Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

रेल्वे पोलिसांनी जप्त केले 6 किलो गांजा, मोठा मुद्देमाल!

PTPRAVIN TANDEKAR
Jul 27, 2025 02:47:19
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara Slug - 2707_BHA_GANJA FILE - 2 VIDEO 1 IMAGE 6 किलो गांजा हस्तगत.... 1.27 लाखांचा मुद्देमाल जप्त रेल्वे पोलिसांची कारवाई Anchor :- पुरी-गांधीधाम साप्ताहिक एक्स्प्रेसमधून गांजाची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाच्या भंडारा रोड पथकाने मोठी कारवाई केली. संध्याकाळच्या सुमारास केलेल्या या कारवाईत 6 किलो 348 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या अंमली पदार्थाची बाजारातील किंमत 1 लाख 26 हजार 960 रुपये असल्याचे समजते. ही कारवाई गाडी क्रमांक 12994 पुरी-गांधीधाम साप्ताहिक एक्स्प्रेसच्या S/03 स्लीपर कोचमधील बर्थ क्रमांक 33 मध्ये करण्यात आली. रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना तपासणीदरम्यान तपकिरी - रंगाची पिट्ट बॅग बेवारस अवस्थेत आढळून आली. बॅगेत गांजासदृश पदार्थ आढळून आल्यानंतर त्याचे वजन करण्यात आले. त्यात तब्बल 6.348 किलो गांजा असल्याचे स्पष्ट झाले. या रेल्वेगाडीचा भंडारा स्थानकावर थांबा नसल्यामुळे ही बॅग नागपूर स्थानकात उतरवून तपासणी करण्यात आली.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Jul 27, 2025 09:45:45
Shirdi, Maharashtra:
Rahuri News Flash अजीत पवार बाईट पॉईंटर्स - ऑन प्रकाश सोळंके नाराजी - या मंगळवारी बैठक , त्यात आमदारांशी चर्चा करेल आणि त्यांना त्यांचं म्हणणं विचारेल... ऑन एकनाथ खडसे जावई - सी पी कायद्याने आणि नियमाने तपास करतायत , जे सापडले त्यांच्यावर रितसर कारवाई करतायत... कोणीच चुकीच वागायच नसतं , चुकीच करायच नसतं... ऑन राज उद्धव भेट - खुप चांगल बघतो या भेटीकडे , तो त्यांच्या घरातला प्रश्न ... त्यांचे विचार स्वतंत्र आहेत , भावा भावांनी काय कराव ? तु आणि तुझा भाऊ वेगळे राहिलात आणि विस वर्षानंतर एकत्र आले तर वाईट वाटायच काय कारण ? आनंद वाटला पाहिजे.. पवार - पवार एकत्र येण्यावर आणि प्राजक्त तनपुरे यांच्या प्रश्नावर शुभेच्छा अस म्हणत बोलणे टाळले... bite - अजित पवार उपमुख्यमंत्री
0
Report
NMNITESH MAHAJAN
Jul 27, 2025 09:33:22
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2707ZT_JALNA_RAINWATER(2 FILES) जालना | मुसळधार पावसामुळे जफरखान चाळीतील घरात शिरलं रस्त्यासह नाल्यांचं पाणी महानगरपालिकेचं पितळ उघड नागरीकांनी रात्र जागरण करून काढली अँकर | जालना शहरात गेले तीन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत तसेच रस्त्यांवर पाणी साचलं आहे. काही घरांमध्ये देखील पावसाचं पाणी शिरलंय.यामुळे वयोवृद्ध, लहान मुलं आणि महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान नागरीकांच्या घरात पाणी शिरल्यानं जालना महानगरपालिकेचं पितळ उघड झालं आहे. शहरातील जफर खान चाळी मध्ये रस्त्यावरून वाहणारं पाणी थेट घरात शिरल्यानं जीवन विस्कळीत झालं आहे. काही घरांतील फर्निचर, अन्नधान्य आणि कपडे खराब झाले आहेत. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप मदतीसाठी कोणताही ठोस उपाय करण्यात आलेला नाही.महापालिका प्रशासनाने साचलेलं पाणी बाहेर निघण्यासाठी तातडीनं लक्ष घालण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.
