Back
कल्याणमध्ये वाहतूक कोंडी: वाहन चालकांचा बेशिस्तपणा आणि पोलिसांचे शून्य नियोजन!
ABATISH BHOIR
Aug 26, 2025 06:33:47
Kalyan, Maharashtra
कल्याण मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी.
बेशिस्त वाहन चालक आणि ट्राफिक पोलिसांचा शून्य नियोजन..
वाहनांच्या लांबच लांब रांगा.
Anc..कल्याणच्या सगळे मुख्य रस्त्यांमध्ये वाहतूक कोंडी झाल्याने वाहन चालकांबरोबर नागरिकांना होत आहे मनस्ताप बेशिस्त वाहन चालक आणि ट्राफिक पोलिसांचे शून्य नियोजन त्याचप्रमाणे उद्या गणरायाचे आगमन होणार असल्याने खरेदीसाठी निघालेले गणेश भक्त व कामाला जाणाऱ्या नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
Wkt.. आतिश भोईर
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 26, 2025 10:47:16Khed, Maharashtra:
Feed 2C
Slug: Khed Layan Club
File:01
Rep: Hemant Chapude(Khed)
राजगुरूनगर /पुणे
Anc...
पुण्याच्या खेड तालुक्यातील लायन्स क्लब ऑफ राजगुरूनगर यांच्या वतीने शाडू मातीपासून पर्यावरण पूरक गणपती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यामध्ये चिमुकल्यामी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत अतिशय उत्साहात गणपती मूर्तीच प्रशिक्षण घेतले
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे...
0
Report
AKAMAR KANE
FollowAug 26, 2025 10:32:44kolhapur, Maharashtra:
2c ला shots आणि बाईट जोडले आहे
------
नागपूर
नागपुरात कंत्राटदारांचे भीक मांगो आंदोलन केलेय.. कंत्राटदारांचे देयके वर्षभरापासून प्रलंबित असल्याने व शासन काही निर्णय घेत नसल्यामुळे
संविधान चौकात कंत्राटदारांचे भीक मांगो आंदोलन.. काळ्या टीशर्ट घालून नोंदवला निषेध..
विदर्भातील शेकडो कंत्राटदार यांनी एकत्र येत केले आंदोलन
शासनाने काम करून पैसे न दिल्यानं रस्त्याच्या कडेला उभे राहत केले भीक मांगो आंदोलन
-------------------
बाईट --- आंदोलक कंत्रटदार
0
Report
UPUmesh Parab
FollowAug 26, 2025 10:20:45Oros, Maharashtra:
अँकर ---- तळकोकणात गणेशोत्सवाच्या आनंदावर पावसाने विरजन टाकलेय. गणेशाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक असतानाच पावसाने दमदार हजेरी लावलीय. गणेश चतुर्थीच्या आदल्यादिवशी गणेश भक्त मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. बाप्पाच्या पूजेसाठी व नैवेद्यासाठी लागणारे बहुतांश साहित्य व पदार्थ गणेश चतुर्थीच्या पूर्व संध्येला खरेदी केले जाते. त्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांची गर्दी देखील पाहायला मिळते. मात्र सकाळपासुन रिमझिम पडणाऱ्या पावसाने दुपार पासून जोर धरलाय. मागील चार दिवस पावसाने उसंत घेतली होती. काही भागात कडक उन देखील पहायला मिळाले होते. मात्र बाप्पाच्या आगमनाच्या पूर्व संध्येला पावसाने हजेरी लावल्याने गणेश भक्तांना खरेदी करताना अडचणी निर्माण होत आहेत. पावसाचा जोर वाढल्याने ग्राहक कमी झाल्याने व्यापाऱ्यांचे देखील नुकसान झालेय. उद्याच्या दिवसात पावसाचे प्रमाण असेच राहिले तर मात्र घरोघरी आगमन होणाऱ्या बाप्पाच्या मूर्तीची ने आण करणे जोखमीचे ठरणार आहे.
4
Report
SNSWATI NAIK
FollowAug 26, 2025 10:17:03Navi Mumbai, Maharashtra:
story slug -
ftp slug -
byet-
shots-
reporter- swati naik
navi mumbai
story Slug -: बिवलकर कुटुंबियांना दिलेल्या जमिनीची आमदार रोहित पवार यांनी केली पाहणी, शिरसाटांचा राजीनामा घ्या अन्यथा भव्य आंदोलनाचा दिला इशारा.
