Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Mumbai City400003
इलेक्ट्रिक वाहनांना अटलसेतूवर टोल माफी! आजपासून प्रवास करा फुकट!
MKManoj Kulkarni
Aug 22, 2025 04:46:20
Mumbai, Maharashtra
अँकर -- इलेक्ट्रिक वाहनांना आज पासून अटलसेतूवरून टोल माफीचा प्रवास सुरू झाला आहे. तुमच्याकडे इलेक्ट्रिक वाहन असेल आणि तुम्हाला अटलसतूवरून जायचं असेल तर आजपासून या वाहनांना टोल भरावा लागणार नाही राज्य सरकारने एप्रिल महिन्यातच राज्यात इलेक्ट्रिक वाहनधारकांना टोल मधून मुक्ती दिली होती त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे अटल सेतू वरून इलेक्ट्रिक वाहन टोलमुक्त झाले आहेत याचबरोबर पुढील दोन दिवसात मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून तसेच समृद्धी महामार्गावरून इलेक्ट्रिक वाहनांना टोल मधून सूट देण्यात आली आहे यामध्ये जड इलेक्ट्रिक वाहने असतील त्यांना मात्र सूट देण्यात आलेली नाही.अटल सेतू हा शिवडी ते नवी मुंबईतील पनवेल नव्हा शेवा असा आहे.यावर येण्याजण्याचा ३७५ रुपये टोल भरावा लागतो. अटल सेतू वरून  आढावा  घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी  Wkt n shots  मनोज कुळकर्णी  Feed send TVU ४३ Slug -- Atal setu Wkt n shots
4
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Aug 22, 2025 06:15:47
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2208ZT_CHP_TANHA_POLA ( single file sent on 2C)  टायटल:-- आज आहे बैल पोळा , मात्र विदर्भात बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी धमाल असते ती तान्हा पोळ्याची अर्थात लाकडी बैलांच्या पोळ्याची,  रुपये 100 ते 50,000 अशी किंमत असलेले हे लाकडी बैल, त्यांची सजावट, त्यांच्या भव्य स्पर्धा म्हणजे बाळगोपाळांचे ऑलिम्पिक, सध्या चंद्रपूरचा बाजार यासाठी साहित्यानी वाहत आहे ओसंडून  अँकर:-- आज राज्यभर बैल पोळा साजरा होत आहे. शेती मातीत राबणाऱ्या बैलांची पूजा करून त्यांना गोडधोड खाऊ घालत कृतज्ञता व्यक्त केली जाते. मात्र विदर्भात बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी धमाल असते ती तान्हा पोळ्याची अर्थात लाकडी बैलांच्या पोळ्याची. रुपये 100 ते 50,000 अशी किंमत असलेले हे लाकडी बैल, त्यांची सजावट, त्यांच्या भव्य स्पर्धा म्हणजे बाळगोपाळांचे जणू ऑलिम्पिक. सध्या चंद्रपूरचा बाजार सजावटीचे साहित्य आणि उत्तम रंगसंगतीच्या हजारो लाकडी बैलांनी फुलुन गेलाय. एकीकडे बड्या मंडळींची बैल पोळ्याची धामधूम असताना दुसरीकडे मोठ्यात मोठा बैल खरेदी करत त्यासाठी याच दर्जाची सजावट करून स्पर्धेत पारितोषिक पटकवण्याची बच्चे कंपनीची धडपड चालते. वाढत्या महागाईने मात्र अधिकच्या खरेदीवर अंकुश लागला आहे. बाईट १) लाकडी बैल विक्रेता बाईट २) ग्राहक आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Aug 22, 2025 06:02:09
Washim, Maharashtra:
वाशिम: File:2208ZT_WSM_APMC_CLOSED रिपोर्टर: गणेश मोहळे, वाशिम अँकर: पोळा आणि रविवार सलग आल्यामुळं वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार आज पासून तीन दिवस बंद राहणार असून शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी नं आणण्याचं आवाहन बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आलय.वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती ही विदर्भातील प्रमुख बाजार समिती असून इतर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आणला जातो मात्र पूर्व सूचना दिल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसळ टाळणार आहे.