2
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Jul 27, 2025 09:20:02
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज..‌ स्किप्ट ::- आणीबाणीची पुनरावृत्ती? रवीकांत तुपकरांचा सरकारला इशारा... AC::- १९७७ साली इंदिरा गांधींनी चळवळी दडपण्याचा प्रयत्न केला होता, आणि आजचं सरकारही त्याच पद्धतीने शेतकरी चळवळींना संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा थेट आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केलाय. लातूर दौऱ्यावर आलेल्या तुपकरांनी विजयकुमार घाडगे यांची भेट घेतली आणि सरकारला स्पष्ट इशारा दिला की, चळवळीत काम करणाऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या नादाला लागू नये. आणीबाणी काळात जशा आंदोलनांची ठिणगी पेटली होती, त्याच पद्धतीचा मोठा लढा या सरकारविरोधात पुन्हा उभा करू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे... बाईट ::- रविकांत तुपकर
2
Report
GMGANESH MOHALE
Jul 27, 2025 09:02:33
Washim, Maharashtra:
वाशिम: File:2707ZT_WSM_MSEB_WORKERS_ANDOLAN रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर: महावितरणच्या वाशीम मंडळातील कंत्राटदारांकडून कंत्राटी कामगारांची पिळवणूक होतं असल्याचा आरोप करत कंत्राटदाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी महावितरणच्या कंत्राटी कामगारांनी 16 जुलैपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केलंय. मात्र आज आंदोलनाचा 11 वा दिवस असूनही त्याची कोणतीही दखल महावितरण कडून आत्तापर्यंत घेण्यात आलेली नाही. याआधीही कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार निवेदन देण्यात आली होती मात्र त्यावर कारवाई न झाल्याने हे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे.कंत्राटदार कामगारांच्या पगारातून दोन ते तीन हजार रुपये बेकायदा कपात करून घेतात.काम करताना मृत्यू झालेल्या कामगाराचा योग्य अहवाल महावितरण कडे दिला गेला नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना कोणताही लाभ मिळाला नाही. यासह अन्य मागण्यांच्या संदर्भात चौकशी करून कारवाई करण्यासाठी ही आंदोलन करण्यात येतंय.
7
Report
PPPRANAV POLEKAR
Jul 27, 2025 09:02:19
Ratnagiri, Maharashtra:
मिरकरवाडा मासेमारी बंदराच्या विकास कामांचा भूमिपूजन समारंभ बंदरे मंत्री नितेश राणे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न दोन्ही मंत्र्यांनी केलं एकमेकांचं कौतुक ________________ रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वाच्या मिरकरवाडा मासेमारी बंदराच्या विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आज बंदरे मंत्री नितेश राणे आणि उद्योग, मराठी भाषा तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमावेळी दोन्ही मंत्र्यांनी एकमेकांचं कौतुक केलं.. 18 महिन्याचं काम 12 महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असं अधिकाऱ्यांनी सांगितलं, मात्र पाठक साहेब प्रयत्न हा शब्द आमच्या डिक्शनरीमध्ये नाही, 12 महिन्यातच पूर्ण करा, कारण आता उदयजीनी गाडीतून उतरल्यावर सांगितलं आहे, तिसऱ्या टप्प्याचेही पैसे तयार ठेवा, त्यामुळे पालकमंत्र्यांचं आमच्यावर लक्ष आहे, तुम्ही 12 चे 13 महिने लावलेत तर उगाच माझे 13 वाजण्याची वेळ येईल, त्यामुळे अशी काही वेळ येऊ देऊ नका असं म्हणत नितेश राणे यांनी मंत्री उदय सामंत यांचं कौतुक केलं. तर मिरकरवाडा बंदराच्या टप्पा दोनचं काम पूर्ण होण्यासाठी कोकणातल्या सुपुत्राला मंत्री व्हावं लागलं हा नियतीचा खेळ होता, त्यामुळे तुमचे मनापासून अभिनंदन म्हणत मंत्री उदय सामंत