Back
नाशिकमध्ये हर घर तिरंगा: सायकल रॅलीने वाढवला देशभक्तीचा जोश!
SGSagar Gaikwad
Aug 11, 2025 07:16:40
Nashik, Maharashtra
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_tiranga_rally
“हर घर तिरंगा” अभियानांतर्गत नाशिक महानगरपालिकेची पर्यावरणपूरक तिरंगा सायकल रॅली उत्साहात संपन्न.
अँकर -
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या वतीने “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत देशभक्ती आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देणारी भव्य तिरंगा सायकल रॅली आज नाशिक शहरात उत्साहात संपन्न झाली. या अभियानाद्वारे देशप्रेम, राष्ट्रीय एकता आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला. 2 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत नाशिक मनपातर्फे विविध उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागवली जात आहे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowAug 11, 2025 09:47:20Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावर अपघात
गोव्याच्या दिशेने जाणारा कंटेनर पलटी
लांजा जवळच्या वेरळ घाटातील घटना
वेरळ घाटामध्ये एकरी वाहतूक सुरू
घटना स्थळी पोलीस दाखल
ब्लॅक स्पॉट अशी वेरळ घाटाची ओळख
वारंवार अपघात होत असल्याने प्रवास वर्गात नाराजी
वाहतूक पोलीस घटनास्थळी
3
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 11, 2025 09:36:57Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1108ZT_WSM_SWEEPER_ANDOLAN
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर : वाशिम नगरपरिषद अंतर्गत घंटागाडी व ट्रॅक्टरद्वारे कचरा संकलन करणारे सुमारे ९० कंत्राटी सफाई कामगार व वाहनचालक कचरा संकलनासाठी कामगार गेली १० ते २० वर्षे कंत्राटी पद्धतीने कार्यरत होते. अनेक वर्षाच्या सेवेनंतरदेखील, २५ जुलै रोजी नव्या टेंडर प्रक्रियेनंतर वाशिम विधानसभेचे आमदार श्याम खोडे यांच्या नातेवाईक असलेल्या कंत्राटदाराने जुने कामगार कमी करून नवे कामगार नेमले.आणि जुन्या कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आणली असा आरोप करत,ऐन सणासुदीच्या काळातच उदरनिर्वाहाचे संकट ओढविल्याने, सफाई कामगार संघटनेच्या वतीनं या सर्वांना पुन्हा कामावर घेण्याच्या मागणीसाठी आज पासून वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न साखळी उपोषण सुरू केले आहे.
बाईट:राहुल ढोके,कंत्राटी कामगार,वाशिम.
5
Report
KJKunal Jamdade
FollowAug 11, 2025 09:34:41Shirdi, Maharashtra:
Anc - राहाता शहरातील शिवाजी चौकात आज ठाकरे गटाच्या वतीने सरकारविरोधात जोरदार जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी सहभाग घेतला.सरकारमधील भ्रष्ट आणि कलंकित मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली..."भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घ्या , सरकार हाय हाय अशा घोषणा यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिल्या...
V/O - राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून सतत भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार होत आहेत, तरीही कलंकित मंत्र्यांना वाचवले जात आहे. जनतेच्या पैशांचा गैरवापर होत असून शेतकरी, बेरोजगार, आणि सामान्य नागरिकांच्या अडचणींकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष होत असुन जोपर्यंत भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घेतले जात नाहीत, तोपर्यंत अशा प्रकारची आंदोलने राज्यभर सुरू राहतील असा इशारा यावेळी देण्यात आला..
बाईट - गणेश सोमवंशी ( भगवा शर्ट )
बाईट - अमोल गायके ( दाढी व पांढरा शर्ट )
बाईट - सोमनाथ गोरे
4
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 11, 2025 09:31:28Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - निवडणूक आयोग विरोधातील आंदोलन म्हणजे राहुल गांधी आणि विरोधी पक्षांची नौटंकी - प्रवीण दरेकर.
