली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्यांनी घ्याव्या लागतील.2011 च्या जनगणनेनुसार एससी, एसटी लोकसंख्या उपलब्ध असून त्यानुसार आरक्षण ठरविले जाईल. मनुष्यबळ, मतदार याद्यांसाठी अद्याप परवानगी मिळालेली नाही. प्रभाग, वॉर्ड, गटरचना प्रक्रिया सुरू आहे याबाबत चर्चा झाली...
7
Report
AAABHISHEK ADEPPA
Jul 30, 2025 03:02:20
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचा महिमा पोहचतोय जगभरात, नेदरलॅंडचे परदेशी पाहुणे स्वामींच्या चरणी लीन - श्री स्वामी समर्थांचे भक्त राज्यभरासह देशभरात वाढत असताना आता परदेशातील नागरिकांनीही पडतेय भुरळ - नेदरलँडचे नागरिक वटवृक्ष श्री स्वामी समर्थांच्या दरबारी लीन - परदेशी पाहुण्यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर अक्कलकोट अन्नछत्र मंडळात जाऊन महाप्रसादाचाही घेतला लाभ - परदेशी पाहुण्यांनी अगदी भारतीयांप्रमाणे पंगतीत बसून घेतला महाप्रसादाचा आस्वाद - भारतात अभ्यास दौऱ्यासाठी आलेले नेदरलँडचे जॉन ड्युईंग झाले स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्यावतीने भारतीय पद्धतीने परदेशी पाहुण्यांचे करण्यात आले स्वागत
5
Report
PPPRAFULLA PAWAR
Jul 30, 2025 03:02:15
Raigad, Maharashtra:
स्लग - तर संबंधित यंत्रणांवर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा ...... महामार्गावरील अपघातांवर जिल्‍हाधिकारी यांचा इशारा ...... रायगड जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक ....... अँकर - मुंबई गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघातांबाबत रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे ॲक्शन मोडवर आहेत . गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही आणि नादुरुस्त रस्त्यामुळे अपघात झाल्यास संबधित यंत्रणांवर जबाबदारी निश्चित करून सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले जातील असा इशारा रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिला. रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली या बैठकीत हा इशारा देण्यात आला. रस्ते अपघात टाळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी तातडीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात असे निर्देश त्यांनी दिले.
5
Report
SGSagar Gaikwad
Jul 30, 2025 03:02:03
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_ganesh_utstv २० ऑगस्टपूर्वीच गणेश मंडळांना परवानगी बंधनकारक अँकर २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने गणेश मंडळांना मंडप, स्टेज, कमानी उभारणीसह विविध प्रकारच्या परवानग्यांसाठी महिनाभर आधीच परवानगी घेण्याचे बंधनकारक केले आहे. २० ऑगस्टपूर्वीच गणेश मंडळांना परवानगी मिळणार आहे. २० ऑगस्टनंतर आलेले अर्ज थेट फेटाळले जाणार असल्याचा इशाराच महापालिकेने दिला आहे. गणेशोत्सवाच्या सात दिवस आधी परवानगीसाठी अर्ज केल्यास परवानगी दिली जाणार नाही, असा इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे. परवानगी साठी  विभागीय कार्यालयांमध्ये एक खिडकी योजना सुरू केली जाणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवाकरिता मंडप धोरण नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महापालिकेकडून मंडप धोरणाची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार गणेशोत्सव काळात मंडप उभारणीची प्रक्रिया, परवानगीकरिता सर्वसाधारण निकष, कमान उभारणीचे निकष, ध्वनि प्रदूषण आणि तक्रार निवारणासाठी असलेल्या धोरणानुसारच मंडळांना परवानगी घ्यावी लागणार आहे. यंत्रणांची धावपळ टाळण्यासाठी यंदा पालिकेने शुद्धीपत्रक काढले असून, परवानगीसाठी अर्ज करण्यासाठी एक महिना आधीचा अल्टीमेटम दिला आहे. मनपाच्या mncfest.nmc.gov.in या संकेतस्थळावर संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले... ..
5
Report
Advertisement
Back to top