Back
वाशिममध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे जोरदार रास्तारोको आंदोलन!
GMGANESH MOHALE
Aug 11, 2025 09:05:05
Washim, Maharashtra
वाशिम:
File:1108ZT_WSM_UBT_ANDOLAN
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज राज्यभर निदर्शनं केले जातं असून वाशिम मध्येही अकोला–हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आलं.भ्रष्ट आणि बेजबाबदार मंत्र्यांना हटवा,विधानसभा निवडणुकीत झालेली मतांची चोरी आणि शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन तात्काळ पूर्ण करावं या मागण्यांसाठी आज या आंदोलनात पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
बाईट : सिद्धार्थ देवळे,ठाकरे गट
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowAug 11, 2025 11:35:56Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1108ZT_PURNDRSASWD
FILE 4
सासवड नगर परिषदेत मध्ये मुख्याधिकाऱ्यांना माजी आमदार संजय जगताप यांनी घातला घेराव .
Anchor:देशात पहिला नंबर आलेली पुणे जिल्ह्यातील सासवड नगर परिषद सध्या निधी विना अनेक समस्यांना तोंड देते आहे. त्यामुळे भाजपचे नेते माजी आमदार संजय जगताप यांनी मुख्याधिकारी यांना घेराव घालत जाब विचारला. यावेळी सासवडमधील प्रश्नांचा पाढा संजय जगताप यांनी वाचला. पाठवलेल्या प्रस्तावावर निधी मंजूर झाला नाही तसेच यावेळी कोणताही प्रकारचा निधी आला नसल्याचं मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांनी संजय जगताप यांना सांगितलं. यानंतर तुम्ही पत्र व्यवहार करा आम्ही आमच्या पद्धतीने निधी आणण्याचा प्रयत्न करतो जर 19 तारखेपर्यंत निधी आला नाही तर गाव बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा संजय जगताप यांनी दिलेला आहे. अनेकदा पत्रव्यवहार करून देखील प्रश्न सुटत नसल्याचा संजय जगताप यांचा म्हणून आहे आक्रमक होत आज सासवड नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे.
0
Report
JMJAVED MULANI
FollowAug 11, 2025 11:35:13Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 1108ZT_PURNDRBILGDING
FILE 5
जेजुरीत पाच मजली इमारत झुकली – परिसरात तात्काळ खबरदारी.
भरवस्तीतील सकाळी ही पाच मजली इमारत पाडण्यात आली.
सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही.
Anchor: जेजुरी शहरातील खोमणे आळीतील बांधकामाधीन इमारत सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास धोकादायकरीत्या झुकली होती . जेजुरी नगरपरिषदने अग्निशमन दल व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली.पोलिसांची तातडीची घटनास्थळी घाव घेवून रहिवाशांचे सुरक्षित स्थलांतर केले. सुरक्षा बरिकेट लावून रहदारी थांबविण्यात आली.
जेजुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी खोमणे आळी परिसरात रविवारी बांधकाम सुरू असलेली पाच मजली इमारत अचानक एका बाजूला धोकादायकरीत्या झुकल्याने परिसरात खळबळ उडाली. वेळीच घेतलेल्या उपाययोजनांमुळे संभाव्य अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि जेजुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी व नगर परिषदेचे आधिकरी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन इमारतीभोवतालचा परिसर तात्काळ बंद करण्यात आला तसेच शेजारील रहिवाशांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले.
पुणे महानगर पालिकेचे कटर्स दाखल झाल्यानंतर इमारत पाडण्याचे काम सुरू झाले आणि क्षणार्धात पाच मजली इमारत खाली कोसळली.
प्राथमिक माहितीनुसार, इमारत झुकण्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी तांत्रिक पथक कार्यरत असून, नेमके कारण तपास अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
वाढत्या शहरांमध्ये बांधकामादरम्यान सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे. जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे व कर्मचारी वर्गाने इमारत झुकल्या पासून ते इमारत पाडून मलबा हटविण्या पर्यंत चोख बंदोबस्त दिला.