रोहित पवार आंदोलन
FTP slug - nm ulwa rohit pawar aandolan
byet- rohit pawar
shots- swati naik
navi mumbai
Anchor -: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार प्रकरणी चांगलेच आक्रमक झालेत. आज रोहित पवार यांनी भिवलकर कुटुंबीयांना देण्यात आलेल्या भूखंडाची पाहणी केली. तत्कालीन सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी तब्बल 5000 कोटी रुपयांची जमीन बेकायदेशीर रित्या बिवलकर कुटुंबीयांना दिली असून हा निर्णय रद्द करुन मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा अनंत चतुर्थी पर्यंत घेण्याची मागणी करण्यात आलेय. याप्रकरणी बॅग भरून पुरावे मुख्यमंत्र्यांना दिले असून योग्य कारवाई न झाल्यास सिडको विरोधात भव्य मोर्चा काढण्याचा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिलाय.
बाईट -: रोहित पवार (आमदार)
6
Report
ABATISH BHOIR
FollowAug 26, 2025 10:15:16Kalyan, Maharashtra:
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज
अप्पर पोलीस आयुक्तांनी केले विसर्जन स्थळांची पाहणी
Anchor :- गणरायाच्या आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे.उद्या लाडक्या बाप्पाच्या आगमन होणार आहे .त्यानंतर दीड ,पाच,सात ,गौरी गणपती ,सात दिवसांनी त्यानंतर अनंत चतुर्दशीला बाप्पाचे विसर्जन होणार आहे . गणेशाच्या आगमन आणि विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली मध्ये पालिका आणि पोलीस यंत्रणादेखील सज्ज झाली आहे . कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने गणेश भक्तांचे विसर्जनाच्या वेळेस गैरसोय होऊ नये यासाठी कृत्रिम तलाव निर्माण केले आहेत त्याचप्रमाणे गणेश खाट येथे विसर्जनाची तयारी केली आहे . अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी देखील कल्याण डोंबिवली मधील विसर्जन स्थळांचे पाहणी केली डोंबिवली येथील गणेश घाट येथे त्यांनी विसर्जन स्थळाची पाहणी करत काय काय सोयी सुविधा आहेत ? उपाययोजना आहेत ? सुरक्षा यंत्रणा कशी आहे? याबाबत अप्पर पोलिस आयुक्त संजय जाधव यांच्या शी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
Wkt.. आतिश भोईर
डोंबिवली
1
Report
SMSATISH MOHITE
FollowAug 26, 2025 09:47:54Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_DoubleMurder
Feed on - 2C
---------------------------
Anchor - विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या प्रियकरासह विवाहितेची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना नांदेड जिल्ह्यात उघडाकीस आलीये. हत्या करणारे मुलीचे वडील, काका आणि आजोबाना पोलिसांनी अटक केलीये.
Vo - लग्न झाल्यानंतरही प्रेमसंबंध सुरु ठेवणे एका प्रेमीयुगुलाच्या जीवावर बेतले. प्रियकर प्रेयसीला भेटायला आल्यानंतर विवाहितेच्या सासरच्या मंडळींनी दोघांना पडकले. मुलीच्या वडिलांना बोलावण्यात आले. राग अनावर झालेल्या मुलीच्या पित्याने, काकाने आणि आजोबाने दोघांची हत्या करून त्यांचे मृतदेह विहिरीत फेकून दिले.
