Back
कोकणमध्ये पावसामुळे वाहतूक ठप्प! जाणून घ्या कारण
TTTUSHAR TAPASE
Aug 19, 2025 09:32:52
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_HELVAK
अँकर :-कराड - चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर पावसाचे पाणी आल्याने कोकणातून साताऱ्याकडे येणारी वाहतूक बंद झाली आहे. हेळवाक येथे कोयना नदीची पाणीपातळी वाढल्याने अनेक दुकानात आणि घरात पाणी शिरले आहे.या भागात पावसाचा जोर वाढतच चालला आहे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowAug 19, 2025 12:05:09Shirdi, Maharashtra:
Anc - बाळासाहेब थोरात यांना औरंगजेबाचा पुळका येत असेल तर त्यांचा DNA तपासावा लागेल असं वक्तव्य आमदार अमोल खताळ यांनी केलंय.. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता असून बाळासाहेब थोरात यांनी खताळ यांना प्रतिउत्तर दिलंय.. DNA काय असतो ते अमोल खताळ यांना माहीत देखील आहे का..?.. त्यांच्याकडे बौद्धिक पातळी नाही, त्यामुळे कुणीतरी लिहून दिलेलं त्यांनी वाचलं असेल असा पलटवार थोरात यांनी केलाय..
V/O - संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे कीर्तनात झालेल्या राड्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे.. कीर्तनकार संग्राम भंडारे हे औरंगजेब आणि अफजल खानाचे उदाहरण देत असल्याने बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी चालू कीर्तनात गोंधळ घातल्याचा आरोप आमदार अमोल खताळ यांनी केलाय.. घटनेच्या निषेधार्थ आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वात संगमनेर येथे काल हिंदुत्ववादी संघटनांनी रास्तारोको आंदोलन केले.. भाषणादरम्यान आमदार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरातांवर टिका करताना थेट त्यांचा DNA तपासण्याचे वक्तव्य केले.. आम्ही मामाला टेकवला आता भाच्याला अर्थात आमदार सत्यजीत तांबे यांना देखील टेकवू अशी टीका खताळ यांनी केलीये...
Sound Byte - अमोल खताळ, आमदार संगमनेर, शिवसेना शिंदे गट
V/O - खताळ यांच्या टिकेला बाळासाहेब थोरात यांनी प्रतिउत्तर दिलंय.. खताळ यांचे वक्तव्य म्हणजे निच आणि खालच्या पातळीच्या राजकारणाचे उदाहरण आहे.. DNA काय असतो ते अमोल खताळ यांना माहीत देखील आहे का?.. त्यांच्याकडे बौद्धिक पातळी नाही, त्यामुळे कुणीतरी लिहून दिलेलं त्यांनी वाचलं असेल असा पलटवार थोरात यांनी केलाय..
Byte - बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेते तथा माजी मंत्री
0
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 19, 2025 11:30:52Raigad, Maharashtra:
स्लग - धबधब्यात अडकलेल्या पर्यटकांची सुटका .....
अँकर - खोपोली येथील झेनिथ धबधब्याच्या प्रवाहात अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. तमिळनाडू येथील 15 पर्यटक खोपोली येथील झेनिथ धबधबा पहाण्यासाठी आले होते पावसामुळे अचानक वाढलेल्या धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने हे 15 पर्यटक प्रवाहात अडकले होते. खोपोली पोलिसांना याबाबत माहिती मिळताच खोपोली पोलिस, खोपोली नगर पालिका अग्नीशमनदल आणि हेल्प फाऊंडेशन यांनी बचाव कार्य करीत या पर्यटकांची सुटका केली.
2
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 19, 2025 11:30:46Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - कामतीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी हराळवाडी ग्रामस्थांचे चिखलात ठिय्या आंदोलन
Anchor - कामती गावाला जोडणारा हराळवाडी येथील प्रमुख मार्ग करण्याच्या मागणीसाठी हराळवाडी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत चिखलात ठिय्या आंदोलन केले. पावसाचे पाणी खड्ड्यात साचत असल्याने मोठ्या प्रमाणात चिखल जमा झालाय. ग्रामस्थांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, तसेच रुग्णालयात जाणारे वृद्ध नागरिक यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
बाईट -
ग्रामस्थ
4
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 19, 2025 11:30:30Ambernath, Maharashtra:
कल्याण-कर्जत राज्य महामार्ग पाण्याखाली
बदलापूरच्या जुवेली गावाजवळ पावसाचं पाणी तुंबलं
पाणी तुंबल्यानं वाहन चालकांची तारेवरची कसरत
Bdl rain water
Anchor - मुसळधार पावसामुळे बदलापुरात कल्याण-कर्जत राज्य महामार्गावर पाणी साचलय. जुवेली गावाजवळ पाणी तुंबल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय. या ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प आहेत. सखल भागात रस्ता असल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याचा कुठलाही मार्ग नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुतर्फा गटारही काढलेलं नाही. त्यामुळे या ठिकाणी पाणी तुंबलं असून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागतीय.