0
Report
JMJAVED MULANI
FollowAug 11, 2025 11:33:17Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1108ZT_INDAPURRASTAROKO
BYTE 1
तासभराहून अधिक काळ पुणे सोलापूर महामार्ग धरला रोखून* ....इंदापुरात हिंगणगाव येथे आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत रास्ता रोको....इंदापुरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील अतिक्रमण संदर्भात रास्ता रोको.... जोपर्यंत मालोजीराजे भोसले यांचे समाधीस्थळ सापडत नाही तोपर्यंत गढीच्या सुशोभीकरणाचे काम थांबवले....
Anchor छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांची इंदापूर शहरातील गढी आणि समाधीस्थळावरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे सुमारे एक तासाहून अधिक काळ रोखून धरण्यात आला यामुळे कित्येक किलोमीटर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या.
वीरश्री मालोजीराजे भोसले यांना इंदापूर मध्ये वीरमरण आलं आहे त्यांची गढी इंदापूर या ठिकाणी असून इंदापुरातच समाधीस्थळ देखील आहे. यावर झालेलं अतिक्रमण हटवण्यात यावं आणि समाधीस्थळ शोधून काढावे या मागणीसाठी हा रास्ता रोको करण्यात आला होता.
सध्या मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या सुशोभीकरणाचे काम राज्य सरकारकडून सुरू असून जोपर्यंत मालोजीराजेंचं समाधीस्थळ स्थापना सापडत नाही, तोपर्यंत चालू असणारं सुशोभीकरणाचे काम थांबवण्याची मागणी आमदार महेश लांडगे यांसह शेकडो शिवभक्तांनी लावून धरली,अखेर प्रशासनाने नमत घेत चालू असणारं काम थांबवण्याचे आदेश दिल्याची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे......
*बाईट— आमदार महेश लांडगे*
0
Report
PNPratap Naik1
FollowAug 11, 2025 11:19:40Kolhapur, Maharashtra:
Story :- Kop Farmer reaction
Feed :- Live U
Anc :- ट्रॅक्टरसाठी जीपीएस ब्लॅक बॉक्ससारखी उपकरणे सक्तीने बसवण्यासाठी केंद्र सरकारची अधिसूचना काढली आहे.. या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. कोल्हापूरचे शेतकरी नव्या अधिसूचने संदर्भात नेमकं काय म्हणतात ते पाहूया.
Play Byte
1) बाळा साहेब आलवेकर, शेतकरी
2) पांडुरंग बिरंजे,शेतकरी
3) विद्यानंद जामदार,शेतकरी
4) विठ्ठलराव माळी, शेतकरी
7
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 11, 2025 11:19:34Nashik, Maharashtra:
Nsk_cbipkg
Feed by live u 51
don't use PTC from nsk_cbipkg feed
Anchor पर्यटकांची नगरी म्हणून ओळख असलेली इगतपुरी आता हळूहळू गुन्हेगारांच आश्रयस्थान बनू लागलये. नुकत्याच पडलेल्या केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या छाप्यामुळे पर्यटकांची इगतपुरी की गुन्हेगारांची बजबजपुरी झाली काय असा प्रश्न यामुळे निर्माण झालाये
Vo 1 नाशिक जिल्ह्यात इगतपुरी शहरापासून आठ ते दहा किलोमीटर निर्जन असलेल्या बलाईदु री गावाजवळ असलेले हे निसर्गरम्य रेन फॉरेस्ट रिसॉर्ट.... काही एकर परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्तात असलेल्या या रिसॉर्टमध्ये सीबीआयने छापा टाकत सायबर फ्रॉड करणाऱ्या सहा जणांना रविवारी पकडले.. या रिसॉर्ट मधील रूम बुक करून लोकांना विविध आमिष दाखवून फसवण्यासाठी कॉल सेंटर उभारण्यात आले होते.. मुंबईत राहणारे हे सर्व जण लक्झरी गाड्या घेऊन रिसॉर्टवर आले ते अँग्री बिझिनेस सबंधित अधिकारी म्हणून ..या महाभागांनी एकूण साठ जणांची नियुक्ती करत फसवणुकीचे आंतरराष्ट्रीय जाळे उभारले...सीबीआय अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून कोट्यावधी रुपये रोख दागिने सोने आणि काही लॅपटॉप जप्त केलेत... ज्यामध्ये देश परदेशातील अनेकांना गंडवल्याचं समोर येत आहे...
