Back
इंदापूर तळा मार्गावर बर्निंग कारचा थरार, चालकाने वेळेत बाहेर पडला!
PPPRAFULLA PAWAR
Jul 27, 2025 01:30:20
Raigad, Maharashtra
अँकर - इंदापूर तळा मार्गावर बर्निंग कारचा थरार .......
अँकर - रायगडच्या इंदापूर तळा मार्गावर रात्री बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. मुठवली गावाजवळ धावत्या कारने अचानक पेट घेतला. कारचालकाच्या लक्षात येताच तो बाहेर पडला. वन्यजीव रक्षणार्थ सामजिक संघटना आणि अग्निशमन दलाने आग विझवली
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 27, 2025 08:03:00Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2707_BHA_NANA_BYTE
FILE - 4 VIDEO
*नाना पटोले ऑन बँक निवडणूक*
ANCHOR :- कल तर आमच्या बाजूने दिसतोय आता.... आणि त्याच्यामुळे विजय परिवर्तन शेतकरी पॅनलचाच होईल असं चित्र या ठिकाणी आहे.....
बाईट - नाना पटोले (०:१४)
.....
.....
*नाना पटोले ऑन अजित पवार स्टेटमेंट*
ANCHOR : धनंजय मुंडे दोषी न आढळ्यास त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळेल अस वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे..... यावर उत्तम देताना नाना पटोले म्हणाले की सरकारमध्ये कोणाला घ्यायचं कोणाला मंत्री करायचं तो त्यांचा अधिकार आहे. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात असेल की महाराष्ट्रातलं राजकारण गढूळ करण्याच काम भाजप आणि या महायुतीने केला आहे. ते तर आता सगळ्यांना स्पष्ट दिसत आहे. खोटं बोलणारी लोकं स्वतः सर्टिफिकेट देतात. त्यांच्याजवळ गेला की तो वॉशिंग मशीन मध्ये धूतला जातो. त्याला कोर्टाची गरज नाही. ही परिस्थिती चक्की पिसिंग पिसिंग करायला निघालेली लोकं आता जे गुन्हेगार आहेत. त्यांच्यात बाजूला बसतात त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकीय जे मूल्यमापन होतं ते भाजपने महाराष्ट्रात संपुष्टात आणलेला आहे. त्यामुळे कोण मंत्रिमंडळात येतं? कोण जाणार? हा आम्हाला विषय राहिलेला नाही जे मंत्री शेतकऱ्यांना कधी भिकारी म्हणतात शेतकऱ्यांची चेष्टा करतात आणि सातत्याने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा पाप करतात एकीकडे आपण पाहिलं बेरोजगारांची तीच अवस्था आहे. त्याचप्रमाणे महागाई इतकी वाढली आहे. त्यामुळे ही सरकार मौज मस्ती करायला लोकांनी निवडून दिलेलं नाही पण हे सरकार त्याप्रमाणे वागत नाही. सर्वसामान्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढली ड्रग्सचं प्रमाण वाढलं त्यामुळे महाराष्ट्र गुन्हेगारीचा अड्डा भरण्याचा काम या भाजपाने माहितीच्या सरकारने केलेला आहे आणि लोकांमध्ये भयानक चीड सरकार विरोधात पाहायला मिळत आहे.
बाईट : नाना पटोले (१:५५)
....
....
*नाना पटोले ऑन हसन मुनश्रीफ*
Anchor :- या सरकारमध्ये सगळे बेताल लोक आपल्याला पाहायला मिळत आहेत यांना द्यायचं असेल तर यांनी प्रामाणिक दिलं पाहिजे. तुम्ही लाडक्या बहिणीची शेतकऱ्याची चेष्टा काय करता लाडक्या बहिणीमुळे सगळा विकास थांबला हे सगळं सांगायचं काम काय? या निमित्ताने लाडक्या बहिणींना तुम्ही बदनाम करताय आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताय......... (हसन मुश्रीफ यांच्या लाडकी बहीण योजनेमुळे कर्जमाफीत अडथळा निर्माण झाल्याच्या वक्तव्यावर नाना पटोले बोलत होते)
बाईट : नाना पटोले (०:४४)
....
....
*नाना पटोले ऑन आय टी पार्क*
Anchor :- आय टी पार्क बेंगलोरला गेल्यानंतर, आपल वाटोळा झाला आहे अस वक्तव्य अजित पवार यांनी एका सरपंचासी बोलताना म्हटले होते. यावर नाना पटोले म्हणाले की इथं पोषक वातावरण नाहीये, महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात उद्योग परप्रांतात चाललेले आहेत हे आपण पाहतोय. महाराष्ट्रातील उद्योगपती या देशातूनही चाललेले आहेत आणि जगाच्या वेगवेगळ्या पाठीवर उद्योग उभे करत आहेत ते वैभवीतपणा जो भीतीच वातावरण आज महाराष्ट्रात आणि देशात निर्माण केलेला आहे त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात आहेत. आता या केंद्र सरकारने ए आय आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे तर आणखीन प्रॉब्लेम होणार आहेत जवळपास देशभरातून चार ते पाच कोटी लोकांना रोजगारापासून मुक्त व्हावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली.... अशी भीती निर्माण झाली आहे. सरकारने ai आणावं पण मॅन पावर कमी करण्याची चुकी करू नये नाहीतर या देशात आर्थिक परिस्थिती विस्कळीत होणार. पैशाची सायकल थांबून जाणार आणि त्याच्यामुळे या परिस्थितीला तातडीने केंद्र सरकारने याचा खुलासा केला पाहिजे...... Ai चा स्वागतच करू विरोधाचा कारण नाही. पण त्याचे परिणाम हे लोकांना रोजगारापासून मुक्त व्हावे लागत असेल तर ही परिस्थिती भयानक होऊ शकते.
बाईट : नाना पटोले (१:३०)
0
Report
PNPratap Naik1
FollowJul 27, 2025 08:02:46Kolhapur, Maharashtra:
Kop KMC Ghotala FIR
File & 2C
Anc :- बनावट सही आणि शिक्यांच्या आधारे कोल्हापूर महानगरपालिकेकडून 85 लाखाची बिल मंजूर करून घेत प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी ठेकेदार श्रीपाद वराळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पवडी भागातील मापन पुस्तकात खाडाखोड करून, मोजमापाच्या नोंदी बदलून पैसे उकळण्याचा फिर्यादीत म्हटले आहे. कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांनी यासंदर्भात लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. दरम्यान ज्या पत्राच्या आधारे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ते पत्र महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी माझ्याकडून एका कॅफेमध्ये लिहून घेतले असा गंभीर आरोप ठेकेदार वराळे यांनी यापूर्वीच केला आहे इतकच नाही तर प्रत्येक ठेकेदाराला टक्केवारीप्रमाणे पैसे दिले आहेत त्याचे पुरावे देखील माझ्याकडे असल्याचे वराळे यांनी म्हटले आहे.. दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त के मंजू लक्ष्मी यांनी 85 लाखाचे बिल उचलण्यासाठी मदत केलेल्या अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, तात्कालीन वरिष्ठ लेखापरीक्षक सुनील चव्हाण, वर्षा परीट, लेखापरीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक जयश्री हंकारे, पावली विभागातील सेवानिवृत्त कनिष्ठ प्रभाकर नाईक यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
Byte :- श्रीपाद वराळे, ठेकेदार
0
Report
KJKunal Jamdade
FollowJul 27, 2025 07:46:10Shirdi, Maharashtra:
Rahuri News Flash
Big Breaking
उपमुख्यमंत्री अजित पवार तनपुरेंच्या भेटीला...
*शरद पवार गटाचे माजी आमदार प्राजक्त तनपूरे आणी प्रसाद तनपूरे यांच्या भेटीला...*
राहुरी येथे तनपूरे वाड्यावर प्राजक्त तनपूरे यांनी केले स्वागत...
*प्राजक्त तनपूरे जयंत पाटलांचे भाचे...*
शेतकरी मेळाव्यानंतर तनपूरेंच्या घरी अजित दादांचे स्नेहभोजन...
अजित पवार तनपूरेंच्या घरी पोहचल्याने चर्चेला उधाण...
*चुलते अरूण तनपूरे यांच्या पाठोपाठ प्राजक्त तनपूरेही अजित पवारांसोबत जाणार असल्याची चर्चा...*
माजी खासदार प्रसाद तनपूरे आणि माजी आमदार प्राजक्त तनपूरे यांनी केले अजित पवारांचे स्वागत..
*अजित पवारांनी तब्बेतीची केली विचारपूस...*
प्रसाद तनपूरेंना काळजी घेण्याची अजित दादांची विनंती...
5
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 27, 2025 07:45:10Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_BUS_FIRE
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या शिवशाही बस ने साताऱ्यातील भुईंज जवळच्या बदेवाडी हद्दीत अचानक पेट घेतला. या बस मध्ये वीस प्रवासी प्रवास करत होते. चालू बसच्या इंजिन मधून अचानक दूर निघू लागल्याने चालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना खाली उतरवले यानंतर बसने आगीचे रौद्ररूप धारण केले. यामध्ये शिवशाही बसचे मोठे नुकसान झाले आहे. भुईंज पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले असून अग्निशामक दलाच्या मदतीने आग विजविण्यात आली... प्राथमिक माहितीनुसार गाडीतील शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
4
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 27, 2025 07:35:03Yeola, Maharashtra:
अँकर :-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे वाढदिवसाच्या निमित्ताने येवल्यातील हिंदू मुस्लिम शिवसैनिकांनी सिद्धिविनायकाला व अल्लाहला साकडे घालत 65 किलो मोतीचूर लाडूंचे वाटप केले. महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच व्हावे याकरता हे साकडे घालण्यात आले असून या शिवसैनिकांशी बातचीत केली आहे.आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
4
Report
DPdnyaneshwar patange
FollowJul 27, 2025 07:34:20Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_FIR
पती-पत्नीच्या नात्याला काळीमापासणारी घटना
पत्नीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची पतीची धमकी
पैशासाठी पतीच करतो पत्नीला ब्लॅकमेल
धाराशिव तालुक्यातील येडशी गावची घटना
पतीविरोधात धाराशिव पोलिसात गुन्हा दाखल
अँकर:
धाराशिव जिल्ह्यातून पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने स्वतःच्या पत्नीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला पैशांसाठी ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना घडली आहे धाराशिव तालुक्यातील येडशी गावात.
ही घटना आहे येडशी गावातील. पीडित पत्नी संगीता शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती उत्तम शिंदे हा सतत पैशांसाठी त्रास देत होता. लग्नानंतरपासूनच पत्नी आणि तिच्या माहेरच्यांकडे पैशांची मागणी करणाऱ्या उत्तमने आता थेट पत्नीचे अश्लील फोटो काढून, ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
इतकेच नव्हे तर, त्या अश्लील फोटोसह अनेक नातलगांनाही फोटो पाठवत, पैशांची मागणी करण्यात आली. या त्रासाला कंटाळून पत्नी संगीता शिंदे यांनी थेट धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि पतीविरोधात तक्रार दाखल केली.
धाराशिव ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी उत्तम शिंदेविरोधात गुन्हा दाखल केला असला, तरी अद्याप त्याला अटक झालेली नाही. एकीकडे महिला सुरक्षेचे दावे केले जात असताना, पतीकडून होणारा मानसिक छळ आणि ब्लॅकमेलिंग हा चिंतेचा विषय बनला आहे.
Byte तक्रारदार पत्नी
Byte नातेवाईक
Byte पोलीस अधिकारी
4
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 27, 2025 07:31:16Beed, Maharashtra:
FEED : ST Bus
बीड : धावत्या बसचे चाक निखळून पडले; चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली
Anc : छत्रपती संभाजीनगर ते लातूर जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात टाळला आहे. मांजरसुंबा-नेकनूर दरम्यान धावत्या बसचं मागचं चाक अचानक निखळून रस्त्यावर पडल्याने क्षणभर प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवत मोठी दुर्घटना टळवली. बसमध्ये सुमारे 40 प्रवासी प्रवास करत होते. घटनास्थळी अपघाताचे थरकाप उडवणारे दृश्य दिसून आलं. एसटी महामंडळाच्या देखभाल दुरुस्ती व्यवस्थेवर यानंतर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही हे समाधानकारक आहे. प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
5
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 27, 2025 07:31:09Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने,वारणा पात्राबाहेर तर कृष्णेची सांगलीतील पातळी पोहोचली 19 फुटांवर..
अँकर - कोयना धरण आणि सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गमुळे कृष्णा आणि वाण नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.वारणा नदी पात्रा बाहेर पडली आहे,तर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.सांगलीतील आयर्विन पूल येथील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 19 फुटांवर पोहचली आहे.एका दिवसात तब्बल तीन फुटाने कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये हि वाढ झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे.गेल्या 24 तासांमध्ये 54 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून धरण 85% इतका भरले आहे.तर कालपपासून सुरू असलेल्या विसर्ग मध्ये आता वाढ करण्यात आली असून साडे तेरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात करण्यात येतोय,त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळी मध्ये झपाट्याने वाढ झाली असून अनेक ठिकाणी वारणा नदी पात्रा बाहेर पडली आहे.तर नद्यांच्या पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता,कृष्णा आणि वारणा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
5
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 27, 2025 07:30:59Akola, Maharashtra:
अकोला जिल्ह्यात रिमझिम पावसामुळे गारवा; जलतरण तलावात जलक्रीडेचा आनंद..
Anchor : गेल्या तीन दिवसांपासून अकोला शहरात रिमझिम पावसाने हजेरी लावली आहेय..या हवामानामुळे गारवा पसरला असून, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहेय.. पावसाच्या या सरींमुळे निसर्गसौंदर्य खुलून दिसत असून, अनेक ठिकाणी हिरवळ फुलली आहेय.याच वातावरणाचा आनंद आता अकोल्यातील जलतरण तलावात कर्णपट्टू (जलतरणपटू) घेत असल्याचे पाहायला मिळत आहेय..थंड हवामानात सराव करताना जलतरणपटूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहेय..येथे आलेले जलतरणपटू पोहण्यासोबत पावसाचा आनंद घेताना दिसून येत आहे एका हातात छत्री घेऊन पोहण्याचा आनंद व्यक्त करत आहेय..
7
Report
SKShubham Koli
FollowJul 27, 2025 07:30:42Thane, Maharashtra:
पाणी पुरवठ्याविषयी महत्त्वाची सूचना
गेले काही दिवस भातसा धरण क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा, व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे मागील दोन दिवसापासून पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नाही. तसेच, गढूळपणामुळे शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर परिणाम होत असल्यामुळे ठाणे शहराकडे येणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे. पंपाच्या स्टेनरमधील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. या कारणामुळे आज, रविवार, २७ जुलै, २०२५ रोजी दुपारपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. तसेच, पुढील दोन दिवस अपुऱ्या प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी. या काळात पाणी उकळून प्यावे आणि पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
4
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 27, 2025 07:30:34Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2707ZT_WSM_ADOL_DAM_OVERFLOW
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नद्या,नाले तुडुंब भरून वाहत आहेत.याच पावसामुळे मालेगाव तालुक्यातील खंडाळा येथील आडोळ मध्यम सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून गेला आहे.आडोळ प्रकल्प तुडुंब भरल्यामुळे रिसोड शहरासह शिरपूर, रिठद आणि परिसरातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची समस्या मोठ्या प्रमाणात सुटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
6
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 27, 2025 07:30:12Ratnagiri, Maharashtra:
रोहित पवार शरीराने शरद पवार यांच्यासोबत आहेत... पण मनाने ते भाजपमध्ये असल्याचं नितेश राणे यांनी म्हटला आहे...
