Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

शिर्डीत व्यापाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक: साईसंस्थान कर्मचारी सामिल!

Kunal Jamdade
Jul 07, 2025 04:01:25
Shirdi, Maharashtra
Shirdi News Flash Big Breaking *शिर्डीकरांसह साईसंस्थान कर्मचारी जिल्ह्यातील बड्या व्यापाऱ्यांची कोट्यावधींची फसवणूक...* ग्रो मोर इंवेस्टमेंट फायनान्स या कंपनीच्या माध्यमातून आर्थिक रकमेच्या फसवणूकिचा पर्दाफाश.... *मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून शेकडों नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक...* *साई संस्थानचे कर्मचारी अनिल रामकृष्ण आहेर यांच्यासह 21 तक्रारदारांनीदिलेल्या फिर्यादीवरून 1 कोटी 65 लाख 4 हजार रुपयांच्या फसवणुकीचा शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल...* आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे उर्फ सर , वडील राजाराम भटू साळवे या बापलेकासह पाच जणांवर गुन्हे दाखल... शिर्डी , राहता , जळगाव , धुळेसह अनेक जिल्ह्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल.. राहता पोलिसांसह शिर्डी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू मात्र आरोपी अटक नाही... भारतीय न्याय संहिता 318(4) , 316(2) , 3(5) आणि महाराष्ट्र ठेवीदार अधिनियम (1999) 3 सह गंभीर गुन्हे दाखल.... *आणखी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता...* आरोपी भूपेंद्र सावळे आणि वडील राजाराम सावळे यांचा व्हिडिओ झी 24 तासच्या हाती...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement