Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

अजित पवार तनपूरेंच्या भेटीला, शेतकऱ्यांच्या मेळाव्यानंतर खास स्नेहभोजन!

KJKunal Jamdade
Jul 27, 2025 07:46:10
Shirdi, Maharashtra
Rahuri News Flash Big Breaking उपमुख्यमंत्री अजित पवार तनपुरेंच्या भेटीला... *शरद पवार गटाचे माजी आमदार प्राजक्त तनपूरे आणी प्रसाद तनपूरे यांच्या भेटीला...* राहुरी येथे तनपूरे वाड्यावर प्राजक्त तनपूरे यांनी केले स्वागत... *प्राजक्त तनपूरे जयंत पाटलांचे भाचे...* शेतकरी मेळाव्यानंतर तनपूरेंच्या घरी अजित दादांचे स्नेहभोजन... अजित पवार तनपूरेंच्या घरी पोहचल्याने चर्चेला उधाण... *चुलते अरूण तनपूरे यांच्या पाठोपाठ प्राजक्त तनपूरेही अजित पवारांसोबत जाणार असल्याची चर्चा...* माजी खासदार प्रसाद तनपूरे आणि माजी आमदार प्राजक्त तनपूरे यांनी केले अजित पवारांचे स्वागत.. *अजित पवारांनी तब्बेतीची केली विचारपूस...* प्रसाद तनपूरेंना काळजी घेण्याची अजित दादांची विनंती...
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Jul 27, 2025 11:32:28
Nashik, Maharashtra:
feed send by 2c reporter-sagar gaikwad slug-nsk_chavhan_byte मंगेश चव्हाण पॉइंट्स... *On रेव्ह पार्टी* - माहिती नाही मिळाली वस्तुस्थिती समोर आली आहे खडसेंच्या जावयाने रेव पार्टी आयोजित केली होती - प्रत्येक गोष्टीकडे राजकीय दृष्ट्या बघता येत नाही - त्यांनीच ती रूम बुक केली आहे ते स्वतः त्या मित्रांसोबत गेले होते त्या ठिकाणी मुली देखील आढळून आले आहेत - अल्कोहोल आणि ड्रग्स याचे देखील रिपोर्ट समोर येतील. - खडसेंच्या जावयाला रूम बुक करायला कुठलाही सत्ताधारी नेत्याने सांगितलं नाही - जावयांचे उद्योग काय परिवारातल्या लोकांचे उद्योग काय याकडे खडसेंनी बघितलं पाहिजे - ड्रग्स च्या व्यवसायामध्ये ते देखील आहेत का अशी भीती आम्हाला वाटू लागली - तिथे ज्या मुली होत्या त्यांच्यावर काही लैंगिक अत्याचार झाले आहेत का हे देखील तपासलं पाहिजे - दिवसभर कार्यक्रमात असल्यामुळे त्याची मी सविस्तर माहिती घेतलेली नाही मात्र याची सविस्तर माहिती घेऊन मी पत्रकार परिषद घेणार .
1
Report
NMNITESH MAHAJAN
Jul 27, 2025 11:05:48
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2707ZT_JALNA_CROP_WKT(2 FILES) जालना | जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली सोयाबीन,कपाशी,मका पिकांना फटका बसण्याचा अंदाज पिकांच्या खोडापर्यंत पाणी साचल्यानं पिकं सडण्याची भीती,(वाक थ्रू) अँकर : जालना जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झालाय.या पावसामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेलीयत.सततच्या पावसामुळे सोयाबीन, मका आणि कपाशी बरोबरच खरीप पिकांमध्ये पावसाचं पाणी साचलंय.सलग 5 ते 6 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसा मुळे पिकांच्या खोडापर्यंत पाणी साचल्यानं ही पिकं सडण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे आणि जालन्यातील पिकांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी. वाक थ्रू : नितेश महाजन,प्रतिनिधी, जालना
10
Report
SNSWATI NAIK
Jul 27, 2025 11:04:57
Navi Mumbai, Maharashtra:
story slug -: सोशल मीडियावर राहूल गांधींची बदनामी करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी. सोशल मीडिया पर राहुल गांधी के खिलाफ बदनामी करने वालो की खिलाफ मामला ftp slug - nm social post rahul gandhi shots- reporter- swati naik navi mumbai Anchor -: कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांच्याबाबत सोशल मीडियावर अपप्रचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आलेय. याप्रकरणी काँग्रेच्या शिष्टमंडळाने नेरूळ पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची भेट घेत निवेदन दिलेय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी जाहीर सभेत केलेल्या विधाना प्रकरणी राहुल गांधी यांच्याविरुद्ध नाशिकमध्ये दाखल खटल्यात त्यांना जामीन मंजूर करण्यात आला असताना देखील काही समाजकंठक समाजात तेढ निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर या खटल्याबाबत न घडलेल्या घडामोडी मांडून समाजव्यवस्थेत वाद निर्माण करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केलाय. gf- ==========================
10
Report
ABATISH BHOIR
Jul 27, 2025 11:03:12
Kalyan, Maharashtra:
कल्याणच्या कचोरा परिसरामध्ये सहा घराची भिंत कोसळली.. सुदैवाने कोणतीही अजित आणि झालेली नाही. मात्र सहा घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान... Anc.. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने कचोरे टेकली वरील माती खचल्याने घराच्या चाळी मधल्या पाच ते सहा रूम च्या भिंती कोसळल्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे मात्र एक दिवस अगोदरच घरांना तडे गेल्याने काही घरातील लोकांनी घरं खाली केली होती त्यामुळे मोठी जीवितहानी टळली झाली नाही मात्र आज सकाळच्या वेळेस भिंत कोसळल्याने घराचे नुकसान झालेले आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी Wkt... आतिश भोईर कल्याण
8
Report
NMNITESH MAHAJAN
Jul 27, 2025 10:51:42
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2707ZT_JALNA_BRIDGE_WATER(9 FILES) जालना : भुयारी रेल्वे पुलात साचलं पावसाचं पाणी दुचाकी पाण्यातून जाईनात,पावसाचं पाणी दुचाकीच्या इंजिनमध्ये शिरत असल्यानं दुचाक्या पडतायत बंद अपंगांचेही होतायत हाल अँकर :जालन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पावसाचं पाणी आता थेट रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या भुयारी रेल्वे पुलात शिरलं आहे.साचलेलं पाणी थेट कमरेपर्यत जात असल्यानं दुचाकी चालकांचे हाल होतायत.दुचाकी या भुयारी मार्गातून जाताना दुचाकीच्या इंजीनमध्ये पाणी शिरत असल्यानं दुचाकी बंद पडतायत या प्रकारामुळे दुचाकी चालकांचे हाल होत आहेत.तर अपंगांना देखील या भुयारी मार्गातून त्रास सोसावा लागतोय.या भुयारी उड्डाणपूलातून जाण्यासाठी नागरीकांना तासांतास वाट बघावी लागतेय.दुसरीकडे या भुयारी मार्गात साचलेलं पाणी मोटारीने काढण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.मात्र अजूनही नागरीक त्रस्त आहेत. बाईट : नागरीक
5
Report
PPPRANAV POLEKAR
Jul 27, 2025 10:50:30
Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी - उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची झालेली भेट ही सर्वांसाठी आनंददायी त्यामध्ये राजकीय तर्कवितर्क लावू नयेत एखादा कुटुंब भावनिक होऊन एकत्र येत असेल त्याच्यामध्ये फूट पाडावी असा मी कार्यकर्ता नाही वाढदिवसानिमित्त त्यांनी ज्या शुभेच्छ आमच्या देखील त्यांना शुभेच्छा पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी तपास सुरू आहे तपासामध्ये जे काही खरं आहे ते समोर येईल त्यांनीही रेव पार्टी आयोजित केली त्यांच्यावर ती कारवाई होईल बाईट उदय सामंत उद्योग मंत्री
10
Report
SMSarfaraj Musa
Jul 27, 2025 10:31:45
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - अभूतपूर्व गोंधळात पार पडणारी शिक्षकांची सभा,यंदा पार पडली शांततेत ! अँकर - सांगलीमध्ये शिक्षक सोसायटीची वार्षिक सभा यंदा खेळी-मेळीच्या वातावरणामध्ये पार पडली आहे.दरवर्षी अभूतपूर्व गोंधळात शिक्षक बँकेची सभा पार पडत होती.शिक्षकांची बँक असणारी शिक्षण सेवक सहकारी सोसायटीची 92 वी वार्षिक सभा सांगलीतल्या डेक्कन हॉलमध्ये पार पडली,सभेच्या सुरुवातीला बँकेकडून अनेक ठराव आणि अहवाल मांडण्यात आला,याला सभासदांकडून मंजुरी देखील देण्यात आली. मात्र काही विरोधकांकडून सत्ताधारयांच्या कारभारावर आक्षेप घेत,गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला,तर बँकेच्या अहवालाला सर्वांनी मते मंजुरी मिळालेली असताना देखील,काही मुद्दा नसल्याने काही लोकांनी जाणून-बुजून सभा उधळून लावण्यासाठी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला,पण तो अयशस्वी ठरला,असा आरोप सत्ताधारी गटाकडून करण्यात आला आहे. तर दरवर्षी शिक्षक बँकेच्या सभेच्या निमित्ताने शिक्षकांचा असाभ्यवर्तन पाहायला मिळत असायचं, त्यामुळे शिक्षकांच्या वार्षिक सभेच्या कडे सगळ्यांचाच लक्ष राहायचं. बाईट - राजाराम पाटील - अध्यक्ष - शिक्षण सेवक सहकारी सोसायटी,सांगली.
8
Report
MMMahendrakumar Mudholkar
Jul 27, 2025 10:31:16
Beed, Maharashtra:
बीड: धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा.. आमदार प्रकाश सोळंके यांची जाहीर नाराजी.. 45 वर्षात मराठा समाजाचा कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री झाला नाही, मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केली खदखद.. Ac - माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळात पुनर्वापसीची चर्चा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी पक्षश्रेष्ठीवर उघड नाराजी व्यक्त करत खदखद व्यक्त केली आहे. पक्षाला ज्या समाजाने भरभरून मदत केली त्याच समाजाला गेल्या 45 वर्षापासून मंत्री मिळत नाही हे दुर्दैव आहे. मंत्री पदासाठी माझी जात आडवी येते अशी खंत आमदार सोळंके यांनी बोलून व्यक्त केली आहे... आमदार धनंजय मुंडेंना संधी मिळत असेल तर माझ्या शुभेच्छा.. त्यांना बीडच पालकमंत्री करावा किंवा राज्य पातळीवरील मोठ पद द्याव असे मिश्किल वक्तव्य सोळंके यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. अनेक वेळा पक्ष श्रेष्ठींसोबत याबाबत मी चर्चा देखील केली मात्र वायफळ गेले असे सांगत प्रकाश सोळंके यांनी थेट पक्षश्रेष्ठीवरच निशाणा साधला आहे. बाईट : प्रकाश सोळंके , आमदार
11
Report
GMGANESH MOHALE
Jul 27, 2025 10:29:48
Washim, Maharashtra:
वाशिम: File:2707ZT_WSM_TAPOVAN_ROAD रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर :वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र तपोवन हे श्रावण महिन्यात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. परंतु पांगरी नवघरे ते तपोवन रस्ता अतिशय खराब अवस्थेत असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.श्रावण सुरू होताच पंचक्रोशीसह जिल्हाभरातून तसेच शेजारील जिल्ह्यांतून हजारो भाविक दररोज येथे येत आहेत.मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.काही ठिकाणी दुचाकीस्वार घसरून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांनी तात्काळ डागडुजी व डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे.
12
Report
AAABHISHEK ADEPPA
Jul 27, 2025 10:28:45
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - मातोश्री हे स्व.बाळासाहेब ठाकरे यांच निवासस्थान आहे हे अधोरेखित करून राज ठाकरेंनी येणाऱ्या भविष्यकाळातील वादळाची नांदी दिली आहे - ज्योती वाघमारे प्रा.डॉ. ज्योती वाघमारे, शिवसेना प्रवक्त्या ऑन राज ठाकरे पोस्ट.. - वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे ही महाराष्ट्रातील राजकारणाची संस्कृती आणि परिपक्वता आहे.. - दोन भाऊ एकमेकांना शुभेच्छा देत असतील तर तो आनंदच आहे.. - देवेंद्र फडणवीस आणि अजित दादांनाही शरद पवार साहेबांनी शुभेच्छा दिल्या होत्या.. - उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या चुलत भाऊ आहेत त्यामुळे शुभेच्छा देणारच.. - पण पोस्ट मधील अधोरेखित करणारी गोष्ट म्हणजे पहिल्या ओळीत मोठ्या भावाला शुभेच्छा दिल्या.. - पण त्या पोस्टमध्ये मातोश्रीचा उल्लेख करत असताना बाळासाहेब ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री आवर्जून उल्लेख त्यांनी केला.. - यातून खूप काही सूचित केलं आहे. - यातूनच राज ठाकरे यांना खूप काही सांगायचं आहे असं वाटतं.. - या पोस्टच्या माध्यमातून बाळासाहेबांसोबत च्या आठवणी राज ठाकरे आठवत आहेत का? - ठाकरे हा ब्रँड बाळासाहेबांचाच होता का हे सुचित करायचे आहे का.. - हाच तो 27 जुलैचा दिवस होता का, जेव्हा मुंबईत सर्वत्र पाणी भरलं होतं तेव्हा उद्धव ठाकरे हे आपल्या मुलाबाळांना घेऊन एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करत होते.. - वेळेस हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मातोश्रीवर एकटं सोडलं होतं.. त्यावेळेस पोलिसांना बाळासाहेबांची सुटका करावी लागली होती.. - या सर्व आठवणी राज ठाकरे यांच्या मनात दाटून येत आहेत का असा टोलाही लगावला.. - उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांनी वरवरच्या शुभेच्छा दिल्या आहेत. - मातोश्री हे हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच निवासस्थान आहे हे अधोरेखित करून राज ठाकरेंनी येणाऱ्या भविष्यकाळातील वादळाची नांदी दिली आहे.. - ही वादळापूर्वीची शांतता आहे का? Byte : ज्योती वाघमारे, शिवसेना प्रवक्त्या
14
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Jul 27, 2025 10:26:28
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 2707ZT_MAVAL_BHUSHI_DAM Total files : 02 Headline -लोणावळ्यातील भुशी धरणाचे पाणी वाढले -भुशी धरणावर पोलीसांची सतर्कता Anchor: मावळात तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या भुशी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून, भुशी धरणाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने लोणावळा पोलीसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यटकांना या पाण्यात जाण्यापासून रोखले आहे, लोणावळ्यात पर्यटकांनी पाय ठेवताच पर्यटकांची पहिली पसंती भुशी धरणाला असते, मात्र सध्या भुशी धरणाच्या सांडव्यावर फक्त लोणावळा शहर पोलीस प्रशासन आपलं कर्तव्य भर पावसात बजावत असल्याचं दिसून येत आहे.