यांनी नितेश राणे यांचं कौतुक केलं. तसेच मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचं काम नितेशजिनी केलं, तसेच ज्या भावनेतून नितेशजीनी मिरकरवाड्याच्या विकासाला हात घातलाय हे फार मोठं काम आहे. वेळेच्या बाबतीत मोठ्या राणे साहेबांप्रमाणेच नितेशजी देखील परफेक्ट असल्याचं उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं.. तसेच कोकणचा सुपुत्र मत्स्य विकासासाठी तळमळीने प्रयत्न करत असल्याचं कौतुक यावेळी उदय सामंत यांनी केलं.. Byte -- नितेश राणे उदय सामंत
10
Report
UPUmesh Parab
Jul 27, 2025 09:01:37
Oros, Maharashtra:
Pkg -- *तळकोकणात महायुतीला बिघाड* ? स्थानिक स्वराज्य निवडणुकात जागा लढविण्यावरून महायुतीत शीत युद्ध ... स्वबळावर लढण्याचे भाजपा आणि शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे संकेत. ... अँकर ---- तळकोकणात भक्कम समजल्या जाणाऱ्या महायुतीत बिघाड होताना पाहायला मिळत आहे. भाजपा आणि शिवसेना या दोन्ही राजकीय मित्र असलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यामध्ये सध्या शीतयुद्ध सुरु आहे. संभाव्य स्थानिक स्वराज्य निवडणुकात जागा लढविण्यावरून हे शीत युद्ध सुरु असून स्थानिक पदाधिकाऱ्यांनंतर आतां नेते देखील स्वबळाची भाषा बोलू लागलेत. सिंधुदुर्ग जिल्हा रानेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो या बालेकिल्ल्यात स्वतः नारायण राणे खासदार दोन्ही पुत्र आमदार आहेत. मात्र निलेश राणे यांना शिवसेनेचे तिकीट मिळाल्यानंतर रानेंच्या कार्यकर्त्यांची फाळणी झाली काही कार्यकर्ते भाजपमध्ये राहिले कुडाळ मालवण मधील कार्यकर्ते निलेश रानेंसोबत शिवसेनेत गेले. अगदी गळ्यात गळे घालून असलेले हे कार्यकर्ते आतां आपली राजकीय ताकद मोठी असल्याचे सांगत स्थानिक स्वराज्य निवडणुकात आपल्याला जास्त जागा मिळाल्व्यात अशी मागणी करू लागलेत. Byte --- संजू परब, जिल्हाप्रमुख शिवसेना सिंधुदुर्ग शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जास्त जागांची मागणी केल्यानंतर भाजपा मोठा पक्ष आहे असा दावा करत वरिष्ठ बोलले तर युती अन्यथा स्वबळावर लढण्याची भाजपाची तयारी असल्याचे संकेत भाजपा जिल्हाध्यक्षानी दिलीय. Byte --- प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हाद्यक्ष भाजपा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका कार्यक्रमात मंत्री उदय सामंत यांनी तर तुम्ही म्हणालात तर युती आणि तुम्ही म्हणालात तर स्वबळावर नगरपंचायत निवडणुका लढवू असे सांगत कार्यकर्त्यांच्या मागणीला दुजोरा दिलाय. Byte -- उदय सामंत, मंत्री शिवसेना स्थानिक स्वराज्य निवडणुकात जागा वाटपाबाबत सिंधुदुर्गात हे शीत युद्ध सुरु असताना मंत्री नितेश राणे यांनी तर थेट रत्नागिरीत स्थानिक स्वराज्य निवडणुका स्वाबळावर लढण्याचे संकेत दिलेत. रत्नागिरी मध्ये भाजपाचे लोकप्रतिनिधी नसल्याचे सांगत राणेनी कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा असल्याचे सांगून आपली ताकद दाखविण्यासाठी स्वबळावर निवडणुका लढविण्याचे संकेत दिलेत. End --- संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कार्यकर्त्यांना स्वबळावर लढवायच्या आहेत असं सांगत महायुतीतील नेते मंडळी स्वबळावर लढण्याचा नारा देत आहेत. मात्र येणाऱ्या निवडणुकात भाजपा आणि शिवसेना महायुती म्हणून एकत्र लढतात कि कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून नेते मंडळी आपले इच्छित साधतात हे पाहणं उत्तस्तुकतेच ठरेलं उमेश परब, सिंधुदुर्ग
7
Report
LBLAILESH BARGAJE
Jul 27, 2025 08:46:01