अँकर - राहुल गांधी आणि विरोधी पक्ष नौटंकी करत आहेत ,अशी टीका भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे. निवडणूक आयोगा च्या विरोधात राहुल गांधींकडून आणि विरोधी पक्षांकडून करण्यात येत असलेल्या आंदोलनावरून दरेकर यांनी हे टीका केलेली आहे, तसेच जनतेचा जनाधार मिळत नाही,त्यामुळे निवडणूक आयोगाबद्दल संभ्रम निर्माण करून येणाऱ्या निवडणुकीत काही हाताला लागतय,का याचा गेम प्लॅन राहुल गांधींकडून करण्यात येत असल्याचा आरोप देखील आमदार दरेकर यांनी केला आहे,तसेच एखाद्या झोपलेल्या माणसाला उठवता येतं पण झोपेच सोंग घेतलेल्या माणसाला कसं उठवायचं,असा टोला देखील दरेकरांनी लगावला आहे.ते सांगलीच्या इस्लामपूर येथे बोलत होते.
बाईट - प्रवीण दरेकर - आमदार,भाजपा.
3
Report
SNSWATI NAIK
FollowAug 11, 2025 09:20:52Navi Mumbai, Maharashtra:
story slug - भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी करत शिवसेना ठाकरे गटाचे जनआक्रोश आंदोलन.
FTP slug - nm shivsena aandolan
byet- m k madhavi
shots-
reporter - swati naik
navi mumbai
Anchor -: राज्यातील महायुती सरकार विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून राज्यभर आंदोलनाची हाक दिलेय. महायुती सरकारमधील भ्रष्ट आणि कलंकित मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना ठाकरे गटातर्फे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. काही मंत्र्यांच्या कार्यप्रणाली विरोधात सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून अश्या मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी यावेळी करण्यात आलेय.
Byte -: एम के मढवी (संपर्कप्रमुख नवी मुंबई)
11
Report
HPHARSHAD PATIL
FollowAug 11, 2025 09:20:42Palghar, Maharashtra:
पालघर - मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून पडून वेळेत उपचार न मिळाल्याने एका महिलेचा उपचारांअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . छाया पुरव असं या मृत महिलेच नाव असून त्या मुंबईच्या माहीम कोळीवाडा येथे वास्तव्यास होत्या . मूळच्या सफाळे येथील रहिवासी असलेल्या छाया आपल्या कुटुंबासोबत शनिवारी गावी आल्या होत्या . याच वेळेस सफाळे परिसरात त्यांच्या अंगावर झाड पडून त्या गंभीर जखमी झाल्या . पालघर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचारानंतर छाया गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत रेफर करण्यात आलं . मात्र पालघरहून मुंबईकडे निघालेली रुग्णवाहिका विरार ते घोडबंदर यादरम्यान तब्बल चार तास वाहतूक कोंडीत अडकून पडली . चार तासानंतर जखमी छाया पुरव यांना मिरा रोड येथील ऑर्बिट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं . मात्र रुग्णवाहिकेतच त्यांचा मृत्यू झाल्याच ऑर्बिट रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आलं . या धक्कादायक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रोजच्या होणाऱ्या वाहतूक कोंडी विरोधात नागरिकांकडून संताप देखील व्यक्त करण्यात येतोय . मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग खड्डे मुक्त आणि वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी मागील वर्षी महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या अच्छाड ते मुंबईच्या सीमेवरील दहिसर पर्यंत 620 कोटी रुपयांचा निधी खर्च करून व्हाईट टॅपिंगचं काम पूर्ण करण्यात आलं . मात्र हे काम निकृष्ट दर्जाच झाल असल्याने या महामार्गावर अवघ्या दोन महिन्यातच खड्ड्यांच साम्राज्य पाहायला मिळतंय . त्यामुळे या महामार्गावर रोजच वाहतूक कोंडी होत असून यामुळे वाहन चालक आणि प्रवासी त्रस्त झाले आहेत . त्यातच वाहतूक कोंडीमुळे छाया पुरव यांचा मृत्यू झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि व्हाईट टायपिंग काम करणाऱ्या ठेकेदारा विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आता स्थानिकांकडून होऊ लागली आहे.
