Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501

उद्धव ठाकरेंनी स्थानाचा विचार करावा, देवेंद्र फडणवीस म्हणतात!

DPdnyaneshwar patange
Aug 08, 2025 08:20:24
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव ब्रेकिंग DHARA_BJP_THAKRE उद्धव ठाकरेंनी त्यांच्या स्थानाचा स्वतः विचार करावा. आई भवानीच्या साक्षीने सांगतो, उद्धवजींना देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या भावाच्या भूमिकेतच बघितलं आमच्या सोबत असताना आणि आताही त्यांचं स्थान आमच्यासाठी मोठंच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मातोश्रीवर जाऊन चर्चा करायचे मातोश्रीवर सांगितले तेच व्हायचं उद्धवजींना देवेंद्रजी आणि आम्ही प्रथम स्थानावर ठेवल आहे आम्ही राजकीय टीका करू, मात्र उद्धव ठाकरे यांच्या विषयी पारिवारिक आणि भावनिक स्थान तुळापुरात तुळजाभवानी देवीच्या दर्शनानंतर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीतील बैठकीच्या स्थानावरून भाष्य केलं Byt: चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JMJAVED MULANI
Aug 08, 2025 11:34:16
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 0808ZT_DAUNDBIBT FILE 5 दौंड तालुक्यातील नानगावमध्ये फाशात अडकलेल्या बिबट्याला सुखरूप पणे वाचवण्यात यश रेस्क्यू टीम आणि वनविभागाने फाश्यातून बिबट्यास सोडवले.. Anchor - दौंड तालुक्यातील नानगावमध्ये डुक्कर पकडण्याच्या फाशामध्ये अडकलेल्या बिबट्याला सुखरूप पणे सोडवण्यात वन विभागास यश आले आहे. वनविभागाचे अधिकारी कर्मचारी आणि रेस्क्यू टीम यांनी संयुक्तपणे काम करत बिबट्यास बेशुद्ध करून फाश्यातून बाहेर काढले .. पुढील उपचारासाठी बिबट्यास वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलेय दरम्यान अशात अडकलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 08, 2025 11:34:08
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0808ZT_JALNA_DAM_OVER(3 FILES) जालना : सोनखेडा येथील साठवण तलाव पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला, आमदार संतोष दानवेंनी केलं जलपूजन अँकर : जालन्यातील सोनखेडा येथील साठवण तलाव पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरलाय.यावर्षी एप्रिल महिन्यात या तलावाचं काम पूर्ण झालंय.तलावाचं काम पूर्ण झाल्यानंतर यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलाय.आज भोकरदन-जाफ्राबाद मतदार संघाचे आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते या प्रकल्पातील पाण्याचं जलपूजन पार पडलं. यावेळी परीसरातील ग्रामस्थांची मोठया संख्येनं उपस्थिती होती.