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- राधाकृष्ण विखे पाटील फीड 2C राधाकृष्ण ऑन पुणे रेव्ह पार्टी खडसे जावई Anc:- राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई पुणे येथील खराडी परिसरात रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहे. याबाबत आपल्याला कुठलीही कल्पना नसून तसं काही असेल तर पोलीस कारवाई करतील अस जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. तसेच यावर मला भाष्य करायचं नसल्याचा देखील विखे यांनी म्हटल आहे. बाईट:- राधाकृष्ण विखे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण ऑन रोहित पवार राष्ट्रवादी दोन गट Anc:- टू द पॉईंट या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात दोन गट असल्याचं म्हटलं आहे, यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टोला लगावला आहे. रोहित पवार यांनी चिंता करण्याची गरज नसून त्यांनी त्यांच्या पक्षात दोन गट पडणार नाही याची काळजी करावी अस म्हटलं आहे. बाईट:- राधाकृष्ण विखे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण ऑन रोहित पवार पक्ष चिन्ह Anc:- टू द पॉईंट या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण उद्धव ठाकरे यांना तर राष्ट्रवादीचे घड्याळ हे चिन्ह आम्हाला पुन्हा वापस मिळणार असल्याचं म्हटलं आहे यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिल्या असून ज्या गोष्टी कायदेशीर सुरू आहेत त्यावर भाष्य करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे बाईट:- राधाकृष्ण विखे, जलसंपदा मंत्री
9
Report
DPdnyaneshwar patange
Jul 27, 2025 08:31:42
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव: DHARA_WATER भुम तालुक्यातील वंजारवाडी येथील आरसोली लघु प्रकल्प ओव्हरफ्लो Anchor:धाराशिव जिल्ह्यातील भुम तालुक्यातील वंजारवाडी येथील आरसोली लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे.गेली दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. हा प्रकल्प 100 टक्के भरला आहे.या प्रकल्पातुन भुम शहराला पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे भुम करांची पाण्याची चिंता देखील मिटली असुन प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाल आहे.
8
Report
SGSagar Gaikwad
Jul 27, 2025 08:30:23
Nashik, Maharashtra:
feed send by TVU 51 reporter-sagar gaikwad slug-nsk_padalkar_121 अँकर एकनाथ खडसे यांच्या जावयाला पुण्यात झालेल्या रेव्ह पार्टी ताब्यात घेण्यात आला आहे....यावर गोपीचंद पडळकर त्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेल्या प्रसार माध्यमांवर पाहिल्यानंतरच कळले की एकनाथ खडसे यांच्या जावयाला ताब्यात घेण्यात आला आहे... याबाबत आता पोलीस पोलीस तपास करतील यावर काय बोलावं असं त्यांनी म्हटले... गोपीचंद पडळकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड
8
Report
AKAMAR KANE
Jul 27, 2025 08:18:38
kolhapur, Maharashtra:
नागपूर स्व. भानुताई गडकरी डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी *विशेष उपस्थिती* चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री,प्रमुख उपस्थिती सुलेखाताई कुंभारे, माजी राज्यमंत्री उपस्थित आहे Live फ्रेम दिलीय
11
Report
SGSagar Gaikwad
Jul 27, 2025 08:18:29
Nashik, Maharashtra:
feed send by TVU 51 reporter-sagar gaikwad slug-nsk_mahajan_byte *नाशिक - गिरीश महाजन, मंत्री बाईट मुद्दे* *ऑन राज उद्धव भेट/ वाढदिवस* - उद्धवजींना मनापासून शुभेच्छा - हे भेटले ते भेटले काय वाईट आहे - देवेंद्रजींना सुद्धा त्यांनी सुंदर शुभेच्छा - कायम भांडत राहिले पाहिजे असे काही नाही - वाढदिवस हा वेगळा प्रसंग असतो - राज ठाकरे भेटले यात वाईट काही नाही - चुकीचे काही झाले नाही - हळूहळू मनमिलाफ होतो आहे - मी सुद्धा फोन केला पण बोलणं झालं नाही - वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं पाहीजे