7
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 11, 2025 09:20:26Dhule, Maharashtra:
ANCHOR - नंदुरबार जिल्ह्यातही शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील कलंकीत मंत्र्यांची तातडीने हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नंदुरबारमध्ये आंदोलन करण्यात आले आहे. शहरातील दिन दयाळ चौकात शिवसैनिकांनी बॅनरबाजी करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. महाराष्ट्रातील वाचळवीर आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांचा सुळसुळाट झाला असतांना लाचार मुख्यमंत्र्यांना त्यांच्यावर कारवाईचा निर्णय घेता येत नसल्याचा आरोप शिवसेना उबाठा गटाने या कलंकीत मंत्र्याच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
BYTE - अरुण चौधरी, आंदोलक
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
6
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 11, 2025 09:18:38Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्हा शिवसेना ( UBT ) तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्रातील वादग्रस्त मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी "जन आक्रोश आंदोलन" आयोजित करण्यात आले आहे..या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून शासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आलीय..नेमक कशा प्रकारे हे आंदोलन आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जयेश जगड यांनी..
10
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 11, 2025 09:16:46Bhandara, Maharashtra:
शिवसेनेच्या वतीने जन आंदोलन
Anchor :- महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झाली पाहिजे यासाठी महाराष्ट्रात आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने जन आंदोलन करण्यात आला आला आहे. आज भंडारा येथे सुद्धा शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे. भ्रष्टाचारी सरकार मध्ये भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करावी अशी मागणी या वेळी करण्यात आली आहे.
11
Report
SNSWATI NAIK
FollowAug 11, 2025 09:16:40Navi Mumbai, Maharashtra:
story slug - नेरुळ मद्ये खाजगी रुग्णालयात आग ,जीवितहानी नाही
नेरुळ मे अस्पतील मे आग
ftp slug - nm hospital fire
shots-
reporter - swati naik
navi mumbai
Anchor - नवी मुंबई नेरुळ सेकटर 6 मधील शुश्रूषा रुग्णालयात शॉर्ट सर्कीट मुळे आग लागली , यावेळी रुग्णालयात 21 रुग्ण दाखल होते , आग लागल्याचे कळताच अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल होऊन सर्व रुग्णांना तात्काळ बाहेर काढण्यात आले , रुग्णालयातील बेसमेंट कम्प्युटर ला शॉर्ट सर्कीत मुळे आग लागल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे, याबाबत अधिक तपास सुरू असून आग नियंत्रणात आली आहे ।
बाईट- अग्नीशमन दल अधिकारी
7
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 11, 2025 09:07:39Washim, Maharashtra:
वाशीम:
File:1108ZT_WSM_INDEPENDENCE_DAY_INVITATION
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशीम जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायत ढोरखेडा येथील महिला सरपंच सुनीता दत्तात्रय मिटकरी यांना यंदाच्या १५ ऑगस्टला दिल्लीतील लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन सोहळ्यास त्याच्या पतीसह उपस्थित राहण्यासाठी ग्रामविकास व पंचायतराज विभागाकडून विशेष आमंत्रण मिळाले आहे.राज्यातील केवळ १७ जिल्ह्यांतील निवडक सरपंचांना हा सन्मान मिळाला असून,वाशीम जिल्ह्यातून एकमेव ढोरखेडाची निवड झाली आहे.गेल्या १० वर्षांत सुनीता मिटकरी यांनी गावात गोदरीमुक्ती, स्वच्छता मोहीम, सौर दिवे, सिमेंट रस्ते, पाणीपुरवठा, शुद्ध पिण्याचे पाणी, जलशुद्धीकरण प्रकल्प, सार्वजनिक शौचालय, पिठ गिरणी, तंटामुक्ती, बोलकी शाळा व अंगणवाडी, व्यायामशाळा, तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी घंटा गाडी अशा योजना राबवल्या आहेत.महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी उमेद व महाराष्ट्र ग्रामीण जीवनोत्ती अभियानांतर्गत लघुउद्योग सुरू करून त्यांनी रोजगार निर्मिती केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे ढोरखेडा ग्रामपंचायतीला अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.