0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Aug 08, 2025 11:33:34
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 0808_BHA_NANA_BYTE FILE - 4 VIDEO बावनकुळे किती सरळ खोपडीचे आहेत हे सर्वांना माहित आहे..... नाना पटोले ANCHOR :- बावनकुळे किती सरळ खोपडीचे आहेत हे सर्वांना माहित आहे. ऑपरेशन सिंदूर चे जे आतंकवादी आहेत ज्यांनी आमच्या 26 आया- बहिणीचे कुंकू पुसलं. त्या आतंकवाद्यांचं काय झालं? उलट्या खोपडीचे लोक सत्तेत बसले आहेत म्हणून पाकिस्तानातून आलेले आतंकवादी आमच्या बहिणीच्या कपाळावरचं कुंकू पुसतात आणि त्याचा जल्लोष -विजयउत्सव हे केंद्रातील आणि राज्यातील सरकार मनवत असेल तर उलट्या खोपडीची कोण आहेत हे त्यातून कळते........ ((असा प्रत्युत्तर नाना पटोले यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलाय..... बावनकुळे यांनी भंडाऱ्याच्या कार्यकर्ता मेळावा दरम्यान नाना पटोले यांना उलट्या खोपडीचे संबोधलं होतं....)) बाईट 01:- नाना पटोले .... .... .... पाच वाजताच्या नंतर जे काही मतदान झालं ते कुठल्या बुथवर किती मतदान झालं? त्याचे फक्त फुटेजेस निवडणूक आयोगाने आम्हाला द्यावे...... ANCHOR :- पाच वाजताच्या नंतर जे काही मतदान झालं ते कुठल्या बुथवर किती मतदान झालं? त्याचे फक्त फुटेजेस निवडणूक आयोगाने आम्हाला द्यावे? मात्र निवडणूक आयोग केंद्र सरकारकडे गेलं आणि केंद्र सरकारने 48 तासात नियम बदलवले आणि ते फुटेज आम्हाला देता येणार नाही गोपनीयता चे कारण दाखवून लपवण्याचं कारण केलं जात आहे. यात दिवसाढवळ्या फोन केला जात आहे लोकशाहीचा ही भूमिका मांडण्याचं काम राहुल गांधी कार्यरत असतील तर त्यांच्याबरोबर हे लोकशाही मानणारे लोक असतील तर त्यांनी यावं. नाहीतर या पद्धतीचा विशिप्त स्टेटमेंट देऊन महाराष्ट्राचा एक प्रकारे लोकशाहीवर विश्वास राहिलेल्या नाही असं राज्याचे मुख्यमंत्री सांगत असेल हे राज्याचं दुर्भाग्य आहे...... ((असा प्रतिउत्तर नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलाय...)) बाईट 02:- नाना पटोले .... .... .... विधानसभेत सरकार सांगते.... कुठला टार्गेट दिला नाही.... आणि इथे सर्रास पूर्ण महाराष्ट्रात ट्रॅफिक पोलिसांकडुन 200 लोकांना रोज दंडात्मक कारवाई करून सरकारची तिजोरी भरण्याचे काम होत आहे..... ANCHOR :- एकीकडे विधानसभेत सरकार सांगते की आम्ही कुठला टार्गेट दिला नाही. आणि इथे सर्रास पूर्ण महाराष्ट्रात ट्रॅफिक पोलिसांच्या माध्यमातून 200 लोकांना रोज त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून सरकारची तिजोरी भरण्याचे काम केले जात आहे. कधी हेल्मेट चे कारण दाखवतात, कागद नाहीत ओव्हरलोड केलं असे विविध कारण दाखवून लोकांना धमकवून जनतेला लुटण्याचं काम राज्याच्या सरकार करताना दिसून येत आहे. रोज नवनवीन कायदे काढून लोकांना लुटायचं आणि विधानसभेत आम्ही प्रश्न विचारतो तेव्हा सरकार म्हणता मी कुठलाही आदेश दिला नाही...... जर सरकारने आदेश दिले नसतील आणि पोलीस विभाग या पद्धतीची कारवाई करत असेल तर पोलिसांवर कारवाई करावी..... दूर तोंडी भूमिका शासन प्रशासनाच्या माध्यमातून घेतली जात असेल तर ती थांबवावी...... (( वाहतूक शाखेतील पोलिसांना टारगेट दिला जातो, भंडाऱ्यातही घटना समोर आली आणि नाना पटोलेंनी हा प्रश्न विधानसभेत मांडला होता याबाबत नाना पटोले बोलत होते....)) बाईट 03:- नाना पटोले .... .... .... इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये देशभरातून सर्व नेते आले होते......