14
Report
UPUmesh Parab
Jul 27, 2025 09:56:25
Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग -- मंत्री नितेश राणे byte on राज उद्धव भेट --- कुटुंब एकत्र येत असेल तर कोणाला वाईट वाटण्याची गरज नाही पण राज साहेबांनी मनाचा मिठेपणा दाखवून उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला गेले पण राज ठाकरेंच्या वाढदिवसाला उद्धव ठाकरे गेले होते का? राज साहेबांना मातोश्रीतून कायमस्वरूपी काढण्यासाठी ज्या उद्धव ठाकरेंनी षडयंत्र केले. आज त्याच उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंच स्वागत करावं लागत आहे. ह्याला अधोगती म्हणतात. On राज उद्धव युती काँग्रेसला परवडेल का? --- बिहार उत्तरप्रदेशच्या लोकांना मारलं जातं आहे त्यांच्या विरोधात जी ( मनसे ) भूमिका घेतली जातं आहे ती काँग्रेसला मान्य आहे का ? काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षाना शोधा त्यांनी याच उत्तर द्यावं on रेव्ह पार्टी - गिरीश भाऊ त्यावर बोलले आहेत. Byte --- नितेश राणे, पालकमंत्री, सिंधुदुर्ग
14
Report
KJKunal Jamdade
Jul 27, 2025 09:45:45
Shirdi, Maharashtra:
Rahuri News Flash अजीत पवार बाईट पॉईंटर्स - ऑन प्रकाश सोळंके नाराजी - या मंगळवारी बैठक , त्यात आमदारांशी चर्चा करेल आणि त्यांना त्यांचं म्हणणं विचारेल... ऑन एकनाथ खडसे जावई - सी पी कायद्याने आणि नियमाने तपास करतायत , जे सापडले त्यांच्यावर रितसर कारवाई करतायत... कोणीच चुकीच वागायच नसतं , चुकीच करायच नसतं... ऑन राज उद्धव भेट - खुप चांगल बघतो या भेटीकडे , तो त्यांच्या घरातला प्रश्न ... त्यांचे विचार स्वतंत्र आहेत , भावा भावांनी काय कराव ? तु आणि तुझा भाऊ वेगळे राहिलात आणि विस वर्षानंतर एकत्र आले तर वाईट वाटायच काय कारण ? आनंद वाटला पाहिजे.. पवार - पवार एकत्र येण्यावर आणि प्राजक्त तनपुरे यांच्या प्रश्नावर शुभेच्छा अस म्हणत बोलणे टाळले... bite - अजित पवार उपमुख्यमंत्री
14
Report
NMNITESH MAHAJAN
Jul 27, 2025 09:33:22
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2707ZT_JALNA_RAINWATER(2 FILES) जालना | मुसळधार पावसामुळे जफरखान चाळीतील घरात शिरलं रस्त्यासह नाल्यांचं पाणी महानगरपालिकेचं पितळ उघड नागरीकांनी रात्र जागरण करून काढली अँकर | जालना शहरात गेले तीन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत तसेच रस्त्यांवर पाणी साचलं आहे. काही घरांमध्ये देखील पावसाचं पाणी शिरलंय.यामुळे वयोवृद्ध, लहान मुलं आणि महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान नागरीकांच्या घरात पाणी शिरल्यानं जालना महानगरपालिकेचं पितळ उघड झालं आहे. शहरातील जफर खान चाळी मध्ये रस्त्यावरून वाहणारं पाणी थेट घरात शिरल्यानं जीवन विस्कळीत झालं आहे. काही घरांतील फर्निचर, अन्नधान्य आणि कपडे खराब झाले आहेत. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप मदतीसाठी कोणताही ठोस उपाय करण्यात आलेला नाही.महापालिका प्रशासनाने साचलेलं पाणी बाहेर निघण्यासाठी तातडीनं लक्ष घालण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.
14
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Jul 27, 2025 09:20:02
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज..‌ स्किप्ट ::- आणीबाणीची पुनरावृत्ती? रवीकांत तुपकरांचा सरकारला इशारा... AC::- १९७७ साली इंदिरा गांधींनी चळवळी दडपण्याचा प्रयत्न केला होता, आणि आजचं सरकारही त्याच पद्धतीने शेतकरी चळवळींना संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा थेट आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केलाय. लातूर दौऱ्यावर आलेल्या तुपकरांनी विजयकुमार घाडगे यांची भेट घेतली आणि सरकारला स्पष्ट इशारा दिला की, चळवळीत काम करणाऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या नादाला लागू नये. आणीबाणी काळात जशा आंदोलनांची ठिणगी पेटली होती, त्याच पद्धतीचा मोठा लढा या सरकारविरोधात पुन्हा उभा करू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे... बाईट ::- रविकांत तुपकर
13
Report
Advertisement
Back to top