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
2
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 19, 2025 11:17:53Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1908ZT_NANDED_FOUND(5 PHOTOES)
नांदेड : ब्रेकिंग
आतापर्यंत वाहून गेलेल्या एकूण 4 जणांचे मृतदेह सापडले,एकाचा शोध सुरू
काल सापडले होते 3 महिलांचे मृतदेह
आज एका महिलेचा मृतदेह सापडला
सर्व मृत हसनाळ गावातील रहिवासी आहेत
अँकर : नांदेड जिल्ह्यातील हसनाळ येथून 5 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले होते.यातील 3 महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात काल SDRF च्या पथकाला यश आलं होतं.वाहून गेलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी आज आणखी शोध मोहीम राबवण्यात येत आहे.यात एका महिलेचा मृतदेह शोध मोहीमे दरम्यान हाती लागला आहे.दरम्यान एक जण अजूनही बेपत्ता असून बेपत्ता असलेल्या एकाचा शोध सुरु आहे.
4
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 19, 2025 11:16:49Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1908ZT_CHP_PWD_PROTEST
( single file sent on 2C)
टायटल :-- चंद्रपूर जिल्ह्य़ातील कंत्राटदारांची देयके थकली, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, प्रलंबित देयके द्या, मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन
अँकर :---- महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम, जलजीवन मिशन, ग्रामविकास, जलसंपदा यांसारख्या विभागांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची आठ महिन्यांपासून देयके प्रलंबित आहेत. शासन निधी उपलब्ध करून न दिल्याने विकासकामे ठप्प झाली असून लाखो मजूर, अभियंते, वाहतूकदार व पुरवठादारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघासह विविध संघटनांच्या वतीने आज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. प्रलंबित देयके तातडीने द्यावी ही विनंती मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देत करण्यात आली.
बाईट १) जगदिश लवाडीया, जिल्हाध्यक्ष चंद्रपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
4
Report
ABATISH BHOIR
FollowAug 19, 2025 11:15:24Kalyan, Maharashtra:
कल्याण डोंबिवली मध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाचा फटका..
अशोक नगर मध्ये घरात पाणी शिरलं, आणि घर पाण्याखाली.
Anc..कल्याणच्या अशोक नगर परिसरामध्ये वालधुनी नदीच्या लगत असलेले घरांमध्ये शिरले पाणी अनेक घर पाण्याखाली गेले असल्याने महानगरपालिकेने वालधूनी नदी काठच्या घरांना खाली केले असून पालिकेकडून बाजूला असलेल्या शाळेत हलवण्यात आले आहे.
2
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 19, 2025 11:15:15Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1908ZT_CHP_CCTV_ACCIDENT
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर शहरातील जनता कॉलेज चौकात नव्यानेच बांधलेले नाल्यावरील चेंबर ढासळले, युवक थेट नालीत कोसळला, सीसीटीव्हीत घटना कैद, भ्रष्टाचाराचा कळस गाठलेल्या महानगरपालिकेने प्रकरणाची चौकशी करण्याची आम आदमी पक्षाची मागणी
अँकर:-- चंद्रपूर शहरातील जनता कॉलेज चौकात दुकानासमोर नव्यानेच बांधलेले नाली चेंबर अचानक ढासळले. या चेंबरवर उभा असलेला एक युवक थेट नालीत कोसळला. त्याच्या मित्राने हात देत या नालीतून त्याला कसेबसे काढले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. जनता कॉलेज चौकातील सेवन स्टार बेकरीच्या समोर हा प्रकार घडला. ही नाली आणि चेंबर नव्यानेच बांधण्यात आले आहे. महानगरपालिकेने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
बाईट १) मयूर राईकवार, जिल्हाध्यक्ष ,आम आदमी।पक्ष
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
2
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 19, 2025 11:05:05Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजी नगर हुन मुंबईला उडणारी विमान रद्द करण्यात आली आहे एअर इंडिया आणि इंडिगो त्यांची विमान रद्द केलेली आहे.. हवामान खराब असल्यामुळे मुंबईला लँडिंग शक्य नाही आणि त्यामुळे ही विमानसेवा आजपूर्ती रद्द करण्यात आलेली आहे, विमानसेवा पुन्हा सुरू होताच प्रवाशांना याबाबतची माहिती विमान कंपन्या पुरवणार आहे..
