Back
आमदार खताळ यांचे DNA वादग्रस्त वक्तव्य, थोरातांनी दिले तिखट उत्तर!
KJKunal Jamdade
Aug 19, 2025 12:05:09
Shirdi, Maharashtra
Anc - बाळासाहेब थोरात यांना औरंगजेबाचा पुळका येत असेल तर त्यांचा DNA तपासावा लागेल असं वक्तव्य आमदार अमोल खताळ यांनी केलंय.. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता असून बाळासाहेब थोरात यांनी खताळ यांना प्रतिउत्तर दिलंय.. DNA काय असतो ते अमोल खताळ यांना माहीत देखील आहे का..?.. त्यांच्याकडे बौद्धिक पातळी नाही, त्यामुळे कुणीतरी लिहून दिलेलं त्यांनी वाचलं असेल असा पलटवार थोरात यांनी केलाय..
V/O - संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे कीर्तनात झालेल्या राड्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे.. कीर्तनकार संग्राम भंडारे हे औरंगजेब आणि अफजल खानाचे उदाहरण देत असल्याने बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी चालू कीर्तनात गोंधळ घातल्याचा आरोप आमदार अमोल खताळ यांनी केलाय.. घटनेच्या निषेधार्थ आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वात संगमनेर येथे काल हिंदुत्ववादी संघटनांनी रास्तारोको आंदोलन केले.. भाषणादरम्यान आमदार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरातांवर टिका करताना थेट त्यांचा DNA तपासण्याचे वक्तव्य केले.. आम्ही मामाला टेकवला आता भाच्याला अर्थात आमदार सत्यजीत तांबे यांना देखील टेकवू अशी टीका खताळ यांनी केलीये...
Sound Byte - अमोल खताळ, आमदार संगमनेर, शिवसेना शिंदे गट
V/O - खताळ यांच्या टिकेला बाळासाहेब थोरात यांनी प्रतिउत्तर दिलंय.. खताळ यांचे वक्तव्य म्हणजे निच आणि खालच्या पातळीच्या राजकारणाचे उदाहरण आहे.. DNA काय असतो ते अमोल खताळ यांना माहीत देखील आहे का?.. त्यांच्याकडे बौद्धिक पातळी नाही, त्यामुळे कुणीतरी लिहून दिलेलं त्यांनी वाचलं असेल असा पलटवार थोरात यांनी केलाय..
Byte - बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेते तथा माजी मंत्री
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowAug 19, 2025 14:31:44Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_KOYNA_1
सातारा - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर वाढल्याने कोयना धरणातून केला जाणारा विसर्ग अजून वाढवण्यात आला आहे.धरणाचे सर्व दरवाजे 12 फुटांपर्यंत उघडून 87000 हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे .कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये असा एकूण 89100 क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने सध्या धरणाने 100.39 टीएमसी चा टप्पा पार केला आहे.
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 19, 2025 14:31:12Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1908ZT_JALNA_BODY_FOUND(4 FILES)
जालना : तब्बल 30 तासानंतर पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या अण्णासाहेब सानप यांचा मृतदेह सापडला
अँकर :जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील एकरुखा गावातील बहिरी नदीत काल एक वयोवृध्द शेतकरी पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेले होते .70 वर्षीय अण्णासाहेब सानप असं वाहून गेलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.या शेतकऱ्याला शोधण्यासाठी आज दिवसभर शोधमोहीम सुरू करण्यात आली होती.अखेर या शोध मोहिमे दरम्यान अण्णासाहेब सानप यांचा मृतदेह सापडला आहे.त्यामुळे तब्बल 30 तासानंतर अण्णासाहेब सानप यांचा मृतदेह हाती लागला आहे
0
Report
PNPratap Naik1
FollowAug 19, 2025 14:16:57Kolhapur, Maharashtra:
Story:- Kop Guardian minister
Feed:- 2C
Anc :- कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीमध्ये नागरिकांनी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. तसेच गरज नसताना घराबाहेर पडू नये, अस आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनासोबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बैठक घेतली. या बैठकीत संभाव्य पूर परिस्थिती संदर्भात पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, त्याचबरोबर जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले.
Byte :- प्रकाश आबिटकर, पालकमंत्री
5
Report
MKManoj Kulkarni
FollowAug 19, 2025 14:16:41Mumbai, Maharashtra:
अँकर -- मुंबईतील मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा आज ७ तास पेक्षा जास्त वेळ ठप्प झाली आहे. अनेक लोकल स्थानकादरम्यान आणि स्थानकावर अडकून पडलेल्या आहेत दादर रेल्वे स्थानकावर कर्जतला जाणारी दहा वाजून 51 मिनिटांची लोकल अजूनही प्लॅटफॉर्म क्रमांक आठवरच उभी आहे अनेक प्रवासी यामध्ये अडकून पडलेले आहेत गेल्या दोन तासापासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी रेल्वे ट्रॅक वरील पाणी अजूनही ओसरले नाही त्यामुळे लोकल सेवा सुरू होऊ शकली नाही पुढच्या एक तासात ही लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले आहे यादरम्यान प्रवाशांचा मात्र संताप व्यक्त करत आहेते दादर स्थानकातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी
Wkt n चौपाल
मनोज कुळकर्णी
Feed send TVU ८१
Slug -- Dadar wkt n woxpoc ६.१५ pm
8
Report
ABATISH BHOIR
FollowAug 19, 2025 14:16:34Kalyan, Maharashtra:
कल्याण डोंबिवली मध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस.
कल्याण डोंबिवली परिसरामध्ये सकाळपासून मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती त्यामुळे प्रवाशांना याचा हा त्रास सहन करावा लागत होता डोंबिवली येथील नांदिवली, मोठा गाव, मानपाडा रोड, कल्याण शिळरोड, डोंबिवली स्टेशन परिसर तसेच कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात,अशोक नगर शिवाजीनगर,आंबेडकर चौक, वालधुनी जवळील नदीकाठच्या मालिकेच्या शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे, कल्याण नगर रस्त्यावरील अनेक गावांमध्ये देखील पाणी शिकलेले होते त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील अनेक रस्त्यांवरती पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले ही घटना समोर आली आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
Ptc.. आतिश भोईर
4
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 19, 2025 14:16:20Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
SLUG NAME -SAT_SCHOOL_SUTTI
सातारा - सातारा जिल्ह्यात हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अंदाज दिल्याने पाटण, जावली, महाबळेश्वर, वाई, सातारा आणि कराड या तालुक्यातील बुधवार 20 ऑगस्ट आणि गुरुवार 21 ऑगस्ट रोजी सर्व शाळा बंद राहतील, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिल्या.
तसेच कोरेगाव, खटाव, खंडाळा, माण आणि फलटण या तालुक्यातील पर्जन्याची स्थिती पाहून तालुकास्तरावर गटविकास अधिकारी हे शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेतील अस जाहीर करण्यात आलं आहे. शाळा सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांची सुरक्षित रहावेत यासाठी पालकांनी दक्ष रहावे, असेही आवाहन देखील मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे.
3
Report
ABATISH BHOIR
FollowAug 19, 2025 14:16:15Kalyan, Maharashtra:
कल्याण ब्रेकिंग
कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांची माहिती
उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढल्याने कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील रायते ब्रीज वाहतूकीसाठी बंद
रायते ब्रिज बंद केल्याने टिटवाळा मार्गे वळवली..
कल्याण तालुक्यात तीन नद्या दुथडीभरुन वाहत असल्याने नदीकाठच्या नागरीकांना सर्तकेचा इशारा
गेल्या 11 तासात कल्याण तालुक्यात ७० मीलीमिटीर पावसाची नोंद
घरात पाणी शिरल्याने २०४ नागरीकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले
नेतीवली टेकडी परिसरात झाड कोसळल्याने १२० नागरीकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले
बाईट सचिन शेजाळ , कल्याण तहसिलदार
1
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 19, 2025 14:16:00Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1908ZT_NANDED_GM_BYTE(1 FILE)
नांदेड :ब्रेकिंग : मंत्री गिरीष महाजन बाईट पॉइंटर
- राज्यात अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासुन पाऊस सुरू आहे. परिस्तिथी नियंत्रणात आहे . गेल्या दोन दिवसापासुन रेकॉर्डब्रेक पाऊस. मुंबईत पाणी साचलं होत. आता परिस्तिथी तशी नाही . 21 तारखे पर्यन्त अर्टल आहे . . नांदेड वगळता कुठे गंभीर परिस्तिथी नाही.. राज्यात एकूण 12 जण दगावले . त्यापैकी नऊ जण नांदेड मधले आहेत..
- मी आज आलो . पालकमंत्री पण येतील
- मुखेडची स्थानिक परिस्थिती काय आहे याची माहिती घेणार .
- लेंढी धरणाचे अधिकारी , संबधित विभागासोबत आम्हीं संपर्कात होतो.. पाण्याचा विसर्ग देखील करण्यात आला . पण इथली घटना का घडली , का लोकांना बाहेर काढू शकलो नाही . याबाबt माहिती घेतो.
- स्थानीक आमदाराला लोकांनी का घेराव घातला याची माहिती नाही .. माहिती घेतो
3
Report
PNPratap Naik1
FollowAug 19, 2025 13:46:32Kolhapur, Maharashtra:
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर पुराचे पाणी; वेळेत उपचार न मिळाल्याने नवजात बालकाचा मृत्यू...