Midptc हे सर्व घडले असले तरी स्थानिक पोलिसांना मात्र कानोकान खबर नव्हती..त्यांना सीबीआय ने माहितीही दिली नाही त्यामुळे केंद्रीय यंत्रणांसमोर स्थानिक पोलिसांच्या बाबतीतील विश्वासार्हता गमावली असल्याचं दिसून येतेय.( nsk_cbiptc)
Vo 2 या सर्व प्रकरणामुळे रेन फॉरेस प्रशासन अडचणीत आले आहे त्यांना मुंबईत चौकशीकामी आज पाचारण करण्यात आले.... यापूर्वीही याच बाबत अनेक तक्रारी पर्यटकांनी केलेले आहेत हॉटेल बाबत बेकायदेशीर कामांच्या बाबतीत तक्रारी पर्यटकांनी केले आहेत तर शहरातील काही रिसॉर्टमध्ये रेव पार्टी आणि जुगाराच्या खेळणाऱ्या काही तरुणांना पकडण्यात आले होते.
इगतपुरी घडलेल्या आक्षेपार्ह घटना
1 ) लैला खान हत्या प्रकरण
2) हिना पांचाळ सह अनेक अभिनेत्रींची रेव पार्टी प्रकरण
3) आंतरराष्ट्रीय जुगार अड्डा उध्वस्त
4) ब्ल्यू फिल्म शूटिंग प्रकरण
इगतपुरी मध्ये अनेक मालमत्ता या मुंबई गुजरातच्या व्यावसायिकांच्या आहेत या मालमत्ता रिसॉर्ट चालवणारे व्यवस्थापन वेगळेच आहे त्यामुळे कारवाई कुणावर करायची असा प्रश्न नेहमी पोलिसांसमोर असतो.आता या वाढणाऱ्या सर्व घटनांमुळे प्रशासन सर्व विभागांशी समन्वय करून रिसॉर्ट चालकांची बैठक घेणारे
Byte अभिजित पारवकर तहसीलदार इगतपुरी
Vo 3 राज्यात लोकप्रिय होणाऱ्या पर्यटन नगरीला गालबोट लावण्याचे काम पैसा कमावण्याच्या नादामध्ये काही व्यावसायिक करत आहेत. त्यामुळे पर्यटनाच्या या नगरीला आता पोलिसांच्या कठोर नियमानसह स्व नियंत्रणाची गरज आहे (nsk_cbiptc)
6
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 11, 2025 11:17:59Khed, Maharashtra:
Feed 2C
Slug: Khed Devkund Waterfall Accident
File:01
Rep: Hemant Chapude(Khed)
ब्रेकींग न्युज
भिमाशंकर पुणे...
भीमाशंकर जवळील भिवेगाव देवकुंड धबधब्यात दुर्दैवी घटना....फिरायला गेलेले डॉक्टर सुबोध करंडे धबधब्याच्या खोल पाण्यात बुडाले.... त्यांना वाचविण्यासाठी गेलेले स्थानिक तरुण दिलीप वनघरे हि धबधब्याच्या खोल पाण्यात बुडाले.... स्थानिक नागरिकांच्या मदतीने देवकुंड धबधब्याच्या परिसरात रेस्क्यू ऑपरेशन सुरू...
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया भिमाशंकर पुणे..
5
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 11, 2025 11:16:47Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - येणारया काळात दूध उत्पादन क्षेत्रात शेतकऱ्यांनी इन्व्हेस्टमेंट करणे गरजेचे - रविंद्र चव्हाण.
अँकर - सांगलीच्या इस्लामपूर येथील वाघवाडी येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला.भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सदाभाऊ खोत,आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी दूध उत्पादनामध्ये येणाऱ्या काळामध्ये शेतकरयांनी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं असून नुसतं दूधच महत्त्वाचं नाही,तर दुधापासून बनणारे वेगवेगळे प्रॉडक्ट,हे आता जगामध्ये मोठ्या संख्येने मार्केट मध्ये मागणी असल्याचं मत रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
2
Report
ABATISH BHOIR
FollowAug 11, 2025 11:02:49Kalyan, Maharashtra:
महापारेषणच्या पडघे- मोहने वीज वाहिनीत बिघाड..
उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ कल्याण सुमारे 90 हजार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा आठ तास खंडित
Anchor :- महावितरण ने आज पुन्हा नांगी टाकल्याचे पाहायला मिळालं . महापारेषणच्या पडघे–मोहने वीज वाहिनीत अचानक बिघाड झाल्यामुळे कल्याणसह उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ परिसरातील वीज ग्राहकांना याचा फटका बसला .
या परिसरातील सुमारे 90 हजार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.बिघाडानंतर महापारेषणच्या पथकांकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू असून, दुपारी तीन वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.मात्र सकाli साडे दहा वाजण्याच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत होण्यास दुपारी 3 ते चार वाजेपर्यंत चा कालावधी लागणार असल्याने कामे रखडल्याने वीज ग्राहकांनी मात्र संताप व्यक्त केला.
byte... चंद्रमणी मिश्रा
मुख्य अभियंता महावितरण
5
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 11, 2025 11:02:27Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Khed Kundeswar Accident
File:05
Rep: Hemant Chapude(Khed)
Anc: पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कुंडेश्वर दर्शनाला जात असताना भीषण अपघात झाला असून या भीषण अपघातात भाविकांनी भरलेले पिकप गाडी थेट 100 फूट खोल दरीत कोसळल्याने यात 7 जणांचा मृत्यू झालाय तर 23 जणांची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक आहे. श्रावण महिन्यातील तिसय्रा श्रावणी सोमवार निमित्त कुंडेश्वर दर्शनाला जात असताना नागमोडी वळणावरती भाविकांनी भरलेली पिकप गाडी पाठीमागे येऊन 100 फूट खोल दरीत कोसळल्याने हा अपघात घडला, सर्व जखमीवरती खेड तालुक्यातील चांडोली ग्रामीण रुग्णालय चाकण ग्रामीण रुग्णालयासह विविध खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत
हे सर्व भाविक खेड तालुक्यातील पाईट आणि पापळवाडी परिसरातील असून या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरलीय...
Byte: भगवान पोखरकर (स्थानिक)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे...
8
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 11, 2025 11:02:04Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे सांगली भाजपाच्या वतीने जंगी स्वागत व सत्कार...
अँकर - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सांगली जिल्हा भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्या नंतर पहिल्यांदा सांगली जिल्ह्यामध्ये रवींद्र चव्हाण येत असल्याने, भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पेठ नाका येथे सांगली जिल्हा भाजपाच्यावतीने क्रेनच्या माध्यमातून पुष्पहार अर्पण करत जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा नेते देखील उपस्थित होते.
4
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 11, 2025 11:01:55Ratnagiri, Maharashtra:
ब्रेकिंग....
गुहागर मध्ये बेकरी मधील पेढे खाऊन दहा महिलांना विषबाधा.
गुहागर मधील शृंगारतळी बाजारपेठे मधील धक्कादायक घटना. महिलांची प्रकृती खालावल्यामुळे खाजगी रुग्णालयात केले दाखल.
विषबाधा झालेल्या महिलांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू.सर्व महिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती.
श्रावण सोमवार असल्यामुळे एकाच कंपनीत कामाला असलेल्या महिलांनी बेकरी मध्ये पेढे खरेदी करून एकत्रितपणे खाल्ल्यामुळे सर्वच महिलांना विषबाधा.