जागतिक लेव्हलवर जेव्हा पंतप्रधान जातात तेव्हा त्यांचा नंबर कुठे असतो? हे सर्व जगाने पाहिलं आहे..... ANCHOR :- महायुतीने पहिले आपली जागा बघितली पाहिजे. आपल्या पापाचे दुसऱ्यावर भांडे फोडून आणि आपले पाप लपवण्याचं प्रयत्न महायुती करत आहे. इंडिया आघाडीची बैठक कुठे आणि इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये देशभरातून सर्व नेते आले होते. आणि त्या पद्धतीने सर्व लोक बसले होते त्यामुळे जागतिक लेव्हलवर जेव्हा पंतप्रधान जातात तेव्हा त्यांचा नंबर कुठे असतो? हे सर्व जगाने पाहिलं आहे त्यामुळे या प्रकारची थट्टाबाजी सोडून महाराष्ट्राचे विकासासाठी आणि बरबादीकडे नेत आहात त्याकडे माहिती लक्ष घातले पाहिजे. आणि फडणवीस यांनी ज्या पद्धतीने राहुल गांधींवर टीका केली विशिष्ट झालेले लोकच अशा पद्धतीची प्रतिक्रिया देऊ शकतात...... राहुल गांधींनी लोकशाही वाचवण्यासाठी आपली भूमिका मांडलेली आहे... निवडणूक आयोगाने यावर उत्तर द्यायचे आहे......((उद्धव ठाकरे हे दिल्लीला महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी गेले होते. मात्र त्यांना सहाव्या रांगेत भोजनासाठी बसले म्हणून महायुतीने त्यांच्यावर "गांधींनी ठाकरेंना जागा दाखवल्याची टीका केली"...... यावर नाना पटोले बोलत होते.....)) बाईट 04:- नाना पटोले .... .... .... ....
0
Report
SNSWATI NAIK
Aug 08, 2025 11:30:25
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - नवी मुंबई मद्ये नारळी पौर्णिमा उत्साहात नवी मुंबई मे नारली पुरणीमा का उत्साह FTP slug - nm fastival shots- byet- mla manda mhatre reporter- swati naik navi mumbai Anchor -: नवी मुंबईतील सारसोळे गावात नारळी पौर्णिमेचा मोठा उत्साह पहायला मिळाला. पावसाळा सुरू होताच कोळ्यांची नाव दर्या किनारी विसावते आणि नारळी पौर्णिमेला दर्या राजाला नारळ अर्पण करून पुन्हा एकदा मासेमारीला सुरुवात करण्यात येत असल्याने हा सण कोळी समाजातर्फे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मासेमारीसाठी गेलेल्या आपल्या नाखवाला सुखरूप पुन्हा घरी आणण्याची प्रार्थना यावेळी करण्यात येते. यासाठी वाजत गाजत पारंपरिक पोशाख परिधान करत सोन्याच्या नारळाची पालखी मिरवणूक काढण्यात येते. बोटीने खोल समुद्रात जाऊन नारळ अर्पण करत नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. बाईट - मंदा म्हात्रे आमदार
0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 08, 2025 11:30:13
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते शरणू हांडेला अपहरण प्रकरणातील चारही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी *- शरणू हांडे अपहरण प्रकरणातील आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी* - आरोपी अमित सुरवसे याच्यासह 4 जणांना सुनावली पोलीस कोठडी - आरोपीकडून कोयता, हॉकी स्टिक, साडी, ब्लेड पान आदी एकूण 25 शास्त्रास्त्र आणि वस्तू पोलिसांनी हस्तगत केले - प्रकरणाचा अधिकचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आरोपीच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची केली मागणी - पोलीस कोठडीच्या मागणीला आरोपीचे वकील ऍड. शरद पाटील यांनी युक्तिवाद करत विरोध केला - आरोपीकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने पोलिस कोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडी द्यायची विनंती केली - दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायमूर्ती वी. ए. कुलकर्णी यांनी पोलीस कोठडी सुनावली
0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Aug 08, 2025 11:18:20
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 0808_BHA_KALAVIT FILE - 2 VIDEO भंडारा शहरात काळविटाच पिल्लू वावरताना दिसून येत आहे.... Anchor : भंडारा शहरात काळवीट आढळून आली आहे. शहराला लागून शेत शिवार आहेत याच शेतात मोठ्या प्रमाणात काळवीट आहेत. एक काळवीट भटकत शहराच्या दिशेने आली. या काळ विटाला बाहेर निघता येत नसल्याने शहराच्या दिशेने धाव घेतली आहे. नागरिकांना पाहून काळवीट पडू लागल्याने बेवारस कुत्रे देखील या काळविटाचा पाठलाग करत असल्याचं दिसून येत आहे.
4
Report
ABATISH BHOIR
Aug 08, 2025 11:17:43
Kalyan, Maharashtra:
सूचना... आवाज म्यूट करणे अपशब्द आहेत कल्याण मध्ये पुन्हा मराठी अमराठी वाद मनसेची इडली हॉटेल चालकाला दिला चोप इडली हॉटेल चालकाने मराठी माणसांबद्दल वापरले अपशब्द रेकॉर्डिंग व्हायरल होताच इडली हॉटेल चालकाला हॉटेल समोर दिला चोप ,हॉटेल चालकाने मागितली माफी कल्याण पूर्व दुर्गा माता मंदिर परिसरात घडली घटना व्हिडियो व्हायरल
3
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 08, 2025 11:16:00
Parbhani, Maharashtra:
अँकर- हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या पावसामुळे सर्वच नदी नाले ओढे नाले तुडुंब भरून वाहत असून अनेक भागातील नागरिक पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करतांना बघायला मिळत आहेत. काही शेतकरी तर शेतात अडकलेल्या जनावरांना चारा पाणी करण्यासाठी जीव धोक्यात टाकून पाण्यातून पोहत जातांना बघायला मिळत आहेत. तर कयाधु नदीला पूर आल्याने समगा येथील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून ग्रामस्थ पाण्यातून जीव धोक्यात टाकून जीवघेणा प्रवास करीत आहेत. तर काही लोक चक्क रेल्वे पटरीवरून जीव धोक्यात टाकून येजा करीत आहेत,मागील अनेक दिवसांपासून समगा येथील पुलाची उंची वाढवावी अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे,या पुलावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी wkt गजानन देशमुख
4
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 08, 2025 11:03:11
Raigad, Maharashtra:
स्लग - मंत्री भरत गोगावले यांना लाडक्या बहिणींचे रक्षाबंधन ....... मतदार संघातील महिलांनी गोगावले यांना बांधली राखी अँकर - आज महाडमध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या घरी रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गोगावले यांना राखी बांधण्यासाठी मतदार संघातील सर्व धर्मिय महिलांनी गर्दी केली होती. यावेळी आदीवासी, मुस्लिम महिला त्याच बरोबर पोलिस कर्मचारी महिलांनी देखील मंत्री भरत गोगावले यांना राखी बांधली.
7
Report
YKYOGESH KHARE
Aug 08, 2025 10:51:47
Nashik, Maharashtra:
nsk_derail feed by 2C नांदगाव ( नाशिक ) : ब्रेकींग.. update ( Video Exclusive...) - मालगाडीचा घसरलेला डबा उचलला.. - मनमाड, नांदगाव येथील तांत्रिक पथकाने युद्ध पातळीवर काम करत डबा उचलला.. - घटनास्थळावरून नांदगाव रेल्वे स्थानकाकडे गाडी रवाना.. - वाहतूक सुरळीत.. - डबा घसरण्याचे कारण शोधण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काम सुरू..
10
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 08, 2025 10:45:51
Hingoli, Maharashtra:
अँकर- हिंगोलीच्या कळमनुरी येथील अँकर- शिवसेना शिंदे गटाचे वादग्रस्त आमदार संतोष बांगर यांनी विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केल्याने आरटीओ अधिकऱ्याला दमदाटी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. कुठली ही चौकशी न करता अधिकाऱ्यांची लाज त्यांनी काढत आरटीओ कार्यालय बंद करण्याची धमकी आमदार बांगरांनी दिलीय,आमदार बांगरांच्या सततच्या अश्या वागण्याने हिंगोली जिल्ह्यात अधिकारी जास्त काळ टिकत नाहीयेत,त्यामुळे आता बांगर यांना कुणी तरी आवरा अस म्हणण्याची वेळ आलीय. व्हीओ- हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शाळकरी विद्यार्थ्यांना कोंबून कोंबून ऑटो आणि व्हॅनमधून शाळेत नेले जात आहे. यावर शहर वाहतूक पोलीस आणि आरटीओच्या सयूंक्त विद्यमाने काल कारवाई करण्यात आली. ऑटो मधून अवैध रीतीने मुलं कोंबून नेत असतांना आरटीओच्या पथकाने 66/192 प्रमाणे कारवाई करून 10 हजार रुपयांचा नियमाप्रमाणे दंड ठोठावला,त्यानंतर सदर वाहनचालक मालक आमदार बांगर यांना जाऊन भेटले असता आमदार बांगर यांनी कोणती ही खातरजमा न करता थेट फोन काढून अधिकार्यांची लाज काढली,शाळा बंद करू म्हटले,आरटीओ कार्यालयाला कुलूप ठोकण्याची धमकी सुद्धा बांगर यांनी शासकीय अधिकाऱ्याला दिली. बांगर फोन कॉल लावणे- बाईट- राहुल गावडे- उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,हिंगोली व्हीओ- संतोष बांगर यांच्याकडून धमकीचा फोन करणे,मारहाण करणे हे काही नवीन नाहीये,आमदार बांगर लोकांना मारहाण करतात,धमक्या देतात आणि त्यांचे कार्यकर्तेच असे व्हिडीओ व्हायरल करून दहशत निर्माण करीत असतात. यांना बळ कुठून मिळत असेल असे वाटत असेल तर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण तुम्ही ऐकाच आमदार संतोष बांगर यांचा स्टेज बाईट लावणे स्टेज बाईट- एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री व्हीओ- यावर विरोधकांनी जोरदार टीका केली असून शासकीय कामात अडथळा करणे हा गुन्हा असून हा सत्तेचा माज असल्याचे म्हटले आहे. बाईट- अंबादास दानवे- व्हीओ-आगीदरच महायुती सरकारला वाचाळ मंत्र्यांमुळे अडचणी निर्माण होत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर असे काम करणाऱ्या बांगर यांना ढान्या वाघ समजत असतील आणि यांचा आदर्श घेण्याचा सल्ला देत असतील तर हिंगोलीच कल्याण होणार यात मात्र शंका नाहीये... गजानन देशमुख,झी मीडिया हिंगोली
11
Report
YKYOGESH KHARE
Aug 08, 2025 10:45:33
Nashik, Maharashtra:
nsk_ubtmnscontro feed by live u 51 *ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे आणि ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांच्यात नेमका काय वाद झाला* * विधानसभा निवडणुकीत वसंत गीते उमेदवार असताना प्रचाराचा मुद्दा जयंत दिंडे यांनी उपस्थित केला. * MD ड्रग्स विषय लोकांपर्यंत व्यवस्थित न पोहोचल्याने गीते यांचा प्रभाव झाला अस जयंत दिंडे म्हणाले.. * मात्र यावर विनायक पांडे यांनी आक्षेप घेत तसं असत तर गीते यांना एवढे मतदान झालं असतं का असा सवाल विनायक पांडे यांनी उपस्थित केला.. * यावेळी पांडे आणि दिंडे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली * आम्ही इतके वर्ष पक्षात आहोत ते उगाच का अस म्हणत विनायक पांडे तडका फडकी बैठक सोडून निघून गेले * विनायक पांडे यांच्या मागोमाग पांडे समर्थक देखील बैठक सोडून निघून गेले.. नाशिक - जयंत दिंडे, ग्रामीन जिल्हाप्रमुख ठाकरेंची शिवसेना - आमच्यात काहीच वाद झाला नाही - आम्ही लहान पासूनचे मित्र आहोत - हा गैर समज पसरवला जात आहे - पांडे का निघून माहिती नाही - मी प्रत्येक भाषणात माफी मागतो, काही झालं असेल तर - कृपया विनंती आहे गैरसमज नका पसरवू नाशिक - दत्ता गायकवाड - उपनेते, ठाकरेंची शिवसेना - हे शहर देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले होते - स्मार्ट सिटीच्या नावाखाली भकास झालं - गांजा ड्रग्ज, खून, हनी ट्रॅप बाबत शोध घेतला जात नाही - आम्ही याबाबत वाचा फोडणार, जिल्ह्यात संयुक्त बैठक घेणार आहे - शहरावर अन्याय होतो आहे, त्यावर आमचे दोनच पक्ष लक्ष घालतील - आम्ही राजकारण करत नाही, शिवसेनेचा जन्म राजकारणांसाठी नाही - सामान्य लोकं काय सांगताय बघा, खड्डा मुक्त शहर हे आंदोलन केले - निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन आंदोलन नाही - १०० पार चा नारा देऊन त्यांना उमेदवार मिळत नाही - काही वाद झाला नाही, गैरसमज निर्माण झाला असेल - मला वाटत नाही काही वाद झाला नाही, मिटिंग संपली असती - किरकोळ वाद झाला, तुमच्यासमोर काय वाद झाला - ड्रग्जचाच मुद्दा आता आम्हाला घ्यायचा, हनी ट्रॅपचा मुद्दा आहे - भाषणात काय बोललं माहिती नाही, काहीच गैरसमज नाही - आम्ही एकत्र का आलो ? शहराची काय अवस्था झाली आहे - मुंबईत एकत्र आले तर हिंदी शक्तीचा निर्णय मागे घेतला - आम्ही शहरासाठी एकत्र आलो आहे निवडणूकीसाठी एकत्र आलो नाही नाशिक - दिनकर पाटील, मनसे पदाधिकारी - मनसे आणि शिवसेना यांच्यात बैठक झाली - जनतेवर अन्याय होतो त्यावर आमची चर्चा झाली यापुढे आम्ही मोर्चा काढणार - कायदा सुव्यवस्था बाबत आम्ही मोर्चा काढणार - विभाग आणि तालुक्यानुसार आम्ही एकत्रित बैठक घेणार - एकत्रित मोर्चा काढणार आणि सरकारला जाब विचारणार - आमचे वरिष्ठ नेते यामध्ये सहभागी होतील - १५ दिवसानंतर मोर्चा राहील, आमचं सगळं काही एकत्रित राहणार - महायुतीचा आम्ही नायनाट करणार
9
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Aug 08, 2025 10:32:02
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 0808ZT_MAVAL_LON_RAIN Total files : 01 Headline : लोणावळ्यात आठवडाभरानंतर पावसाची हजेरी Anchor: मावळ तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली होती. मात्र आज लोणावळ्यात मुसळधार पावसाची जोरदार सुरुवात झाली. अचानक कोसळलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली, तर उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
9
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 08, 2025 10:04:55
Ratnagiri, Maharashtra:
अँकर - महायुतीमध्ये आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याबाबत स्थानिक पातळीवर तरी एकमत होताना दिसत नाही. त्याच्या वादाचा अंक सध्या कोकणात पाहायाला मिळतोय...रत्नागिरीमध्ये याच मुद्यावरून सध्या शिवसेना - भाजपमध्ये वादाची ठिणगी पेटलीय...दोन्ही बाजुनं आमची ताकद दाखवून देऊ अशी भाषा केली जातेय...त्यामुळे वरिष्ठ नेते युतीची भाषा करत असले तरी कार्यकर्ते, स्थानिक नेते यांचं मत काय? यावरून वाद सुरू झालेत...