3
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 22, 2025 06:01:48
Nashik, Maharashtra:
nsk_bhujbalbt feed by live u नाशिक - छगन भुजबळ, मंत्री* *बाईट मुद्दे* *ऑन लक्ष्मण हाके व्हिडीओ व्हायरल* - सकाळी दोन तीन वेळा फोन आले - काहीतरी गैरसमज झाले आहेत - ते म्हणाले खुलासा करणार आहे - मी सुद्धा सांगितले यावर कॉमेंट करायची नाही *ऑन पालकमंत्रीबाबत सुहास कांदे विरोध* - मला याबाबत काहीही बोलायचे नाही - नो कमेंट्स *ऑन अंडरपास नवीन काम* - यापुढे नवीन काम काढला तर नवीन अडचण उपस्थित होईल - कुंभाच्या आधी काम होणार असेल तर हरकत नाही - रस्ते येण्यासाठी नीट ठेवण्याची गरज नाही - काम एजन्सी आणि डिझाईन ताबडतोब करा असे सांगितले - कुंभाच्या आधी गॅरंटी असेल तर काम करा *ऑन कर्जमाफी अजित पवार* - माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांनीही तेच सांगितले - अजित दादाने पण तेच सांगितले - योग्य वेळी निर्णय घेतला जाईल *ऑन कुंभ बैठक* - मी काही आदेश त्यांना दिला नाही - मी फक्त समजून घेतलं - माझं मत प्रदशीत केलं - मी काही आयडिया दिल्या - ऐकायच्या की नाही ते अधिकाऱ्यांनी ठरवलं पाहिजे - साधू महंत यांच्या सूचना घेतात - छगन भुजबळांच्या पण सूचना घ्यायला हरकत नाही *ऑन पब्जी गेम बळी येवला* - लाखो तरुण देशोधडीला लागतात - अशा गेमवर बंदी आणायला पाहिजे *ऑन निवडणूक तयारी* - कुठलाही पक्ष कुठलीही निवडणूक लढण्यासाठी तयारीत असतो *ऑन मलिक मुंबई जबाबदारी* - जिथं जिथं मला बोलावलं जाईल तिथं सहकार्याला जाईल - महाराष्ट्रात आणि देशात जिथं बोलावतील तिथं मी जाईल *ऑन खड्डे रस्ते टोल* - प्रदूषित विरहित वाहनांना प्रोत्साहन देण्याच काम शासन करत आहे - याशिवाय इतर दृष्ट्या शासन प्रयत्न करत आहे
2
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 22, 2025 06:00:34
Nashik, Maharashtra:
Nashik breaking - *नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा 88 टक्क्यांवर* - *नाशिकला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण देखील 94 टक्के भरले* - गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे पाणी साठ्यात झपाट्याने वाढ - जिल्ह्यातील 24 पैकी 11 ते 12 धरण भरले 100% - तर इतर धरणात देखील 70 ते 80 टक्के पाणीसाठा - नाशिक जिल्ह्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटण्याचा मार्गावर
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 22, 2025 05:48:40
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 2208ZT_JALNA_HAKE_VIRAL(3 FILES) जालना : ब्रेकिंग |ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा व्हिडीओ व्हायरल, भुजबळ यांच्यावरही आगपाखड, वाघमारे यांच्याकडून हाके यांचा निषेध,दिलगिरी व्यक्त करण्याची केली मागणी अँकर :ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.या व्हिडीओत हाके यांनी माळी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलंय.हा व्हिडीओ कुठला आहे याबद्दल माहिती मिळू शकली नाही.झी-२४ तास या व्हिडीओची पुष्टी करत नाही. "माळयांचं एक दुखणं आहे.माळयांकडून नेतृत्व धनगर समाजाकडे चाललं.हे त्यांच्या पोटात दुखतय.भुजबळांचे पोरं दोन्ही काही कामाचे नाहीत.बाकीच्या कार्यकर्त्यानी भुजबळांनी वर येऊ दिले नाही,मग आता काय करायचं. असं व्हायरल व्हिडीओत हाके यांनी म्हटलं आहे.दरम्यान हाके यांच्या व्हायरल व्हिडीओतील वक्तव्यावरून ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी हाके यांनी दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी करत हाके यांचा निषेध नोंदवलाय.तर भुजबळ यांच्यावरील टिकेवरूनही हाके यांचा समाचार घेतलाय. बाईट : नवनाथ वाघमारे,ओबीसी नेते
4
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Aug 22, 2025 05:33:59
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File.name : 2208ZT_MAVAL_MISSING_LINK Total files : 01 Headline -खोपोली ते लोणावळा कुसगाव मिसिंग लिंक प्रकल्पाला विधीमंडळ समितीची धावती भेट Anchor: पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील महत्त्वाकांक्षी लोणावळा, कुसगाव ते खोपोली मिसिंग लिंक प्रकल्पाला राज्याच्या विधीमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीने भेट देत आढावा घेतला. भाजप आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पाहणीदरम्यान, देशातील सर्वात मोठा ९ किमी लांबीचा बोगदा आणि १८५ मीटर उंच पूल बांधकामाच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली. हा पूल देशातील सर्वात उंच पूल म्हणून याची नोंद होणार असून, ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर पुणे मुंबई खंडाळा बोरघाटमार्ग टाळला जाऊन मुंबई-पुणे प्रवास अधिक जलद व सुरक्षित होणार आहे.
1
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 22, 2025 05:33:38
Nashik, Maharashtra:
नाशिक * ग्रामसभेत झालेले राडा प्रकरण .. * सरपंच तसेच तंटामुक्ती अध्यक्षासह दहा जणांना पोलिसांनी केली अटक * व्हिडिओ शूटिंग काढण्यावरून तंटामुक्ती अध्यक्ष आणि सरपंचात झाले होते वाद * वादाचा पर्यावसन झाल हाणामारीत * हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला व्हायरल * ॲट्रॉसिटी, बेकायदेशीरपणे जमावसमवून दंगल घडवणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, विनयभंग अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल
4
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 22, 2025 05:33:28
Beed, Maharashtra:
बीड:जायकवाडी धरणातून पाणी सोडल्याने गोदावरी नदी तुडुंब, गेवराईतील राक्षसभुवन मंदिर पाण्याखाली Anc:पैठण येथील जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरी नदी पात्र तुडुंब भरून वाहू लागले आहे. जायकवाडीचे पाणी बीड जिल्ह्यात दाखल झाले असून, गेवराई तालुक्यातील प्रसिद्ध राक्षसभुवन मंदिर पाण्याखाली गेले आहे. धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. यामुळे राक्षसभुवन परिसर जलमय झाला असून, प्रशासनाने नागरिकांना मंदिर परिसरात जाण्यास सक्त मनाई केलीय. तसेच नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान अनेक वर्षांनी गोदावरी नदी अशा पद्धतीने तुडुंब वाहताना दिसत आहे. नदी काठच्या शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार असून, भूजलपातळी वाढून विहिरी व बोअरवेल्सला पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
4
comment0
Report
SKSudarshan Khillare
Aug 22, 2025 05:32:46
Satana, Maharashtra:
अँकर- सटाणा तालुक्यातील मोरेनगर येथील शेतकरी तथा व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी बैलपोळा निमित्ताने सर्जा राजा आणि बच्चु कडु चे सरकार ला प्रश्न विचारणारे चित्र मातीतून रेखाटले... सरकार ला यानिमित्ताने प्रश्न विचारला कि आमच्या शेतकरयांच्या डोक्यावर असेल कर्ज तरी आम्ही उत्तम शेती पिकवु जनतेला अन्नधान्य कमी पडु देणार नाही.. आणि सर्जा राजा चा सण बैलपोळा ही उत्साहात साजरा करु.. फक्त तुम्ही सांगा कि शेतकरयांच्या डोक्यावर असलेला कर्जाचा भार कधी उतरवणार सातबारा कधी करणार कोरा कोरा कोरा....
1
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 22, 2025 05:32:37
Nashik, Maharashtra:
nsk_someshvardrone feed by 2C नाशिक - ( सौजन्य - सिद्धेश सरोदे ) गंगापूर धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आल्यानं नाशिकचा प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा खळाळून वाहतोय. गोदेच्या अत्यंत वेगानं उसळणाऱ्या पाण्यामुळे हा धबधबा पुन्हा एकदा जिवंत झालाय. गोदापात्रातील उंच कातळावरून वेगानं खाली कोसळणाऱ्या या पाण्यामुळे सोमेश्वर धबधब्याचं काहीसं रौद्र, तर काहीसं विहंगम दृश्य सध्या पाहायला मिळतंय. सोमेश्वर धबधब्याची विहंगम दृश्य ड्रोनद्वारे टिपलेली आहेत, सिद्धेश सरोदे यांनी..