रोहित पवार भाजपचा कुणाकुणाच्या मंत्राच्या संपर्कात असतात हे देखील बघा असा देखील राणे म्हणाले आहेत-
नितेश राणे
3
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 27, 2025 07:02:55Beed, Maharashtra:
बीड: गेवराई तालुक्यातील दैठण येथील रस्त्यावरुन पाण्याचा विसर्ग, दोरीच्या साह्याने पुल पार करण्यासाठी ग्रामस्थांची कसरत; व्हिडिओ व्हायरल
Anc : बीड जिल्ह्यात दोन दिवसापासून सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तर अनेक ठिकाणचे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. गेवराई तालुक्यातील कट चिंचोली येथील विद्यार्थी 4 किमी अंतर पार करून दैठण गावातील शाळेत जातात. मात्र रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने पूल बांधलेला नसल्याने रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहु लागले. यामुळे बस किंवा कुठलीही गाडी पुढे जाऊ शकत नव्हती. बराच वेळ विद्यार्थी अडकून पडले होते यानंतर शिक्षक आणि काही ग्रामस्थांनी मिळून दोरीच्या साह्याने सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप दुसऱ्या बाजूला काढून देत घरापर्यंत पोहचवले. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
9
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowJul 27, 2025 06:49:55Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_RAIN_LOSS_BYTE आठ फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
अमरावती जिल्ह्यात गेल्या 48 तासापासून पावसाची संततधार; तूर, सोयाबीन आणि कापसाचे पिकं पाण्याखाली, शेतकरी संकटात
अँकर :- अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संततधार पावसामुळे तूर, सोयाबीन आणि कापूस या खरीप हंगामामधील पिके पाण्याखाली गेली असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये संतधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असून हा पाऊस असाच सुरू राहिला तर यापेक्षाही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते असा अंदाज वर्तविल्या जात आहे. सरकारने सर्व शेतकऱ्यांना पीक विमा काढन्याचे आव्हान केले होते त्यानंतर शेतकऱ्यांनी विमा काढला असून शेतकरी आता नुकसान भरपाईची मागणी करीत आहे.
बाईट :– उमेश महिंगे, नुकसानग्रस्त शेतकरी
12
Report
ABATISH BHOIR
FollowJul 27, 2025 06:49:38Kalyan, Maharashtra:
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याणच्या भरारी पथकाची कारवाई
उल्हासनगरमध्ये इलेक्ट्रिक वस्तू रिपेअरिंगच्या नावाखाली बेकायदेशीररित्या महागड्या परदेशी दारु तस्करीचा पर्दाफाश
"स्कॉच°तस्कर गजाआड, लाखोंची स्कॉच जप्त
Anchor :- मोबाईल लॅपटॉपसह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रिपेरिंगच्या नावाखाली दुकान थाटले .या दुकानात परदेशातून एकादशी रित्या भारतात एक्साईज ड्युटी चुकवून भारतात आणलेल्या महागड्या दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका दारू तस्कराला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याणच्या भरारी पथकाने बेडा ठोकल्यात.कमलेश दहराम असे या आरोपीचे नाव आहे कमलेश कधीपासून हा व्यवसाय करत होता याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक करत आहे .
Anc..उल्हासनगर परिसरात विविध व्यवसायाच्या पडद्याकडून बेकायदेशीर रित्या परराज्यातून परदेशातून महागड्या स्कॉच विदेशी दारू आणून त्या विक्री होत असल्याच्या अनेक घटना इथून मागे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याणच्या भरारी पथकाने उघडकीस आणल्या आहेत . उल्हासनगर एक परिसरात जय सत्यानंद ट्रेडर्स या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रिपेरिंग च्या दुकानात परदेशी महागड्या दारूच्या बाटल्या विकल्या जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याणच्या भरारी पथकाला मिळाली होती . हा दारू तस्कर परदेशातून एक्साईज ड्युटी चुकवून महागडा दारू या भारतात विकत होता . माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण भरारी पथकाने त्याच्या दुकानाच्या परिसरात सापळा रचला आणि कमलेश दहराम या दारू तस्कराला बेड्या ठोकल्यात .त्याच्या दुकानातून परदेशातून आणलेल्या स्कॉचच्या सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीच्या 69 बाटल्या जप्त केल्या आहेत
BYTE :- दीपक परब ( राज्य उत्पादन शुल्क विभाग कल्याण भरारी पथक प्रमुख)
11
Report