14
Report
SGSagar Gaikwad
Jul 27, 2025 08:17:14
Nashik, Maharashtra:
feed send by 2c reporter-sagar gaikwad slug-nsk_bhujbal_byte *नाशिक - छगन भुजबळ, मंत्री, बाईट मुद्दे* *ऑन वाढदिवस शुभेच्छा, ठाकरे बंधू भेट* - उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस आहे - मी सुद्धा शुभेच्छा देतो - उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो या शुभेच्छा - राज ठाकरे तिकडे गेले नवल वाटत नाही - ते चुलत भाऊ आहे - राज ठाकरे उद्धव ठाकरेंना दादू म्हणायचा - राजकिय कारणामुळे दूर झालेले भाऊ वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र येत असतील तर वाईट वाटायचे कारण नाही - आपण सुद्धा शुभेच्छा दिल्या पाहिजे
13
Report
PTPRAVIN TANDEKAR
Jul 27, 2025 08:17:08
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 2707_BHA_NANA_ON_RAJ FILE - 1 VIDEO नाना पटोले ऑन राज उध्दव भेट Anchor :- मी अनेक दिवसांनी सांगतोय की पारिवारिक कौटुंबिक ही आपल्या महाराष्ट्र परंपरा राहिलेली आहे. दोन भाऊ एकत्र येत असतील, बोलत असतील भेटत असतील याचा राजकारण करू नये असं आमच्या सल्ला आहे. पण मोठ्या प्रमाणात या पद्धतीची चर्चा मुद्दामहून टाकायचं हे बीजेपीचा मीडिया सेल करत आहे. त्या पद्धतीने आणि महाराष्ट्र मध्ये सरकार बद्दल रोष आहे. महाराष्ट्राचे जनता या सरकारच्या विरोधात आहे. त्या विषयाला डायव्हर करण्यासाठी दोन भाऊ एकत्र भेटले ते का भेटले का भेटले याच्यावर चर्चा आहे. दोघ भावी एकत्र भेटतील तर ते गैर नाही याला विरोध करण्याचा कोणताही कारण नाही.
11
Report
SGSagar Gaikwad
Jul 27, 2025 08:16:49
Nashik, Maharashtra:
feed send by TVU 51 reporter-sagar gaikwad slug-nsk_mahajan_pc *नाशिक - गिरीश महाजन, मंत्री, पत्रकार परिषद मुद्दे* ऑन रेव्ह पार्टी - माझ्याकडे कुठलीही माहिती नाही - मी काल पंढरपूरला होतो - मी पहाटे नाशिकला आलो - प्रेसच्या माध्यमातून बातमी कळले - आमचे नेते नाथाभाऊचे जावई सापडले - तेच आयोजक होते - मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले - त्यांना ताब्यात घेतले आहे - कालच नाथाभाऊने सांगितले चालीसगाव ला गांजा कसा बोलत होते - त्यांचे जावईच कसे काय सापडले - मोठा विषय आहे, रेव्ह पार्टी हा विषय मोठा - पाच का तीन होत्या माहिती नाही - तपास केल्यावर किती महिला होत्या - कुणी पलायन केले समोर येईल - हुक्क्याचा बार लावला होता, - तपासाअंती समोर येईल - नाथाभाऊने जावई बापूंना अलर्ट करायचे होते ना? - जे झालंय ते मान्य करायला पाहिजे - ज्याने चूक केली तर गळ्यात पडेल - प्रत्येक वेळी षड्यंत्र आपल्या सोबतच का होतं - फोन तपासले तर सगळे कळेल - जावईला कडेवर घेऊन थोडी कुणी घेऊन गेलं - कुंभाड कसं काय होईल - चौकशी झाली पाहिजे - दोषींवर कारवाई झाली पाहिजे ऑन लाडकी योजना पुरुष समावेश - निश्चित असे असेल तर वसूल केले पाहिजे - पुरुष कसे काय लाभ घेतील - पाहावे लागेल ऑन हसन मुश्रीफ - लाडक्या बहीण योजनेमुळे तिजोरीवर भार पडला आहे - गरज होती, ऑन माणिकराव कोकाटे - मंगळवारी बोलावलेलं आहे - दादा चर्चा करतील - मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील ऑन भाजप प्रवेश - दिग्गज नेते येण्यासाठी इच्छूक आहार - आजी माजी आमदार मुख्य प्रवाहात यायला तयार ऑन पालकमंत्री - तुम्ही सांगत नाही, पालकमंत्री नाही - रस्ते व्यवस्थित