अय्यंगार बेकरी मधील पेढे घेतल्याची बाधित महिलांची माहिती
5
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 11, 2025 10:52:26Nashik, Maharashtra:
feed send by mozo
reporter-sagar gaikwad
slug-nsk_shinde_meting
*नाशिक ब्रेकिंग*
- *शिंदेच्या शिवसेनेची आज उत्तर महाराष्ट्र विभागीय आढावा बैठकीचे आयोजन*
- मंत्री उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात
- बैठकीत जिल्हा निहाय आढावा घेतला जाणार
- *आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक संदर्भात होणार चर्चा*
- उत्तर महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधी आणि आजी माजी प्रतिनिधी बैठीकला उपस्थित
- अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक विभागातील प्रमुख प्रतिनिधी उपस्थित
6
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 11, 2025 10:51:35Khed, Maharashtra:
Feed 2C
Slug: Khed Kundeswar Accident
File:05
Rep: Hemant Chapude(Khed)
Anc: पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कुंडेश्वर दर्शनाला जात असताना भीषण अपघात झाला असून या भीषण अपघातात भाविकांनी भरलेले पिकप गाडी थेट 100 फूट खोल दरीत कोसळल्याने यात 4 जणांचा मृत्यू झालाय तर 35 जणांची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक आहे. श्रावण महिन्यातील तिसय्रा श्रावणी सोमवार निमित्त कुंडेश्वर दर्शनाला जात असताना नागमोडी वळणावरती भाविकांनी भरलेली पिकप गाडी पाठीमागे येऊन 100 फूट खोल दरीत कोसळल्याने हा अपघात घडला, सर्व जखमीवरती खेड तालुक्यातील चांडोली ग्रामीण रुग्णालय चाकण ग्रामीण रुग्णालयासह विविध खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत
हे सर्व भाविक खेड तालुक्यातील पाईट आणि पापळवाडी परिसरातील असून या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरलीय...
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे...
6
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 11, 2025 10:48:42Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1108ZT_CHP_JANSURAKSHA
( single file sent on 2C)
टायटल:-- महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम-2024 तात्काळ मागे घ्या, चंद्रपूर जिल्ह्यात विविध पक्ष- संघटनांचा एकमुखी विरोध
अँकर:---- चंद्रपूर जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष व जनसंघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम-2024 विरोधात जोरदार आवाज उठविला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आंदोलनकर्त्यांनी हा कायदा अनावश्यक, बेकायदेशीर व संवैधानिक मूल्यांची पायमल्ली करणारा असल्याचा आरोप केला. भारतीय संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य व मूलभूत अधिकारांवर गदा आणणाऱ्या या अधिनियमाला महाराष्ट्र विधानमंडळात मंजुरी देणे म्हणजे संवैधानिक संकेतांचे उल्लंघन असल्याचे सांगत, हा अधिनियम तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
बाईट १) रविंद्र उमाटे,आंदोलक
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
11
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 11, 2025 10:35:05Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1108ZT_CHP_MACHINE
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूरच्या ऐतिहासिक रामाळा तलावाच्या यांत्रिक पद्धतीने वनस्पती व कचरा काढण्यासाठी विशेष यंत्र कार्यान्वित, ऐतिहासिक रामाळा तलावाचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठीच महत्त्वाचा प्रयत्न
अँकर:-- चंद्रपूरच्या मध्यभागी असलेला व गोंड राजांनी केवळ दगडांनी बांधलेला रामाळा तलाव म्हणजे म्हणजे पुरातन पाणी व्यवस्थापन तंत्राचा उत्तम नमुना आहे. चंद्रपूर शहरातील पाच तलावांपैकी आता केवळ रामाळा तलावाचे अस्तित्व शिल्लक आहे. एकीकडे या तलावात सांडपाणी येऊ नये यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विशेष संयंत्र बसविले जात आहे तर दुसरीकडे तलावातील इकोर्निया समस्या कायमची निकाली काढण्यासाठी आता इकोर्निया तोडणी -संकलन व कचरा वेचण्यासाठी विशेष यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. सुमारे दोन कोटी रुपयाचे हे यंत्र याच तलावात राहणार असून तलावाची सातत्याने स्वच्छता केली जाणार आहे. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने हे यंत्र रामायण तलावात आज कार्यान्वित करण्यात आले. शहरातील गोंडकालीन विविध वास्तु- तलाव -मंदिर यांचे जतन- संवर्धन करणे व त्यासोबतच पर्यावरण अनुकूल दृष्टिकोन राखणे यासाठी या पद्धतीने कार्य केले जात आहे.
बाईट १) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
7
Report