ग्राफिक्स
एकाच गावातील राहिवाशी असलेल्या संजीवनी आणि लखन चे होते प्रेमसंबंध
एक वर्षापूर्वी संजीवनीचे लग्न लावून दिले
लग्नानंतरही दोघांचे प्रेमासंबंध
मुलीच्या सासरी भेटायला गेलेल्या दोघांना पकडले
मुलीच्या वडिलांना सासरच्या मंडळींनी बोलावून घेतले
राग अनावर झालेल्या मुलीच्या वडील, काका आणि आजोबाने दोघांची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकले
Mid WKT
Vo - उमरी तालुक्यातील बोरजूनी येथील रहिवाशी असलेल्या 19 वर्षीय संजीवनी आणि 17 वर्षीय लखन भंडारे यांचे प्रेमसंबंध होते. गेल्या वर्षी संजीवनीचे लग्न गोळेगाव येथील युवकांशी लावून देण्यात आले. लग्न झाल्यानंतरही संजीवनी आणि लखन चे भेटणे सुरूच होते. सोमवारी दुपारी लखन संजीवनीच्या गावात तिला भेटण्यासाठी गेला. संजीवनीच्या सासरच्या लोकांनी दोघांना एकत्र पकडले. संजीवनीच्या वडिलांना बोलावून घेऊन मुलीला घरून जाण्यास सांगितले. दोघांना घेऊन जाताना त्यांना मारहाण करण्यात आली. या सर्व प्रकारामुळे गावात अपमान झाल्याच्या भावानेतून संजीवनीचे वडील, काका आणि आजोबानी दोघांना मारून त्यांचे हात दोरीने बांधून करकाळा शिवारातील विहिरीत फेकून दिले. आपल्या मुलाचा काही दोष नव्हता, मुलीनेच फोन करून त्याला बोलावून घेतल्याचे मयत मुलाच्या वडिलांनी सांगितले.
Byte - बालाजी भंडारे - मयत मुलाचे वडील
Vo - हत्या केल्यानंतर मुलीचे वडील मारोती सूरने स्वतःहून उमरी पोलीस ठाण्यात गेले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी गेले. रात्री उशिरा दोघांचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले. मुलीचे वडील मारोती सुरने, माधव सुरने आणि आजोबा लक्ष्मण सुरने या तिघांना पोलिसांनी अटक केलीये.
Byte - अर्चना पाटील - अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड
Vo - प्रेमसंबंधातुन घडलेल्या या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात खळबळ उडालीये. यात नेमकी चूक कुणाची? लग्न झाल्यानंतरही प्रेमसंबंध ठेवणाऱ्या प्रेमियुगुलाची? की प्रेमसंबंध माहिती असूनही इच्छेविरुद्ध मुलीचे लग्न लावून देणाऱ्या मुलीच्या कुटुंबाची? हे प्रश्न अनुत्तरित राहणार आहेत.
-------------------------
9
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 26, 2025 09:47:39Beed, Maharashtra:
बीड: लक्ष्मण हाके यांनी नोटीसचे उल्लंघन केले, म्हणून कारवाई झाली... पोलिसांनी वेळीच हस्तपेक्ष केल्याने अनुचित प्रकार घडला नाही... पोलिस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांची माहिती....
Anc- पोस्टरवरून वातावरण पेटल्यानंतर ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके यांनी मी बीडमध्ये येतोय असं आवाहन केलं होतं. त्यानंतर बीड पोलिसांनी तुम्ही गेवराईत येऊ नका यासाठी नोटीस बजावली. मात्र लक्ष्मण हाके यांनी प्रतिबंधात्मक नोटीसचे उल्लंघन करत गेवराई पोहोचले. मात्र पोलिसांनी वेळी हस्तक्षेप केला म्हणून कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. त्यानंतर काल झालेल्या राड्यानंतर लक्ष्मण हाके यांच्यासह तब्बल 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गेवराईचे पोलीस उपाधीक्षक नीरज राजगुरू यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. गेवराई मधलं वातावरण सध्या सुरळीत आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये अन्यथा कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.
बाईट: नीरज राजगुरू, पोलिस उपअधीक्षक गेवराई
7
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 26, 2025 09:47:29Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - गोरक्षकांच्या माध्यमातून राज्यात शेतकरयांना लुटण्याचे काम -मकोक लावण्याची अधिवेशनात मागणी करणार -
आमदार इद्रिस नायकवडी
अँकर - राज्यात शेतकरयांना लुटण्याचे काम गोरक्षकांच्या माध्यमातून सुरू आहे,आणि
महाराष्ट्राचा बिहार होतोय की अशी स्थिती निर्माण झाल्याची,टीका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी करत महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे,आमदार सदाभाऊ खोतांवर गोरक्षकांकडुन झालेल्या हल्ल्या प्रकरणी आमदार इद्रिस नायकवडी यांनी ही टीका केली आहे, पोलिसांच्या सोबत मिली भागात करून गोरक्षकांकडून शेतकऱ्यांना लुटण्यात येत आहे,हा नवा व्यवसाय राज्यात उदयास आला असून बिहार प्रमाणे हा सगळा प्रकार सुरू असून अशा गोरक्षकांना मकोका कायदा लावण्याबाबत येत्या अधिवेशनात कायदा पारित करण्याची मागणी करणार, असल्याचे देखील राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी स्पष्ट करत सदाभाऊ खोतांच्यावरील हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे.