6
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 19, 2025 10:53:58Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1908ZT_CHP_DEMOLITION
( single file sent on 2C)
टायटल :-- चंद्रपूर मनपाने जमीनदोस्त केली 105 वर्षे जुनी जीर्ण इमारत , घनदाट वस्तीच्या भागात धोकादायक स्थितीत होती इमारत
अँकर:-- चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी महानगरपालिकेने कारवाई करत बाजार वॉर्ड, जैन मंदिराजवळील 105 वर्षे जुनी जीर्ण इमारत जमीनदोस्त केली. या इमारतीस पाडण्याचे नोटीस देण्यात आले होते, मात्र मालकाने कोणतीही कार्यवाही न केल्याने मनपानेच इमारत जमीनदोस्त केली. पावसाळ्यात धोका टाळण्यासाठी मनपातर्फे दरवर्षी जीर्ण इमारतींना नोटीस दिली जाते. तरीही अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात येतो. ही धोकादायक इमारत अतिक्रमण निर्मूलन पथक व नगर रचना विभागाच्या सहकार्याने पाडण्यात आली.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
13
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 19, 2025 10:53:50Dhule, Maharashtra:
Anchor- धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या भाजी मंडीचे अतिक्रमण काढण्यावरून महापालिका व भाजी विक्रेत्यांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष झाल्याच पाहायला मिळाले. महापालिकेतर्फे देवपुरातील भाजी मंडीचा अतिक्रमण काढण्यासाठी कारवाई करण्यात येणार होती. यावेळी भाजी मंडीचे अतिक्रमण काढण्यास जोरदार विरोध करत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह भाजी विक्रेत्यांनी आंदोलन केलं. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांच्या नेतृत्वात भाजी विक्रेत्यांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कारवाईचा निषेध केला. यावेळी अतिक्रमण विभागाचे अधिकारी व भाजी विक्रेत्यांमध्ये शाब्दिक वाद देखील झाला. जोपर्यंत महापालिका हक्काची जागा देत नाही तोपर्यंत देवपुरातील भाजी मंडी बंद करणार नसल्याचा पवित्रा भाजी विक्रेत्यांनी घेतला आहे.
byte - मनोज मोरे, आंदोलक, शिवसेना
प्रशांत परदेशी, धुळे.
11
Report
ABATISH BHOIR
FollowAug 19, 2025 10:52:42Kalyan, Maharashtra:
डोंबिवलीत प्रदूषणाचा कहर : नाल्यात पुन्हा गुलाबी पाणी
Anc..औद्योगिक प्रदूषणाचा परिणाम पुन्हा एकदा स्पष्टपणे समोर आला आहे. डोंबिवली MIDC फेज-२ मधील आशापुरा मंदिर परिसरातील मोठ्या नाल्यात पुन्हा एकदा गुलाबी पाणी सोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही वर्षांपूर्वी याच नाल्यात अशीच घटना घडली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे.
9
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 19, 2025 10:52:18Bhandara, Maharashtra:
भंडारा जिल्ह्यात पावसाची संततदार सुरुच.... शेतकरी राजा सुखावला
Anchor :- भंडारा जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संतधार सुरूचतआहे. अधून मधून जोरदार पावसाच्या सरी बरसत आहे. जिल्ह्यात सर्वत्र पाऊस बरसत असल्याने शेतकरी सुखावला आहे. मागील आठवड्यात पावसाने पाठ फिरविली होती म्हणून शेतकरी चिंतेत होता. मात्र काल पासुन येणाऱ्या पावसामुळे शेतकरी सुद्धा आनंदित आहे. तर दुसरीकडे नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळाली आहे.
4
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowAug 19, 2025 10:51:40Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 1908ZT_MAVAL_LONAVALA
Total files : 02
Headline : लोणावळा नगरपरिषद हद्दीतील सर्व शाळांना पुढील 2 दिवस सुट्टी जाहीर
Anchor :
-पुणे हवामान विभागाने रायगड, ठाणे, पुणे, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा Red Alert घोषित करण्यात आलेला आहे. तसेच, लोणावळा शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक आहे. लोणावळा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाखालील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना बुधवार व गुरुवार, दिनांक २० व २१ ऑगस्ट २०२५ रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आलीये...
9
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 19, 2025 10:51:21Washim, Maharashtra:
वाशिम :
File2:1908ZT_WSM_PANGANGA_FLOOD_WKT
WSM_PANGANGA_FLOOD_SHOTS
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर : बुलढाणा जिल्ह्यातील पेन टाकळी धरण 84.38 टक्के भरल्याने व सतत पाण्याची आवक सुरू असल्याने धरणाची 9 द्वारे 30 सें.मी. ने उघडण्यात आली असून 9,689 क्युसेक्स पाण्याचा पैनगंगा नदीत विसर्ग केला जात आहे.या विसर्गामुळे वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीला पुन्हा मोठा पूर आला आहे.नदीने रौद्ररूप धारण केल्याने गोहोगाव हाडे परिसरातील घरांमध्ये व गोठ्यांमध्ये पाणी शिरले असून गावाचा संपर्क तुटला आहे.पूरामुळे गोहोगाव हाडे–वाकद मार्गावरील विद्रुपा नदीवरील रस्ता आणि गोहोगाव हाडे–मेहकर मार्ग बंद झाले आहेत. तसेच रिसोड–मेहकर मार्गावरील महागाव जवळील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. करडा–गोभणी व धोडप–सरपखेड मार्गही तीन दिवसांपासून बंद आहेत.नदीकाठच्या शेतीत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले असून प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.या पुरस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी..
6
Report