Anc:- कोल्हापूर गगनबावडा मार्गावर पुराचे पाणी असल्यानं, एका गर्भवती महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने तिच्या नवजात बालकाचा मृत्यू झाला. या घटनेत गर्भवती महिला बचावली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील 108 रुग्णवाहिकेतील डॉक्टर स्वप्नील जमखांडे आणि चालक सतीश कांबळे हे मात्र या महिलेसाठी देवदूत ठरले.
VO:- अतिवृष्टीमुळे कोल्हापुर जिल्ह्यात पूरस्थिती उदभवली असून कोल्हापूर गगनबावडा मार्गावर पुराचे पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय. अशातच वेळेत उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेच्या नवजात बालकाचा मृत्यू झालाय. गगनबावडा तालुक्यातील बोरबेट या ठिकाणी राहणाऱ्या या महिलेचे नाव कल्पना आनंदा डुकरे आहे. 27 वर्षीय ही महीला सात महिन्याची गरोदर होती. अचानक प्रस्तुती कळा सुरू झाल्याने, या गर्भवती महिलेला गगनबावडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल.. मात्र, या ठिकाणी उपचार न झाल्याने या महिलेला पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला या ठिकाणच्या डॉक्टरांनी दिला. त्यातच कोल्हापूर गगनबावडा मार्गावर असळज, पडवळवाडी, शेनवडे या ठिकाणी पुराचे पाणी आल्याने, या गर्भवती महिलेला उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल करण्याचं मोठं आव्हान होतं अशातच, निवडे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे 108 रुग्णवाहीकेचे डॉक्टर स्वप्नील जमखाने आणि 108 रुग्नेवाहिकेचा चालक सतीश कांबळे यांच्यासह नागरिकांनी गर्भवती महिला कल्पना डुकरे यांना स्ट्रेचरवरून पुराच्या पाण्यातून वाट काढत रस्ता पार केला. यानंतर 108 रुग्णवाहिकेतून सीपीआर कडे नेत असतानाच कल्पना डुकरे यांची प्रसूती होऊन, नवजात बालकाचा मृत्यू झाला. त्या घटनेत कल्पना डुकरे यांची प्रकृती स्थिर असून त्यांना उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलय. सध्या सर्वत्र पावसाचे थैमान सुरू असतानाच उद्भवलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. नवजात बालकाचा मृत्यू झाला असला तरी गर्भवती महिला कल्पना डुकरे हिला मात्र सीपीआर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यासाठीं शर्तीचे प्रयत्न करणारे 108 रुग्णवाहिकेचे चालक सतीश कांबळे आणि डॉक्टर स्वप्नील जमखाने हे मात्र देवदूत ठरले..
8
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 19, 2025 13:37:02Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1908ZT_CHP_RAIN_LOSSES
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पावसाने शेत पिकांचे मोठे नुकसान, जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये झाली अतिवृष्टी, गेल्या 24 तासातील दमदार पावसाने वार्षिक सरासरीच्या 73% एवढा पडलाय पाऊस, सावली तालुक्यात घरांचे मोठे नुकसान तर एकूण 1378 हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी , एकूण 16 रस्ते बंद, भद्रावती तालुक्यात 45 वर्षीय इसम गेला वाहून
अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पावसाने शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. गेल्या 24 तासातील दमदार पावसाने वार्षिक सरासरीच्या 73% एवढा पाऊस नोंदविला गेलात. सावली तालुक्यात 36 घरांचे नुकसान झाले आहे तर एकूण 1378 हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली आहे. यात सर्वाधिक 1139 हेक्टर कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. नदी- नाले फुगल्याने जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि राज्य मार्गासह एकूण 16 रस्ते बंद झाले आहेत. बोरगाव- धांडे या भद्रावती तालुक्यातील गावात पतरू ठावरी नामक 45 वर्षीय इसम वाहून गेला. शोधकार्यात त्याचा मृतदेह सापडला आहे. ब्रम्हपुरी ते वडसा हा प्रमुख मार्ग भूती नाला अवरुद्ध झाल्याने बंद झाला आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
10
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowAug 19, 2025 13:32:18Vasai-Virar, Maharashtra:
Date-19aug2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slug-VASAI CAR
Feed send by 2c
Type-Av
Exclusive
Slug- मुंबई अहमदाबाद महामार्गावर कार वाहून गेली
कार वाहून जाताना चालकाने घेतली उडी
वासु माऱ्या ब्रीज जवळील घटना मोबाईल कॅमेरात चित्रित
उपस्थित नागरिकांच्या प्रसंगावधनामुळे चालक थोडक्यात बचावला
अँकर - दोन ते तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गाला अक्षरशः नदीचे स्वरूप आले आहे... या मार्गावर सखल भागात इतके पाणी साचले आहे की या पाण्यातून एक कार पाण्याच्या जोरदार प्रवाहातून वाहत जाताना दिसत आहे ... नायगाव जवळीक वासमाऱ्या ब्रीज जवळ हा प्रकार घडला आहे..