बाईट - इद्रिस नायकवडी - आमदार - राष्ट्रवादी अजित पवार गट.
9
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 26, 2025 09:46:58Dhule, Maharashtra:
ANCHOR - गणपती उत्सवामध्ये पर्यावरण संवर्धनाचे काम महत्वाचे आहे. कारण की यां उत्सवाशी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत आणि पर्यावरण संवर्धनाही महत्त्वाची बाब आहेत. त्या दृष्टिकोनातून नंदुरबार शहरांमध्ये एक गणपती हा सर्वांसाठी आदर्श म्हणावा लागेल. नंदुरबार मध्ये काळ्या शेतमातीपासून तयार गणपती स्थापनेची पारंपरा एक मंडळ जोपासून आहे. कुठलाही ठसा न वापरता काळया मातीने कार्यकर्ते आपल्या हाताने गणपती बाप्पाला आकार देतात आणि त्याची स्थापना करतात. यां मंडळाला 131 वर्षाची परंपरा आजही कायम आहार.
vo - लोकमान्य टिळकांनी 1893 साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्याच परंपरेला पुढे नेत, नंदुरबार शहरात 1894 पासून श्री 'श्रीमंत बाबा गणपती' मंडळाने गणेशोत्सवाला सुरुवात केली. विशेष म्हणजे, या मंडळाची गणपती मूर्ती दरवर्षी हाताने तयार केली जाते. नंदुरबारच्या 'श्रीमंत बाबा गणपती'ची ही मूर्ती कोणत्याही साच्यात बनवलेली नाही, तर शेतातून आणलेल्या काळ्या माती, शाडू माती आणि कापूस यांचा वापर करून ती हाताने साकारली जाते. मंडळाचे सुमारे 200 कार्यकर्ते आपापले दैनंदिन काम संपवून या कामासाठी एकत्र येतात. गणेश चतुर्थीच्या पंधरा दिवस आधी, संकष्ट चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर पाटपूजन करून मूर्ती बनवण्याच्या कामाला सुरुवात होते.
BYTE :- वैभव सोनी. कार्यकर्ता
VO : कार्यकर्ते आपल्या श्रद्धेने आणि मेहनतीने मूर्तीला आकार देतात. तब्बल पंधरा दिवसांच्या अथक परिश्रमानंतर मूर्ती तयार होते. त्यानंतर तिला रंग दिला जातो आणि विविध दागिन्यांनी सजवले जाते. 'श्रीमंत बाबा गणपती'चा हा भक्तिमय परिसर बघण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यासह धुळे, गुजरात आणि मध्य प्रदेशमधूनही हजारो भाविक मोठ्या संख्येने येतात.
BYTE :- पियुष सोनार, कार्यकर्ता.
VO END :महानगर्यंप्रमाणे नंदुरबारचा हा गणपतीही आपल्या अनोख्या आणि जुन्या परंपरेमुळे प्रसिद्ध आहे. येथील उस्तावात नात्यांची वीण आहे, पर्यावरणाचा विचार आहे. आणि संस्कृतीची जोपासनापण आहे.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
5
Report
PNPratap Naik1
FollowAug 26, 2025 09:46:06Kolhapur, Maharashtra:
kop marathi
feed:- live U
Anc - कोल्हापुरातील मराठा समाजाचे कार्यकर्ते हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांच्या विरोधात आक्रमक झालेला आहेत.
कोल्हापुरातील आयटी पार्क शेजारी असणाऱ्या आरक्षित जागेवर मराठा समाजाच्या वतीने मराठा भवन उभारण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दिला होता. मात्र याच जागेवर आमदार अशोकराव माने यांनी आपल्या संस्थेसाठी दावा दाखल केला असून ही जागा आपल्याच संस्थेला मिळावी यासाठी ते राज्य सरकारकडून दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेला आहे. ज्या जागेवर मराठा समाजाने दावा केलेला आहे त्या जागेवर मराठा समाज मराठा भवन असा बोर्ड लावण्यासाठी आक्रमक झालेला आहे. आमदार अशोकराव माने आणि राज्य शासनाच्या विरोधात कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आहे.