पाहुयात रिपोर्ट... GFX IN स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून कि विरोधात? कोकणात भाजप - शिवसेनेचे स्वबळाचे नारे दोन्ही पक्षांकडून ताकद दाखवण्याची भाषा आरोप - प्रत्यारोपांनी निवडणुकीपूर्वी रंगत वाढली ! GFX OUT व्हिओ 1 - कोकणात सध्या महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये कलगीतुरा रंगलाय...त्याला निमित्त आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका...याच मुद्यावरून आता मित्रपक्षांचे आजी - माजी आमदार आमनेसामने आलेत...स्थानिक पातळीवर लढायच्या जागा असतील किंवा मग जिल्हा नियोजनमधून मिळणारा विकास निधी यावरून थेट आरोपांची राळ उठलीय... बाईट - सतीश मोरे, भाजप जिल्हाध्यक्ष, बाईट- अभय भाटकर, गुहागर तालुका प्रमुख भा व्हिओ 2 - उदय सामंत यांनी भाजपचे माजी आमदार विनय नातू यांच्याबाबत केलेलया विधानावरून तर भाजप चांगलीच दुखावली गेलीय त्यात उदय सामंत यांनी आज पुन्हा एकदा नातू आणि भाजपला डिवचलय ... रत्नागिरी जिल्ह्यातील कोणीतरी म्हणजे जिथे त्यांची एकही जागा नाही.. 55 पैकी 55 जागा शिवसेनेचे आहेत.. रत्नागिरी पंचायत समितीमध्ये 24 पैकी 22 जागा शिवसेनेचे आहेत.. कोणीतरी त्यावर बोलतोय त्यावर कोल्हापुरातून उत्तर देणे म्हणजे त्याला राष्ट्रीय नेते बनवण्या सारखे आहे.असं आज .उदय सामंत यांनी म्हणतलंय बाईट - उदय सामंत, पालकमंत्री व्हिओ - त्यात दोनच दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांनी भाजपचे माजी आमदार विनय नातू यांच्यावर केेलेली टीका योग्य असल्याचं म्हणत सामंत यांनी एक प्रकारे जाधव यांच्या स्वरात सूर मिसळला आहे.... बाईट - भास्कर जाधव, आमदार, ठाकरे गट व्हिओ - यापूर्वी मंत्री नितेश राणे यांनी देखील रत्नागिरीमध्ये भाजप स्वबळावर लढेल असे संकेत दिले होते....त्यानंतर आता स्थानिक पातळीवरचे नेते देखील स्वबळासाठी आक्रमक झालेत... बाईट - नितेश राणे, मंत्री व्हिओ - अर्थात आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार असं वरिष्ठ नेते बोलत असले तरी स्थानिक पातळीवर सूर वेगळा आहे...परिणामी आगामी निवडणुकीत सत्तेत असलेले मित्र पक्ष काय भूमिका घेतात हे पाहायाला हवं....पण, निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक असताना सुरू झालेला वाद नेमका कुठं जातो याकडे देखील लक्ष ठेवावं लागेल... कोल्हापूरहून प्रताप नाईकसह प्रणव पोळेकर झी 24 तास रत्नागिरी
14
Report
PNPratap Naik1
Aug 08, 2025 10:04:44
Kolhapur, Maharashtra:
Kop Pink Rekshwa Feed :- Live U Anc :- कोल्हापुरात पिंक ई रिक्षा आणि रुपे कार्ड वितरण समारंभ राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार शाहू महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात लाभार्थी महिलांना प्राथमिक स्वरूपात पिंक ई रिक्षा आणि रूपे कार्डचं वाटप करण्यात आलं.यावेळी बोलताना अदिती तटकरे यांनी पिंक ई रिक्षासाठी 700 हुन अधिक अर्ज आलेले आहेत. खूप चांगला प्रतिसाद या उपक्रमाला मिळतोय. या कार्यक्रमानंतर आदिती तटकरे यांच्यासह सर्व मान्यवरांनी पिंक इ रिक्षा मधून फेरफटका मारला. दरम्यान लाडक्या बहीण योजनेच्या वाढीव रकमे संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. पण शासनाकडून एकापेक्षा अधिक लाभ घेत असलेल्या महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही..यासाठी डबल लाभ घेणाऱ्या महिलांची यादी तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. Byte :-आदिती तटकरे- मंत्री महिला व बालकल्याण
14
Report
Advertisement
Back to top