3
comment0
Report
GMGANESH MOHALE
Aug 22, 2025 05:32:25
Washim, Maharashtra:
वाशिम : File:2208ZT_WSM_DAMS_OVERFLOW रिपोर्टर: गणेश मोहळे, वाशिम अँकर: वाशिम जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण १६७ लघु व मध्यम प्रकल्पांपैकी तब्बल १०५ प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत.यामध्ये पाटबंधारे विभागाचे ३७ प्रकल्प तर मृद व जलसंधारण विभागाच्या ६८ प्रकल्पांचा समावेश आहे.सततच्या पावसामुळे उन्हाळ्या मध्ये निर्माण होणारी पाण्याची टंचाई दूर होऊन जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.तसेच अनेक ठिकाणी शेतीसाठी आवश्यक असलेल्या सिंचनाच्या पाण्याचीही समस्या मिटली असून येत्या रब्बीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.
4
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Aug 22, 2025 05:31:14
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव ब्रेकिंग DHARA_AATHAWALE मराठा आंदोलकांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची गाडी अडवून घेतली भेट सारोळा गावात आंदोलकांनी केली आठवलेंशी चर्चा मराठा आरक्षणाचा मार्ग काढा अशी आंदोलकांची मागणी 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आंदोलन होऊ नये यासाठी पुढाकार घ्या अशी कार्यकर्त्यांची विनंती मराठा आरक्षणाचा प्रश्न पंतप्रधानांच्या कानावर घालतो, असं आठवले यांचं आश्वासन " आठवले यांच्या ताफ्यासमोर एक मराठा लाख मराठा" अशी घोषणाबाजी आरपीआय कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांना सांत्वन भेट देण्यासाठी आले होते केंद्रीय मंत्री रामदास आठवले धाराशिवात
0
comment0
Report
AKAMAR KANE
Aug 22, 2025 05:16:49
kolhapur, Maharashtra:
फोटो 2c ला पाठवले आहे ------ नागपुरात एका बारमध्ये सुरू असलेल्या अश्लिल नृत्य व तरुणींवर पैसे उधळण्याच्या प्रकाराचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. संबंधित अवैध डान्सबारमध्ये पोहोचलेल्या 20 हून अधिक ग्राहकांसह 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेथे तीन तरुणी तोकड्या कपड्यांमध्ये अश्लिल नृत्य करत होत्या. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने गुरुवारी मध्यरात्री ही कारवाई केली.जुनी कामठी मार्गावरील उड्डाणपुलाजवळ असलेल्या शिवशक्ती बारमध्ये हा ‘छमछम’चा प्रकार सुरू होता. पोलिसांनी खबऱ्यांकडून याची माहिती मिळाली. तेथे अश्लिल नृत्य सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी रात्री एक वाजताच्या सुमारास तेथे धाड टाकली.
4
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 22, 2025 05:15:38
Beed, Maharashtra:
बीड:...तर, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या लक्ष्मण हाके यांची जीभ हासडणाऱ्यास लाखाचे बक्षीस देऊ; मनोज जारंगेंचे समर्थक गंगाधर काळकुटे यांची जीभ घसरली..! Anc:ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके सतत दोन जातीत तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल देखील एकेरी भाषेत बेताल वक्तव करत आहेत. लक्ष्मण हाकेंनी जातीय तेढ निर्माण करू नये. अन्यथा त्यांची जीभ हासडली जाईल. जो कोणी लक्ष्मण हाके यांची जीभ हासडेल त्याला लाख रुपये बक्षिस देऊ अशी घोषणा मनोज जरांगे यांचे समर्थक मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी केली आहे. यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण तापले आहे. दरम्यान माझी जीभ कशाला हासडता जीवच घ्या, असे आव्हान लक्ष्मण हाके यांनी केले. मी संविधानिक पद्धतीने वक्तव्य करतो. हे साऱ्या महाराष्ट्राला माहित आहे. माझे वक्तव्य लोकशाहीला धरून आहे. उलट मनोज जरांगे हेच अभद्र आणि शिवराळ भाषेत बोलतात असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 तारखेला मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आहे. त्याच पार्श्वभूमीवर ओबीसी आणि मराठा आंदोलकांची शाब्दिक बाचाबाची समोर येत आहे. बाईट: गंगाधर काळकुटे, मराठा समन्वयक बाईट: लक्ष्मण हाके, ओबीसी आंदोलक
8
comment0
Report
Advertisement
Back to top