Byte - वसंतराव मुळीक (मराठा समाजाचे नेते )
4
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 26, 2025 09:37:00Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2608ZT_CHP_HC_REMARK
( single file sent on 2C)
टायटल:-- 20 वर्षात 120 वन्यजीव मृत्युमुखी पडलेल्या चंद्रपूर- गोंदिया रेल्वेमार्गावर वेग मर्यादेविषयी नागपूर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे, आपली भूमिका न मांडणाऱ्या केंद्र सरकारला कोर्टाने फटकारले
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह-चंद्रपूर-गोंदिया रेल्वे मार्गावरील वनक्षेत्रातील प्राण्यांच्या सुरक्षेची मागणी करणाऱ्या प्रकरणामध्ये उत्तर सादर करण्यास उदासीनता दाखविल्यामुळे केंद्र सरकारला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फटकारले. न्यायालयाने सरकारची कानउघाडणी करताना आम्ही रेल्वेचा वेग कमी करण्याचा आदेश दिल्यास आम्हाला दोष देऊ नका, असे बजावले. यासंदर्भात उदयन पाटील व स्वानंद सोनी या पर्यावरणप्रेमी नागरिकांनी जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने या प्रकरणात केंद्र सरकारला दोन महिन्यापूर्वी नोटीस बजावली. परंतु, त्यांनी अद्याप उत्तर सादर केले नाही. त्यामुळे न्यायालयाने गंभीर भूमिका घेतली. वनक्षेत्रातून धावणाऱ्या रेल्वेंचा वेग कमी करण्यात यावा, वन्यजीवांना रेल्वेलाइनपासून दूर ठेवण्यासाठी जोरात भोंगा वाजविण्यात यावा असे विविध निर्देश आहेत. केंद्र सरकार या निर्देशांचे पालन करीत नाही. त्यामुळे दरवर्षी अनेक वन्यजीवांना रेल्वे अपघातात प्राण गमवावे लागत आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. रेल्वेमुळे वन्यजीवांचा अपघात होऊ नये याकरिता कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, यासंदर्भातील सूचनांसह याचिकेतील इतर मुद्यांवर येत्या दोन आठवड्यात उत्तर सादर करा, असे निर्देश न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला दिले. तसेच, वन्यजीवांच्या सुरक्षेविषयी सरकारने संवेदनशील असायला पाहिजे, असे मत व्यक्त केले. बल्लारशाह-चंद्रपूर-गोंदिया रेल्वे मार्गावर झालेल्या अपघातामुळे २००१ ते २०२१ या २० वर्षात १३० वन्यजीव ठार झाले. त्यामध्ये वाघ, अस्वल, अजगर, बिबट, तरस यासह शेड्युल-१ श्रेणीतील इतर अनेक प्राण्यांचा समावेश आहे. ही रेल्वे लाईन २५० किलोमीटर लांब आहे. त्यापैकी ६० किलोमीटर लाईन संवेदनशील वनक्षेत्रातून जाते. या लाईनवर रोज २४ प्रवासी रेल्वे व अनेक मालवाहू रेल्वे धावतात.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 26, 2025 09:36:45Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2608ZT_CHP_OBC_PROTEST_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:--
टायटल :------ चंद्रपुरात मराठा आंदोलक मनोज जरांगे विरोधात ओबीसी समाजाचे तीव्र आंदोलन
अँकर:--- मराठा समाजाला कुणबी समाजातून सरसकट आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या विरोधात आज चंद्रपुरात ओबीसी समाजाने तीव्र आंदोलन केलं. भारतीय जनता पक्षाचे ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष डॉ अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात वरोरा नाका चौक परिसरात ओबीसी समाजाने हे आंदोलन केलं. यावेळी मनोज जरांगे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जरांगे यांच्या फोटोला चपला मारण्यात आल्या. आतापर्यंत 4 आयोगांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाकारलं असताना मनोज जरांगे मनोरुग्णासारखा आरक्षणासाठी हट्ट करत आहे. मात्र त्यांची ही मागणी पूर्णपणे घटनाबाह्य असल्याचा ओबीसी आंदोलकांचा दावा आहे. सोबतच त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर एफआयआर दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. मनोज जरांगे ला अक्कल नसेल तर त्याच्यासमोर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट चे वकील सरकारने बसवावे आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्या देता येणार नाही हे सरकारने पटवून द्यावे असेही आवाहन ओबीसी समाजाने केलं आहे.
बाईट १) डॉ. अशोक जीवतोडे, प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा ओबीसी सेल
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
6
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowAug 26, 2025 09:35:20Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज
स्किप्ट ::- खऱ्या ओबीसीलाच जिल्हा परिषद पालिका महापालिकेचे तिकीट मिळायला हवे...डुप्लिकेटला घरचा रस्ता दाखवा..... राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सक्षणा सलगर यांचे विधान... व्हिडिओ आला समोर
Ac : मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सक्षणा सलगर यांनी केलेल्या एका विधानामुळे नवा वाद ओढावण्याची शक्यता निर्माण झालीय... खऱ्या ओबीसीला जिल्हा परिषद पालिका महापालिकेचे तिकीट मिळायला हवे डुप्लिकेटला घरचा रस्ता दाखवा असे विधान सक्षणा सलगर यांनी केले आहे... याबाबतचा व्हिडिओ समोर आला असून, लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केल्याची समोर आलं आहे . त्यांच्या या विधानावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे...
साऊंड बाईट : सक्षणा सलगर
10
Report
SMSATISH MOHITE
FollowAug 26, 2025 09:35:04Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_AshokChavan
Feed on - 2C
-------------------------------
Anchor - भाजपावासी झालेले माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण दीड वर्षाच्या कालावधीनंतर काँग्रेस नेत्यांसोबत एका व्यासपीठावर दिसले. काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि शोकसभेनिमित्त अशोक चव्हाण काँग्रेस नेत्यांसोबत दिसले. वर्षभरापूर्वी खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोट निवडणुकीत त्यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण खासदार म्हणून निवडून आले. नायगाव येथे माजी खासदार वसंतराव चव्हाण यांचा पुतळा साकारण्यात आलाय. या पुतळा अनावरण सोहळ्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार छत्रपती शाहू महाराज, माजी मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री विश्वजित कदम हजर होते. यावेळी खासदार अशोक चव्हाण यांची उपस्थिती होती. हर्षवर्धन सपकाळ आणि अशोक चव्हाण यांनी हस्तानदोलन करत गप्पाही मारल्या. वसंतराव चव्हाण सहकारी होते, यांच्याशी कौटुंबीक संबंध होते त्यामुळे हजेरी लावल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.
Byte - खा. अशोक चव्हाण
------------
5
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 26, 2025 09:34:56Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2608_BHA_DOG_ATTACK
FILE - 2 IMAGE
कुत्र्यांच्या हल्ल्यात कोसरा येथील ४ वर्षीय बालक गंभीर जखमी.... नागपूर येथे उपचार सुरू
Anchor :- भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील कोसरा येथील रत्नपारखी सभागृहाजवळ लहान मुलं खेळत असताना अचानक २० ते २५ कुत्र्यांच्या समूहाने लहान मुलावर हल्ला केला, त्यामध्ये ४ वर्षीय शरविल लोणारे रा. कोसरा हा गंभीर जखमी झाला. हि घटना काल दुपारच्या सुमारास घडली आहे. कुत्र्यांनी शरविलच्या चेहऱ्याला चावून विद्रूप केले. गावातील नागरिकांनी वेळीच कुत्र्याच्या तावडीतून मुलाची सुटका केल्याने त्याचे प्राण वाचले. लगेच प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढा येथे उपचारासाठी देण्यात आले. येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून भंडाऱ्याला हलविले. परंतु भंडाऱ्याहून सुद्धा प्रकृती गंभीर असल्याने नागपूर येथे उपचारासाठी पाठविले. सध्या कोंढा परिसरात भटक्या कुत्र्यांच्ये प्रमाण वाढले असून वयस्क व लहान मुलांवर आक्रमण करण्याचे प्रकार वाढले आहेत. कोंढा व कोसरा ग्रामपंचायतीने बंदोबस्त करणे गरजेचे आहे. शरविल लोणारे यांच्या चेहऱ्यावर कुत्र्यांनी चावल्यामुळे नाक आणि तोंड याचे लचके तोडले आहे. मुलांची प्रकृती सध्या गंभीर असून त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहे.
13
Report