कार वाहून जाण्याची दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित करण्यात आली आहेत.. या कार मधील चालक वाहून जाता जाता थोडक्यात वाचला आहे..
फोनो
9
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 19, 2025 13:05:00Yavatmal, Maharashtra:
यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील पळशी आणि संगम चिंचोली गावाचा पुराच्या पाण्यामुळे संपर्क तुटला आहे.
त्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन पथक पळशी आणि चिंचोली संगम मध्ये दाखल झाले आहे. पैनगंगा नदी पात्रात ईसापुर धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने पैनगंगेने रौद्ररूप धारण केले आहे. पुराचे पाणी शेतशिवारासोबतच आता पळशी आणि संगम चिंचोली या गावांमध्ये शिरल्याने गावांना पाण्याचा वेढा घातला आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी बोटीद्वारे स्थलांतरित केल्या जात आहे.
11
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowAug 19, 2025 12:49:39Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.Name : 1908ZT_MAVAL_RAIN_LONAVLA
Total files : 02
Headline -लोणावळ्यात 10 तासांत 150 मिलिमीटर पाऊस बरसला.
Anchor:
पर्यटन नगरी लोणावळ्यात आज पावसाने तुफान बॅटिंग केलीये. अवघ्या दहा तासांत 150 मिलिमीटर पाऊस बरसलाय. सकाळी 7 ते सायंकाळी 5 दरम्यान पावसाने विक्रमी नोंद केलीये. यंदाच्या मोसमात दहा तासांत पहिल्यांदाच पावसाने अशी बॅटिंग केलीये. घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी केल्यानं अन तसा पाऊस ही बरसत असल्यानं लोणावळ्यातील सर्व शाळांना उद्या आणि परवा सुट्टी ही जाहीर केलेली आहे. तर मावळ तालुक्यातील सर्वच धरणांमधून मोठा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्याने मावळ तालुक्यातील जनतेला महत्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
मावळातील धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग :
-पवना धरण- 9950 क्यूसेस
-कासारसाई धरण- 1480 क्यूसेस
-मुळशी धरण- 19,500 क्यूसेस
-वडिवळे धरण- 7574 क्यूसेस
या प्रमाणे मावळ मधील धरणांतून विसर्ग चालू आहे.
7
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 19, 2025 12:49:18Nashik, Maharashtra:
feed send by 2c
reporter-sagar gaikwad
slug-nsk_ganpati
*नाशिक ब्रेकिंग*
- *नाशिकमध्ये गणेशोत्सवातील शेवटचे पाच दिवस विशेष मुभा*
- नाशिकमध्ये शेवटचे पास दिवस रात्री १२ वाजेपर्यंत देखावे सुरू ठेवता येणार
- रात्री १० वाजताच देखावे बंद करण्याचा आजवर होता नियम
- या पूर्वी शेवटचे २ किंवा ३ दिवस मिळत होती १२ वाजे पर्यंत परवानगी
- नाशिक जिल्हाधिकारी यांनी अधिकाराचा वापर करत दिलीये मुभा
- *१५ दिवस रात्री १२ पर्यंत सण उत्सव साजरे करण्यासाठीच्या परवानगीचे आहेत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार*
- त्या अधिकाराचा वापर करत जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव काळात शेवटचे ५ दिवस रात्री १२ पर्यंत साजरा करण्याची दिलीये परवानगी
- *आता राज्य सरकार यामध्ये वाढ करून १० संपूर्ण दिवस रात्री १२ वाजेपर्यंत गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी देण्याची शक्यता*
13
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 19, 2025 12:47:29Nashik, Maharashtra:
feed send by 2c
reporter-sagar gaikwad
slug-nsk_dam
नाशिक -
- संततधार पावसानं नाशिक जिल्ह्यातील १४ धरणं ओव्हर फ्लो
- तर जिल्ह्यातील २४ लहान मोठ्या धरणांमधील पाणीसाठा ८५ टक्क्यांवर
- नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ८४.२५ टक्के पाणीसाठा
- गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास कधीही धरणातून पाणी सोडण्याचा इशारा
- तर जिल्ह्यातील अन्य ११ धरणांमधून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग
- नाशिकला आज देखील पावसाचा रेड अलर्ट
- धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवणार
- नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
*जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील सध्याचा पाणीसाठा*
गंगापूर - ८४.२५ टक्के
दारणा - ८७.३७ टक्के
मुकणे - ९५.१८ टक्के
नांदुरमध्यमेश्वर - ९६.५० टक्के
गिरणा - ६९.९४ टक्के
चणकापूर - ७० टक्के
14
Report