7
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 11, 2025 09:07:03Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME -SAT_UBT_AGITATION
सातारा - महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आज साताऱ्यातील पोवई नाका येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. सत्तेसाठी सुरू असलेले गलिच्छ राजकारण महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करत आहे. यासाठी यापुढील काळात महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवण्यासाठी भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करावी या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.ही कारवाई न केल्यास भविष्यात मोठे जनआंदोलन उभारले जाईल. याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन जनतेला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाईट- नितीन बानुगडे पाटील संपर्क प्रमुख
12
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 11, 2025 09:05:05Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1108ZT_WSM_UBT_ANDOLAN
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज राज्यभर निदर्शनं केले जातं असून वाशिम मध्येही अकोला–हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आलं.भ्रष्ट आणि बेजबाबदार मंत्र्यांना हटवा,विधानसभा निवडणुकीत झालेली मतांची चोरी आणि शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन तात्काळ पूर्ण करावं या मागण्यांसाठी आज या आंदोलनात पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
बाईट : सिद्धार्थ देवळे,ठाकरे गट
11
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 11, 2025 09:00:44Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1108ZT_JALNA_UBT_ANDOLAN(5 FILES)
जालना :" कलंकीत मंत्र्यांचे राजीनामे घ्या",शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं धरणे आंदोलन
अँकर : कलंकीत मंत्र्यांचे राजीनामे घ्या या मागणीसाठी जालन्यात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं.जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.मंत्री संजय सिरसाट, माणिकराव कोकाटे,योगेश कदम,भरत गोगावले,गिरीष महाजन यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी केली.
बाईट : भास्कर अंबेकर,जिल्हाप्रमुख, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, जालना
10
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 11, 2025 08:45:56Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
PKG
sng_bjp_on_congress
स्लग - भाजपाकडून काँग्रेसला धक्क्यावर धक्के बाजारांचे कट्टर समर्थक आणि काँग्रेस नगरसेवक भाजपात..
अँकर - भाजपाकडून सांगलीच्या काँग्रेसला धक्कया मागून धक्के देण्यात येत आहेत. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटलांच्या भाजप पक्षप्रवेशानंतर आता भाजपामध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांच्या प्रवेशाचा धडाका सुरू झाला आहे.काँग्रेसचे आणि खासदार विशाल पाटील यांची कट्टर समर्थक नगरसेवक, भाजपात दाखल होत आहेत.
व्ही वो - भाजपाकडून सांगली जिल्ह्यात सध्या मिशन काँग्रेस सुरू आहे.आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाकडून सांगली जिल्ह्यात पक्षप्रवेशाचा धडाका लावला आहे.विशेषतः सांगली महापालिका क्षेत्र भाजपाने टार्गेट केलंय.
बाईट - नीता केळकर - नेत्या, भाजपा, सांगली.
व्ही वो - काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्या आणि स्वर्गीय माजी मंत्री मदन भाऊ पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटलांचा भाजपा प्रवेश झाला आहे.आता या पाठोपाठ भाजपाने काँग्रेसच्या नगरसेवकांना आणि खासदार विशाल पाटलांच्या कट्टर समर्थकांना भाजपात आणले आहे.यामध्ये काँग्रेसच्या माजी महापौर कांचन कांबळे,नगरसेविका शुभांगी साळुंखे आणि खासदार विशाल पाटलांचे कट्टर समर्थक काँग्रेस नगरसेवक मनोज सरगर यांचा पक्षप्रवेश भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज सांगली पार पडतोय.
बाईट - मनोज सरगर - भाजपात प्रवेश करणारे काँग्रेस नगरसेवक - सांगली.
व्ही वो - सांगली शहर हे कॉग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा.मात्र गेल्या काही वर्षात भाजपाने काँग्रेसला खिंडार पाडलं,त्यानंतर जयश्रीताई पाटील यांच्या माध्यमातून काँग्रेसचा गड भाजपाने उध्वस्त केला आहे.आता आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेत काँग्रेसचे नगरसेवक आणि खासदार विशाल पाटील यांच्या कट्टर समर्थक भाजपात दाखल होत आहेत.
बाईट - शिवाजी मोहिते- जेष्ठ पत्रकार - सांगली.
व्ही वो - जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील या दोघांनाही भाजपाने पक्षात घेण्याबाबत प्रयत्न केले,मात्र हे दोन्ही नेते गळाला लागत नसल्याने भाजपाने दोन्ही नेत्यांच्या समर्थक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना पक्षात घेण्याचा सपाट लावला आहे.त्यामुळे आता जिल्ह्यातले काँग्रेस खिळखिळी होत असून भाजपच्या मिशन काँग्रेसला जिल्ह्यातले आणि राज्यातले नेते आता कसं थांबवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय..
12
Report