करावे लागतील - अनेक ठिकाणी खड्डे आहे - वाईट परिस्थिती आहे - लवकरच दुरुस्त होईल ऑन पर्यटक अपघात - निश्चित माझी विनंती आहे - अतिशय चांगले वातावरण आहे - बाहेर पडतांना काळजी घ्या - पाण्यापासून लाभ राहा - पुलावरून विनाकारण वाहन टाकतात - पादचारी सुद्धा वाहून जातात - सुरक्षित पर्यटन करावे ऑन संजय राऊत - खडसेंना सांगा - त्यांच्याशी सख्य आहे - त्यांना सल्ला घ्या ऑन राऊत आरोप सांड - मी कधी कुणाला मारलं - ते काम माझं नाही - माझ्यावर मारल्याची एक केस नाही - त्यांची जीभ कोणी धरू शकत नाही - त्याबाबतीत त्यांना सोडलं आहे - त्यांना सांड शब्द वापरणार नाही - माझ्यावर प्रेम जास्त - 40 वर्षे झाली राजकारणात - दादागिरी केल्याची एक केस नाही ऑन हनी ट्रॅप खडसे आरोप - माझ्याकडून हा विषय बंद केला - माझा फोटो खडसेंनी दाखविला - मी नंतर 10 फोटो दाखविले - उठता बसथा मीच दिसतोय - त्यांनी घराकडे लक्ष द्यावे
14
Report
PTPRAVIN TANDEKAR
Jul 27, 2025 08:15:58
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 2707_BHA_PARINAY_FUKE FILE - 4 VIDEO *संजय राऊत यांना पक्षातून काढा नाही तर पक्षाच काही खरं नाही.... परिणय फुके* Anchor ;- रोहिणी खडसे यांचे पती एका रेव पार्टीमध्ये पकडले आहेत. या रेव पार्टीमध्ये काय काय होते आणि काय अमली पदार्थ होते हे सर्व पोलिसांना सापडले आहेत. म्हणून त्यांना तिथे अटक केलेली आहे. तर दुसरीकडे संजय राऊतच्या जो सकाळच्या दहा वाजेच्या भोंगा आहे तो कुठेतरी बंद झाला पाहिजे कारण संजय राऊत यांना भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काही दिसत नाही संजय राऊत यांनी बोलून बोलून उबाठाचा इतका वाटोळा केला आहे. संजय राऊत यांना पक्षातून काढा अशी उद्धव ठाकरे यांना विनंती आहे...त्या नंतरच पक्षाची वाढ होईल... Byte ;- परिणय फुके *संजय राऊत यांचे कपडे फाडण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही - परिणय फुके* Anchor ;- महायुती सरकार कॅरेक्टर लेस आहे याला जवाबदार देवेंद्र फडणवीस आहे असे संजय राऊत यांनी म्हटले असून यावर बोलतांना फुके म्हणाले की ,संजय राऊतच किती कॅरेक्टरलेस आहेत हे सांगायची गरज नाही काही काही गोष्टी ह्या ठरवलेल्या आहेत की काही विरोधी बेल्ट नाही करणार म्हणून संजय राऊत यांचे कपडे पाहण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. Byte ;- परिणय फुके *भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत 21 पैकी 21 उमेदवार आमचे निवडून येणार - फुके* Anchor :- भंडारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात अग्रणी ठरलेली भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक तब्बल 9 वर्षानंतर होत आहे.विविध गटातून 21 संचालकांच्या निवडीसाठी एकूण 1062 मतदार आपला हक्क बजावणार आहेत.एकूण 46 उमेदवार रिंगणात आहेत. ही निवडणूक चुरशीची ठरणार असून यात नाना पटोले, प्रफुल्ल पटेल, परिणय फूके यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे असली तरी 21 पैकी 21 उमेदवार आमचे निवडून येणार आहे. Byte ;- परिणय फुके *लाडक्या बहिणीमुळे कर्ज माफीत अलथळा निर्माण होत आहेत. अस वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलं आहे* *शेतकऱ्यांची कर्जमाफी शंभर टक्के होणार यांच्यात काही दुमत नाही...* Anchor ;- लाडकी बहिण पण तितकीच महत्त्वाचे आणि शेतकरी पण तितकेच महत्त्वाचे आहेत ज्याप्रमाणे लाडकी बहिणीला न्याय देण्याचे काम माहिती सरकारने केलं त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी शंभर टक्के होणार याच्यात काही दुमत नाही Byte ;- परिणय फुके
13
Report
Advertisement
Back to top